“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १ येथे सर्वेक्षण
डाळज वार्ता .१७
"माझे कुटुंब माझी जबाबदारी" अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १ येथे सर्वेक्षण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी सर्वेक्षणात सहभाग घेत स्वतः नागरिकांची तपासणी केली आणि लक्षण असणाऱ्या नागरिकांनी रॅपीड ॲंटिजन टेस्टसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
...
इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर जीवघेणा हल्ला
भिगवण वार्ता.13
इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर काही अज्ञात इसमाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवे वरील असणारे आबासाहेब देवकाते यांचे घराशेजारील हॉटेलवर हा प्रकार घडला रात्री उशिरा जेवणासाठी आलेल्या...
तक्रारवाडी गावच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरानी केला जीवघेणा हल्ला ; जखमी तरुणांची प्रकृती नाजूक
भिगवण वार्ताहर .दि .१२भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर तक्रारवाडी गावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.लोखंडी रॉड आणि लाकडी बॅट ने केलेल्या हल्ल्यात तरुणांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे .
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार वैष्णव राहुल अनपट वय २१ असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. वैष्णव हा आपल्या दुकानाच्या मालाच्या...
कोरोनाच्या भीतीने गळफास लावीत संपविले जीवन ; भिगवण येथील दुःखद घटना
भिगवण वार्ताहर.दि.२५
लस घेवूनही आपणाला कोरोनाच्या आजाराचा संसर्ग झाल्याचा संशय आणि उपचारासाठी बेड मिळणार नाही या भीती पोटी एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविल्याची घटना भिगवण येथे घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रकाश विष्णुपंत भगत वय ६५ असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. भगत...
लामजेवाडी येथे दरोडा टाकीत जवळपास पावणेदोन लाखाची चोरी ; धारदार शस्त्राचा धाक दाखवीत तीन चोरट्यानी मारला डल्ला
भिगवण वार्ताहर.दि.१७
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लामजेवाडी गावात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास दाराची कडे कोयंडे उचाकाटीत १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. हिंदी बोलणाऱ्या या चोरट्यांनी घरमालकाला कोयत्याचा धाक दाखवून हि चोरी केल्यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लामजेवाडी...
शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि.१६
पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले.
पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात...
तहसीलदार पोलीस अधिकारी पथकाची भिगवण खासगी कोवीड सेंटरला भेट; भेट देत रुग्णाच्या सुविधा बाबत घेतली माहिती
भिगवण वार्ताहर . दि.२४
इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, अनेक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची जादा बिले आकारली जाऊ नयेत व ज्या प्रमाणात मोबदला घेतला जातो त्याच प्रमाणात सोयी दिल्या जातात का नाही हे पाहण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे व भिगवण पोलीस स्टेशनचे...
जुगार अड्ड्यावर छापा घालीत राजकीय पक्षाच्या अध्यक्ष आणि नामंकित वस्तादासह २६ जुगाऱ्या वर कारवाई ; भिगवण पोलिसांची सिंघम कारवाई .
रिमझिम पडणाऱ्या पावसात पोलिसांनी केली सिनेमा स्टाईल एंट्री...
६ तालुक्यातील २६ व्हाईट कॉलर खेळाडू सह शासकीय नोकर आणि गाव पुढारी जागेवरच पकडले..
भिगवण वार्ताहर.दि.१३
भिगवण वार्ताहर.दि.१३
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारीत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगारी नागरिकांना...
मदनवाडी गावासाठी १५ कोटीची जलजीवन मिशन अंतर्गत योजना ; मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उतरणार महिलांच्या डोक्यावरचा हंडा
भिगवण वार्ताहर.दि.२३
मदनवाडी गावासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १४ कोटी ९८ लक्ष १६ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर तसेच सरपंच आम्रपाली बंडगर यांच्या पाठपुराव्यातून माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनेमुळे मदनवाडी गावच्या महिलांच्या डोक्यावरून कायमस्वरूपी हंडा उतरला जाणार आहे.
राज्यमंत्री भरणे यांनी दिलेला शब्द पाळला ; कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची केली सोय
भिगवण वार्ताहर . दि.२१
भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात...




























