Monday, October 5, 2026

भिगवण परिसरात चालू हंगामातील 505 मिलिमिटर पावसाची नोंद ; समाधानकारक पाऊस आणि उजनीच्या शंभरी मुळे सुखावला बळीराजा..

महा बँक ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहाय्यक देविदास फलफले यांची माहिती.. भिगवण वार्ताहर.दि.११ भिगवण परिसरात मे महिन्यात आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने समाधानी झालेल्या बळीराजाला दोन महिने कोरडे गेल्यामुळे सताविणाऱ्या काळजीला ९ ओगस्ट आणि १० ओगस्ट ला झालेल्या दमदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून उजनीच्या १०० टक्यांनी भरल्यामुळे बाजारपेठेत आनंद दिसून येत...

बारामती राशीन राज्यमार्गांवर तक्रारवाडी गावच्या हद्दीत मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने ठोकरल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू ; रविवार रात्री आठ वाजता घडला अपघात

भिगवण वार्ताहर.दि.११ बारामती राशीन राज्यमार्गावर तक्रारवाडी गावच्या हद्दीत जयभवानी हॉटेल समोर मालवाहतूक करणाऱ्या कॅरी गाडीने दुचाकीला ठोकर दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली .या अपघात १० वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात गणेश सुखदेव जाधव वय ३१ रा.शेटफळगढे यांचा जागीच...

भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना एकाचा अपघाती मृत्यू ; तोडलेल्या बॅरिगेट मुळे निष्पाप नागरिकाला गमवावा लागला जीव.

महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जी पणाचा बळी ; महामार्गांवरील तोडलेल्या बॅरिगेट बाबत कोणतीही कोणतीही कारवाई नाही. तसेच दुरुस्ती साठी यंत्रणा पाठविली नाही. भिगवण वार्ताहर.दि.२३ भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडीत असताना ट्रकची धडक बसून एका पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली .महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि व्यावसायिकांच्या आपमतलबी वृतीचा हा बळी...

भिगवण पोलीस आवारातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव ; इच्छुक खरेदीदारांना सहभाग नोंदविण्याचे सपोनि विनोद महांगडे यांचे आवाहन.

भिगवण वार्ताहर. दि.. 12 भिगवण पोलीस स्टेशन यांनी विविध कारवाईत तसेच संशयित गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन अनेक वेळा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात आले होते. याबाबत अनेक वेळा प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया तुन आवाहन करण्यात आले होते.या आवाहना नंतर अनेक...

भिगवण ग्रामपंचायत प्रशासनाकडून अपंग कल्याण निधीचे होणार वाटप ; अपंग (दिव्यांग )लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरपंच गुराप्पा पवार यांचे आवाहन.

भिगवण वार्ताहर. दि. 15भिगवण गावातील अपंग (दिव्यांग )नागरिकांचा निधी देण्याच्या कार्यवाहीला सुरवात केली असून लाभार्थी अपंग नागरिकांनी ग्रामपंचायत विभागाकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन सरपंच गुराप्पा पवार तसेंच उपसरपंच सत्यवान भोसले यांनी केले. तर ग्रामपंचायत सर्व लाभार्थी यांना निधी दिला जाणार असल्याची माहिती ही यावेळी सरपंच पवार यांनी दिली.पंचायत राज संस्था च्या उत्पनाच्या 5 टक्के निधी अपंग( दिव्यांग...

पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी ब्रिज वरून कंटेनर खाली कोसळला. चालकाचा अपघातात मृत्यू.

भिगवण वार्ताहर. दि. 15पुणे सोलापूर महामार्गांवर मदनवाडी ब्रिज वरून सर्व्हिस रोड वर कंटेनर कोसळल्याने झालेल्या भीतीदायक अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या कंटेनर खाली इतर वाहने आणि नागरिक न आल्याने मोठी जीवितहानी टळली. या भयानक अपघाताने तरी भिगवण कर नागरिक जे महामार्गांवर अतिक्रमण करून व्यवसाय करतात आणि अनधिकृत...

भिगवण मध्ये होळी आणि धुलवड सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी

भिगवण वार्ताहर. दि. 14 भिगवण शहरामध्ये होळी आणि धुलवड सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली असून सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिगवणची बाजारपेठे आसपासच्या 15 गावे आणि 40 च्यावर असणाऱ्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना रोज लागणाऱ्या वस्तू आणि सेवाचे ठरलेलं ठिकाण. त्यातच भिगवण साठी सर्व गाव आणि वाड्या वास्त्यावरून...

मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचा 20 लक्ष रुपयाचा निधी ; भिगवण वैकुंठ भूमीत होणार निवाऱ्याची सोय

भिगवण वार्ताहर.दि.११ भिगवण येथील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेडचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे शुभहस्ते सरपंच गुराप्पा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले .कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे यांनी सांगितले. भिगवण वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी शेडची व्यवस्था...

तक्रारवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ; जागतिक महिला दिनी स्तुत्य उपक्रम.

भिगवण वार्ताहर.दि.८ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तक्रारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करीत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. ग्रामपंचायत तक्रारवाडी गावच्या सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेविका ,आरोग्य उपकेंद्र अधिकारी ,वायरमन ,आरोग्य सेविका ,अंगणवाडी सेविका ,स्वस्त धान्य दुकानदार ,जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख, महिला शिक्षिका, ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी या सर्वच पदावर महिला काम...