भिगवण पोलीस ठाण्यातील अंमलदार सचिन भस्मे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; परिसरात हळहळ

0
384

​भिगवण वार्ताहर. दि. 26
भिगवण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ पोलीस अंमलदार सचिन भस्मे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलासह भिगवण आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, सचिन भस्मे हे भिगवण पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना म्हसोबावाडी बीटची जबाबदारी सांभाळत होते. गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना अचानक छातीत वेदना जाणवू लागल्या. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना तातडीने उपचारासाठी बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना लागोपाठ हृदयविकाराचे दोन तीव्र झटके आले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
​सचिन भस्मे यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष होता. त्यांच्या निधनाने पोलीस खात्यासह समाजात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
दरम्यान, सेवेत असतानाच त्यांना अशा प्रकारे जीव गमवावा लागल्याने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर असलेल्या कामाच्या आणि मानसिक ताणाचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर बनल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here