भिशी व्यापारी वर्गासाठी संजीवनी कि मारक ; व्यापारी चर्चेतील काही मुद्दे.
भिशीचे समर्थन नक्कीच नाही मात्र वाईट प्रवृती ठेचण्याची गरज...
भिगवण वार्ताहर. दि. 30भिगवण बाजारपेठेत चालू असणाऱ्या भिशी (सार्वजनिक फंड ) बाबत काही समाज माध्यमातून होत असलेल्या बदनामी बाबत व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून भिशी हा सर्वसामान्य व्यापारी वर्गाचा श्वास असून भिशी बंद पडल्यास व्यापारी पुन्हा सावकारी पाश आणि पतसंस्था च्या जाळ्यात अडकला...
भिगवण बारामती रोडवर उस वाहतूकीचा 6 वा बळी ; उपाय योजना करूनही जाताहेत जीव.
भिगवण पोलीस आणि महामार्ग पोलीस करत आहेत अपघात कमी होण्यासाठी रोज प्रयत्न आणि जनजागृती; परिवहन विभाग आणि कारखाना प्रशासन हि ऍक्शन मोड वर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरु.
भिगवण वार्ताहर. दि. 13
भिगवण बारामती मार्गांवर निरगुडे पाटीजवळ उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर ट्रॉलीचा आणि दुचाकी स्वाराचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची...
क्षीरसागर विद्यालयात आंतरराष्ट्रीय मानवअधिकार जनजागृती ; ऍड. तुषार झेंडेपाटील यांचे मिळाले मार्गदर्शन
भिगवण वार्ताहर.दि.११
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे ओचीत्य साधून भिगवण येथील क्षीरसागर विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कायदे तसेच ग्राहक जागृती बाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी एडव्होकेट तुषार झेंडेपाटील अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार याविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाला माहिती व्हावी राष्ट्रीय आयोग त्यातील विविध...
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात ; अपघातात वाहनांनी पेट घेतल्याने चालकाचा होरपळून मृत्यू
ऊस हंगामातील चौथा बळी. परिवहन विभाग आणि कारखाना प्रशासन यांनी चालकांना प्रशिक्षण देण्याची मागणी.
भिगवण वार्ताहर.दि.७
भिगवण बारामती रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत उस वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रॅकटर यांच्यात अपघात होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे ट्रॅकटर ड्रायव्हरचा जागीच जळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली .ऊस...
भिगवण ग्रामीण रुग्णालयाला उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची सरप्राईज व्हिजिट ; परिमंडळस्तरीय पथकाने घेतली कामकाज माहिती.
भिगवण वार्ताहर .दि.२९
भिगवण ग्रामीण रुग्णालयाला परिमंडळस्तरीय पथकाने अचानक सरप्राईज भेट दिली. आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ.भगवान पवार यांच्या सोबत वैदकीय अधिकारी पुणे डॉ.अभिराज सूर्यवंशी,डॉ.आनंद साबणे स्त्रीरोग तद्न्य भोर ,गणेश औटी कार्यालयीन अधीक्षक ,गणेश जगताप परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक ,धनाजी कोलगे मूल्य व सनियंत्रक अधिकारी ,सागर शेळके फॅसिलीटी मॅनेजर पुणे या पथकाने अचानक भेट...
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून एकाचा मृत्यू ; अपघात नसून घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.
भिगवण वार्ताहर.दि.२३
भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत उस वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे १.३० च्या सुमारास घडली.उस तोडणीच्या हंगामातील हा दुसरा अपघातातील बळी असून अजून किती बळी गेल्यावर कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग जागा होणार ? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.तर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृत...
फेसबुक वरील ओळखीच्या माध्यमातून विश्वास संपादन करून बलात्कार करीत पीडितेचे सोने लुबाडणारया नराधमाच्या मुसक्या भिगवण पोलिसांनी आवळल्या.
भिगवण वार्ताहर .दि.७
भिगवण पोलिसांनी धाडसी कारवाई करीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करीत विश्वास संपादित झालेल्या अबलेच्या सोन्यावर डल्ला मारून शरीराचे लचके तोडणार्या क्रूर आरोपीच्या मुसक्या आवळीत मुद्देमाल जप्त केला.भिगवण पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक करून स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाच्या इतरही गुन्ह्याच्या तपास कारवाईसाठी अधिकार वाढवावेत अशी मागणी केली जात आहे.
याबाबत...
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर च्या अपघातात मदनवाडी येथील शेतकऱ्याचा मृत्यू ; भिगवण बारामती रोडवरील घटना
भिगवण वार्ताहर. दि. 4भिगवण बारामती राज्यमार्गांवर मदनवाडी गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक लागून मदनवाडी गावातील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार किशोर बाळासाहेब साळुंखे वय 30 रा. मदनवाडी या शेतकरयाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या साळूंखे यांना मदनवाडी गावाच्या...
अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीने गुदमरला भिगवण बाजारपेठेचा श्वास ; भिगवण ग्रामपंचायत आणि पोलिसांनी कारवाई करण्याची होतेय मागणी
भिगवण वार्ताहर. दि. 4
भिगवण बाजारपेठ तीन जिल्ह्यातील आणि चार तालुक्यातील जवळपास 30 गावे आणि 20 वाडीवस्ती वरील ग्राहकांसाठी रोज लागणाऱ्या वस्तू खरेदी साठी योग्य ठिकाण मानले जाते. मात्र या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमण आणि काही आपलाच व्यवसाय व्हावा स्वार्थी वृतीच्या व्यापारी वर्गामुळे बाजारपेठेतील रस्ते कोंडले जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी...
भिगवण राशीन राज्यमार्गांवर अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू ; अपघात करून वाहन पसार
भिगवण वार्ताहर. दि. 13
भिगवण राशीन राज्यमार्गांवर डिकसळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 9 ते 10 च्या सुमारास घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अपघातात विजय सीताराम बांडे वय 42 राहणार खेड ता. कर्जत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ठोकर देणारे वाहन अपघात करून...



























