Tuesday, October 6, 2026

शिव फाउंडेशनने फुलविले जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू ; भिगवण स्टेशनच्या 200 विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल आणि खाऊ वाटप

भिगवण वार्ताहर. दि. 29 आपले समाजाविषयी काही देणे लागते, या उदात्त भावनेने समाजातील उपेक्षित घटक, वनवासी यांना यथाशक्ती मदत करण्याची मनात खूणगाठ बांधून शिव फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी जिल्हा परिषद पुणे यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भिगवन स्टेशन येथे विद्यार्थ्यांना सुमारे 200 वॉटर बॅग व खाऊचे...

ग्रामीण रुग्णालयातील सेवा आणि ट्रामा केअर सेंटर तातडीने सुरु करण्यासाठी जनसामान्य नागरिकांचे आंदोलन : शिवतेज ग्रुप आणि मराठा महासंघाच्या मोर्चात 15 ग्रामपंचायत आणि संघटना सहभागी.

भिगवण वार्ताहर.दि.२७ भिगवण ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि ट्रामा केअर सेंटर तातडीने चालू करण्याच्या मागणीसाठी आज शिवतेज ग्रुप आणि अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी शेकडो महिला तसेच नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवत ग्रामीण रुग्णालयावर मोर्चा काढला होता.जनसामान्य रुग्ण आणि परिसरातील नागरिकांच्या या आवश्यक असणाऱ्या मागण्या १३ ओगस्ट पर्यंत मान्य न झाल्यास...

पुणे सोलापूर महामार्गांवर कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 1 गंभीर जखमी ; अति वेग आणि पावसाची रिप रिप मुळे अपघात घडल्याची शक्यता.

भिगवण वार्ताहर. दि. 1 भिगवण पुणे – सोलापूर महामार्गावर डाळज नं 3 (ता. इंदापूर) ग्रामपंचायतच्या हद्दीत चारचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 02) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील...

पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू. बिल्ट पेपर कंपनी समोर अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने अपघात घडल्याची शक्यता

भिगवन वार्ताहर .दि. २६पुणे सोलापूर महामार्गावर बिलट पेपर कंपनी समोरील बाजूला अकोले पाठीजवळ दुचाकीचा अपघात होऊन यात दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ४ वा. सुमारास घडली.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात अजय सौदागर आणि शिवानंद डुंगरे यांचा मृत्यू झाला. दोन्ही मयत तरुण लातूर येथील रहिवासी असण्याची माहिती मिळत आहे हे तरुण आपल्या ताब्यातील स्कुटी वरून...

भिगवण पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; पोलीस अंमलदार सचिन पवार यांना विशेष महासंचालक सन्मानचिन्ह आणी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित.

भिगवण वार्ताहर.दि.२६ भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस अमलदार सचिन पवार यांना सन २०२३ चे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हे विशेष सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र अमलदार पवार यांना प्रदान केले. भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सचिन अशोक पवार हे...

भिगवण बारामती रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा मृत्यू ; लामजेवाडी गावच्या हद्दीतील प्रकार

भिगवण वार्ताहर. दि. 22भिगवण बारामती रोडवर लामजे वाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहिती नुसार कोल्हा पाण्याचा शोध घेत असताना लामजेवाडी येथील वळणावर अज्ञात वाहणाची ठोकर लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला असावा.बारामती भिगवण रोडचे नूतनीकरणाचे काम सुरु असून याठिकाणी वाहणांचा...

भिगवण बारामती रोडवर झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू !मदनवाडी पिंपळे घाटात अज्ञात वाहणाने ठोकल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता .

भिगवण वार्ताहर.दि.१२ भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात भिगवण येथील विशाल उर्फ भैया कैलास धवडे वय ४१ यांचा जागीच मृत्यू झाला.बारामती येथील खासगी कंपनीतून काम करून त्यांच्या ताब्यातील एम.एच.42 ए बी 9427 या...

भिगवण पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकपदी विनोद महांगडे तर बारामती वाहतूक विभागाच्या निरीक्षकपदी सिंघम पोलीस अधिकारी चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती

भिगवण वार्ताहर .दि. 16 भिगवण पोलीस स्टेशनचे महिना भरापूर्वी आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी स पो नी विनोद महांगडे यांनी चार्ज घेतल्याची माहिती मिळत आहे.तर भिगवण येथे सिंघम अधिकारी म्हणून नाव असणाऱ्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बारामती वाहतूक विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे. लोक सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला...

भिगवण येथे रथसप्तमी निमित्ताने प्रवासी दिन साजरा ; ग्राहक पंचायत महा.राज्य ,भिगवण पोलीस ठाणे आणी बारामती परिवहन विभागाचा आगळा वेगळा उपक्रम.

भिगवण वार्ताहर .दि.१६ जगाचा अधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमीचे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,भिगवण पोलीस ठाणे ,परिवहन विभाग बारामती तसेच इंदापूर राज्यपरिवहन आगाराच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे तिळगुळ आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला. देशातील नागरिकांनी...

भिगवण गावचे माजी सरपंच शंकरराव (आण्णा ) गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन

भिगवण वार्ताहर .दि.5 भिगवण गावचे माजी सरपंच आणी राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते शंकरराव गायकवाड वय 66 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भिगवण आणी परिसरावर शोककळा पसरली आहे. शंकरराव गायकवाड भिगवण आणी परिसरात आण्णा या नावाने प्रसिद्ध होते. शंकरराव आण्णा यांनी इंदापूर कृषी उत्पन बाजार समिती वर सदस्यपद भूषविले आहे....