इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथून ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल, पोलिसांचे तपासाचे आवाहन

0
365

​भिगवण वार्ताहर. दि. 23

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथून एक ३० वर्षीय महिला बेपत्ता झाली असून, तिच्या अपहरणा बाबत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार सारिका ज्योतीराम वाघ वय 30 म्हसोबाचीवाडी असे अपहरण झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. पती ज्योतीराम यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांची पत्नी सारिका वय 30 ही दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास ‘ड्रीम प्लास्ट, एमआयडीसी बारामती’ येथे कामाला जाते असे सांगून घरातून निघाली होती. परंतु, ती अद्याप घरी परत आलेली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तिचे अपहरण केले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.


​या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २३२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहृत महिलेचे वर्णन सारिका ज्योतीराम वाघ३० वर्षे सडपातळरंग काळा-सावळा आहे.
​सदर महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास किंवा ती दिसून आल्यास भिगवण पोलीस स्टेशन (दूरध्वनी: ०२११८-२४६२३३) किंवा संबंधित तपास अधिकारी सचिन भस्मे मो. 9881387487, 9552164100
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here