भिगवण पोलिसांची उल्लेखनीय कारवाई: CEIR पोर्टलच्या मदतीने २.५ लाखांचे १० गहाळ मोबाईल हस्तगत करीत मूळ मालकांना केले परत!
भिगवण वार्ताहर. दि. 20
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतून सन २०२५ व २०२६ या कालावधीत शेतकरी, व्यापारी आणि नोकरदारांचे गहाळ झालेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या प्रभावी वापराद्वारे पोलिसांनी सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे १० गहाळ मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत केले...
भिगवण पोलिसांची उंचावली मान अधिकारी यांना मिळाला गृह मंत्रालयाचा बहुमान: स. पो. नि.सोमनाथ शेंडगे व सचिन पवार यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक व प्रशस्तीपत्रक’ प्रदान
भिगवण (प्रतिनिधी):महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकालीन, निष्कलंक आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भिगवण पोलीस ठाण्याचे (पुणे ग्रामीण) प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ सिंधू पांडुरंग शेंडगे आणि पोलीस अंमलदार सचिन रतन अशोक पवार यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून सन २०२६ चे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.या उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य (मुंबई)...
बारामतीत सराईत चोराच्या मुसक्या आवळून 30 लाखाच्या 19 बुलेट हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखा बारामती आणि तालुका पोलिसांची धाडसी कारवाई.
भिगवण वार्ताहर. दि. 14
बारामती शहर आणि तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बुलेट मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बारामती तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ३० लाख रुपये किमतीच्या १९ मोटारसायकली (१३ बुलेट व ६ इतर...
भिगवण पोलिसांची धडक कारवाई: गावठी पिस्तूल अन् स्कॉर्पिओसह ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपीस बेड्या!
भिगवण वार्ताहर. दि. 11
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील निरगुडे परिसरात गावठी पिस्तूल बाळगून फिर्यादीस गोळ्या घालण्याची धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला भिगवण पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र), एक जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ५ लाख ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला...
उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या शिष्टाईला यश: अमर बौद्ध युवक संघटनेचे आमरण उपोषण काही दिवसासाठी स्थगित
भिगवण दि. 4
मदनवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याच्या निषेधार्थ अमर बौद्ध युवक संघटनेने सुरू केलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) चैतन्य कदम यांनी केलेल्या मध्यस्थी आणि यशस्वी शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला,...
भिगवणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अवमानावरून तीव्र संताप; अमर बौद्ध संघटनेचे आमरण उपोषण, भिगवण बंदला शंभर टक्के प्रतिसाद
भिगवण वार्ताहर | दि. 3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे तसेच दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाने आयोजित केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व कार्यक्रमात' संविधानाचे जनक व कायदेपंडित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार व निष्काळजी भूमिकेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर...
लज्जास्पद! स्वतःच्याच अल्पवयीन नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील गावात घडला मनाला सुन्न करणारा प्रकार ! भिगवण पोलिसांनी घटनेतील गांभीर्य ओळखुन तातडीने आवळल्या नराधमाच्या मुसक्या
भिगवण वार्ताहर. दि. 31भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात गतिमंद असलेल्या अल्पवयीन निर्भयावर नात्यातील आजोबाने अत्याचार केल्याची घटना घडली.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात निर्भयाच्या आईने तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. भिगवण पोलिसांनी तातडीने...
मदनवाडी गावच्या हद्दीत पिकअप वाहनाने ठोकरल्याने जेष्ठ नागरिकांचा मृत्यू
भिगवण वार्ताहर. दि. 31भिगवण बारामती राज्यमार्गांवर मदनवाडी गावच्या हद्दीत मालवाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने ठोकरल्याने मदनवाडी गावातील जेष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यावर पिकअप ड्रायव्हर याने वाहणासह पळ काढला मात्र पोलिसांच्या तातडीच्या तपासामुळे वाहन आणि ड्रायवर याचा शोध घेण्यात आला.याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित प्रभारी पोलीस अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी 30 तारखेच्या सकाळी...
पुणे सोलापूर महामार्गांवर अज्ञात वाहनाने दुचाकी स्वारास चिरडले ; भादलवाडी हद्दीतील अपघात
पुणे सोलापूर महामार्ग ठरतोय जीवघेणा ; अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करताना महामार्ग प्रशासन ठरतोय अपयशी
भिगवण वार्ताहर. दि. 12पुणे सोलापूर महामार्ग जीवघेणा ठरत असताना स्थानिक नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला सेवा मार्गही अपघाती ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण याच भिगवण ते भादलवाडी सर्व्हिस रोडवर अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू...
पुणे सोलापूर महामार्गांवर उभ्या गाडीला धडकून झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू. तीन जण गंभीर जखमी
भिगवण वार्ताहर. दि. 26
पुणे सोलापूर महामार्गांवर डाळज गावाच्या हद्दीत पुणे कडे जाणाऱ्या लेन वर पंक्चर झालेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून इको गाडीने दिलेल्या धडकी मुळे झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका दोन वर्ष्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला तर 10 महिन्याची चिमुकली जखमी झाली इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची...





























