पद्मावती देवीच्या पहाटेच्या पायी वारीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची धाव; एपीआय सोमनाथ शेंडगे यांनी स्वतः चालत केली सुरक्षा सुनिश्चित

0
328

भिगवण वार्ताहर.दि. 17

पिंपळे (इंदापूर )येथील पद्मावती देवीच्या दर्शनासाठी निघणाऱ्या पहाटेच्या पायी वारीत महिला सुरक्षेचा एक उत्तम आदर्श पाहायला मिळाला आहे. पहाटेच्या अंधारात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि महिला भाविकांना सुरक्षित वातावरण लाभावे,भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक (API) सोमनाथ शेंडगे यांनी स्वतः पहाटेपासून पायी चालत महिलांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली.

भाविक महिला आणि ​स्थानिक परंपरेनुसार, पिंपळे येथील पद्मावती देवीला दर्शनासाठी पहाटे पायी चालत जाण्याला पसंती देतात . घट स्थापना झालेल्या पहिल्या दिवसा पासूनच देवीच्या दर्शनाला अनवाणी पायाने चालत जाणाऱ्या महिला आणि पुरुष दिवस उगाविण्याच्या आत देवीचे दर्शन घेतात. तक्रारवाडी, भिगवण, मदनवाडी, पोंधवडी, डिकसळ तसेच भिगवण रेल्वे स्टेशन येथील अनेक भाविक बारामती भिगवण राज्य मार्गांवरून देवीच्या दर्शनासाठी येत असतात.पहाटेची वेळ आणि अंधार असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली.


​पोलिसांचा संवेदनशील आणि आश्वासक सहभाग


​कोणताही बंदोबस्त केवळ कागदावर किंवा वाहनापुरता मर्यादित न ठेवता, एपीआय सोमनाथ शेंडगे यांनी स्वतः महिलांच्या सोबतीने पायी चालण्याचा निर्णय घेतला. पहाटेच्या अंधारात आणि भक्तिमय असणाऱ्या वातावरणात पोलीस अधिकारी आपल्यासोबत पायी चालत आहेत, हे पाहून महिला भाविकांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. तसेच शासकीय वाहनातून सायरन आणि दिवा लावून पोलीस मंदिर परिसरात तसेच मदनवाडी घाटात बंदोबस्त करताना आढळून आले.पोलिसांच्या या जनहितैषी व संवेदनशील भूमिकेचे सर्वच स्तरातून जोरदार स्वागत होत आहे.

​नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक

​पोलीस प्रशासनाच्या या तळागाळातील आणि आपुलकीच्या सहभागामुळे सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाला आहे. “पोलीस हे केवळ सुरक्षेसाठीच नाही, तर जनतेच्या सुख-दुःखात आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरांमध्येही खंबीरपणे पाठीशी उभे असतात,” अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल एपीआय सोमनाथ शेंडगे आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याबाबत बोलताना शेंडगे यांनी पुणे ग्रामीण पोलीस हे नेहमीच महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी नेहमी प्राधान्य देत असल्याचे सांगितले. तसेच सणासुदीच्या काळात आणि महिलांच्या आनंदी वातावरनात दर्शन व्हावे म्हणुन भिगवण पोलिसांनी हा उपक्रम राबवीला जात असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here