Wednesday, October 7, 2026
Home Blog Page 10

भिगवण मुख्य बाजार पेठेतील सराफी दुकान फोडण्याचा चोरांचा प्रयत्न ; सायरन वाजल्यामुळे काढला पळ

0

भिगवण वार्ताहर .दि. ७

भिगवण येथील मुख्य बाजार पेठेतील सराफी दुकान चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास  फोडण्याचा प्रयत्न केला.मात्र दुकानात असणारा  सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला .या संपूर्ण प्रकाराचे सी.सी टी व्ही मध्ये चित्रण झाले असून भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत चोरट्यांचा शोध सुरु केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिगवण बाजार पेठेतील श्रीकृष्ण ज्वेलर्स या सराफी दुकानात हा प्रकार घडला.मध्यरात्री २ च्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या ४ ते ५ अज्ञात चोरांनी कटावणी च्या सहायाने दुकानाचे शटर उघडले .मात्र शटर उघडताच दुकानाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेली सायरन चालू झाल्यामुळे चोरट्यांनी येथून पळ काढला.तर काही वेळानी याच ठिकाणी येवून परत चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र दुकानाच्या आत असणारी जाळी तोडण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांना याची चाहूल लागल्यामुळे येथून पळ काढण्यात समाधान मानले.सायरनचा आवाज जवळपास २० मिनिट येवूनही कोणीही या ठिकाणी न आल्यामुळे परत येण्याचे धाडस चोरट्यांनी केले असल्याचे दुसऱ्या इमारतीवर असणाऱ्या सी.सी.टी.व्ही चित्रणातून दिसून आले.काही वेळानी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना याची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी भेट देण्यासाठी आले होते.

चौकट…..आजकाल सोन्याचे भाव गगनाला भिगले असून चोरट्यांनी सराफी दुकाने फोडण्याचे टार्गेट ठेवल्याचे दिसून येत आहे.तर चारचाकी वाहन दुकानाच्या दरवाजात लावून चोरी करण्यामागे तिजोरी फोडण्यासाठी वापरण्यात येणारी गॅसकटर यंत्रणा वापरण्याचा हेतू असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पोलीस तसेच व्यावसायिकांनी या बाबत गंभीरता पूर्वक उपाययोजना करण्याची करण्याची आवश्यकता असल्याचे सराफ संघटना सदस्य सुनील उदावंत यांनी सांगितले.

पुणे सोलापूर महामार्गावरील ज्योती हॉटेल समोर थांबलेल्या आयशर गाडीला स्कार्पिओ धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 9 जन जखमी

0

भिगवण वार्ताहर.दि.१५

पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण गावच्या हद्दीत  बंद पडलेल्या आयशर टेम्पोला स्क्रार्पिओ धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ९ जन गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.पुणे सोलापूर महामार्गावर अनधिकृतपणे थांबलेल्या वाहनामुळे अनेक अपघात होवून निष्पाप जीव जात असताना याकडे महामार्ग प्रशासन गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात जालिंदर बाळासाहेब वीरकर वय .३६ रा चिखली ता.हवेली यांचा मृत्यू झाला आहे.तर वैशाली राजू फडके ,मच्चीद्र बाळासाहेब वीरकर ,लक्ष्मीबाई बाळासाहेब वीरकर ,प्रीतम जालिंदर वीरकर ,मंगल राहुल मेदनकर ,विशाल विलास मोरे ,संगीता विलास मोरे तसेच राजू गोविंद फडके हे ९ जन किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले आहेत.वीरकर मोरे कुटुंबीय आपल्या ताब्यातील स्कारपिओ नंबर एम.एच.१४ जी.ए ५५१४ गाडीतून पुणे बाजूकडून सोलापूरकडे जात असताना भिगवण गावच्या हद्दीत ज्योती हॉटेल येथून समोरील गाडीला ओव्हरटेक करीत असताना मुख्य मार्गाच्या शेजारी कडेला थांबलेल्या आयशर गाडी नंबर एम.एच.४३ यु ६८१७ गाडीला पाठीमागून धडकून अपघात झाला आहे.याबाबत फिर्यादी राजू फडके यांनी खबर दिली असून भिगवण पोलिसांनी आयशर ड्रायव्हर विरोधात त्याच्या ताब्यातील वाहन धोकेदायक पणे रस्त्याच्या कडेला उभे करून रीप्लेकटर अथवा धोक्याची कोणतीही सूचना न लावल्याबद्दल तसेच अपघातास कारणीभूत ठरून एकाचा जीव आणि ९ इसमाला जखमी करण्यास कारण ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अपघाताचा तपास पोलीस हवालदार लोढी करीत आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावर धोकेदायक पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनामुळे अपघात घडत असून यात निष्पाप माणसांचे जीव जात आहेत.आजचा अपघात घडण्या अगोदर काही मिनिटे नवजीवन पेपर एजन्सीचे संचालक संतोष सोनवणे यांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर ड्रायव्हरला या ठिकाणी अपघात घडू शकतो याची माहिती देवून गाडी १०० फुट पुढे असणाऱ्या मोकळ्या जागेत लावण्याची विनंती केली होती.तर अनेक मोर्निंग वॉक साठी जाणार्या नागरिकांनी गाडी काढण्यासाठी सूचना केल्या होत्या.मात्र झोपेत असणाऱ्या ड्रायव्हर ने याकडे दुर्लक्ष केले आणि १० मिनिटाच्या आत हा अपघात घडला.

तक्रारवाडी गावाचे सरपंच पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त असताना उपसरपंच यांना सहीचा अधिकार का नाही ? कोण उप सरपंच यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवत आहे.

0

सरपंच पद रिक्त असेल तर उप सरपंच यांना सहीचा आणी कार्यभार सांभाळण्याचा अधिकार .

महिला उपसरपंच असल्यामुळे अधिकार डावलला जात आहे का ?

कोणाच्या राजकीय दबावा पोटी दिला जात नाही सहीचा अधिकार ? नागरिकांत चर्चा

भिगवण वार्ताहर.दि.२१

तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश विनायक वाघ यांनी पदाचा राजीनामा देवून दीड महिना उलटूनही विद्यमान उपसरपंच यांना सहीचा अधिकार दिला नसल्यामुळे कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.तर सत्ताधारी पार्टीचे विद्यमान उपसरपंच असतानाही कदाचित विश्वास नसल्यामुळे सहीचा अधिकार दिला गेला नाही काय ? अशी कुजबुज गावातील नागरिक करीत आहेत.

तक्रारवाडी गावच्या विद्यमान सरपंच वाघ यांनी दिलेल्या शब्दाचे पालन करीत आपल्या सहकारी सदस्याला पदभार मिळावा म्हणून ठरलेल्या वेळात राजीनामा सादर केला. शासनाच्या ठरलेल्या पद्धतीने तो गटविकास अधिकारी यांनी छाननी करून ग्रामपंचायत सदस्याकडे पडताळणीसाठी योग्य वेळेत पाठविला.पडताळणी होवून माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे जावून तो मंजूर होवून प्रोग्राम लागणार आहे.या सर्व बाबी पार पाडण्यासाठी जवळपास दीड महिना कालावधी लोटला आहे.या काळात ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी यांचा पगार दिवाबत्ती तसेच आवश्यक पत्रव्यवहार पाहण्यासाठी उपसरपंच यांना सहीचा अधिकार मिळणे क्रमप्राप्त होते.मात्र सहीचा अधिकार मिळाला नसल्यामुळे सर्व कामाचा खेळ खंडोबा होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून केला जात आहे.तर उपसरपंच आपल्याच विचाराचा असताना सहीचा अधिकार विश्वास नसल्यामुळे दिला जात नाही काय असा संशय एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर वृत्तवाहिनी प्रतिनिधीकडे व्यक्त केला.

तक्रारवाडी गावासाठी ‘ हर घर नल हर घर जल ’ योजने अंतर्गत जवळपास १ कोटी ५० लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.हि योजना विद्यमान सरपंच सतीश वाघ यांच्या कार्यकाळात सुरु होणे अपेक्षित होते.मात्र सरपंच वाघ यांचा राजीनामा झाल्यावर या कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली. त्यामुळे उपसरपंच यांना सरपंच यांच्या अनुपस्थितीत कामकाज करण्याचा आणि सहीचा अधिकार असणे गरजेचे होते.मात्र राजकीयदृष्ट्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता ग्राह्य धरून अधिकार देण्यात आला नाही काय असा सवाल उपस्थित होत आहे.

याबाबत ग्रामसेवक दीपक बोरावके यांच्याशी संपर्क साधला ग्रामपंचायत कारभार व्यवस्थितपणे चालू असून उपसरपंच सहीचा अधिकार विषयी सदस्यांची मिटिंग बोलावली आहे.या बैठकीत सहीचा अधिकार उपसरपंच यांना देण्यात येण्याविषयी ठराव घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

तक्रारवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती उत्साहात साजरी

0

भिगवण वार्ताहर.दि.17

तक्रारवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ३६५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. घोडे दांडपट्टा आणि साहसी खेळाबरोबरच नेत्रदीपक लाईट आणि डीजेच्या सोबत काढण्यात आलेल्या भव्यदिव्य मिरवणुकीत परिसरातील तरुणांनी मोठा सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.

तक्रारवाडी येथील तरुणांनी एकत्र येत हि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार आणि लाइफलाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ.संजय भोसले यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजता महाराजांची आरती करून जयंतीला सुरवात करण्यात आली.यावेळी तरुणाईने पांढऱ्या शुभ्र वेशातील कपडे परिधान केल्यामुळे वेगळेपणा दिसून येत होता.दिवसभर महाराजांची मूर्ती सभा मंडपात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.संध्याकाळी ६ वाजता मिरवणुकीला सुरवात करण्यात आली.यावेळी १० पांढरेशुभ्र घोडे,पांढर्या रंगाचे कुडता पायजमा घातलेले तरुण आणि गळ्यात भगवे उपरणे असा वेश परिधान केलेले दांडपट्टा खेळणारे मुले यांनी वातावरणात रंगत आणली होती.भव्यदिव्य मिरवणुकीत नेत्रदीपक रंगीबेरंगी रंगाची उधळण करणारा लाईट सेट आणि डीजे यामुळे तरुणाई बंधुंद होवून नाचत असल्याचे पहावयास मिळत होते.तर संभाजी महाराज यांची जयंती असल्याचे भान राखून प्रत्येक वेळी घोषणाही देण्यात येत होत्या.

छ. संभाजी महाराजांची मिरवणूक प्रत्येक वर्षी तक्रारवाडी गावात सुरु होऊन मदनवाडी चौफूला मार्गे भिगवण शहरातून मुख्य बाजार पेठेतील रस्त्याने जात असते मात्र पोलीस अधिकारी दिलीप पवार यांच्या सूचनेचा आदर राखून तरुणांनी हि मिरवणूक फक्त तक्रारवाडी गावात काढून आदर्श निर्माण केला.या मिरवणुकीत तरुण बाल आणि जेष्टानीही सहभाग नोंदवला.मिरवणुकी दरम्यान सर्व माता भगिनींनी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून आशीर्वाद घेतले.मिरवणुकीचे नियोजन राजवर्धन वाघ ,दीपराज काळंगे ,प्रथमेश निंबाळकर ,प्रणव वाघ ,किशोर काळंगे ,रोहन वाघ ,ऋतिक वाघ ,रोहन काळंगे ,केशव गोडसे यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले.

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नाहीतर संविधान वाचून ; समता फौंडेशन चा आगळा वेगळा उपक्रम

0

भिगवण वार्ताहर.दि.१४

महापुरुषांची जयंती नाचून साजरी न करता ती वाचून साजरी करावी असा विचार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता. त्यांच्या याच विचाराचा आदर्श समाजासमोर ठेवून भिगवण येथील समता फौंडेशन यांनी ‘ वाचू संविधान १० तास ’या स्पर्धेचे आयोजन करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

महापुरुषांची जयंती म्हणजे डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि काळजाचे ठोके वाढवीत बेधुंद तरुणांचा नाच परंतु या डीजेला फाटा देत समता फौंडेशन या सामाजिक संस्थेने भिगवण येथील तारादेवी लोन्स येथे या चला वाचू संविधान आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील विजयी उमेदवारांसाठी रोख रक्कम बक्षीस पारितोषिक आणि सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.सकाळी ७ वाजता सुरु झालेली स्पर्धा १० तास सुरु राहणार आहे.या स्पर्धेला १९६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.स्पर्धा सुरु झाल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाला १०० गुण दिले गेले त्यातून त्याच्या एकूण शिस्त पालनाच्या पाहणीतून गुण वजा केले जाणार असल्याचे आयोजक संजय देहाडे यांनी सांगितले.या वेळी भिगवण गावच्या सरपंच दीपिका क्षीरसागर ,पराग जाधव , पोलीस अधिकारी दिलीप पवार ,जयदीप जाधव ,पांडुरंग जगताप ,संकेत मोरे ,राजकुमार मस्कर , जयप्रकाश खरड ,अनिल तांबे ,कमलेश गांधी भेट देत सुभेच्छा दिल्या.या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून कला महाविद्यालय ,दत्तकला शिक्षण संस्था आणि प्राथमिक शाळा भिगवण यांच्या शिक्षकांनी काम पाहिले.

या उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा २१ मे रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.  

तीन तपे अर्थात 36 वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र ; प्रगती विद्यालयाचा स्नेह मेळावा भिगवण येथे पार पडला.

0

भिगवण वार्ताहर.दि.७

एक दोन नाही तर तब्बल ३६ वर्षांनी प्रगती विद्यालयातील वर्ग मित्रांनी एकत्र येत भिगवण येथील एका हॉटेल मध्ये स्नेह मेळावा आयोजित केला.अगदी वर्ग शिक्षकापासून सर्व शिक्षकांना सोबत घेत ३६ वर्षापूर्वीचा वर्ग परत भरविताना आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्याचे काम केले.

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील प्रगती विद्यालयातील १९८७ च्या वर्ग मित्रांनी आपला स्नेह मेळावा भिगवण येथील उजनी हॉटेल प्रांगणात आयोजित केला होता.३६ वर्षापूर्वी अगदी हाफ शर्टपँनट मधील असणारे 45 विद्यार्थी आजच्या काळात कोणी नोकरी व्यवसाय शेती पारंगत असल्याचे यावेळी ओळखी दरम्यान दिसून आले. या स्नेह मेळाव्याची सुरवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. अत्यंत आपुलकी आणि आनंदाने भारावून गेलेल्या वातावरणात घेण्यात आलेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थी दिलावर तांबोळी ,शरद डोंगरे ,जयश्री सरडे,मंदा चव्हाण ,दशरथ रासकर या वर्ग मित्रांनी आपले मनोगत व्यक्त करीत ओळख करून दिली. वर्ग शिक्षक अशोक कोकरे यांनी सर्व विद्यार्थी मित्रांची आपुलकीने चौकशी करीत सुरु असलेल्या व्यवसाय नोकरीची माहिती जाणून घेतली.तर इतर शिक्षक विवेक शेटे , सतीश मगर ,हनुमंत गोसावी यांनी विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करीत नेहमी एकमेकांच्या सहवासात राहण्याचा सल्ला दिला.तर आपल्या पैकी काहीना जर मदतीचा हात हवा असेल तर तो इतरांनी मनापासून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.या स्नेह मेळाव्याचे आयोजन उज्वला देवकर ,दिलीप पिसाळ , मदन झोळ , दिलीप गायकवाड ,दशरथ रासकर, लक्ष्मण गोळे ,विजय गुणवरे ,संजय डुबल ,भाऊसाहेब यांनी, वामन राऊत यांनी केले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गरोदर ठेवल्याचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीने झाडाला गळफास घेत संपविले जीवन ; शेटफळगढे येथील घटना

0

भिगवण वार्ताहर.दि.३०

भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील विटभट्टीवरील काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संशयिताने चिंचेच्या झाडाला लटकावून गळफास घेत आपले जीवन संपविल्याची घटना घडली. समाजातील बदनामी आणि पोलिसांचा अटकेचा ससेमिरा पाठीमागे लागण्याच्या विवंचनेतून आत्महत्या केली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार वय ४० वर्ष रा.शेटफळगडे असे गळफास घेवून जीव देणाऱ्याचे नाव आहे.मयत अर्जुन वर भिगवण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गरोदर ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.भिगवण पोलिसांनी यातील दुसरा आरोपी रमेश रघुनाथ मोरे याला गुन्हा दाखल झालेल्या दिवशीच अटक केली होती.तर दुसरा संशयित मयत अर्जुन याचा शोध पोलीस घेत होते.मात्र शनिवारी रात्री ११ च्या सुमारास बारामती भिगवण रोड शेजारील किरण वडूजकर यांच्या शेतात चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेत अर्जुन याने जीव दिला.याबाबत पिंटू रामभाऊ कुंभार यांनी भिगवण पोलिसांना खबर दिली आहे.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार , बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे याबाबतचा अधिकचा तपास करीत आहेत .

तरुणावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या अट्टल गुंडाच्या भिगवण पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; 13 महिन्यापासून देत होता पोलिसांना चकवा

0

भिगवण वार्ताहर.दि.२२

तक्रारवाडी गावातील तरुणावर जीवघेणा हल्ला करीत वर्षभरापासून फरार असणाऱ्या अट्टल गुंडाच्या मुसक्या आवळण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले.मात्र अजूनही त्याचा एक साथीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस अंकुश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र उर्फ राजू भगवान बदर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.१२ मार्च २०२२ रोजी तक्रारवाडी गावातील वैष्णव राहुल अनपट या तरुणाला जयपाल रसिक खरात ,विक्रम माडगे ,रवींद्र उर्फ राजू भगवान बदर ,विशाल घोलप या आरोपींनी पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून कट रचून  लोखंडी रॉड लाकडी बॅट याचा वापर करून जीवघेणा हल्ला केला होता.या जीवघेण्या हल्ल्यात वैष्णव गंभीर जखमी होवून अत्यंत वाईट अवस्थेत पोहोचला होता.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर २ आरोपी पोलिसांना चकमा देत फरार झाले होते. यातील बदर नावाचा आरोपी पडवी ता.दौंड येथे लपूनछपून राहत असल्याची गोपनीय माहिती भिगवण पोलिसांना मिळताच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम ,सचिन पवार रणजीत मुळीक ,महेश उगले ,अंकुश माने ,हसीम मुलाणी यांच्या टीमने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

भिगवण पोलिसांनी आरोपी विरोधात घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे आणि कायदेशीर तपासी कारवाई मुळे गेली १३ महिने यातील आरोपी जेलबंद आहेत.तर अजूनही १ आरोपी फरार असल्यामुळे त्यांचा जेल मधील प्रवास लांबणार आहे.तर या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी वैष्णव अनपट यांच्या आई वडिलाने केली आहे.    

तक्रारवाडी गावच्या सरपंच सतीश वाघ यांचा राजीनामा ; सरपंच पदासाठी 3 गटात चुरस

0

भिगवण वार्ताहर.दि.20

तक्रारवाडी गावच्या विद्यमान सरपंच सतीश विनायक वाघ यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वसाधारण पदासाठी असणाऱ्या सरपंच खुर्चीसाठी गावातील तीनही गटांनी आपली ताकद वापरण्यास सुरवात केली असून विजयमाला कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे ओस्तुक्याचे ठरणार आहे.

इंदापूर तालुक्यातील राजकारणात नेहमी अग्रगण्य असणाऱ्या तक्रारवाडी गावातील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ सालात पार पडली.गेली २० वर्षापासून माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून असणारे गाव सर्वपक्षीय गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवून ७ सदस्य निवडून आले.मात्र निवडणूक होताच निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ” कोणता झेंडा घेवू हाती ? ” या विषयावरून फुट पडून ५ सदस्यांनी एकत्र येत सरपंच पद मिळविले.त्यामुळे गावात निवडून आलेल्यात २ आणि विरोधी १ असे एकूण ३ गट निर्माण झाले.सरपंच पदाची २ वर्ष पूर्ण झाल्याने सतीश विनायक वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सहकारी सदस्यासाठी जागा मोकळी करून दिली.मात्र राजीनामा मंजूर होताच तीनही गटांनी आपली ताकद आजमविण्यास सुरवात केली असून यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.सर्वसाधारण जागेसाठी पद मिळणार असल्यामुळे ३ गटातील महिला सदस्यांनी तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांत आमदार दत्तात्रय भरणे यांचा समर्थक सरपंच होणार कि हर्षवर्धन पाटील यांचा समर्थक अशी चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे.मात्र कोणीही सरपंच झाला तरी स्वताच्या ऐवजी गावाचा विकास व्हावा अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे.

याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता इतर सदस्यांना पदाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण राजीनामा दिला असल्याचे सांगितले.तर गावच्या विकासासाठी आपण यापुढेही सर्व सदस्यांना सोबत घेवून कामकाज पाहणार असल्याचे सांगितले.

तक्रारवाडी येथील पिरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यानी पळवली ; चोरीची घटना सी.सी.टी.व्ही मध्ये कैद

0

भिगवण वार्ताहर.दि.३०

तक्रारवाडी येथील पीरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.चोरीचा हा प्रकार सी.सी.टी.व्ही मध्ये टिपला गेला असून भिगवण पोलिसांनी याबाबतची खबर मिळताच तातडीने तपास सुरु केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी दिली.

तक्रारवाडी गावातील नवसाला पावणारा पीर अशी ख्याती असणाऱ्या मंदिरातील हि दानपेटी आहे.नुकताच या पिरसाहेबाचा उरूस मोठ्या थाटामाटात पार पडला असून या दानपेटीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान टाकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.२८ तारखेच्या मध्यरात्री १ वाजून २० मिनिटाच्या वेळेत दुचाकीवरून आलेल्या ३ चोरट्यांनी हि चोरी केल्याचे सी.सी.टी.व्ही मध्ये दिसून येत आहे.तर हि चोरी उरुसाच्या दरम्यान मंदिराची रेकी करून केल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या घटनेबाबत माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रुपेश कदम ,महेश उगले ,हसीम मुलाणी यांचे पथक घटनास्थळी पाठवून तपासाला सुरवात केली.यावेळी तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ ,विजय जगताप ,संजय मोरे ,शरद वाघ ,केतन वाघ ,अंकुश वाघ घटनास्थळी उपस्थित होते.

सध्या उरूस ,यात्रा ,जत्रा यांचा उत्सव मोठ्या प्रमाणावर चालू असून चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी भिगवण पोलीस रात्रीच्या वेळेत पेट्रोलिंग करत असतात.तसेच गावातील नागरिकांना जागृत राहण्याच्या सूचना वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात येत असतात.मात्र तरी देखील यात्रा समितीकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे म्हसोबावाडी येथील देवाची मूर्ती ,सकुंडे वस्तीवरील मंदिरातील दानपेटी आणि आता तक्रारवाडी येथील मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून येते.यातील सकुंडे वस्तीवरील दानपेटीचा शोध लावण्यात भिगवण पोलिसांनी यश मिळविले आहे.