भिगवण पोलिसांची ‘बुलेट’ स्पीड कारवाई! ‘हिट अँड रन’ प्रकरणात वाहन जप्त करीत चालकाला ठोकल्या बेड्या; सपोनि सोमनाथ शेंडगे यांचा नेचर डेअरीकडून नागरी सत्कार

0
162

अपघातातील मृत साहिल भोसले नेचर डेअरीचा कामगार असल्यामुळे नेचर डेअरी व्यवस्थापन आणि कामगारांचे तपासाकडे होते विशेष लक्ष

​भिगवण वार्ताहर. दि. 20
भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या बुलेट अपघातातील ‘हिट अँड रन’ करून पळून गेलेल्या वाहनाचा तत्परतेने तपास लावून ते पकडण्यात भिगवण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल व तत्पर तपासाबद्दल नेचर डेअरीचे संचालक संदीपभैय्या देसाई आणि जनरल मॅनेजर डॉ. प्रशांत कदम यांच्या हस्ते भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे तसेच पथकातील अधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

घटना व पोलिसांची तत्परता:

काही दिवसांपूर्वी भिगवण परिसर हद्दीत बुलेट दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात नेचर डेअरी चा एम्प्लॉयी असणाऱ्या साहिल भोसले याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूमुळे नेचर डेअरी या संस्थेतील कामगार तसेच कंपनी व्यवस्थापन यांच्यावर दुःखाचा प्रसंग निर्माण झाला होता.अपघात घडवल्यानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला होता. यामुळे नेचर डेअरी चे संचालक संदीपभैया देसाई यांचे या प्रकरणी तपासाकडे विशेष लक्ष होते.
(‘हिट अँड रन’).
या गंभीर आणि आव्हानत्मक घटनेची तातडीने दखल घेत भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सी सी. टीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि परिसरातील तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच पळून गेलेल्या वाहनाचा शोध घेऊन ते पकडले.

पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक:

अपघातातील दोषी वाहनाचा शोध घेऊन न्याय मिळवून दिल्याबद्दल आणि कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण केल्याबद्दल नेचर डेअरीच्या व्यवस्थापनाने पोलिसांच्या या धडक कारवाईचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी नेचर डेअरीचे संचालक संदीपभैय्या देसाई आणि नेचर डेअरी चे जनरल मॅनेजर डॉ. प्रशांत कदम यांनी भिगवण पोलिस ठाण्यात जाऊन सोमनाथ शेंडगे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार केला.
यावेळी बोलताना संदीपभैय्या देसाई यांनी सांगितले की, “अपघात करून पळून गेलेल्या वाहणाचा सर्व पैलूने तपास करून मृत व्यक्तीस न्याय देण्याच्या भूमिका आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. यामुळे नागरिकांचा महाराष्ट्र पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो.”

​सत्काराला उत्तर देताना प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे ग्रामीण पोलिस नेहमीच कटिबद्ध आहेत. नागरिकांनी दिलेल्या या स्नेहामुळे आणि कौतुकामुळे कामाची ऊर्जा अधिक वाढते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here