वालचंदनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! खंडणीखोर पत्रकार सुंदर कुसाळकरला बेड्या; भुरट्या पत्रकारितेचा बुरखा टरकावला
भिगवण वार्ताहर. दि. 29
भिगवण पोलीस स्टेशनं येथे 2023 मधील खंडणी गुन्हा दाखल असलेल्या कथित पत्रकार असणाऱ्या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी सिनेमा स्टाईल सापळा रचून अटक केली.सुंदर दगडू कुसाळकर रा. कृष्णकुंज सोसायटी भिगवण असे अटक करण्यात आलेल्या कथित पत्रकाराचे नाव असून 2023 साली या आरोपी विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे.
याबाबत सविस्तर माहिती प्रमाणे भिगवण बाजारपेठेतील सरांफी व्यावसायिक असणाऱ्या फिर्यादी सुरेश पिसाळ यांच्या मुला विरोधात खोट्या आणि गंभीर गुन्ह्यांची धमकी देत कुसाळकर याने 6 लाख रुपयाची खंडणी घेतली होती.
तर खंडणी मिळाल्या नंतर खुनशी प्रवृत्ती बाळगून हद्दीबाहेरील पोलीस ठाण्यात जाऊन फिर्यादी यांच्या मुला विरोधात गुन्हा नोंद केली. खंडणीचा गुन्हा भिगवण येथे नोंद होऊनही आरोपी आणि फिर्यादी मीडिया मध्ये काम करीत असल्याने तत्कालीन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्याचा तपास वालचंद पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला होता. 33 महिने पत्रकारितेचा रुबाब दाखवीत आणि रात्रीच्या वेळी खंडणी हप्ते मिळणाऱ्या भक्षाच्या शोधात बाहेर पडणाऱ्या तथाकथित पत्रकाराला पकडणे हे पुणे ग्रामीण पोलिसांना आव्हान होते. मात्र या आव्हानाचा वालचंदनगर पोलिसांनी सामना करीत इंदापूर कोर्ट परिसरात सापळा रचित या सोकॉल पत्रकारांच्या मुसक्या आवळल्या. 27 तारखेला अटक करीत 28 तारखेला मेहेरबान न्यायालयात हजर केले असता त्याला मेहेरबान कोर्टाने 29 तसेच 30 अशी दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.
सदर अटकेची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैत्यन्य कदम यांच्या मार्गदर्शना खाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोपाळ पवार, राईटर अधिकारी अभिजित कळसकर, पोलीस सतीश चव्हाण या पथकाने केली.


















