Wednesday, October 7, 2026
Home Blog Page 7

भिगवण पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; पोलीस अंमलदार सचिन पवार यांना विशेष महासंचालक सन्मानचिन्ह आणी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित.

0

भिगवण वार्ताहर.दि.२६

भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस अमलदार सचिन पवार यांना सन २०२३ चे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हे विशेष सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र अमलदार पवार यांना प्रदान केले.

भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सचिन अशोक पवार हे २००७ साली पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाले. सन.२००९ ते सन.२०१५ या कालावधीमध्ये नारायणगाव पोलीस स्टेशन येथे तर २०१५ ते २०२१ पर्यंत लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली आहे.या सेवेदरम्यान त्यांनी खून ,खुनाचा प्रयत्न ,दरोडा ,दरोड्याचा प्रयत्न ,जबरी चोरी ,चोरी ,अमलीपदार्थ कारवाई ,अवैध गुटखा वाहतूक अशा विविध स्वरूपाच्या कारवाई मध्ये सहभाग नोंदविला आहे.तर अनेक गुन्ह्याचा उकल होनेकामी कारवाई केली आहे.सन २०२१ पासून अंमलदार सचिन पवार भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असून भिगवण परिसरातील अनेक पोलीस कारवाईत त्यांनी सहभाग नोंदविला आहे.याच त्यांच्या कार्याची दखल घेत मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पवार यांना सन्मान प्रदान केला.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार यांना शुभेच्छा दिल्या.

भिगवण बारामती रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा मृत्यू ; लामजेवाडी गावच्या हद्दीतील प्रकार

0

भिगवण वार्ताहर. दि. 22
भिगवण बारामती रोडवर लामजे वाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे कोल्ह्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार कोल्हा पाण्याचा शोध घेत असताना लामजेवाडी येथील वळणावर अज्ञात वाहणाची ठोकर लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला असावा.बारामती भिगवण रोडचे नूतनीकरणाचे काम सुरु असून याठिकाणी वाहणांचा वेग जास्त असतो.याचं वेळी पाण्याचा शोध घेत असताना हा अपघात घडला असून यात कोल्ह्याचा डोक्याच्या भागाला गंभीर जखमा होऊन यात त्याचा मृत्यू झाला.सदर कोल्हा मादी जातीचा असावा आणी त्याच्या पोटाच्या स्थितीवरून गर्भवती असण्याची शक्यता माहितीतील नागरिकाने दिली.याबाबत बारामती वन विभागाच्या अधिकारी शुभांगी लोणकर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.याची माहिती वनविभागाच्या टोल फ्री मदत केन्द्र येथे देण्यात आली आहे.

भिगवण बारामती रोडवर झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू !मदनवाडी पिंपळे घाटात अज्ञात वाहणाने ठोकल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता .

0

भिगवण वार्ताहर.दि.१२

भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात भिगवण येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात भिगवण येथील विशाल उर्फ भैया कैलास धवडे वय ४१ यांचा जागीच मृत्यू झाला.बारामती येथील खासगी कंपनीतून काम करून त्यांच्या ताब्यातील एम.एच.42 ए बी 9427 या दुचाकीवरून घरी येत असताना हा अपघात घडला.बारामती भिगवण रोडवरील पिंपळे घाटाच्या उतारापासून १०० मीटर अंतरावर बारामती दिशेला हा अपघात घडला.सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सदर घटनेची खबर अमर धवडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.

बारामती भिगवण रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून अनेक दुचाकी स्वारांचे अपघात घडले आहेत.तर भिगवण येथील दोन तरुण यात दगावले आहेत.तर काहीना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते वेग मर्यादेचे सूचना फलक आणि पोलीस प्रशासनाने अपघात घडू नये यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.आज झालेल्या अपघातात मृत पावलेल्या धवडे यांचे शवविच्छेदन भिगवण येथील ग्रामीण रुग्णालयात केले जाणार आहे.

भिगवण पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकपदी विनोद महांगडे तर बारामती वाहतूक विभागाच्या निरीक्षकपदी सिंघम पोलीस अधिकारी चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती

0

भिगवण वार्ताहर .दि. 16

भिगवण पोलीस स्टेशनचे महिना भरापूर्वी आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी स पो नी विनोद महांगडे यांनी चार्ज घेतल्याची माहिती मिळत आहे.तर भिगवण येथे सिंघम अधिकारी म्हणून नाव असणाऱ्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बारामती वाहतूक विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

लोक सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.यात भिगवण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी दिलीप पवार यांच्या जागी संदेश बावकर यांची तर दौंड पोलीस निरीक्षक पदी चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती करण्यात आली होती. यादव यांनी दीड महिन्याच्या काळात आपला जलवा दाखवीत अनेक गुन्ह्यांची उकलं केली होती.तर अनेक समाज कंठकाच्या मुसक्या आवळीत कायदा आणी सुव्यवस्था आबादीत राहावी यासाठी कामकाज सुरु केले होते.तर अनेक वर्षापासून बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कार्यवाही सुरु केली होती.मात्र काही राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधामुळे किंवा नुकत्याच कुरकुंभ येथील ड्रग कारवाई मुळे ? त्यांची तातडीने बदली करण्यात आली होती .यादव यांच्या अचानक झालेल्या बदलीला दौंड कर जनतेने विरोध दर्शवीला होता.मात्र नुकतीच त्यांची बदली बारामती वाहतूक निरीक्षक पदी नियुक्ती झाल्यामुळे बारामती येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास त्यांचा फायदा होईल.
तर भिगवण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी संदेश बावकर यांनी भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील अफूची शेती कारवाई तसेच अनेक फरारी आरोपीना जेरबंद करीत आपल्या कामकाजाची चुणूक दाखविण्यास सुरवात केली होती.त्यांनी नुकतीच हॉटेल वर चालणाऱ्या अनैतिक व्यवसायावर कारवाई केली होती.मात्र त्यांची अचानक बदली करण्यात आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आल्याचे दिसून येत आहे. बावकर यांच्या जागी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विनोद महांगडे यांनी पदभार स्वीकारला आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी संदेश बावकर यांची 45 दिवसात बदली करण्यात आली असल्यामुळं नवीन पदभार स्वीकारलेल्या स पो नी विनोद महांगडे यांच्या समोर भिगवण पोलीस ठाण्यात काम करताना आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
भिगवण येथील वाहतूक कोंडी असेल अथवा शाळा परिसरात असणारी रोड रोमिओ चा बिमोड तसेच शाळा परिसरात दारू आणी तंबाकू सारख्या विषयावर कारवाई असेल तर नव्याने निर्माण होणाऱ्या सोशल मीडिया रिल्स गुंडावर कारवाई करण्याचे आव्हान असेल.तर भिगवण बाजार पेठेत चोरी आणी सामाजिक सलोखा आबादीत राखण्याचे आव्हान असेल.

भिगवण येथे रथसप्तमी निमित्ताने प्रवासी दिन साजरा ; ग्राहक पंचायत महा.राज्य ,भिगवण पोलीस ठाणे आणी बारामती परिवहन विभागाचा आगळा वेगळा उपक्रम.

0

भिगवण वार्ताहर .दि.१६

जगाचा अधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमीचे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,भिगवण पोलीस ठाणे ,परिवहन विभाग बारामती तसेच इंदापूर राज्यपरिवहन आगाराच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे तिळगुळ आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला.

देशातील नागरिकांनी प्रवास करताना खासगी वाहतुकीच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय अंगीकारावा . तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी ग्राहक पंचायत पुणे यांच्यावतीने हा आगळावेगळा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येतो . आज राबविण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी  भिगवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर ,मोटार वाहन निरीक्षक नितीन घोडके ,मोटार वाहन निरीक्षक निरंजन पूनसे , सहा.मोटर वाहन निरीक्षक शुभम तांगडे ,प्रज्ञा ओमासे ,प्रियांका कुडले ,चालक विठ्ठल गावडे , ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य सचिव तुषार झेंडेपाटील, जिल्हा ग्राहक संरक्षण सदस्य दिलावर तांबोळी , प्रवासी महासंघाचे नंदकुमार तावरे ,राजेंद्र निंबाळकर तसेच रा.प.वाहतूक नियंत्रक नंदकुमार राउत उपस्थित होते.यावेळी पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास करणाऱ्या अक्कलकोट दादर एस.टी बसला थांबवून या गाडीचे चालक आणि वाहक यांचा फेटा बांधून सत्कार करीत बस मधील प्रवाशी यांना पाणी बाटली तसेच तिळगूळ तसेच गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.पोलीस अधिकारी संदेश बावकर आणि झेंडेपाटील यांनी एसटीबस मधील प्रवासी यांचे स्वागत करीत बसने प्रवास केल्याने देशाचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच देशातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतल्यास अपघात प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक नारायण मोरे ,हरिओम ज्वेलर्सचे संचालक मनोज उदावंत ,औदुम्बर हुलगे , जनार्धन  पांढरमिसे ,स्वप्नील सूर्यवंशी ,राहुल सोनवणे उपस्थित होते.

भिगवण गावचे माजी सरपंच शंकरराव (आण्णा ) गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन

0

भिगवण वार्ताहर .दि.5

भिगवण गावचे माजी सरपंच आणी राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते शंकरराव गायकवाड वय 66 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भिगवण आणी परिसरावर शोककळा पसरली आहे.


शंकरराव गायकवाड भिगवण आणी परिसरात आण्णा या नावाने प्रसिद्ध होते. शंकरराव आण्णा यांनी इंदापूर कृषी उत्पन बाजार समिती वर सदस्यपद भूषविले आहे. पत्रकार आप्पासाहेब गायकवाड आणी ईश्वर गायकवाड यांचे ते वडील होत. आण्णा यांच्या अचानक जाण्यामुळे गायकवाड परिवार तसेच भिगवण परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.त्यांचा अंत्यविधी आज सोमवार रोजी 5 वाजता भिगवण वैकुंठ भूमी येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची दौंड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती तर भिगवण सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी संदेश बावकर.

0

भिगवण वार्ताहर.दि.१

भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सिंघम पोलीस अधिकारी अशी छाप पाडीत महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी वेळ प्रसंगी वज्रापेक्षा कठोर भूमिका बजाविणाऱ्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची दौंड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.तर भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून संदेश बावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वरिष्ठ पदावरील अधिकारी यांच्या राज्यात बदलीचे सत्र सुरु आहे.याच अनुशंघाने भिगवण आणि दौंड येथील प्रभारी अधिकारी यांच्या नव्याने नियुक्ती करण्यात आल्या.भिगवण पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत असताना चंद्रशेखर यादव यांनी सर्वसामान्य भिगवण करांच्या मनावर आपल्या कार्याची छाप उमटवली होती. स्थानिक गुन्हेगारी मोडीत काढीत गुन्हेगारांना कायद्याचा वचक बसविण्याचे काम केले होते.तर महिला आणि मुलीना आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण होण्यासाठी रोड रोमिओच्या मुसक्या आवळीत सुता सारखे सरळ करण्यासाठी पोलीस दलाचा वापर केला होता.तर सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाला पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक देण्याचे काम केले होते.प्रभारी कार्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर बदली झाल्या नंतरही बदली रद्द व्हावी यासाठी अनेक नागरिक आणि व्यापारी तसेच महिला भगिनीनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.याच सिंघम पोलीस अधिकारी यांची अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्यातून दौंड येथे बदली करण्यात आली.त्यांच्या बदलीचे दौंडकर नागरिक आणि भिगवण कर नागरिकांनी स्वागत केले.तसेच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या जागी यवतचे संदेश चंद्रकात बावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बावकर यांच्या समोर भिगवण येथील गुन्हेगारी आणि वाहतुकीची कोंडी सुधारण्याचे तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि महिला मुलीना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करण्याचे आव्हान असेल.

निंबोडी येथे 50 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन ; नवनिर्वाचित सरपंच संतोष सोनवणे यांचा विकासाचा चौकार

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामे .

बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

.

भिगवण वार्ताहर .दि. 9
बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे गुरुवारी (ता:०४) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर व सरपंच संतोष सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
सदर कामातील मुस्लिम कब्रस्तान बांधकाम, सुतारवस्ती रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण, तुकायवाडी सिमेंट गटर लाईन करणे, ग्रामपंचायत शुशोभीकरण, फडतरेवस्ती रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे अश्या विविध ५० लाख रुपये निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच संतोष सोनवणे यांनी अजित पवार यांच्या निधीतून तसेच संभाजी होळकर यांच्या मदतीने गावातील मंजूर झालेल्या विकास कामांची माहिती दिली. तसेच गावातील ३६ चारीला खडकवासलाचे वर्षातून ३ आर्वतन मदनवाडी तलावामध्ये सोडल्याने पाणी प्रश्न मार्गी लागेल. ४० चारीची दुरुस्ती करून देखील पाणी सोडण्यात यावे. तसेच जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या सुशोभिकरण करण्यासाठी देखील निधी मिळण्याची मागणी सरपंच संतोष सोनवणे यांनी केली.

यावेळी संभाजी होळकर यांनी निंबोडी सरपंच संतोष सोनवणे यांनी मागणी केलेली कामे अजित पवार यांच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शिवाजी काळे, ग्रामपंचातीचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिद्धेश्वर निंबोडी येथे आरोग्य शिबिरातून 221 रुग्णांची तपासणी ; नूतन सरपंच संतोष सोनवणे यांची माहिती

0

शासनाच्या योजनेतील गोल्डन कार्ड आणी आभा कार्ड साठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणार मदत ; राजकीय जोडे बाजूला ठेवत गावातील नागरिकांसाठी विकास कामांना प्राधान्य देण्याचा सरपंच संतोष सोनवणे यांचा संकल्प

भिगवण वार्ताहर.दि.२३

सिद्धेश्वर निंबोडी ता.बारामती येथे १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा २२१ नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती नवनियुक्त सरपंच संतोष सोनवणे यांनी दिली.यावेळी रुग्णांची रक्तदाब ,मधुमेह तसेच डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून भरघोस मताने निवडून आलेल्या सरपंच संतोष सोनवणे यांनी राजकीय मतभेद सोडून गावासाठी विकास कामांना महत्व देत वाटचाल सुरु केली आहे.याच अनुशंघाने १४ व्या वित्त आयोगातून गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्सेतून मुक्त करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.यासाठीं तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे ,बारामती पंचायत समिती आरोग्य अधिकारी डॉ.अनिलकुमार वाघमारे ,शिर्सुफळ प्राथमिक आरोग्य अधिकारी यांनी सहभाग नोंदवत रुग्णांची तपासणी केली.यावेळी भारत सरकारच्या योजनेतील गोल्डन कार्ड तसेच आभा कार्ड याविषयी मार्गदर्शन करून कार्ड काढण्याच्या विषयी मदत करण्यात आली.या आरोग्य शिबिरात जवळपास २२१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

यावेळी बोलताना सरपंच संतोष सोनवणे यांनी शासनाच्या अनेक योजना नागरिकांसाठी तयर करण्यात आलेल्या असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य ती मदत ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्याचा मानस व्यक्त केला.

आरोग्य शिबिरासाठी विजय मदने आरोग्य सहाय्यक ,रुपाली बंडगर ,माधुरी शिंदे समुदाय अधिकारी ,एस.एम उदावंत आरोग्य सेविका ,विकास कापसे ,रुपाली धुमाळ ,कमळ शेळके असा शासकीय आरोग्य विभागाचा स्टाफ मदतीस उपस्थित होता. यावेळी उपसरपंच मुमताज मुलाणी तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविस्तार अधिकारी शिवाजी काळे यांनी आरोग्य शिबिराचे नियोजन केले.

रोटरी क्लब ऑफ भिगवण च्या माध्यमातून विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मूठभर धान्य जमा करीत वाटला आभाळाएवढा आनंद

0

एक् मुठ धान्य गरजावंतासाठी जमवून चिमुकल्या नी घेतला दातृत्वाचा वसा

सत्यवार्ता वार्ताहर : दि. 23

विद्या प्रतिष्टानच्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीअम स्कूल, चिंचोली येथील रोटरी इंटरॅक्ट क्लब आयोजित ‘एक मूठ धान्य’ या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजातील संवेदनशीलता अजूनही टिकून आहे व ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे हे दाखवून दिले आहे. या उपक्रमात शाळेतील मुलांनी व पालकांनी सढळ हाताने एकूण १३ पोते धान्य जमा केले. यात गहू, तांदूळ, बाजरी व ज्वारी या धान्याचा समावेश आहे. हे जमा केलेले धान्य गोविंद वृद्धाश्रम, टेंभुर्णी यांच्या संचालकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजीत भोंगळे यांनी शाळेतील मुलांना सामाजिक बांधिलकी जपता यावी व गरजूंना मदत मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब व शाळेतील इंटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक मूठ धान्य’ हा उपक्रम राबवला असल्याचे सांगितले.


या उपक्रमाच्या माध्यमातून दान केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दातृत्त्वाची भावना वाढीस लागावी व त्यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हा उद्देश सफल झाला.रोटरी क्लब भिगवन अनेक सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज भाई शेख यांनी सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सचिन शेठ बोगावत यांनी रोटरीच्या संकल्पनेतून 7 वर्षांपासून हा उपक्रम राबवीला जात असून समाजातील इतरही सामाजिक संस्थांनी राबवला तर अनाथ गोरगरीब लोकांना फार मोलाची मदत होईल असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब चे एजी संजय खाडे नूतन अध्यक्ष संतोष सवाने तसेच भिगवण रोटरी सदस्य उपस्थित होते.इंट्रकट क्लब समन्वयिका अर्चना जानकर व मोहिनी गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले.