Wednesday, October 7, 2026
Home Blog Page 8

चिमुकलीला उराशी कवटाळून विहिरीत उडी घेत विवाहितेने दिला जीव ; इंदापूर तालुक्यातील पोंधवडी पवार वस्ती येथील जीव पिळवटून टाकणारी घटना

0

भिगवण सत्यवार्ता प्रतिनिधी : दि.३

भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील पोंधवडी पवारवस्ती येथील विहिरीत चिमुकलीसह उडी घेत विवाहितेने जीव दिल्याची हृदयाला पिळवटून टाकणारी घटना घडली.याबाबत भिगवण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आईचा मृतदेह सापडल्या नंतर १० तासांनी चिमुकलीचा मृतदेह शोधण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोट नुसार धनश्री केतन मदने वय.३१ रा.पवारवस्ती पोंधवडी असे मयत विवाहितेचे नाव असून परी केतन मदने वय १८ महिने असे चिमुकलीचे नाव आहे.याबाबत विवाहितेचे वडील नामदेव जंगलू कोकरे रा.खातगाव यांनी भिगवण पोलिसांत खबर दिली आहे.खबरी नुसार ३० /११/२०२३ रोजी धनश्री घरी कोणालाही न सांगता लहान परीला घेवून निघून गेली होती.तिचा शोध सुरु असताना २/१२/२०२३ जावई केतन मदने यांनी फोन करून धनु पवारांच्या विहिरीत पडली आहे माहिती दिली.यावेळी शोध घेणाऱ्या नातेवाईक यांनी घटनास्थळी जावून पाहिले असता अकोले गावच्या हद्दीत अलका शिवाजी पवार यांच्या गट.नं.१३७ मधील विहिरीत धनश्री यांचा मृतदेह आढळून आला.यावेळी धनश्री यांचे कडेला बाळ घेतल्याची स्थितीत मृतदेह आढळून आल्याने चिमुकलीला सोबत घेवून उडी मारल्याची शक्यता गृहीत धरून शोध घेण्यात आला.आईचा मृतदेह सापडल्या नंतर १० तासांच्या अंतराने चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.चिमुकलीचा मृतदेह सापडल्यामुळे पोंधवडी पवारवस्ती आणि अकोले या गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले.मयतांचे शव विच्छेदन करण्यात आले असून आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.सदर घटनेचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.

पत्रकारिता सामाजिक बांधिलकी की व्यवसाय ? ; संविधान दिना निम्मित सत्यवार्ता लेख

0

भिगवण वार्ताहर.दि.26

संविधान दिना निम्मित सत्यवार्ता लेख !!

पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी कि व्यावसायिकता ? असा सवाल गेली अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उठत आहेत.मात्र याचे उत्तर ना सरकारी यंत्रणेकडे आहे ना कायदे बनविणाऱ्या संसदेकडे त्यामुळे सामाजिक पत्रकारिता हा विषय नुसता नावापुरताच शिल्लक राहिलाय अशी आजची अवस्था आहे .

पाठीमागील काही वर्षात पत्रकारीतेमध्ये अमुलाग्र बदल होताना दिसून येत आहे.पूर्वीच्या काळात प्रिंट मिडीयाला अनंत साधारण महत्व होते.बातमी छापून आली म्हणजे तो प्रकार खराच आहे अस जनसामान्य नागरिकाचे मत होते.तर त्याला कायदेशीर महत्व हि होत.मात्र आता सोशल मिडीयाचा यात शिरकाव झाला असल्यामुळे कोणीही आपले पोर्टल युट्युब आणि न्यूज पोर्टल रजिस्टर करून पत्रकार होताना दिसून येत आहे.मात्र यामुळे पत्रकारिता हा सामाजिक धर्म नसून त्याला व्यावसायिकतेचा मुलामा दिला जात आहे. मागील काळातील पत्रकारिता आणि सध्याच्या पत्रकारितेत मोठी तफावत आहे. कोणतीही साधनसामग्री नसताना त्या वेळी पत्रकारिता करणे अवघड काम होते, तरीही सामाजिक बांधिलकी जोपासली गेली. आता पत्रकारांनी उपलब्ध साधनसामग्रीचा वापर केला पाहिजे. अन्यथा स्पर्धेत टिकाव धरू शकणार नाहीत. विविध स्तरावरील पत्रकारांना स्वत:च्या ताकदीचा भ्रम निर्माण होतो. त्यामुळे समाजात पत्रकाराविषयी तिरस्कार व्यक्त होताना दिसत आहे. राजकारणी पुढार्यांच्या टाकलेल्या काही आमिषास बळी न पडता पत्रकारांनी जबाबदारी व कर्तव्याने समाजात वागण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हे सर्व होत असताना कायदे बनविणाऱ्या संसदेकडे आणि न्याय व्यवस्थेने सध्या सुरु असलेल्या व्यावसायिक पत्रकारितेवर अंकुश ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

आजच्या पत्रकारितेचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना भीतीचा बागुलबुवा दाखवून व्यवसाय म्हणून होणे सर्वसामान्य जनतेच्या सामाजिक जीवनावर दूरगामी परिणाम करणारे असून यातून कायदेमंडळ आणि प्रशासन यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

…या आणि अशा अनेक सामाजिक विषयावरील बातम्या बद्दल आपले मत नक्की नोंदवावे …..सत्यवार्ता पोर्टल

देवदर्शनावरुन घरी निघालेल्या भाविकाचा अज्ञात वाहणाने चिरडल्यामुळे जागीच मृत्यू ; पुणे सोलापूर महामार्गांवरील डाळज चौकी समोरील घटना

0

भिगवण वार्ताहर.दि.24

पुणे सोलापूर महामार्गांवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून काल एसटी ने ट्रेकटरने धडक दिल्याने दोघांचा जीव गेला तर आज संध्याकाळी 7 वाजता महामार्ग पोलीस चौकी समोर अज्ञात वाहनाने चिरडल्याने देव देवदर्शन करून घरी निघालेल्या भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.
याबाबत प्राथमिक मिळालेल्या नुसार अपघातात मुरलीधर बेंडाधूम रा.जांभुळपाडा जि. नाशिक यांचा जागीच मृत्यू झाला.पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज येथील महामार्ग पोलीस चौकी समोर हा अपघात घडला.नाशिक येथून देवदर्शनासाठी गेलेल्या वाहनातील मुरलीधर हे लघु शंकेसाठी महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला गेले असता अज्ञात वाहणाने त्यांना धडक देऊन चिरडले.अपघात घडल्यावर झालेल्या आवाजामुळे काही पोलीस बाहेर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.मृत व्यक्तीच्या खिशातील आधार कार्डामुळे त्याची ओळख झाली.यावेळी भिगवण शहरासाठी तसेच महामार्गासाठी वरदान ठरत असलेल्या आपुलकीची अम्ब्युलन्स सेवा यांच्या माध्यमातून मृत व्यक्तीचे पार्थिव शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.यावेळी बोलताना केतन वाघ यांनी मृत व्यक्तीचा चिरडल्यामुळे अतिशय वाईट अवस्था झाल्याचे सांगितले.भिगवणं पोलीस अपघाताचा तपास करित आहेत.

पुणे सोलापूर महामार्गांवर डाळज गावच्या हद्दीत एसटी बस ने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू ; तर 25 प्रवाशी किरकोळ आणी गंभीर जखमी

0

भिगवण वार्ताहर.दि.२४

पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज नंबर १ हद्दीत सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या ट्रॅकटर ट्राली पाठीमागून धडक दिल्याने घडलेल्या अपघात ट्रॅकटर ड्रायव्हर सह सर्विस रस्त्याने जाणार्या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.एसटी ड्रायव्हरच्या सुसाट वेगाचे अनेक बळी जात असताना महामार्ग पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळ मात्र ड्रायव्हरच्या चुकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डाळज गावचे सरपंच अमित जाधव यांनी केला आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र रावसाहेब जगताप वय.३१ रा.डाळज १ ,आबा करे रा.एकशिव ता.माळशिरस जि.सोलापूर असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीची नावे आहेत.तर एसटी बस मधील 25 प्रवाशी यात जखमी झालेले असून त्यांच्यावर जवळच्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत.याबाबत भिगवण पोलिसांनी विनायक सोपान गायकवाड रा.काझी कारबस ता.अक्कलकोट या बस ड्रायव्हर वर त्याचे चुकीमुळे अपघात घडल्याचा गुन्हा नोंद केला आहे.पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या ट्रॅकटर ट्राली ला एस.टी बस नंबर एम.एच.१३ सी.यु.८१२५ या बस ने पाठीमागून भरधाव वेगात धडक दिल्याने हा अपघात घडला.हि धडक इतकी जोराची होती कि यामुळे हवेत उडालेल्या ट्रोली खाली सर्विस रस्त्याने आपल्या कामावरून घरी जाणाऱ्या रवींद्र जगताप यांच्या दुचाकी एम.एच.४२.बी.एच.९७०७ वर येवून धडकली.यात जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.तर बस ड्रायव्हरला गाडी ताब्यात न राहिल्याने इलेक्ट्रिक पोलवर बस आदळली. तर यात ट्रॅकटर ड्रायव्हर आबा करे यांचाही जागीच मृत्यू झाला.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात निलेश रामदास कोळी यांनी फिर्याद दिली आहे.अपघाताचा तपास पोलीस उप निरीक्षक जाधव करीत आहेत.

पाठीमागील काही दिवसापासून पुणे सोलापूर महामार्गावर एसटी बसचे सुसाट वेगामुळे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहेत.भिगवण बस स्थानकातून निघून १०० मीटर अंतरावर असाच दोन चालकांत लागलेल्या स्पर्धेमुळे एकाला आपला जीव गमवावा लागला होता.मात्र ब्रेकफेल चे नाटक ड्रायव्हरने करून यातून सुटका करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला होता.आजच्या अपघातात बस च्या ड्रायव्हर मद्य प्राशन केली असल्याची शक्यता अनेक नागरिकांनी वर्तविली आहे.मात्र या ड्रायव्हरला कोणी तरी जाणूनबुजून अपघात स्थळावरून पळून जाण्यासाठी मदत केली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पुणे सोलापूर महामार्गांवर अपघात घडल्याचे समजताच आपुलकीची जागा ऍम्ब्युलन्स सर्व्हिस संचालक केतन वाघ ऋषिकेश वाघ यांनी तातडीने धाव घेत सर्व जखमीना उपचारासाठी दाखल केले.या अपघातात जवळपास 25 प्रवासी जखमी झाले होते तर घाबरल्यामुळे काहींची अवस्था गंभीर झाली होती.मात्र टोल वसुल करणाऱ्या कंपनीने कोणतीही सुविधा पोहोचवली नाही.त्यामुळे केतन वाघ आणी ऋषिकेश वाघ यांचे सर्व स्तरातून कॊतुक केले जात आहे..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रवक्तेपदी जेष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात यांची निवड

0

भिगवण वार्ताहर .दि. 7
राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार गट ) पार्टीच्या पुणे जिल्हा प्रवक्तेपदी जेष्ठ पत्रकार दादासाहेब माणिकराव थोरात यांची निवड करण्यात आली . खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, इंदापुर तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे सुपुत्र उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे विचार महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आरक्षणाचे धोरण, महिला धोरण आणि शेतीचे धोरण जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या बरोबरच संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शाखाली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि भाजपाची लबाडी माय बाप जनतेच्या समोर नेहण्याचे काम आमदार रोहितदादा पवार यांच्या सहकार्याने करणार असल्याचे यावेळी बोलताना नवनियुक्त प्रवक्ते दादासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
दादासाहेब थोरात यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयात सामान्य जनतेला न्याय मिळाला असून त्यांच्या निवडीमुळे भिगवण आणी परिसरात शरद पवार गटाला नवसंजीवनी प्राप्त होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ज्बज्व्ब्ब्व्

0

ब्ब्ब्व्व्व्ब्ब्ब्

विकास कामाच्या भूमिपूजनावरून तक्रारवाडी गावातील सत्ताधारी आणी विरोधक आमने सामने ; श्रेयवादाचे लोणं तालुका स्तरावरून गाव पातळीवर

0

भिगवण वार्ताहर.दि.१३

तक्रारवाडी गावात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपा आणि विरोधक राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यात तू तू मै मै वाढली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून महिला सरपंच यांची बदनामी केल्याचा आरोप माजी उपसरपंच प्रशांत वाघ यांनी केला.तर याबाबत माजी सरपंच सतीश वाघ यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वेळ नसल्याचे सांगण्यात आले. मात्र शाशकीय निधीच्या मंजुरी वरून श्रेयवादाचे लोण जिल्हा तालुका स्तरावरून ते तक्रारवाडी सारख्या छोट्या गावातही पसरत असल्याचे यातून दिसून आले.

तक्रारवाडी गावात माजी मंत्री आणि तालुक्याचे आमदार दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून ३० लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.निधी देणारे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा हे दोघे सत्तेत सामील आहेत. त्यामुळे भाजपा गटाच्या सरपंच मनीषा वाघ यांनी भरणे यांच्या माध्यमातून आलेल्या विकास कामाची माहिती सर्व सदस्यांना देत भूपिपुजनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून विकासकामाचे भूमिपूजन केले.यावेळी सत्ताधारी सरपंच मनीषा वाघ ,
उपसरपंच आशाताई जगताप तसेच इतर असे ९ पैकी ६ सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.मात्र भूमिपूजन कार्यक्रम स्थळी राष्ट्रवादीच्या सदस्यांना बोलाविण्यात आले नसल्याचा आरोप करीत काही कार्यकर्त्यांनी ग्रामसेवक दीपक बोरावके यांना प्रश्न विचारले तसेच यावेळी काही कार्यकर्त्यांनी भूमिपूजन कार्यक्रमाचा निषेध करीत दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि जि.प.सदस्य हनुमंत बंडगर आणी एकमेव विद्यमान सदस्य यांच्या उपस्थितीत प्रती उद्घाटन कार्यक्रम घेतला.यावेळी मदनवाडी भिगवण आणि परिसरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.मात्र विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमामुळे तक्रारवाडी गावात तणावाचे वातावरण पहावयास मिळाले.

याबाबत तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ यांनी विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी सर्व सदस्यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगितले.तर निधी आमदार भरणे यांच्या माध्यमातून आला असला तरी सत्तेत भाजपा आहेच म्हणून भाजपच्या सरपंच म्हणून उद्घाटन करण्याचा मला अधिकार आहेच मात्र महिला सरपंच असल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी याचे राजकीय भांडवल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला.हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी घटना नसल्याचे यावेळी त्यांनी खेदाने सांगितले.तर सोशल मिडीयावरून काही बदनामी कारक कमेंट केल्या आहेत त्यासबंधी कायदेशीर माहिती घेवून पुढे जाणार असल्याचे सांगितले.

याबाबत राष्ट्रवादीचे माजी सरपंच सतीश वाघ यांना संपर्क करून बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेळेचे कारण देत बोलण्यास नकार दिला.

तक्रारवाडी गांवात 1 कोटी 75 लाख रुपयांच्या विकास कामाला सुरवात ; गावाला रोल मॉडेल बनविण्याचा सरपंच मनीषा वाघ यांचा निश्चय

0

भिगवण वार्ताहर.दि.६

तक्रारवाडी गावात सत्ताबदलामुळे विकास कामाला चालना मिळाली असून गावातील अंतर्गत रस्त्याची जवळपास १ कोटी ७५ लाख रुपयाचा कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली आहे.तर कामातील दर्जा चांगला राहावा यासाठी सरपंच मनीषा वाघ कामाच्या ठिकाणी भेट देवून कंत्राटदार यांना योग्य त्या सूचना देत आहेत.

तक्रारवाडी गावात मागील २ वर्षापासून राष्ट्रवादी विचाराच्या पदाधिकारी यांची सत्ता होती.मात्र सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे आणि इतर सदस्यांना सरपंच पदाचा मान मिळावा यासाठी तत्कालीन सरपंच सतीश वाघ यांनी राजीनामा दिला होता.तर यावेळी अनेक राजकीय डावपेच खेळून भाजपा विचाराच्या पदाधिकारी यांनी युक्त्या वापरत राष्ट्वादीची सत्ता अलगद उचलून टाकून सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या.सत्ताबदलामुळे गावातील अनेक विकास कामांना चालना मिळाली असून स्थगिती असलेलीं कामे आपली राजकीय चलाखी वापरून ती सुरु करण्यात आली आहेत.गावातील अंतर्गत रस्त्याचे नुसते भूमिपूजन नाही तर प्रत्यक्षात लाखो रुपयांच्या कामांना प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली आहे.सरपंच मनीषा वाघ ,उपसरपंच आशाताई जगताप आणि सदस्या संगीता वाघ ,प्राजक्ता  वाघ ,शरद वाघ या सर्व विकास कामाच्या दर्जावर लक्ष देत असून कामे वर्षानुवर्ष टिकावू व्हावीत यासाठी प्रयत्न केला जात आहे.

कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ ,माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,विजयराव जगताप ,सचिन वाघ यांनी गावातील विकासकामासाठी अधिकचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.तसेच माळरान येथील शेतीसाठी असणाऱ्या वनविभागातील रस्त्यासाठी वरिष्ठ पातळीवर परवानगी आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.तक्रारवाडी गाव हे रोल मॉडेल गाव होण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सरपंच मनीषा वाघ यांनी सांगितले.

भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून भिगवण येथील कला महाविद्यालयात रक्तदान शिबीर ; जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांच्या उपस्थितीत आगळा वेगळा उपक्रम

0

भिगवण वार्ताहर .दि.३

भारत देशातील तरुण युवकांना रोजगार आणि नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे मत भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी भिगवण येथील कार्यक्रमात व्यक्त केले.

भाजपा युवामोर्चा यांच्या वतीने भिगवण येथील कला महाविद्यालय भिगवण येथे सेवा पंधरवडा निम्मित रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी उद्घाटक असणाऱ्या अंकिता पाटील बोलात होत्या.यावेळी नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील ,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुतराव वनवे ,माजी सरपंच पराग जाधव ,इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे ,इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन अशोक शिंदे ,संचालक संजय जगताप ,भाजपा गटनेते संपत बंडगर ,तेजस देवकाते ,तक्रारवाडी गावचे सरपंच प्रतिनिधी प्रशांत वाघ ,सुनील वाघ,सचिन वाघ ,कपिल भाकरे,गुरापा पवार ,डॉ.महादेव वाळूंज,मराठी पत्रकार संघाचे डॉ.प्रशांत चवरे हे मान्यवर उपस्थित होते.या रक्तदान शिबिराला विद्यार्थी तसेच परिसरातील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निम्मिताने देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे.याच माध्यमातून भिगवण तक्रारवाडी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.तर भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून कला महाविद्यालयात हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला.रक्तदान शिबिरासाठी पुणे येथील अक्षय ब्लड बँक यांचे माधयामातून रक्तदात्याकडून रक्त संकलित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन डॉ.बाबासाहेब काळे यांनी केले.तर या कार्यक्रमासाठी भिगवण येथील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

बारामती भिगवण राज्यमार्गांवर झालेल्या अपघातात भिगवण येथील व्यवसायिकाचा जागीच मृत्यू ; अज्ञात वाहणाने दुचाकीला ठोकरल्यामुळे झाला अपघात

0

भिगवण वार्ताहर.दि.२

बारामती भिगवण राज्यमार्गावर लामजेवाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिगवण बाजारपेठेतील व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जोगेश नाथसाहेब पाचांगने वय ३२ असे अपघातात मृत झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.जोगेश सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भिगवण येथून आपल्या दुचाकीवरून बारामती कडे जात असताना हा अपघात घडला.अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे जोगेश यांचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातानंतर अपघात ग्रस्त वाहन निघून गेल्याची माहिती मिळत आहे.अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस तसेच अनेक तरुणांनी अपघात स्थळी धाव घेतली.जोगेश यांच्या मृत्यू मुळे भिगवण बाजारपेठेवर शोककळा पसरल्याचे दिसून आले.

बारामती भिगवण सिमेंट रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे.यातील एक बाजू काही अंशी तयार झाली असून दुसऱ्या बाजूचे काम चालू आहे.मात्र तयार झालेल्या सिंगल बाजूची पूर्वेची साईड पट्टी व्यवस्थित भरण्यात आलेली नाही त्यामुळे दुचाकी तसेच इतर वाहने खाली घेण्यास वाहन चालक धजावत नाहीत त्यामुळे अनेक अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे .याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.तर वाहन धारक गुळमुळीत रस्त्यावर सुसाट वेगाने वाहन चालवीत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे .