पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ;एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू
भिगवण वार्ताहर. दि.८पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.अपघात इतका भयानक होता की यात वाहनाचा चक्काचूर झाला आहे.एकाच घरातील आई वडील आणि मुलगा यांनी या अपघातात जीव गमावला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गीता अरुण माने वय ३६ मुकंद अरुण माने वय २५ अरूण बाबुराव माने वय ४५ असे अपघातातील...
ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमण करणे पडणार महागात ; ग्रामविकास विभागाचा आदेश
भिगवपण प्रतिनिधि .. दि..७
ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व त्यांचे कुटूंबातील इतर सदस्य यांचं एक इंचसुद्धा अतिक्रमण असल्यास त्यांचेवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच पद रिक्त करण्याच्या सूचना ग्रामविकास विभाग यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यात बऱ्याच जिह्यात ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या...
कमळ फुलणार की घड्याळाची टिक.टिक ..सुरू होणार ; सर्वपक्षीय पॅनल मध्ये धुसपुस
भिगवण वार्ताहर . दि. ७
गावचा विकास करण्याच्या आणाभाका घेत सर्वपक्षीय युती करीत निवडून आलेल्या ७ सदस्या पैकी ४ सदस्यांनी १ सदस्यांच्या नातेवाईकसह सरपंच पदासाठी खेळी करीत गावातून देवदर्शनाचया नावाखाली सहलीला गेल्याची चर्चा तक्रारवाडी गावात सुरू झाली आहे.इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराचे मानले जाते.मात्र मागील काही वर्षांपासून या...
सरपंच नक्की कोणाचा राष्ट्रवादीचा की भाजपचा ? तक्रारवाडी जनतेच्या मनातील प्रश्न !
भिगवन वार्ताहर…५तक्रारवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय एकी करत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सरपंच पदांमुळे बेकि निर्माण झाले चित्र दिसून येत आहे. निवडून येत असताना बाजूला ठेवलेले पक्षाचे जोडे आता निवडीसाठी हातात घेण्यात येतात काय असा सवाल मतदारांना पडला आहे .नुकत्याच पार पडलेल्या तक्रारवाडी गावच्या निवडणुकीत १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या पार्टीला हरविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत मोठ बांधली होती.यात सताधरी...
पोंधवडी येथे दोन प्रकरणात ८ आरोपी विरोधात ऐट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल ; ग्रामपंचायत निवडणुकीचे उमटू लागले पडसाद
भिगवण वार्ताहर.दि.१
पोंधवडी बंडगरवाडी येथील निवडणूक पार पडताच भिगवण पोलीस ठाण्यात लागोपाठ दोन दिवसात दोन अॅट्रासिटी आणि अपहरणासह लोकप्रतिनिधी अधिनियम कलमानुसार गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.दोन वेगवेगळ्या दाखल झालेल्या या गुन्ह्यात एकात ५ आरोपी असून दुसऱ्या गुन्ह्यात ३ आरोपी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर दोन्ही गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
स्मशानभूमीच्या स्वच्छतेपासून गाव कारभाराला सुरुवात; नवनिर्वाचित सदस्यांचा आदर्श उपक्रम
भिगवण वार्ताहर.दि.२५
इंदापूर तालुक्या मध्ये लक्षवेधी ठरलेल्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी स्मशानभूमीच्या स्वच्छते पासून कामकाजाला सुरवात करत अनेक गावांसाठी आदर्श निर्माण करण्याचे काम केले.यावेळी सर्व निर्वाचित सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवीत भिगवण गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत वर...
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गर्भवती महिलांसाठी डोहाळे जेवण ;कुपोषित बालकांना बोर नहान
भिगवण वार्ताहर.दि.२२
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उप केंद्र तक्रारवाडी येथे गर्भवती महिलांसाठी डोहाळेजेवण तसेच कुपोषित बालकांसाठी बोरनहाने सारखा आगळावेगळा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी तक्रारवाडी ,भिगवण आणि पोंधवडी गावच्या महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्र तक्रारवाडी येथील आरोग्य कार्यालयाच्या पटांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला.सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांच्या कल्पकतेतून आयोजित करण्यात आलेल्या या...
अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या विरोधात पास्को तसेच विनयभंग गुन्हा दाखल ;
भिगवण वार्ताहर.दि.२१
अल्पवयीन मुलीला पल्सर मोटार सायकल ने अडवीत आपल्या मित्रांना हे माझ सामान आहे.तिच्याकडे कोणी पाहू नका आणि तु माझ्या गाडीवर बस तुला घेवून जातो असे म्हणून मुलीच्या मनात लज्जा उत्पन होईल असे वर्तन केल्यामुळे दोन आरोपी विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची...
निवडणुक काळात सोशल मीडिया वर स्टेटस् ची धूम ; संवेनशील स्टेटस वर पोलिसांची करडी नजर
अनेक तरुणांना यातून चढावी लागली पोलीस ठाण्याची पायरी
भिगवण वार्ताहर . दि.२०
" लबाड बोलतंय लबाड बोलतंय . कारखान्यावर लावतो कामाला लावतो !५ वर्ष झाली पगारी नाहीती आणि काय म्हणतय कामाला लावतो. काय इलेक्शन आल्यावरच कामाला लावतो काय ? " असा सोशल मीडिया वर व्हिडिओ फिरत असून या मॅसेज ने...
कळस ग्रांमपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी कॅांग्रेस पुरस्कृत श्री हरणेश्वर ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय.
कळस प्रतिनिधी सचिन राजेभोसले दि.१९
कळस ग्रांमपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळे राष्ट्रवादिच्या नेत्यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावरती जनतेला पुन्हा एकदा सत्ता देण्यासाठी साद घातली होती. त्यास जनतेने साथ देत १५ जागांपैकी १२ जागांवर विजय मिळवत ग्रांमपंचातीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली. ...

























