लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील घटना
भिगवण वार्ताहर.दि.१६
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत जाळ्यात अडकवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भिगवण पोलिसांनी या घटनेतील गांभीर्य ओळखून आरोपी विरोधात पास्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अंकुश भगवान गाडे रा.वार्ड नं .२ भिगवण असे...
पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी लुटणारी टोळी जेरबंद ;भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी
भिगवण वार्ताहर .दि. १२
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस अडवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात भिगवण पोलिसांना यश आले.९२ हजार रुपयाच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.
शुभम प्रकाश जाधव वय २१ , वैभव व्यंकट संगुळे वय २१ रा.काळेगाव...
भिगवण स्टेशन येथील क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ;
भिगवण वार्ताहर.दि.१९
भिगवण रेल्वे स्टेशन येथे क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी भिगवण पोलीस स्टेशन येथे करण्यात आल्या .यात एका गटाच्या ५ जणांवर तर दुसऱ्या गटाच्या ६ असे ११ जणांवर एट्रासिटी मारामारी आणि दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर क्रिकेट सारख्या शुल्लक...
डम्परखाली चिरडून मृत्यू झालेल्या तरूणाच्या पत्नीने गळफास लावत दिला जीव ; भिगवण येथील दुर्दैवी घटना
भिगवण वार्ताहर.दि.१४
डंपरखाली चिरडून जीव गेलेल्या तरुणाच्या पत्नीने नवऱ्याच्या अंत्यविधीच्या दुसर्या दिवशीच गळफास घेत आपला जीव दिल्याची मनाला सुन्न करणारी घटना भिगवण येथे घडली.या दुर्दैवी घटनेने भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साक्षी उर्फ पियुषा ज्ञानेश्वर बिबे वय २० रा.विवेकानंद नगर भिगवण असे गळफास लावून जीव दिलेल्या...
तरुणांच्याआत्महत्येत होतेय वाढ ; कारणांचा उकल होण्याची गरज
टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी मित्र अथवा नातेवाईक यांच्याजवळ मन मोकळे करणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून मत व्यक्त
भिगवण वार्ताहर.दि.३०
भिगवण परिसरात तरूणांच्या आत्महत्या वाढत असून यामागचे खरे कारण मात्र गोपनीय राहत असल्यामुळे कारणांचा शोध देहाबरोबरच अनंतात विलीन होत आहे.पैसा संपती प्रेम विरह या कारणाबरोबरच सोशल...
शाळेत मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी खुनाचा प्रयत्न ; भाईगिरी साठी सरसावली तरुण पिढी
भिगवण वार्ताहर.दि.१४
पाच वर्षापूर्वी शाळेतील भांडणात गालावर मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाने दिली.तर एका झापडीसाठी एखाद्या मृत्युच्या दारात पोहोचविन्यामागे गुंडगिरीची मानसिकता असल्याचे दिसून येते.
अगदी सिनेमात दाखविला जातो असाच सीन भिगवण मधील दोन दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्यात वापरला गेला.अकरावीच्या वर्गात शिकत...
तक्रारवाडी गावच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरानी केला जीवघेणा हल्ला ; जखमी तरुणांची प्रकृती नाजूक
भिगवण वार्ताहर .दि .१२भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर तक्रारवाडी गावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.लोखंडी रॉड आणि लाकडी बॅट ने केलेल्या हल्ल्यात तरुणांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे .
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार वैष्णव राहुल अनपट वय २१ असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. वैष्णव हा आपल्या दुकानाच्या मालाच्या...
आईसमान चुलतीवरच केला नराधमाने बलात्कार ; भिगवण पोलीस ठाण्याचे हद्दीतील गावातील नात्याला काळीमा फासणारी घटना
भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आवळल्या नराधमाच्या मुसक्या
भिगवण वार्ताहर.दि.१२
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका नराधमाने आईसमान असणाऱ्या चुलतीवर बलात्कार केल्याची घटना घडली.नात्याला काळिमा फासणारी घटना असूनही नात्याचा विचार आणि आरोपीच्या दहशतीखाली पीडितेनी ८ दिवसानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिगवण...
किरकोळ कारणावरून विवाहितेने गळफास लावून दिला जीव ; भिगवण येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना
लहान मुलाला अभ्यास करताना आईने हाताने केली होती मारहाण म्हणून नवरा रागावल्याच्या कारणातून दिला जीव
भिगवण वार्ताहर.दि.१३
मुलाचा अभ्यास घेत असताना पती रागावल्याच्या कारणातून विवाहितेने गळफास लावीत जीव दिल्याची घटना भिगवण येथे घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रोहिणी राकेश थोरात वय २५ असे आत्महत्या केलेल्या...
उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
भिगवण वार्ताहर .दि.२५
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मदनवाडी गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्ग सर्विस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला.यावेळी...