पुणे सोलापूर महामार्गावरील ज्योती हॉटेल समोर थांबलेल्या आयशर गाडीला स्कार्पिओ धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 9 जन जखमी

0
577

भिगवण वार्ताहर.दि.१५

पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण गावच्या हद्दीत  बंद पडलेल्या आयशर टेम्पोला स्क्रार्पिओ धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ९ जन गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.पुणे सोलापूर महामार्गावर अनधिकृतपणे थांबलेल्या वाहनामुळे अनेक अपघात होवून निष्पाप जीव जात असताना याकडे महामार्ग प्रशासन गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात जालिंदर बाळासाहेब वीरकर वय .३६ रा चिखली ता.हवेली यांचा मृत्यू झाला आहे.तर वैशाली राजू फडके ,मच्चीद्र बाळासाहेब वीरकर ,लक्ष्मीबाई बाळासाहेब वीरकर ,प्रीतम जालिंदर वीरकर ,मंगल राहुल मेदनकर ,विशाल विलास मोरे ,संगीता विलास मोरे तसेच राजू गोविंद फडके हे ९ जन किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले आहेत.वीरकर मोरे कुटुंबीय आपल्या ताब्यातील स्कारपिओ नंबर एम.एच.१४ जी.ए ५५१४ गाडीतून पुणे बाजूकडून सोलापूरकडे जात असताना भिगवण गावच्या हद्दीत ज्योती हॉटेल येथून समोरील गाडीला ओव्हरटेक करीत असताना मुख्य मार्गाच्या शेजारी कडेला थांबलेल्या आयशर गाडी नंबर एम.एच.४३ यु ६८१७ गाडीला पाठीमागून धडकून अपघात झाला आहे.याबाबत फिर्यादी राजू फडके यांनी खबर दिली असून भिगवण पोलिसांनी आयशर ड्रायव्हर विरोधात त्याच्या ताब्यातील वाहन धोकेदायक पणे रस्त्याच्या कडेला उभे करून रीप्लेकटर अथवा धोक्याची कोणतीही सूचना न लावल्याबद्दल तसेच अपघातास कारणीभूत ठरून एकाचा जीव आणि ९ इसमाला जखमी करण्यास कारण ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अपघाताचा तपास पोलीस हवालदार लोढी करीत आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावर धोकेदायक पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनामुळे अपघात घडत असून यात निष्पाप माणसांचे जीव जात आहेत.आजचा अपघात घडण्या अगोदर काही मिनिटे नवजीवन पेपर एजन्सीचे संचालक संतोष सोनवणे यांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर ड्रायव्हरला या ठिकाणी अपघात घडू शकतो याची माहिती देवून गाडी १०० फुट पुढे असणाऱ्या मोकळ्या जागेत लावण्याची विनंती केली होती.तर अनेक मोर्निंग वॉक साठी जाणार्या नागरिकांनी गाडी काढण्यासाठी सूचना केल्या होत्या.मात्र झोपेत असणाऱ्या ड्रायव्हर ने याकडे दुर्लक्ष केले आणि १० मिनिटाच्या आत हा अपघात घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here