Sunday, May 24, 2026

अबब लॉक डाऊन चालू असताना विनाकारण फिरणाऱ्या २२४ पैकी २६ जणांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह ; भिगवण पोलिसांची विशेष मोहीम

भिगवण वार्ताहर.दि.२५ कोरोनाने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजविला जात असताना तसेच कडक निर्बंध असतानाही काही महाभाग विना कामाचे फिरताना दिसून येत आहे.या मोकाट वीरांना आवर घालण्यासाठी आणि सुपर स्प्रेडर समाजात फिरून संसर्ग वाढवू नये यासाठी इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे पोलीस अधिकारी जीवन माने यांनी मदनवाडी ब्रिज खाली या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी...

तहसीलदार पोलीस अधिकारी पथकाची भिगवण खासगी कोवीड सेंटरला भेट; भेट देत रुग्णाच्या सुविधा बाबत घेतली माहिती

भिगवण वार्ताहर . दि.२४ इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, अनेक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची जादा बिले आकारली जाऊ नयेत व ज्या प्रमाणात मोबदला घेतला जातो त्याच प्रमाणात सोयी दिल्या जातात का नाही हे पाहण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे व भिगवण पोलीस स्टेशनचे...

राज्यमंत्री भरणे यांनी दिलेला शब्द पाळला ; कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची केली सोय

भिगवण वार्ताहर . दि.२१ भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात...

कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी

भिगवण वार्ताहर.दि.१८ इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास...

भिगवण कोविड सेंटर मध्ये होणार ५० ऑक्सिजन बेडची उपलब्धता ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

भिगवण वार्ताहर.दि.१७ इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णाचा वाढता आलेख कमी करण्याच्या तसेच रुग्णांना तातडीने सेवा मिळावी यासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे मंत्री दतात्रय भरणे यांनी भिगवण ट्रामा केअर सेंटर इमारती मधील कोविड सेंटर मध्ये आढावा बैठक आयोजित केली होती.या बैठकीला बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे ,इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे ,जि.प.सदस्य हनुमंत बंडगर ,गट विकास...

अतिक्रमण रोखण्यास प्रशासन अपयशी ; रस्ता मिळत नसल्यामुळे मिळकत धारक जाणार न्यायालयात !

भिगवण वार्ताहर . दि.१६ तक्रारवाडी गावातील अतिक्रमणाचा वाद पोलीस ठाण्याच्या दरवाजात पोहोचला असला तरी याची दखल ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामसेवक घेताना दिसून येत नसल्यामुळे तक्रारदार न्यायालयाचे दरवाजे ठोठवनार असल्याची माहिती संबंधिता कडून देण्यात आली.अतिक्रमणावर अंकुश ठेवण्यासाठी कोणतेच प्रशासन कार्यवाही करत नसल्यामुळे अतिक्रमण करणारांची मानसिकता वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत...

जत्रा ,यात्रा ,उरूस रद्द ,वर्गणी मात्र सुरूच ; कोरोणा काळातील ग्रामीण भागातील चित्र

भिगवन वार्ताहर. दि.४ कोरोना च्या वाढत्या प्रसारामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या ग्रामदेवतेच्या यात्रा उरूस जत्रा यावर शासनाने निर्बंध आणल्यामुळे यावर्षीच्या यात्रा भरलेले नाहीत. मात्र असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांची या यात्रेच्या वर्गणीतून सुटका झाली असल्याचे मात्र दिसत नाही. या दिवसात ग्रामीण भागात सालाबाद प्रमाणे भरतात. ग्रामीण भागात यात्रा उरूस जत्रा...

भिगवण कोविड सेंटर मध्ये ५० ऑक्सिजन बेड देण्याची ;भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी

भिगवण वार्ताहर. दिं.३इंदापुर तालुक्यासह राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपा नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नवनिर्वाचीत कार्यकारिणी भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर पंचायत समिती आदींच्या वतीने करण्यात आली आहे. भिगवण येथे भव्य ट्रॉमा केअर सेंटरची इमारत...

दारूबंदी साठी महिलांचा एल्गार ;कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

भिगवण वार्ताहर.दि.३ इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदी साठी ग्रामसभा घेवून दारूबंदी करण्याचा ठराव घेतला.प्रसिद्ध देवस्थान पद्मावती मंदिर परिसरात असणाऱ्या ढाब्यांवर हि दारूविक्री सुरु असून याचा भाविक आणि ग्रामस्थ यांना मनस्ताप सहन करावा लागत असून तातडीने दारूबंदी झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा महिलावर्गा कडून देण्यात आला आहे. याबाबत...

कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे ;पंचायत समिती उपसभापती चे आवाहन

भिगवण प्रतिनिधी .... दिं.१ कोरोनाची दुसरी लाट सध्या राज्यात सुरु झाली असून इंदापूर तालूक्यामध्येही मोठ्या प्रमाणात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर तालूक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहून अधिक काळजी घेण्याचे आवाहन इंदापूर पंचायत समीतीचे उपसभापती संजय देहाडे यांनी केले. तालुक्यांतील ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या...