डाळज येथील कार अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू
भिगवण,ता.१० :पु्ण्यामध्ये जुनी गाडी खरेदी करुन गावी लातुरला निघालेल्या दोघांचा मोटार कारचा टायर फुटून कार उलटुन झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्र. १(ता.इंदापुर) येथे हा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये मोटार कारमधील दोघे जागीच ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी(ता.१०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास झाला.नंदकिशोर भाऊसाहेब जोगदंड, सौदागर दगडु...
ढग फुटी सदृश पावसाने नुकसान झालेल्या भागाला तहसीलदार ठोंबरे यांची भेट;तातडीने उपाय योजना करण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना
भिगवण वार्ताहर .दि.४
भिगवण येथील ढगफुटी सदृश पावसाने नुकसान झालेल्या भागाला तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी भेट देत पाहणी केली.विठ्ठलराव थोरातनगर,शासकीय रो हाउस ट्रामा केअर तसेच आरोग्य अधिकारी निवास स्थान येथील नागरिकांशी बोलून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव ,संजय देहाडे ,तुषार क्षीरसागर ,सचिन बोगावत ,बाळासाहेब भोसले तसेच इतर ग्रामपंचायत...
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उप केंद्र तक्रारवाडी माध्यमातून भिगवण पोलिसांची आरोग्य तपासणी
उपकेंद्र तक्रारवाडी आणि हिंद महालॅब यांचा कौतुकास्पद उपक्रम...
भिगवण वार्ताहर . दि.२२प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उप केंद्र तक्रारवाडी यांच्या मघ्यमातून भिगवन पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उपकेंद्राच्या समुदाय अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी हिंद महालॅब यांच्या सहकार्यातून ही तपासणी केली.कोरोना आजाराचा काळात सर्व सामान्य नागरिक घरात बसून आहेत .मात्र दिवस रात्र सेवा बजावित नागरिकांना आजारापासून...
कोविड सेंटर मधील डॉकटर आणि आरोग्य सेविका यांच्या साठी रोटरीच्या माध्यमातून सकस आहार योजना
कोरोणाच्या काळात घरदार सोडून आपल्या जीवाची काळजी न करतां सेवा देणाऱ्या आरोग्य दुताप्रती पार पाडली जातेय सामाजिक जबाबदारी ...ध्क्ष््््््
भिगवण वार्ताहर . दि..२२कोरोना सारख्या महामारीच्या काळात घर परिवार सोडून स्वतःच्या जीवाची काळजी न करता अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर ,आरोग्य सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या साठी भिगवण रोटरी क्लब आहारदुत ठरत असल्याचे दिसून येत...
इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर ;अनेक उपायोजना करूनही आलेख वाढताच
पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग आणि महसूल विभाग २४ तास काम करूनही आलेख खाली येत नसल्यामुळे हतबल होत असल्याचे वास्तव ....
भिगवण वार्ताहर.दि.३
सत्यवार्ता कोरोना अपडेट:----
इंदापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत असून आज अखेर ग्रामीण भागात १०३१९ तर शहरी भागात १८९६ रुग्ण संख्या...
छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल बागल यांच्यावर जीवघेणा हल्ला ; कोयताने केलेल्या हल्ल्यात बागल गंभीर जखमी
बिग ब्रेकिंग न्यूज ......भिगवण वार्ताहर.दि.१
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पिंपळे गावचे माजी सरपंच अनिल बागल यांच्या वर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात बागल यांच्या डोक्यावर छातीवर आणि हाताच्या बोटावर सपासप वार करण्यात आल्याची माहिती.४ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पूर्ववैमनस्य...
दिलासा आणि प्रेरणा देणारी बातमी ; ११० वर्षाच्या आजीने केली कोरोना वर मात
भिगवण वार्ताहर,.दि.३०
आयुष्याच्या जीवनपटलावर शतकी खेळी पूर्ण करीत जागतिक महामारीला पराजित करण्याच्या पराक्रम करणाऱ्या लक्ष्मीबाई मुळे कोरोना रुग्णांना लढण्याचे नक्कीच बळ मिळणार असल्याची भावना उपचार करणाऱ्या डॉक्टर मंडळीनी व्यक्त केली.तर रुग्ण ठीक होवून घरी जाणे हीच आपण केलेल्या उपचाराची हि सर्वात मोठी पोच पावती असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
कोरोना...
४५ वर्षाच्या वरील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण ;तक्रारवाडी उपकेंद्रातील यशस्वी लसीकरण मोहीम
भिगवण वार्ताहर.दि.३०
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारवाडी उपकेंद्रात ४५ वर्षाच्या पुढील २३३३ नागरिकांपैकी १८४८ नागरिकांचे लसीकरण पहिल्या टप्प्यात झाल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी सांगितले.तर १५० च्या आसपास नागरिकांना दुसरा डोस हि देण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तक्रारवाडी उपकेंद्रात मदनवाडी आणि पोंधवडी अशी तीन गावे येतात.यात ४५ वर्षाच्या...
ना रेमडीसिविर ना फेबी फ्ल्यू ; भिगवण ट्रॉमा कोवीड सेंटर मधील अवस्था
गंभीर रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागते इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव ...
कोवीड सेंटरमध्ये कोणाचाच कोणाला मेळ लागत नसल्याचे दिसत आहे वास्तव..
भिगवण वार्ताहर .दि.२६
भिगवण कोविड सेंटर मध्ये आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन आणि फेबी फ्ल्यू गोळ्या मिळत नसल्यामुळे १५ ऑक्सिजन बेडची सुविधा कशासाठी देण्यात आली असा सवाल येथील रुग्ण...
कोरोनाच्या भीतीने गळफास लावीत संपविले जीवन ; भिगवण येथील दुःखद घटना
भिगवण वार्ताहर.दि.२५
लस घेवूनही आपणाला कोरोनाच्या आजाराचा संसर्ग झाल्याचा संशय आणि उपचारासाठी बेड मिळणार नाही या भीती पोटी एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविल्याची घटना भिगवण येथे घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रकाश विष्णुपंत भगत वय ६५ असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. भगत...





















