पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकाजवळ एसटी खाली चिरडून एकाचा मृत्यू तर दोघे जन जखमी ; पुढे जाण्याच्या नादात चालकाचा सुटला ताबा
भिगवण वार्ताहर.दि.२
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून एकाला जीव गमवावा लागला.तर दोघे जखमी होवून अनेक दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली.अपघात घडल्यावर एसटी ड्रायव्हर ने भिगवण पोलिसांत हजेरी लावून ब्रेक फेल झाल्याची बतावणी केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ एसटी...
पत्नीच्या मृत्यूमुळे आलेल्या नैराश्यातून गळफास घेत मदनवाडी गावाच्या तरुणाने संपविले जीवन. 7 महिन्याची चिमुकली आई वडिलांला झाली पोरकी
भिगवण वार्ताहर .दि.२९
अल्पशा आजाराने पत्नीचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून मदनवाडी येथील तरुणाने गळफास घेत जीवन संपवल्याची दुखद घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाळ उर्फ स्वप्नील प्रदीप सुतार वय.24 असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे .गोपाळ याचा भिगवण परिसरात मोबाईल विक्रीचा व्यवसाय असून दोन दिवसापूर्वीच गोपाळची पत्नी...
पुणे सोलापूर महामार्गांवर कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 1 गंभीर जखमी ; अति वेग आणि पावसाची रिप रिप मुळे अपघात घडल्याची शक्यता.
भिगवण वार्ताहर. दि. 1
भिगवण पुणे – सोलापूर महामार्गावर डाळज नं 3 (ता. इंदापूर) ग्रामपंचायतच्या हद्दीत चारचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 02) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील...
भिगवण बारामती रोडवर झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू !मदनवाडी पिंपळे घाटात अज्ञात वाहणाने ठोकल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता .
भिगवण वार्ताहर.दि.१२
भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात भिगवण येथील विशाल उर्फ भैया कैलास धवडे वय ४१ यांचा जागीच मृत्यू झाला.बारामती येथील खासगी कंपनीतून काम करून त्यांच्या ताब्यातील एम.एच.42 ए बी 9427 या...
तक्रारवाडी गांवात 1 कोटी 75 लाख रुपयांच्या विकास कामाला सुरवात ; गावाला रोल मॉडेल बनविण्याचा सरपंच मनीषा वाघ यांचा निश्चय
भिगवण वार्ताहर.दि.६
तक्रारवाडी गावात सत्ताबदलामुळे विकास कामाला चालना मिळाली असून गावातील अंतर्गत रस्त्याची जवळपास १ कोटी ७५ लाख रुपयाचा कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली आहे.तर कामातील दर्जा चांगला राहावा यासाठी सरपंच मनीषा वाघ कामाच्या ठिकाणी भेट देवून कंत्राटदार यांना योग्य त्या सूचना देत आहेत.
तक्रारवाडी गावात मागील २ वर्षापासून राष्ट्रवादी विचाराच्या...
स्कुलबस खाली चिरडून लहानग्याचा मृत्यू ;इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील घटना
भिगवण वार्ताहर.दि.१४
शाळकरी मुलांना शाळेतून घरी सोडत असताना दीड वर्षाच्या चिमुरड्याला स्कूलबस खाली चिरडल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे घडली.भोगी सणाच्या दिवशीच चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार या अपघातात स्वराज महेश...
बारामती भिगवण राज्यमार्गांवर झालेल्या अपघातात भिगवण येथील व्यवसायिकाचा जागीच मृत्यू ; अज्ञात वाहणाने दुचाकीला ठोकरल्यामुळे झाला अपघात
भिगवण वार्ताहर.दि.२
बारामती भिगवण राज्यमार्गावर लामजेवाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिगवण बाजारपेठेतील व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जोगेश नाथसाहेब पाचांगने वय ३२ असे अपघातात मृत झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.जोगेश सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भिगवण...
अकोले पोटनिवडणूकीसाठी ८७ टक्के मतदान ;दोन गटाची प्रतिष्ठा पणाला
सत्यवार्ता अकोले पत्रकार विजय गायकवाड-
इंदापूर तालुक्यात ८ पैकी ७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीच्या जागा बिनविरोध होऊन केवळ एकमेव निवडणूक लागलेल्या अकोले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज ८७ टक्के मतदान झाले.पोटनिवडणूकीच्या झालेल्या मतदानातून उद्या उमेदवारांचे निकालातून भवितव्य ठरणार आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणातुन एकमेकांची प्रतिष्ठा पणाला...
भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना एकाचा अपघाती मृत्यू ; तोडलेल्या बॅरिगेट मुळे निष्पाप नागरिकाला गमवावा लागला जीव.
महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जी पणाचा बळी ; महामार्गांवरील तोडलेल्या बॅरिगेट बाबत कोणतीही कोणतीही कारवाई नाही. तसेच दुरुस्ती साठी यंत्रणा पाठविली नाही.
भिगवण वार्ताहर.दि.२३
भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडीत असताना ट्रकची धडक बसून एका पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली .महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि व्यावसायिकांच्या आपमतलबी वृतीचा हा बळी...
चिमुकलीला उराशी कवटाळून विहिरीत उडी घेत विवाहितेने दिला जीव ; इंदापूर तालुक्यातील पोंधवडी पवार वस्ती येथील जीव पिळवटून टाकणारी घटना
भिगवण सत्यवार्ता प्रतिनिधी : दि.३
भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील पोंधवडी पवारवस्ती येथील विहिरीत चिमुकलीसह उडी घेत विवाहितेने जीव दिल्याची हृदयाला पिळवटून टाकणारी घटना घडली.याबाबत भिगवण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आईचा मृतदेह सापडल्या नंतर १० तासांनी चिमुकलीचा मृतदेह शोधण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोट नुसार धनश्री...