Saturday, May 23, 2026
Home Blog Page 20

पुणे सोलापूर महामार्गावर सेवा रस्त्यावर दगड धोंड्या मुळे अपघाताची शक्यता ; पळसदेव हद्दीतील प्रकार

0

अज्ञातांनी टाकलेल्या दगडाच्या धिगाऱ्यामुळे अपघाताची शक्यता ,; महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे मत

पळसदेव वार्ताहर. दि.१६ इरफान तांबोळी डाळज. पुणे -सोलापूर महामार्गावर पळसदेव हद्दीत असणाऱ्या सेवा रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने दगड आणि गोटे टाकले आहेत.या दगड गोट्यामुळे रात्रीच्या वेळेस त्यामुळे येथील पायी चालणारे पादचारी ,दुचाकीस्वार,चारचाकी वाहने यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर महामार्ग प्रशासनाची पेट्रोलिंग वाहने दिवसभर या ठिकाणाहून ये जा करत असताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

या सेवा रस्त्यावरून स्थानिक नागरिक तसेच आसपासच्या गावातील अनेक नागरिक सुरक्षेचा विचार करून मुख्य मार्गा ऐवजी या सेवा रस्त्याचा वापर करीत असतात .त्यामुळे रात्रीच्या अंधारात अचानक दगड दिसल्यामुळे वाहन धारक गडबडून जावून अपघात होवू शकतो. प्रवास सुखकर व्हावा यासाठी वाहनधारक महामार्ग प्रशासनाला टोल भरत असताना टोल प्रशासन मात्र अशा प्रकरणी गांभीर्य घेताना दिसून येत नाही.त्यामुळे यातून एखाद्या निष्पाप नागरिकाला आपला जीव गमावावा याची दखल टोल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.महामार्ग प्रशासनाने याची तातडीने दखल घेत या ठिकाणचे दगड आणि गोटे हटविण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.

” बैल गेला आणि झोपा केला “; उजनीतील अवैध माती उपसा बाबंत जलसंपदा विभागाची पोलीस कारवाई

0

लाखो रुपयांची माती ओरबाडून लुटल्या नंतर जलसंपदा विभागाला आली जाग ; माती माफिया सोबतच शासकीय कर्मचारी मालामाल झाल्याची सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती ?

भिगवण वार्ताहर.दि.१६

उजनी धरणातील अवैध माती उपसा प्रकरणी जलसंपदा विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा हा “ बैल गेला आणि झोपा केला ” या म्हणी प्रमाणे असल्याचे मत उजनी किनारी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केले.तर पाउस सुरु झाल्यावर करण्यात आलेली कारवाई नुरा कारवाई आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

उजनी धरणाच्या तक्रारवाडी ,कुंभारगाव ,राजेगाव ,खाणावटे पाणलोटक्षेत्रात  गेल्या महिनाभरा पासून दिवस रात्र माती उपसा केली जात आहे.याबाबत कोणी चौकशी करायला गेले तर माती शेतात भरण्यासाठी जलसंपदा विभागाने परवानगी दिली असल्याचे आणि त्याची रीतसर रॉयल्टी भरली असल्याचे सांगितले जाते.मात्र खर तर हि माती राज्यातील वीट व्यावसायिकांना पोहोच केली जात असल्याचे वास्तव आहे.तर १०० ब्रास ची परवानगी काढून हजारो ब्रास माती उचलली जात असताना सबंधित विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते .याच्या पाठीमागे यातील अधिकाऱ्यांना शासकीय खनिज चोरीबाबत जागरुकता अगर शेतकऱ्यांचा कळवला नसून आर्थिक तडजोडी हे कारण असल्याचे बोलले जात आहे.अनेकांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारी करूनही हा विभाग हजारो ब्रास माती ओरबाडून नेल्या नंतर आणि पावसाने माती उपसा बंद झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जात चोरीची तक्रार करत असेल आणि ती हि अज्ञात चोरा विरोधात ? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

उजनी धरणातील पाणी खाली गेल्या कुंभारगाव ,तक्रारवाडी ,राजेगाव,डिकसळ ,खानावटे गाळ पेर क्षेत्रातून माती उपसा करून ती वीट व्यावसायिकांना विकली जाते.याच्या पाठीमागे लाखो रुपयाचे अर्थकारण असल्याचे वास्तव आहे .त्याच्यासाठी माती माफिया आपल्या ओळखीच्या अधिकाऱ्यांशी संधान साधित तुटपुंजी ब्रास मातीची परवानगी मिळवीत उजनी ओरबाडून काढली जाते.

उजनीतील माती उचलण्यावरून अनेकवेळा तरुणांच्या टोळक्याची भांडण होवून माती रक्तरंजित झालेली असली तरी प्रशासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही

याबाबत जलसंपदा विभागाचे भिगवन विभागाचे अधिकारी संजय मेटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कार्यक्षेत्रातील अधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झाल्यामुळे पदभार आपण स्वीकारला असल्याचे सांगितले.तर कारवाई करण्यास उशीर झाल्याचे मान्य करीत आपल्या विभागाने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून तपास करणे पोलीस विभागाचे काम असल्याचे सांगितले.

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तुत्य उपक्रम ; मास टेस्टिंग योजनेत ४३३ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी

0

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाची जय्यत तयारी..

व्यापारी वर्गाने आपली तपासणी करून घेण्याचे आरोग्य विभाग आणि पोलीस अधिकारी जीवन माने यांचे आवाहन

भिगवण वार्ताहर.दि.१५

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रतिबंध म्हणून भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मास आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.दोन दिवसात ४३३ नागरिकांची यात तपासणी करण्यात आली असून जमा करण्यात आलेले स्वाब बारामती मेडिकल हॉस्पिटल कडे पाठविण्यात आल्याची माहिती तक्रारवाडी उपकेंद्राच्या सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप भगत यांनी दिली.

कोरोना रुग्णाचा आकडा खाली येत असल्यामुळे भिगवण शहरात काही अंशी निर्बंध हटविण्यात आलेले आहेत.त्यामुळे बाजार पेठात किंचित गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे.तर कोरोना विषयक तज्ञ डॉ. मंडळी नी दुसरी लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे आकडा कमी होत असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. याच कारणामुळे भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रांनी तिसऱ्या लाटेला प्रतिबंध व्हावा आणि रुग्णांची संख्या आटोक्यात राहावी यासाठी मास टेस्टिंग योजना सुरु केली आहे. भिगवण मच्छी मार्केट ,भाजी बाजार ,साखर वितरण  ऑफिस तसेच मदनवाडी चौफुला या गर्दीच्या ठिकाणी हि तपासणी करण्यात येत आहे.व्यापारी वर्ग आणि रिकामे फिरणारे नागरिक यांना थांबवून हि तपासणी करण्यात येत आहे.यासाठी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी एक पोलीस पथक आरोग्य विभागाच्या मदतीला दिले आहे.याकामी आरोग्य विभागाच्या अम्बुलंस मध्ये आरोग्य सहायक अशोक मोरे , गणेश चौधर ,लॅब टेक्निशियन सौदागर शिंदे ,आरोग्य सेविका उषा यादव ,प्रतीक्षा वाघमारे ,वार्डबॉय तात्या करे यांनी विशेष परिश्रम घेत मदत केली.

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी भिगवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन करीत तिसऱ्या लाटे पासून आपल्या शहराला दूर ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

जुगार अड्ड्यावर छापा घालीत राजकीय पक्षाच्या अध्यक्ष आणि नामंकित वस्तादासह २६ जुगाऱ्या वर कारवाई ; भिगवण पोलिसांची सिंघम कारवाई .

0

रिमझिम पडणाऱ्या पावसात पोलिसांनी केली सिनेमा स्टाईल एंट्री…

६ तालुक्यातील २६ व्हाईट कॉलर खेळाडू सह शासकीय नोकर आणि गाव पुढारी जागेवरच पकडले..

भिगवण वार्ताहर.दि.१३

भिगवण वार्ताहर.दि.१३

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारीत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगारी नागरिकांना ताब्यात घेतले.यात शासकीय नोकराबरोबर राजकीय पदाधिकारी ,नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत निंबोडी रस्तावर असणाऱ्या डोंगराजवळ हा अड्डा चालविला जात असल्याची पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांना गोपनीय बातमी द्वारे मिळाली.याच बातमीचा आशय घेत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी तातडीने छापा टाकीत हि कारवाई केली. या कारवाईत ८ टेबलावर खेळविल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. यावेळी अड्डा चालक हनुमंत माणिक थोरात यांच्या सह २६ जुगार्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते ,पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने ,पोलीस अनंता वारगड ,संदीप लोंढे ,केशव चौधर ,नवनाथ भागवत ,समीर करे या पथकाने केली.

सदर कारवाईत अनेक पांढरपेशी मंडळी बरोबर शासकीय कर्मचारी , माजी ग्रा.पं सदस्यासह बारामती परिसारातील नामांकित वस्ताद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तर आपले नाव जुगार्याच्या यादीतून काढण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न करूनही पोलिसांनी कारवाईत कोणालाही दाद दिली नसल्याची माहिती मिळाली.

पोलीस कारवाई होण्याच्या भीतीने अनेक वेळा जागा बदल करून हा जुगार अड्डा चालविला जात होता. रिमझिम पाऊस चालू असताना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल ने या ठिकाणी प्रवेश करीत अड्ड्यावर छापा घातल्याने जुगार्यांच्या पळून जाण्याच्या प्रयत्नावर विरंजन पडले.

एकूण आठ टेबल वर सुरु असणाऱ्या या जुगारीत बारामती , इंदापूर ,दौंड ,कर्जत ,फलटण ,माळशिरस अशा ६ तालुक्यातील २६ जुगारी खेळत होते.त्यामुळे जागतिक महामारीच्या काळात सर्व व्यवहार आणि आस्थापना बंद असताना असले उद्योग कसे चालू राहतात असा प्रश्न पडतो.

डाळज येथील कार अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

0


भिगवण,ता.१० :
पु्ण्यामध्ये जुनी गाडी खरेदी करुन गावी लातुरला निघालेल्या दोघांचा मोटार कारचा टायर फुटून कार उलटुन झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्र. १(ता.इंदापुर) येथे हा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये मोटार कारमधील दोघे जागीच ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी(ता.१०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास झाला.
नंदकिशोर भाऊसाहेब जोगदंड, सौदागर दगडु उंप (वय.३५ रा.दोन्ही वासनगांव,ता.जि. लातुर)यांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला तर चालक नवनाथ खंडु कांबळे (वय. २८ रा. वासनगांव,ता.जि. लातुर) हा अपघातांमध्ये गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ःलातुर जिल्ह्यातील वासनगाव येथील दोघे चालकांसह पुणे येथे जुनी गाडी खरेदीसाठी आले होते. जुनी गाडी(क्र. एम.एच. १२ एफ.पी. ८२९०) खरेदी करुन ते गावी परतत असताना डाळज क्र.१(ता.इंदापुर) येथील उतारावर गाडीचा टायर फुटुन भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाडीच्या अनेक पलटया झाल्यामुळे गाडीतील दोघांच्या डोक्याला व संपुर्ण शरीराला गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. गाडीतील जखमी व मृतांना गाडीबाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोटार कारमध्ये अडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु अपघातांमध्ये गाडीतील दोघे जागीच ठार झाले होते तर चालकांस गाडीतुन बाहेर काढण्यात आले. जखमीवर येथील खासगी रुग्नालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.

ढग फुटी सदृश पावसाने नुकसान झालेल्या भागाला तहसीलदार ठोंबरे यांची भेट;तातडीने उपाय योजना करण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना

0

भिगवण वार्ताहर .दि.४

भिगवण येथील ढगफुटी सदृश पावसाने नुकसान झालेल्या भागाला तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी भेट देत पाहणी केली.विठ्ठलराव थोरातनगर,शासकीय रो हाउस ट्रामा केअर तसेच आरोग्य अधिकारी निवास स्थान येथील नागरिकांशी बोलून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव ,संजय देहाडे ,तुषार क्षीरसागर ,सचिन बोगावत ,बाळासाहेब भोसले तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य हजर होते.

भिगवण येथे बुधवारी झालेल्या ७१ मिलीमीटर पावसाने अनेकांचे यात नुकसान झाले.याची माहिती घेण्यासाठी तहसीलदार ठोंबरे आले असता या भागातील नागरिकांनी महामार्ग व आजूबाजूच्या १ किमी अंतरातून रस्त्याने सर्व पाणी हे बसस्थानक परिसरात जमुन तेथून ते ग्रामीण रुग्णालयाच्या आतील असणाऱ्या गटारीतून पुढे येत असते अशी माहिती दिली. याबाबीचे गांभीर्य ओळखून मा. तहसीलदार यांनी राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, सा.बां. उपविभागाचे अधिकारी व भिगवण ग्रामपंचायत चे सदस्य व पदाधिकारी तसेच या भागातील नागरिक यांची तातडीने बैठक आयोजित करून सर्व संबंधीत अधिकारी यांचेशी चर्चा केल्यानंतर व प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अस्तित्वातील राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील गटर या अनेक ठिकाणी गाळ व मातीमुळे बंद पडल्या आहेत सर्व बाजूने येणारा पाण्याचा प्रवाह  अस्तित्वातील गटर मध्ये तो बसत नाही व तो ग्रामीण रुग्णालयाच्या कंपाऊंड खालून मार्ग काढत थोरातनगर मधील घरांमध्ये पाणी शिरते. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस आसणारी गटरची रुंदी ही आतील गटारीपेक्षा दुपटीने कमी आहे असे निदर्शनास आले.

यावर प्रभावी उपाय करण्याच्या सूचना तहसीलदार ठोंबरे यांनी देत  सा.बां उपविभाग भिगवण चे सहाययक अभियंता प्रशांत  पंडित यांना ग्रामीण रुग्णालयापासून ते भिगवण सबस्टेशन पर्यंत चे मोठ्या आकाराचे गटरचे अंदाजपत्रक लवकरात लवकर तयार करण्यास सांगितले जेणेकरून पावसाळ्यात होणारा हा नेहमीचा त्रास कायमचा बंद होईल व परिसरातील नागरिकांचे होणारे नुकसान टाळता येईल. 

या वेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवन चे सहाय्यक अभियंता प्रशांत पंडित , शाखा अभियंता राजेंद्र चौधरी कनिष्ठ अभियंता अमोल कावडे भिगवण ग्रामपंचायत सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव ,तुषार क्षीरसागर  इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,थोरात नगर संस्थापक बापूराव थोरात ,सचिन बोगावत बैठकीस हजर होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उप केंद्र तक्रारवाडी माध्यमातून भिगवण पोलिसांची आरोग्य तपासणी

0

उपकेंद्र तक्रारवाडी आणि हिंद महालॅब यांचा कौतुकास्पद उपक्रम…

भिगवण वार्ताहर . दि.२२
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उप केंद्र तक्रारवाडी यांच्या मघ्यमातून भिगवन पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. उपकेंद्राच्या समुदाय अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी हिंद महालॅब यांच्या सहकार्यातून ही तपासणी केली.
कोरोना आजाराचा काळात सर्व सामान्य नागरिक घरात बसून आहेत .मात्र दिवस रात्र सेवा बजावित नागरिकांना आजारापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरून बंदोबस्ताचे कार्य पार पाडत आहेत.सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ते आपल्या आरोग्याकडे पाहिजे तेवढे लक्ष देताना दिसून येत नाहीत.याचाच विचार करून तक्रारवाडी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप भगत यांनी पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा मानस भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांच्या समोर व्यक्त केला.याला माने यांनी लगेचच परवानगी दिली.या कामी त्यांनी हिंद महालॅब चे सहकार्य घेत उपकेंद्रातील आरोग्य सेविका आणि कर्मचारी यांच्या मदतीने डॉ.जगताप यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीत सर्व पोलीस महिला पोलीस आणि होमगार्ड यांच्या रक्ताचे नमुंने जमा केले.या रक्त तपासणीत सी बी सी , डी . डायमर ,बीएस .एल ,थाईराईड ,सी आर पी यांची तपासणी करण्यात आली.यावेळी उप केंद्राच्या आरोग्य सहायिका रेणुका जाधव , आरोग्य सेविका उषा यादव ,सीमा मारकड लॅब टेक्नशियन घनशाम जाधव यांनी विशेष सहकार्य केले.उपकेंद्राच्या माध्यमातुन पार पडलेल्या उपक्रमात सर्व पोलिसांनी सहभाग घेत आपले आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी बोलताना पोलीस अधिकारी जीवन माने यांनी उपकेंद्र तक्रारवाडी यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी उपक्रमाचे स्वागत केले.पोलीस नेहमी बंदोबस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून आपल्या आरोग्य कडे काहीसे दुर्लक्ष करतो. मात्र अशा उपक्रमामुळे पोलिसांचे आरोग्य समजून घ्यायला मदत होईल.

उप केंद्राचे आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका कर्मचारी आणि हिंद महा लॅब यांचे पोलिसांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

कोविड सेंटर मधील डॉकटर आणि आरोग्य सेविका यांच्या साठी रोटरीच्या माध्यमातून सकस आहार योजना

0

कोरोणाच्या काळात घरदार सोडून आपल्या जीवाची काळजी न करतां सेवा देणाऱ्या आरोग्य दुताप्रती पार पाडली जातेय सामाजिक जबाबदारी …ध्क्ष््््््

भिगवण वार्ताहर . दि..२२
कोरोना सारख्या महामारीच्या काळात घर परिवार सोडून स्वतःच्या जीवाची काळजी न करता अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर ,आरोग्य सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या साठी भिगवण रोटरी क्लब आहारदुत ठरत असल्याचे दिसून येत आहे .याच रोटरी क्लबच्या माध्यमातून एप्रिल महिन्यापासुन कोवीड सेंटर मधील डॉक्टर आणि नर्सेस यांना सकस आहार देण्याची योजना सुरु केली असल्याची माहिती अध्यक्ष संपत बंडगर यांनी दिली.

भिगवण येथील कोवीड सेंटर मधील नित्यनियमाने होणाऱ्या या आहार वाटपाच्या कार्यक्रमावेळी रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर,सचिन बोगावत,वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा ,डॉ.समीर शेख,डॉ.कैलास व्यवहारे ,डॉ.गणेश पवार,डॉ.अमोल खानावरे,आरोग्य सेविका ,आरोग्य कर्मचारी ,संजय चौधरी,रियाज शेख,रणजित भोंगळे,संतोष सवाणे,औदुंबर हुलगे,प्रवीण वाघ,संजय खाडे,किरण रायसोनी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष संपत बंडगर यांनी आपल्या देशात कोरोना सारख्या महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जनजीवन सगळे कोलमडुन गेले आहे. हातात काम नाही आणि घराबाहेर पडल्यास कोरोना घरात येतोय अशी अवस्था सर्वसामान्य लोकांची झाली आहे.
शासनस्तरावरुन कोरोना रुग्णालयात डॉक्टर,आरोग्य कर्मचारी अहोरात्र रुग्णाची सेवा करीत आहे. शासनाने सीसीसी आणि डीसीएच सेंटर सुरु करुन रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत आहार आणि मोफत औषधोपचार करीत आहे.मात्र जीवाची बाजी लावून अहोरात्र सेवा करणाऱ्या आरोग्य दुतांच्या
सकस आहाराबाबत काहीसा विचार होताना दिसून येत नाही याच बाबींचा विचार करीत आम्ही भिगवण मधील रोटरी क्लबच्या माध्यमातून ही सकस आहार योजना सुरू केली.कोरोना रुग्णाची सेवा करीत असताना डॉक्टर आणि नर्सेस यांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शेंगदाना चिक्की,फळे आणि उकडलेली अंडी अशाप्रकारे सकस आहार देण्याबाबतची योजना एप्रिल पासुन सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी रोजचा पंधराशे रुपये खर्च येत आहे.मात्र याची जुळवणी क्लब सदस्या कडून केली जात आहे .

कोरोना सेंटर मधील रुग्णालयात सकस आहार मिळाल्याने कोरोना डॉक्टर आणि नर्सेस यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळणाराआनंद हा आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याचे रोटरीच्या सदस्यांच्या वतीने सांगण्यात आले.

उजनी धरणातील पाणी प्रश्न पेटला ;इंदापूर तालुक्यातील २२ गावातील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर

0

आंदोलन चिघळण्याची शक्यता . सोलापूर लोकप्रतिनिधींना जिल्हा बंदी केली जाणार असल्याचे आंदोलकांचा इशारा

भिगवण वार्ताहर. दि.२१

इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील उजनी जलाशयामध्ये येणारे ५ टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुका साठी देण्याचे मंजूर करण्यात आले होते . सोलापूर भागातील लोक प्रतिनिधी यांनी घातलेल्या खोड्या मुळे जयंत पाटील यांनी तो निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले. तेव्हापासून इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने होत असून भिगवण याठिकाणी शेतकरी संघर्ष कृती समितीच्य वतीने सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या विरोधात बारामती नगर रस्ता रोखून आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको बरोबरच ,जोडेमार आंदोलन आणि निषेधार्त मुंडण करण्यात आले.

यावेळी ” पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचे ,कोण म्हणतं देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही ” अशा घोषणा देण्यात आल्या .तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या तसेच सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचा निषेध करण्यात आला.तसेच सोलापूरच्या लोक प्रतिनिधिचा प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांनी मुंडण करीत पाणी निर्णय बाबत निषेध करण्यात आला.
यावेळी हनुमंत बंडगर ,शरद चीतारे ,विष्णू देवकाते ,सचिन बोगावत ,हनुमंत वाबळे , धनाजी थोरात यांनी मनोगतात इंदापूर तालुक्यावर सोलापुर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी यांच्याकडून अन्याय झाल्याचे सांगितले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर , तक्रारवाडी गावाचे सरपंच सतीश वाघ ,सचिन बोगावत, इंदापूर बाजार समिती सदस्य आबासो देवकाते ,काका वाबळे , जिजाराम पोंदकूले अजिंक्य माडगे ,विष्णू देवकाते , शरद चीतारे ,संदीप वाकसे ,सतीश शिंगाडे ,राजेंद्र देवकाते यांच्यासह मदनवाडी , पिंपळे ,पोंधवडी , शेटफळ गावच्या शेकडो शेतकरी बांधवांनी एकत्र येत रास्ता रोको करून आंदोलन केले.
यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांनी पोलीस पथकासह चोख बंदोबस्त ठेवला होता.

इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी ; नगरपालिका मुख्याधिकारी ,तहसीलदार तसेच तालुका आरोग्य अधिकारी ही महत्वाची पदे प्रभारी

0

तातडीने सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्याची राज्य ग्राहक संघटना सदस्य तुषार झेंडे पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे मागणी

भिगवण वार्ताहर.दि.१३

कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीच्या काळात इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होत असून सक्षम अधिकाऱ्यांच्या तातडीने नियुक्त्या करण्याची मागणी राज्य ग्राहक संघटनेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे केली.याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल करून माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रभारी आहेत.तर या महा भयंकर साथीच्या आजाराच्या काळात आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम अधिकारी असणारे तहसीलदारपद देखील प्रभारी आहेत.इंदापूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी हे देखील प्रभारी आहेत.या तीनही पदावर सक्षम अधिकारी यांची नियुक्ती झालेली नाही .सध्या राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती असताना आणि त्यातच कोरोना संसर्गाची दुसरी लाट चालू असताना इंदापूर तालुक्यामध्ये प्रशासन यंत्रणा राबविणारी ,कायदा सुव्यवस्था राखणारी तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार हे पद प्रभारी /अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अमलबजावणी कशी होवू शकते ? हा प्रश्न अनुउतरीत असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे.

तर सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या आरोग्य यंत्रणेच्या जीवावर तालुका लढतोय त्या आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी पद हि प्रभारीच आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात या तीनही पदावर सक्षम अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी झेंडेपाटील यांनी मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे .

इंदापूर तालुक्याचे आमदार हे महाराष्ट्रातील मंत्री मंडळात राज्यमंत्री आहेत त्यांच्याच तालुक्यात महत्वाची अधिकारी पदे प्रभारी असणे हे विशेष मानले जाते,तर विरोधक हि या प्रभारी पदाबाबत आवाज उठवीत नसल्यामुळे आपत्तीच्या काळात सर्वसामान्य जनतेला सुविधा मिळण्यावर मर्यादा येणार हे निश्चित..