Wednesday, October 7, 2026
Home Blog Page 9

पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकाजवळ एसटी खाली चिरडून एकाचा मृत्यू तर दोघे जन जखमी ; पुढे जाण्याच्या नादात चालकाचा सुटला ताबा

0

भिगवण वार्ताहर.दि.२

पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून एकाला जीव गमवावा लागला.तर दोघे जखमी होवून अनेक दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली.अपघात घडल्यावर एसटी ड्रायव्हर ने भिगवण पोलिसांत हजेरी लावून ब्रेक फेल झाल्याची बतावणी केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ एसटी बसखाली गंगाराम सोमा पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.भिगवण बस स्थानकापासून दोन बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.बस स्थानकासाठी असणाऱ्या सर्विस रस्त्याने येणाऱ्या दोन बस चालकामध्ये पुढे जाण्याची शर्यतीमुळे हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.यावेळी उजव्या बाजूने असणार्या गाडीने मुख्य मार्गावर प्रवेश मिळविला मात्र डाव्या बाजूने येणाऱ्या बस ड्रायव्हरचे लक्ष विचलित झाल्याने मृत पवार बस खाली चिरडले गेले.यावेळी अपघात ग्रस्त चालकाने बस ड्रेनेजच्या कठड्यावर चढविल्यामुळे बस थांबली मात्र तोपर्यंत ७ ते ८ दुचाकी गाडी खाली चेंगारल्या गेल्या.या अपघातात मृत पवार यांच्यासह दोन जन जखमी झाले.अपघातानंतर बस चालकाने भिगवण पोलीस ठाण्यात हजर होवून ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती दिली. मात्र १०० फुटावरील स्थानकांत बस व्यवस्थितपणे थांबली असल्याचे नागरिकांनी माहिती दिली.

चौकट…..भिगवण एसटी अपघातामुळे पुणे येथील संतोष माने एसटी अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या.तर भिगवण येथे एका मनोरुग्णाने याच भिगवण बस स्थानकातून बस चालू करून पुणे सोलापूर मार्गावर पळविल्याच्याही आठवणी समोर आल्या.तर भिगवण येथील मुख्यमार्गावरील अनधिकृत व्यवसाय आणि पार्किंग यामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता यामुळे वर्तविण्यात आली.

भिगवण बस स्थानकावर येणाऱ्या बस मुळे अनेक अपघात घडले आहेत.बस स्थानकावर बस आणत असताना चालक वेगाने गाड्या चालवीत असतात.जास्तीची वर्दळ आणि रहदारी असताना वेगावर नियंत्रण आणण्याची गरज आहे असे मत माजी सरपंच पराग जाधव यांनी मांडले.

भिगवण बाजार पेठेतील व्यवसायिकाची गळफास घेत आत्महत्या ; आजाराच्या कारणावरून पाऊल उचलल्याची शक्यता .

0

भिगवण वार्ताहर दि. 22
भिगवण बाजारपेठेतील व्यवसायिकाने राहत्या घरी वायरच्या सहायाने गळफास घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास घडली. शारीरिक व्याधी अथवा आजाराची भीती
घेऊन पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .मात्र आत्महत्येचे कारण उघड झालेले नसून याबाबत भिगवण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शैलेश धरमचंद ओसवाल रा.राही आंगण बिल्डिंग भिगवण असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.याबाबत मयत शैलेश यांच्या पत्नी मेघना ओसवाल यांनी भिगवण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.शैलेश ओसवाल आज नियमित पणे कामकाज करित असताना बुधवारी दुपारी त्यांनी हे पाऊल उचलले याबाबत भिगवण बाजार पेठ आणी परिसरात् त्यांच्या शारीरिक आजार आणी त्यांची मानसिकता याबाबत उलट सुलट चर्चा केली जात होती .मात्र त्यांच्या आत्महत्ये बबाबत कोणतेही कारण समोर आलेले नाही. भिगवण पोलिसांनी याबाबत आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. ओसवालं यांच्या या आत्महत्येमुळे भिगवण बाजार पेठेवर शोककळा पसरल्याचे दिसून आले. भिगवण पोलिसांनी पंचनामा करित त्यांचे पार्थिव इंदापूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले .याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करित आहेत.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी भिगवण बाजारपेठेतील व्यवसायिकाने जीव दिल्याची घटना अतिशय दुःखद असून ओसवाल यांच्या नातेवाईक यांनी तक्रार केल्यास पुढील तपास योग्य पद्धतीने होणार असल्याचे सांगितले.तसेच त्यांच्या काही डायऱ्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले.

रोटरी क्लब भिगवण यांच्या माध्यमातून एस टी चालक वाहक आणी प्रवाशी यांच्या आरोग्याची तपासणी

0

ग्रामीण रुग्णालय भिगवणआणी वाहतूक नियंत्रक यांच्या माध्यमातून रोटरीचा स्तुत्य उपक्रम .

भिगवण वार्ताहर .दि. 11
रोटरी क्लब ऑफ भिगवण तसेच ग्रामीण रुग्णालय व वाहतूक नियंत्रक परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एस टी चे चालक व वाहक आणी प्रवाशी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आहे आले. भिगवण बस स्थानक येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात 100 च्या वरती नागरिकांची तपासणी करण्यात आली.

सकाळी 10 वाजता सुरु झालेल्या या शिबिरामध्ये शुगर तपासणी ,ब्लड प्रेशर या महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्या.तर तपासणी नंतर घेण्यात येणारी खबरदारी तसेच आरोग्याविषयी सल्ला देण्यात आला.
यावेळी भिगवन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन विभुते ,वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक देशपांडे डॉ अमोल खानावरे यांनी रुग्णांची तपासणी करून सल्ला दिला . तसेच अधिपरीचारिका रेश्मा निळे प्रियदर्शनी शिंदे जया गायकवाड लॅब टेक्निशन शिवांजली वाकळे यांनी तपासणी केल्या.
यावेळी सरपंच दीपिका क्षीरसागर , रोटरी अध्यक्ष रणजित भोंगळे ,रियाझ शेख ,तुषार क्षीरसागर , इंदापूर बस आगार चे डेपो मॅनेजर गोसावी यांनी भेट दिली.

यावेळी रोटरी अध्यक्ष् रणजीत भोंगळे यांनी दैनंदिन जीवनामध्ये एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने बस चालक व वाहक यांच्यावरील ताण वाढत आहे हे लक्षात घेता त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे सर्व सदस्य व भिगवन बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक एन एम राऊत यांनी केले.

सकल मराठा समाजाने रोखला पुणे सोलापूर महामार्ग ; जालना येथील लाठीमाराचा भिगवण येथे निषेध

0

भिगवण वार्ताहर.दि.३

जालना येथील मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी भिगवण येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला.यावेळी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली.

एक मराठा लाख मराठा ,आर कोण म्हणत देणार नाही आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाय अशा घोषणा देत शेकडो मराठा तरुण पुणे सोलापूर महामार्गावर ठाण मांडून बसला असल्याचे दिसून आले.जालना येथील निष्पाप मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमार करून डोकी फोडली.याच जुलमी कारवाईचा भिगवण येथे निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी भिगवण परिसरातील अमर बौद्ध संघटना ,मुस्लीम संघटना ,भोई संघटना आणि कुंची कोरवी संघटना यांनी मराठा समाजाच्या आंदोलनांना पाठींबा व्यक्त केला.यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा संघाचे पांडुरंग जगताप ,अशोक शिंदे ,सचिन बोगावत ,विक्रम शेलार ,डॉ.पद्मा  खरड यांनी लाठीमार आणि गोळीबार करणाऱ्या सरकारचा आणि सरकारचा आदेश माणून सर्वसामान्य मराठा आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलीसानाचा निषेध व्यक्त केला.तर सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,तहसीलदार अनिल ठोंबरे ,भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी आर सी पी ३ आणि ४ , एडीम २ वाहने , ४ अधिकारी आणि जवळपास ३० पोलीस जवान तसेच महामार्ग पोलीस पथक असा तगडा पोलीस बंदोबस्त यावेळी लावण्यात आला असल्याचे दिसून आले.

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी आंदोलना दरम्यान कोणातही गैरप्रकार घडू नये साठी खबरदारी घेतली होती.तर आंदोलन स्थळा पासून २०० मीटर दूरवरच वाहने थांबवून ठेवली होती.तर कोठेही टायर पेटवून वाहने रोखली जावू नयेत यासाठी खबरदारी घेत पोलीस पथकाची नेमणूक केली होती.आंदोलन सुरु होण्या अगोदर २ तास पूर्ण रंगीत तालीम घेण्यात आल्याने आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने पार पडल्याचे पहावयास मिळाले.

भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांना ग्रीन वर्ल्ड चा सन्मान

0

भिगवण वार्ताहर.दि.१५

भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांचा ग्रीन वल्र्ड प्राईड ऑफ इंडिया २०२३ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.या पुरस्काराने भिगवण पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक म्हणून भिगवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप पवार यांनी कायदा सुव्यवस्था ,गुन्हेगारीचे उच्चाटन ,वाहतूक कोंडी सारख्या समस्या कायमस्वरूपी सुटाव्यात यासाठी कामकाज केले .विशेष करून भिगवण शहर हे शिक्षणासाठी हब समजले जाते.याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोड रोमिओ चा त्रास शाळकरी मुलीना सहन करावा लागत होता. याविषयी मोठ्या प्रमाणात कारवाया करून मुली आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले.तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निराकारण तातडीने करून त्यांना न्याय वाटेल अशी कार्यपद्धती अवलंबली.याच त्याच्या कार्याचा आढावा घेत मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅनड टेक्नोलोजी पुणे येथे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार वितरण प्रसंगी विविध शाळा महाविद्यालयांना ग्रीन वर्ल्ड क्लबच्या वतीने १० हजार पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी ,कॉसमोस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे ,पप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय कणेकर ,रामबंधू मसालाचे अध्यक्ष हेमंत राठी ,रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर ,ग्रीन वर्ल्ड चे अध्यक्ष गौतम कोतवा हे उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

वाद एकाशी जिवघेना हल्ला दुसऱ्यावरच ; हॉटेल व्यावसायिक धुमाळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कोडे उलघडले

0

जीवाघेना हल्ला करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ; चार अनोळखी साथीदार फरार

भिगवण वार्ताहर .दि.१०

सत्यवार्ता न्यूज नेटवर्क बातमी.

दुचाकीला कट मारल्याच्या वादातून झालेल्या किरकिरीची माफी मागण्याचा बहाना करून बदला घेण्यासाठी आलेल्या टोळक्याने धारदार शश्त्राने दुसऱ्याच तरुणावर वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दौंड पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी चिंचोली येथे घडली .या सदंर्भात रावणगाव पोलीस ठाण्यात ५ आरोपीविरोधात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शिवम कांबळे रा.दौंड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे इतर ४ साथीदारांनी पळ काढला आहे.याबाबत राहुल राजेंद्र ढवळे रा.मदनवाडी यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत सांगितलेल्या घटना क्रमानुसार फिर्यादी राहुल याचा भाऊ अक्षय जनावरांचा चारा घेवून येत असताना आरोपी शिवम कांबळे याने दुचाकीला कट मारून उलट अक्षय यालाच शिवीगाळ करीत गाडीच्या चाव्या काडून घेतल्या होत्या.त्यावेळी राहुल याने फोन करून समंजस पणा दाखवत वाद मिटविला होता.चार दिवस उलटून गेल्यावर राहुल याला शिवमने फोन करून माफी मागावयाची असल्याचे सांगून भेट घेण्याचे सांगितले,मात्र राहुल हा विशाल धुमाळ या हॉटेल व्यावसायिकासोबत दौंड हद्दीतील स्वामीचिंचोली येथे असल्यामुळे शिवम त्याला त्याच ठिकाणी आलो म्हणून भेटण्यास गेला .सोबत दोन दुचाकीवर ४ साथीदार होते.पाचही आरोपींनी राहुल असणाऱ्या ठिकाणी जात मी शिवम कांबळे आहे तूच राहुल आहेस का असे म्हणत विशाल आणि राहुल यांना मारहाण करण्यास सुरवात केली.तर दोन साथीदार यांनी राहुल याला पकडून धरत दुसऱ्या दोघांनी विशाल याला पकडून ठेवत शिवम याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने विशाल याच्यावर वार केले.त्यावेळी दोघांनी आरडाओरडा सुरु केला असता यातील दोन आरोपींनी जखमी विशाल याच्या गळ्यातील सोन्याची चैन घेवून दुचाकीवरून धूम ठोकली.आरडाओरडा झाल्यामुळे जमलेल्या जमावाने शिवम याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

या संपूर्ण घटनेचा हॉटेल व्यावसायिक विशाल धुमाळ यांचा सबंध नसताना राहुल समजून आरोपी शिवम याने विशाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.यात गंभीर जखमी धुमाळ यांना बारामती येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

.जखमी विशाल धुमाळ हे सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आणि शिवसेना वैदकीय मदत केंद्राचे काम करीत असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार आहे.धुमाळ यांच्यावर वार केल्याची बातमी वार्यासारखी पसरल्यामुळे अनेक तरुणांनी हॉस्पिटल कडे धाव घेतली.त्यामुळे काही काळ बारामती भिगवण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले.  

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार आणी त्यांच्या पोलीस पथकाचे हद्दीचा भाग विचारात न घेता जखमी धुमाळ यांना उपचार मिळणे कामी तसेच आरोपीला धारदार शस्त्रासह ताब्यात घेत कायदा आणी सुव्यवस्था चोख ठेवण्याचे काम केल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

भिगवण येथील प्रसिद्ध हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला ; कोयत्याने केले सपासप वर

0

जीवाघेण्या हल्यात हॉटेल व्यवसायिक गंभीर जखमी ; उपचारासाठी बारामती येथे दाखल

भिगवण वार्ताहर.दि. 9

भिगवण येथील हॉटेल व्यवसायिकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सायंकाळी घडली.हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार भिगवण येथील प्रसिध्द मासे खानावळीचे मालकांवर हे प्राणघातक वार झालेले आहेत.पुणे सोलापूर महामार्गा वरील दौड हद्दीतील हॉटेल ज्योती व्हेज समोर हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे.दौड हद्दीतील गुन्हा असला तरी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील कोयता जप्त केला आहे.तसे च याची माहिती दौड पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.सदर् हल्लेखोर एकटाच होता की त्याचे साथीदार याबाबताची माहिती मिळाली नाही .मात्र हा जिवघेना हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.जखमी हॉटेल व्यवसायिक यांना भिगवण येथील यशोधरा आय सी यु या खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच पुढील उपचारसाठी बारामती हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना संपर्क केला असता हल्लेखोराला त्याच्या ताब्यात असणाऱ्या धारदार शस्त्रासह ताब्यात घेतले असून याची माहिती दौड पोलीस ठाण्याला दिली आहे. तसेच जखमी व्यक्तीची

प्रकृती स्थिर असून भिगवण शहरात शांतता कायम असल्यामुळे कोणत्याही अफवाना बळी पडू नये असे आवाहन केले आहे

म्हसोबावाडी विहीर दुर्घटना प्रकरणी विहीर मालक आणी ठेकेदार या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ;

0

भिगवण वार्ताहर.दि.५

सत्यवार्ता न्यूज नेटवर्क भिगवण

म्हसोबावाडी येथील विहीर दुर्घटना घडून झालेल्या मजुरांच्या मृत्यू बाबत विहीर मालक गिरीश विजय क्षीरसागर तसेच कंत्राटदार विश्वास गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. या प्रकरणी विहीर मालक गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आले आहे.

म्हसोबावाडी येथील विहिरीच्या रिंग बांधण्याचे काम सुरु असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली जावेद अकबर मुलानी ,सोमनाथ लक्ष्मण गायकवाड ,परशुराम बन्सीलाल चव्हाण ,लक्ष्मण मारुती सावंत हे  ४ मजूर गाडले गेले होते.मंगळवारी घडलेल्या या घटनेची माहिती त्याच रात्री उशिरा मिळाली होती.भिगवण पोलीस ठाण्यात याची खबर मिळताच त्यांनी तातडीने सर्व प्रशासकीय यंत्रणाना माहिती देत मजुरांच्या शोध कार्याला सुरवात केली होती. अक्राळविक्राळ विहीर आणि गाडल्या गेलेल्या मजुरांना जिवंत काढण्यासाठी प्रशासन सर्व ते प्रयत्न करीत होते.पुणे येथून यासाठी एन डी आर एफ पथकाला पाचारण करण्यात आले होते.मात्र अनेक प्रयत्न करूनही कामगारांना जिवंत काढणे प्रशासनाला शक्य झाले नाही आणि जवळपास ७० तास चाललेल्या बचाव आणि शोध पथकाच्या हाती ४ हि मजुरांचे मृतदेह मिळून आले.यावेळी नातेवाइकांनी मृतदेह ठेवलेल्या अम्बुलंस समोर लोटांगण घेत न्याय देण्याची मागणी केली.तर विहीर मालक आणि कंत्राटदार याना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढून या प्रकारणी दोषींवर कठोर शासन करण्याची ग्वाही दिली.याच संदर्भात भिगवण पोलिसांनी विहीर मालक गिरीश क्षीरसागर आणि रिंगचे कंत्राट घेणाऱ्या विश्वास गायकवाड विरोधात याठिकाणी काम करताना मजुरांच्या जीवाला धोका होवू शकतो याची कल्पना असताना आणि कोणत्याही प्रकारची सुरक्षेच्या बाबींचा उपयोग न केल्यामुळे मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.तर क्षीरसागर याला तातडीने अटक करण्याची प्रकिया पूर्ण केली आहे.

म्हसोबावाडीतील विहिरीत गाडल्या गेलेल्या 4 मजुरांचे मृतदेह शोधण्यात एन डी आर एफ पथकाला यश ; 70 तासाच्या अविरत प्रयत्नातून मृतदेह मिळाले

0

भिगवण वार्ताहर.दि.४

सत्यवार्ता न्यूज नेटवर्क भिगवण

म्हसोबावाडी ता.इंदापूर येथील विहिरीची रिंग तयार करत असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली गाडले गेलेल्या ४ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात एन डी आर एफ पथकाला ७० तासांनंतर यश मिळाले. ७० तास उलटून गेल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत मजूर मिळण्याची आशा मावळली होती आणि प्रत्यक्षात तेच वास्तव समोर आले. मृतदेह बाहेर काढताच मृतांच्या नातेवाइकांनी न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नसल्याचे प्रशासनाला सांगितले.

म्हसोबावाडी येथे खडी क्रेशर साठी दगड काढून त्याठिकाणी झालेल्या अक्राळविक्राळ खड्याला विहिरीचे रूप देवून रिंग टाकण्याचे काम सुरु होते.तर हे काम करताना कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे रिंग बांधताना अपघात होऊन ४ मजूर मातीच्या खाली गाडले गेले होते.त्यांना जिवंत काढण्यासाठी एन.डी आर एफ पथक गेल्या दोन दिवसापासून अविरत पणे काम करीत होते.मात्र अनेक प्रयत्न करूनही मजूर ज्या ठिकाणी गाडले गेले होते त्या ठिकाणी पोहोचता येत नव्हते अखेर पूर्व बाजूला सुरु केलेले खोदकाम थांबवून दुसऱ्या बाजूला रप्म तयार करून मशीन खाली उतरवण्यात आल्या.आणि तब्बत ७० तास उलटून गेल्यावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह मिळून आला.त्यानंतर शोधकार्य सुरु ठेवून ३ मजुरांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.मृतदेह बाहेर काढताच नातेवाईक यांनी हंबरडा फोडून रडण्यास सुरवात केली.त्यामुळे तेथील वातावरण अगदी रडण्या ओरडण्याच्या आवाजाने भारून गेलेले दिसून आले.

मृतदेह अम्बुलंस मध्ये ठेवताच मृतकाचे नातेवाइकांनी वाहन अडवून जोपर्यंत यातील दोषींना अटक करून न्याय मिळत नाही तो पर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याचे सांगितले.तर विहीर मालकावर तसेच रिंगच्या कंत्राटदार याच्यावर गुन्हा नोंद करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तर हा अपघात होता कि घातपात याची चौकशी करण्याची मागणी समोर येत आहे.

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग कोसळून चार कामगार गाडले गेल्याची भीती ; एन डी आर एफ पथकाकडून शोध मोहीम सुरु

0

भिगवण सत्यवार्ता न्यूज नेटवर्क.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी शेतातील विहिरीचे संरक्षण कठड्याचे काम सुरु असताना त्यातील काही भाग कोसळून त्या खाली काम करणारे 4 मजूर गाडले गेल्याची घटना घडली. गाडले गेलेले चारही मजूर बेलवाडी गावाचे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.या ठिकाणी एन डी आर एफ पथक आले असून ढासळलेला भाग पोकलंड मशीनाच्या सहायाने काढून मजुरांचा शोध घेतला जात आहे.

गाडले गेलेल्या चारही कामगारां च्या नावाची खात्री केली जात आहे.अतिशय गंभीर प्रकरण असल्यामुळे या ठिकाणी एन डी आर एफ च्या पथकाला बोलाविण्यात आले असून पथकाने तातडीने मलबा हटाविण्याचे काम सुरु केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार म्हसोबाची वाडी येथील विजय क्षीरसागर यांच्या शेतात नव्याने बांधण्यात येत असलेल्या विहिरीची रिंग चे काम सुरु असताना सदर प्रकार घडला आहे. रिंगचे काम करणारे कामगार रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने घरच्या नातेवाईकांनि शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला.

घटनास्थळी माजी मंत्री आणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मध्यरात्री भेट देत प्रशासनाला शोध कार्यासाठी सूचना करित मदत केली.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती बारामती विभाग पुणे ग्रामीण, श्रीकांत पाटील तहसीलदार इंदापूर हे हजर आहेत.
घटनास्थळी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.घटनास्थळी लाईट ची व्यवस्था करण्यात आली आहे. पोकलेन मशीन लावून विहिरीचे डासाळलेला मुरूम काढण्याचे काम चालू आहे. मुरूम काढून कामगार बाहेर काढण्याचे काम चालू आहे.