Sunday, May 24, 2026

कायदा साक्षरता

On each category you can set a Category template style, a Top post style (grids) and a module type for article listing. Also each top post style (grids) have 5 different look style. You can mix them to create a beautiful and unique category page.

उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; मदनवाडी हद्दीतील खळबळ जनक प्रकार

अनोळखी ४० ते४५ वयाच्या पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रसिद्धी पत्रका द्वारे आवाहन भिगवण वार्ताहर .दि.२५ भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.

अतिक्रमनाच्या वादामुळे रस्त्याचे काम थांबविण्याची वेळ ;आदर्श गाव तक्रारवाडी येथील प्रकार

भिगवण वार्ताहर.दि.२१ तक्रारवाडी गावात वाढत असलेल्या अतिक्रमणाचा फटका विकास कामांना बसत असून दोन बाजूच्या प्लॉट धारकांच्या तक्रारी मुळे सदर ठिकाणचा रस्ता थांबविण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली असल्याचे दिसून आले.तर कमी रुंदीच्या रस्त्यामुळे अतिक्रमणाला खतपाणी मिळत असल्याचे वास्तव आहे. तक्रारवाडी गावात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून सिमेंट रस्त्याचे काम...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन ; भाजपा युवा मोर्चा यांचे भिगवण येथे आंदोलन

भिगवण वार्ताहर.दि.१८ भिगवण येथील मदनवाडी ब्रिजखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पुतळ्याचे दहन करीत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी नाना पटोले यांनी खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्य बाबत हे आंदोलन करण्यात आले.माजी मंत्री हर्षवर्धन...

भिगवण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत ; अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले पूजन

भिगवण वार्ताहर.दि.९ भिगवण पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोनशिलेचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले . भिगवण येथे पोलीस चौकीला ओगस्ट २०१४ साली पोलीस स्टेशनचा दर्जा प्राप्त झाला.यावेळी तीन चार खोल्यातून कामकाज पाहिले जात होते.तीन जिल्हे आणि पाच...

शेअर्स मार्केटमध्ये नफा कमविण्याच्या बहाण्याने ९ लाखाचा गंडा ; बिल्ट पेपर कंपनी कामगाराला फसविले

भिगवण वार्ताहर.दि.८ शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्यासाठी आपल्याकडे द्या आणि गुंतविलेल्या पैशाची जबाबदारी आम्ही घेतो असे म्हणत ९ लाख २१ हजार रुपयांना गंडा घालण्याच्या प्रकार भिगवण पोलीस ठाणे हद्दीत घडला.याबाबत तीन आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे . याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी सुभाष पवार रा.आसू पवारवाडी ता.फलटण जि.सातारा...

भिगवण ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी महा पारेषण कार्यालया ठोकले टाळे ; २ कोटी १७ लाखाची थकबाकी

भिगवण वार्ताहर .दि.७ ग्रामपंचायत कराच्या थकबाकीमुळे भिगवण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कार्यालयाला ग्रामपंचायत विभागाकडून टाळे ठोकण्यात आले. वीज बिल थकल्यावर ग्राहकाची वीज कापणाऱ्या विभागाला ग्रामपंचायत विभागाने घरपट्टी आणि कर न भरल्यामुळे टाळे लाऊन दणका दिला असल्याचे दिसून आले. याबाबत भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या माहिती...

चार महिन्यापूर्वी झालेल्या खुनाला भिगवण पोलिसांनी फोडली वाचा ; चुलत भावानं घेतला जीव

भिगवण वार्ताहर .दि. ६ भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील शेटफळगढे गावात ४ महिन्यापूर्वी झालेल्या खुनाला वाचा फोडण्यात पोलिसांना यश लाभले आहे.कोणताही पुरावा नसताना भिगवण पोलिसांनी नियोजनबद्ध तपास आणि तांत्रिक विश्लेषणचा आधार घेत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यामुळे भिगवण पोलिसांचे कौतुक केले जात आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी प्रेसनोट...

प्लास्टिक विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोड मध्ये ; ९ दुकानावर कारवाई करत १८ हजाराचा दंड वसूल

भिगवण वार्ताहर .दि.२५ प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८  हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे हनुमंत चांदगुडे यांनी दिली .ग्रामपंचायतीने घेतलेल्या या कडक भूमिकेच अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून व्यापारी वर्गातून मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यभरात...

बारामती भिगवण रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू ; अपघातात अक्षरशा देहाचा चेंदामेंदा

भिगवण वार्ताहर .दि .२० बारामती भिगवण रस्त्यावर शेटफळगढे गावच्या हद्दीत शेतमालाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीखाली सापडून सुरक्षा रक्षकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार संतोष मारुती शिंदे वय ४७ रा.सणसर असे अपघातात मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.बारामती भिगवण रस्त्यावर शेटफळगढे अग्रो कारखान्याच्या उस वाहतूक करणाऱ्या...

रोटरीच्या मदतीतून विरवाडी गावच्या दिव्यांग तरुणाला व्हीलचेअर ; भिगवण रोटरीचा स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि . २७रोटरी क्लब ऑफ भिगवन तसेच रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्ष संजय खाडे तसेच इतर रोटरीचे सदस्य उपस्थित होते . भिगवण विरवाडी येथील जाधव यास दिव्यांग असलेल्या कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करावा...