Friday, July 4, 2025

भिगवण मध्ये होळी आणि धुलवड सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी

भिगवण वार्ताहर. दि. 14 भिगवण शहरामध्ये होळी आणि धुलवड सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली असून सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिगवणची बाजारपेठे आसपासच्या 15 गावे आणि 40 च्यावर असणाऱ्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना रोज लागणाऱ्या वस्तू आणि सेवाचे ठरलेलं ठिकाण. त्यातच भिगवण साठी सर्व गाव आणि वाड्या वास्त्यावरून...

मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचा 20 लक्ष रुपयाचा निधी ; भिगवण वैकुंठ भूमीत होणार निवाऱ्याची सोय

भिगवण वार्ताहर.दि.११ भिगवण येथील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेडचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे शुभहस्ते सरपंच गुराप्पा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले .कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे यांनी सांगितले. भिगवण वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी शेडची व्यवस्था...

तक्रारवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ; जागतिक महिला दिनी स्तुत्य उपक्रम.

भिगवण वार्ताहर.दि.८ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तक्रारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करीत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. ग्रामपंचायत तक्रारवाडी गावच्या सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेविका ,आरोग्य उपकेंद्र अधिकारी ,वायरमन ,आरोग्य सेविका ,अंगणवाडी सेविका ,स्वस्त धान्य दुकानदार ,जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख, महिला शिक्षिका, ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी या सर्वच पदावर महिला काम...

भिगवण गावच्या हिंदू खाटीक समाजासाठी स्वखर्चाने बोअर ; बाजार समिती माजी उपसभापती पराग जाधव यांचे कौतुकास्पद कार्य

भिगवण वार्ताहर .दि. ७ भिगवण गावातील हिंदू खाटिक समाजाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करून बोअर मारून २४ तास पाणी उपलब्ध करण्याचे काम भिगवण गावच्या पराग जाधव यांनी केले.त्यांच्या या कामाचे कौतुक खाटिक समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खडके यांनी ‘ गावचा नेता असावा तर असा ’ उल्लेख करीत समाजाच्या वतीने सत्कार केला.

भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी ;ऍग्रो कारखाना परिसरातून चोरीला गेलेला ट्रॅक्टर संशयित चोरट्यासह ताब्यात.

भिगवण वार्ताहर.दि.३ भिगवण पोलिसांनी दमदार कामगिरी करत उस वाहतूक करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याचा बारामती अग्रो कारखाना शेटफळ परिसरातून चोरी झालेला ट्रॅकटर हस्तगत करीत चोराच्याही मुसक्या आवळल्या .१०० ठिकाणाचे सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय गोपनीय बातमीदाराच्या मदतीने केलेल्या कामगिरी मुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील चोरटा...

तक्रारवाडी बौध्द विहारासाठी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय चा 20 लाखाचा निधी ; सरपंच मनीषा वाघ यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

भिगवण वार्ताहर.दि.३ तक्रारवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहाराचे बांधकाम आणि सुशोभीकरण विकास कामाचे भूमिपूजन गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन आढाव यांनी दिली. इंदापूर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे...

जिल्हा परिषद तक्रारवाडी शाळेच्या वर्गखोलीचे अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ; जिल्हा नियोजन समिती माध्यमातून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला विकास निधी

भिगवण वार्ताहर.दि.२५ तक्रारवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन भगवानराव भरणे प्रतिष्टानच्या कार्याध्यक्षा अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ,मदनवाडी गावच्या सरपंच अश्विनी बंडगर ,भिगवण गावच्या आदर्श सरपंच हेमाताई माडगे ,इंदापूर बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते ,प्रशांत शेलार ,प्रदीप वाकसे ,अजिंक्य माडगे ,प्रमोद नरुटे राजाभाऊ देवकाते ,बापूराव थोरात तसेच तक्रारवाडी...

भिगवण ग्रामीण रुग्णालय येथील शिबिरात 233 रुग्णांची कर्करोग तपासणी ; 8 संशयित रुग्णांना पुढील तपासणी साठी रेफर

भिगवण वार्ताहर.दि.१७ भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे कर्करोग तपासणी व्हॅन मार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी दिली .यावेळी शिबिरात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सचिन विभूते ,डॉ.अनिकेत लोखंडे ,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अमोल खानावरे ,डॉ.सूर्या दिवेकर ,दंतरोग तज्ञ डॉ.घोगरे ,डॉ.मृदुला जगताप ,डॉ.कीर्ती व्यवहारे ,समुदाय आरोग्य अधिकारी रेणुका...

भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा पवार यांची निवड ; कुंची कोरवी समाजातील महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मिळाला मान.

भिगवण वार्ताहर .दि.१४ भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा गंगाराम पवार यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक कोकरे यांनी दिली.गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी गुराप्पा गंगाराम पवार यांना १२ मते मिळाली तर श्रीमती निर्मला हरिचंद्र पांढरे यांना ५ मते मिळाली.या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक कोकरे तसेच तलाठी राहुल देवकर आणि ग्रामपंचायत अधिकारी...

दोन निष्पाप लेकरांचा आईनेच गळा घोटून घेतला जीव ; भिगवण शेजारील स्वामीचिंचोली येथील घटना

भिगवण वार्ताहर. दि. 8 आपल्याच उदरी जन्म घेतलेल्या दोन निष्पाप मुलांचा गळा दाबून जीव घेतल्यावर नवऱ्यावर धारदार शस्त्राने वार गंभीर जखमी केल्याची घटना दौड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात घडली. गंभीर जखमी नवऱ्यावर बारामती येथे उपचार. संशयित आरोपी महिलेला दौड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती समोर...