महा बँक ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहाय्यक देविदास फलफले यांची माहिती..
भिगवण वार्ताहर.दि.११
भिगवण परिसरात मे महिन्यात आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने समाधानी झालेल्या बळीराजाला दोन महिने कोरडे गेल्यामुळे सताविणाऱ्या काळजीला ९ ओगस्ट आणि १० ओगस्ट ला झालेल्या दमदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून उजनीच्या १०० टक्यांनी भरल्यामुळे बाजारपेठेत आनंद दिसून येत आहे.
भिगवण परिसरात अनेक वर्षात निसर्गाने आपली किमया दाखवीत पहिल्यांदाच ४१७ .८० मिली मीटर इतक्या पावसाची बरसात केली होती.त्यामुळे बळीराजा आणि व्यापारी वर्ग हि आनंदी झाले होते .मात्र गेली जून ०० आणि जुलै ०० हे दोन महिने कोरडी गेल्यामुळे बळीराजाला चिंता सतावित असतानाच ओगस्ट मध्ये परत वरुणराजा बरसायला सुरवात झाली असून या महिन्यात जवळपास ८७.७० मिलीमीटर पाऊस बरसला असल्याची माहिती महाबँक ग्रामीण विकास केंद्राचे कृषीसहायक देविदास फलफले यांनी दिली.तर या हंगामातील आज अखेर ५०५.४० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहितीहि फलफले यांनी दिली.भिगवण परिसरात सरासरी इतका पाऊस पडत असतो तर २०२४ या साली ८०५ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली तर २०१२ साली २८८.७० इतक्या कमी पावसाची नोंद झाली असल्यामुळे या वर्षी वरुणराजा कोणता विक्रम करतो याची वाट बळीराजा पाहत आहे…


















