सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित ‘राष्ट्रीय एकता रॅली’चे भिगवण येथे होणार स्वागत; भिगवण पोलिसांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

0
144

भिगवण (विशेष प्रतिनिधी):

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात येथील स्टॅच्यु ऑफ युनिटी (केवडिया) येथे ‘राष्ट्रीय एकता परेड’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, पुडुचेरी आणि अंदमान-निकोबार येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या वतीने एक विशेष प्रोत्साहन रॅली काढण्यात येत आहे.

​या राष्ट्रीय एकता रॅलीचे भिगवण शहरात दसरा सणा दिवशी औचित्यपूर्ण स्वागत करण्यात येणार असून, भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या वतीने विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संस्थांना एकत्र येऊन या रॅलीचे जंगी स्वागत व त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही रॅली दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास भिगवण शहरात आगमन करणार आहे. सोलापूर लेन नजीक असलेल्या हॉटेल सागर समोरील मोकळ्या प्रांगणात स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

​विविध संघटनांना पोलिसांचे निमंत्रण:

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ भिगवण, नेचरस् फाउंडेशन / सायकल क्लब, भिगवण मेडिको असोसिएशन, पत्रकार संघ भिगवण, परिसरातील सर्व धार्मिक व राजकीय संघटना तसेच सर्व अकॅडमीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रॅलीचे स्वागत करावे, अशी विनंती पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here