Saturday, May 23, 2026
Home Blog Page 21

कोरोनाचा आलेख आला खाली ;इंदापूर तालुक्यात काहीसा दिलासा

0

इंदापूर तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या ग्रामीण भागात २०८१ तर शहरी भागात २४९

ग्रामीण भागात १६६ तर शहरी भागात ३८ नवीन सक्रिय रुग्ण तहसीलदार अनिल ठोंबरे यांची माहिती…

भिगवण वार्ताहर,दि.५

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आजच्या दिवशी १६६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर शहरी भागात ३८ रुग्णांची नोंद करण्यात आली.कोरोनाचा आलेख खाली येण्यास सुरवात झाली असून या बातमीने  प्रशासनाला आणि नागरिकांना काहीसा दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.

महिनाभरा चा काळ उलटून गेल्यानंतर पहिल्यांदाच कोरोणाचा आलेख खाली येत असल्याचे दिसून येत आहे.इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात काल अखेर १०६५० आणि शहरी भागात १९४५ रुग्णांची नोंद करण्यात आली .आज यामध्ये ग्रामीण भागात १६६ तर शहरी भागात ३८ रुग्णांची वाढ नोंदविण्यात आल्याची माहिती तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली. तर काल अखेर ग्रामीण भागातील ८५१९ रुग्णांना आणि शहरी भागातील १६५७ रुग्णांना उपचार नंतर घरी सोडण्यात आले.दुर्दैवाने ग्रामीण भागात ५ कोरोना रुग्णांचे मृत्यू होवून ग्रामीण भागातील मृत्यूंची संख्या २१६ वर पोहोचली.

ग्रामीण भागात विविध कोविड सेंटर मध्ये २०८१ अॅकटीव्ह रुग्ण उपचार घेत असून शहरी भागात २४९ उपचार घेत आहेत.कोविड सेंटरमध्ये वैदकीय अधिकारी आणि डॉक्टर तसेच आरोग्य सेवक सेविका त्यांच्यावर उपचार करीत आहेत,

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात लसी करणासाठी नागरिकांची गर्दी ; आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती

0

आरोग्य कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांची मोठी गर्दी..सोशल डीस्टनसिंगचा फज्जा ….गर्दी मुळे जेष्ठ नागरिकांत कोरो ना संसर्ग पसरण्याची भीती…

माहिती देण्यासाठी फोन करणाऱ्या पत्रकारांना जबाबदार अधिकारी गट विकास अधिकारी यांची उर्मट उत्तरे..

भिगवण वार्ताहर. ५

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षापुढील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे सोशल केल्यामुळे सोशल डीस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.तर लसीकरणासाठी नागरिकांना बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणताही कर्मचारी अथवा डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे नागरिकांत मोठा गोंधळ झाल्याने शेवटी पोलिसांनी याठिकाणी येवून गर्दी नियंत्रणात आणण्याचे काम केले.

इंदापूर तालुक्यातील भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षापुढील २०० नागरिकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.त्यामुळे सकाळी ८ वाजलेपासूनच नागरिकांनी याठिकाणी आपला नंबर लावण्यासाठी उपस्थिती लावली होती.मात्र १० वाजून गेले तरी कोणीही आरोग्यसेवक डॉक्टर अथवा कर्मचारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे १०  वाजता मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली.तसेच नंबर वरून नागरिक आपसात वाद घालू लागले.याची माहिती पत्रकारांना मिळताच याठिकाणी भेट देत याबाबतची माहिती पदभार असणाऱ्या वैदकीय अधिकारी डॉ.गणेश पवार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ .सुनील गावडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांना दिली.त्यावेळी तीनही अधिकारी यांनी याची दखल घेत कर्मचारी आणि डॉक्टर पाठविण्याची व्यवस्था करीत असल्याचे सांगितले.मात्र वेळेत कर्मचारी न आल्याने मोठ्या गोंधळाची परिस्थिती यावेळी निर्माण झाल्याने अखेर भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी पोलीस पथक पाठवून गर्दी कमी करण्याचे काम केले.

याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकारांनी याची माहिती  देण्यासाठी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परीट यांना फोन केला असता त्यांनी पत्रकारांना उर्मटपणे उत्तरे देण्यात आली. तुम्हाला लसीकरण आहे म्हणून सांगण्यात आले होते का तुम्ही आताच घरातून बाहेर आला आहात.२४ तास आमची मानस काम करीत आहेत.तुम्ही भिगवण कर नाहीतरी जास्तच करींत आहात आता तुम्ही शांत बसा असी उर्मट उत्तरे देत माहिती देण्यासाठी फोन केलेल्या पत्रकारांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आली.त्यावेळी त्यांनी लगेचच कार्यवाही करीत आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना याठिकाणी नागरिकांना सेवा देण्यासाठी उपलब्ध केले.

शासन एका बाजूला गर्दी करू नका म्हणून निर्बंध पाळण्यास सांगत आहे.तर दुसऱ्या बाजूला लसीकरणासाठी बोलावून गर्दी करीत आहे.त्यामुळे आतापर्यंत कोरोना पासून बचाव करीत असलेल्या जेष्ठ नागरिकांना कोरोणाचा संसर्ग वाढण्याची भीती यावेळी नागरिकांनी बोलून दाखविली.तर कोणतेच नियोजन नसताना आम्हाला कशाला नाहक त्रास द्यायला बोलावले असे महिलांनी मत व्यक्त केले.

इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर ;अनेक उपायोजना करूनही आलेख वाढताच

0

पोलीस प्रशासन , आरोग्य विभाग आणि महसूल विभाग २४ तास काम करूनही आलेख खाली येत नसल्यामुळे हतबल होत असल्याचे वास्तव ….

भिगवण वार्ताहर.दि.३

सत्यवार्ता कोरोना अपडेट:—-

इंदापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत असून आज अखेर ग्रामीण भागात १०३१९ तर शहरी भागात १८९६ रुग्ण संख्या नोंदवली.तर आज ग्रामीण भागात १७९ नवीन रुग्णांची भर पडली तर शहरी भागात २९ नवीन रुग्णांची भर पडली.त्यामुळे १ महिनाभर निर्बंध पाळूनही नवीन रुग्णांच्या संख्येत कमी येत नसल्याने प्रशासनापुढे चिंतेचा विषय झालेला आहे.इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात आजच्या दिवशी १०४९८ तर शहरी भागात १९२५ एकूण रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

तर आता पर्यंत या आजारातून बरे होत घरी सोडलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या काल अखेर ७७०१ इतकी आहे.तर आज २४८ ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.तर शहरी भागातील १५५७ जणांना काल अखेर ४६ जणांना आज उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.उपचारादरम्यान मयत झालेल्यांची संख्या ग्रामीण भागात काल अखेर १९७ तर आज १० जणांचा यात मृत्यू झालेला आहे.शहरी भागात काल अखेर १० रुग्णांचा मृत्यू झाला असून आजचा दिवस शहरी भागासाठी नशिबवान ठरला कारण आज शहरी भागात एकही जन दगावलेला नाही.ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण १.९७ इतके असून शहरी भागातील प्रमाणही १.९७ इतकेच आहे.

ग्रामीण भागातील कोविड सेंटर मध्ये २३४२ अॅकटीव रुग्ण उपचार घेत असून शहरी भागात २८४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण वाढ पाहता होम आयसोलेशन बंद करून शासकीय विलगीकरण कक्ष निर्माण करणे गरजेचे झाले आहे याकडे प्रशासन आणि ग्रामपंचायता आणि सामाजिक संस्थानी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

दिलेला शब्द पाळला ; भिगवणकरांसाठी नवीन पाईप लाईन

0

जुने भिगवण पासून मंगलदृष्टी पर्यंत नवीन पाईप लाईन..

वार्ड २ ,३ आणि ४ या वार्डचया नागरिकांना होणार फायदा पाणी प्रश्न काही अंशी सुटण्यास होणार मदत…

भिगवण वार्ताहर . दि.२

भिगवणकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जुने भिगवण गाव ते मंगलदृष्टी इथपर्यंतची पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती सरपंच तानाजी वायसे यांनी दिली. १ मे या कामगार दिनापासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याने पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांची यातून सुटका झाल्याचे पहावयास मिळाले .

भिगवण गावची लोकसंख्या दिवसंदिवस वाढत असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.प्रत्येक उन्हाळ्यात मोठी टंचाई जाणवत होती .मात्र दूरदृष्टीचे राजकारण केले जात नव्हते त्यामुळे टंचाईचा सामना नागरीकांना आणि विशेष करून महिला वर्गाला करावा लागत होता.

नवीन झालेल्या पाइपलाइन मुळे भिगवणकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास फार मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. या नवीन पाइपलाइन मुळे जवळजवळ २ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची साठवण, टाकीत होणार असून त्यातील सुमारे १ लाख ७० हजार लि. पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे.या नव्याने झालेल्या पाइपलाइन मुळे विशेषतः येथील वॉर्ड क्र.२,३,व ४ मधील नागरिकांची पाण्याची समस्या सुटणार आहे.आणि वॉर्ड क्रमांक १ व २ साठीही स्वतंत्र पाणीपुरवठा होणार आहे.

सदर पाइपलाइन करता साधारणतः ८ लाख रुपये खर्च झाला असून याकरिता हरीश लुंड यांनीही आर्थिक मदत केली आहे.या नवीन पाइपलाइन मुळे गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे .निवडणुकीत दिलेला पाण्याचा आणि विकासाचा शब्द पाळला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच प्रतिनिधी पिंटू शिंदे,अशोक शिंदे, माजी सरपंच पराग जाधव, उपसभापती संजय देहाडे, हरीश लूंड, संजय रायसोनी,तुषार क्षीरसागर,जयदीप जाधव,दत्ता धवडे, जावेद शेख,कपिल भाकरे, सत्यवान भोसले, गुराप्पा पवार, रुपेश क्षीरसागर, मच्छिंद्र खडके, काळे व ग्रा. प. कर्मचारी उपस्थित होते.

” यावेळी आम्ही राजकारण करण्याऐवजी विकास कामांना प्राधान्य देणार असून, इतरांप्रमाणे फक्त विकास कामांच्या नुसत्या वल्गना करणार नाही तर ते करून दाखवणार आहोत.” भिगवण कर जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये , चांगले रस्ते मिळावेत आणी त्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी भविष्यातही अनेक विकासकामे मार्गी लावणार असल्याचे सरपंच तानाजी वायसे माजी सरपंच पराग जाधव आणि पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी सांगितले.

छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल बागल यांच्यावर जीवघेणा हल्ला ; कोयताने केलेल्या हल्ल्यात बागल गंभीर जखमी

0

बिग ब्रेकिंग न्यूज ……भिगवण वार्ताहर.दि.१

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पिंपळे गावचे माजी सरपंच अनिल बागल यांच्या वर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात बागल यांच्या डोक्यावर छातीवर आणि हाताच्या बोटावर सपासप वार करण्यात आल्याची माहिती.४ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पूर्ववैमनस्य आणि राजकीय वादातून हा हल्ला झाला असल्याची माहिती मिळत आहे.

बारामती भिगवण रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत बागल यांच्या नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरु आहे.दुपारी ४ च्या सुमारास कामाची माहिती घेण्यासाठी बागल आले असता अचानक आलेल्या हल्लेखोरांनी काही कळायच्या आतच बागल यांना घेरत त्यांच्यावर कोयत्या या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला.अचानक झालेल्या हल्ल्यातून बागल यांना सावरायला वेळ मिळाला नाही.सपासप केलेल्या हल्ल्यात बागल यांच्या उजव्या हाताची तीन बोटांना गंभीर दुखापत झाली तसेच हल्लेखोरांनी बागल यांच्या वर्मी वार केले आहेत.तर छातीवर आणि पोटावरही गंभीर वार करण्यात आलेले आहेत.यावेळी पंपाच्या कामावर असणाऱ्या व्यक्तींनी बागल यांना जखमी अवस्थेत भिगवण येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथील संचेती हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी भेट देत हल्लेखोरांची माहिती घेत शोध मोहीम सुरु केली.तर घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटना स्थळाला भेट देत माहिती घेतली.

सदर घटनेबाबत भिगवण पोलीस ठाण्यात माहिती घेतली असता गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दिलासा आणि प्रेरणा देणारी बातमी ; ११० वर्षाच्या आजीने केली कोरोना वर मात

0

भिगवण वार्ताहर,.दि.३०

आयुष्याच्या जीवनपटलावर शतकी खेळी पूर्ण करीत जागतिक महामारीला पराजित करण्याच्या पराक्रम करणाऱ्या लक्ष्मीबाई मुळे कोरोना रुग्णांना लढण्याचे नक्कीच बळ मिळणार असल्याची भावना उपचार करणाऱ्या डॉक्टर मंडळीनी व्यक्त केली.तर रुग्ण ठीक होवून घरी जाणे हीच आपण केलेल्या उपचाराची हि सर्वात मोठी पोच पावती असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

कोरोना झालाय एवढंच समजल तर अनेक जन धास्ती घेतात मात्र त्यांच्यासाठी हि बातमी नक्कीच प्रेरणा दायी ठरणार आहे.लक्ष्मीबाई पंढरीनाथ देवकर वय .११० रा,मूळ.रेडा सध्या भिगवण यांना २१ तारखेला कोरोनाची लक्षण असल्याची जाणीव झाली.यावेळी त्यांनी खचून न जाता भिगवण येथील कोविड सेंटर मध्ये येत कोरोना चाचणी केली.त्यात त्यांना संसर्ग झाल्याचे दिसून आले.मात्र वय जास्त आणि आजार नाव घेतलं तरी धास्ती निर्माण करणारा त्यामुळे नातेवाईक हि गडबडून गेले होते.त्यांना भिगवण कोविड सेन्टरमध्ये उपचारासाठी दाखल करतेवेळी त्यांची ऑक्सिजन पातळी ८५ पर्यंत घसरली होती.मात्र याठिकाणी कार्यरत असणारे डॉ.कैलास व्यवहारे आणि डॉ.गणेश पवार यांनी त्यांना ऑक्सिजन लावीत आवश्यक असणारे ओषध उपचार करीत त्यांना वैदकीय सेवा दिली.

जगण्याची उमेद आणि डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे दोन दिवसातच लक्ष्मीबाई यांची ऑक्सिजन लेवल सुधारली.तर सात दिवसात उपचार करणाऱ्या डॉक्टर मंडळीना लक्ष्मीबाई स्वताच मला आता बरे वाटत आहे मला आता घरी जायचं आहे अस सांगितले. आठव्या दिवशी डॉ.व्यवहारे यांनी लक्ष्मीबाई यांचे रक्ताचे रिपोर्ट पाहून त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेत नातेवाईक यांना पुढील १० दिवस आजीबाईना विलगीकरण करण्यास सांगितले.

आजीबाईंना कोविड सेंटर मधून डिस्चार्ज देते वेळी डॉ.कैलास व्यवहारे ,डॉ. गणेश पवार ,डॉ.अंकिता शिंदे ,कोरोना रुग्णासाठी दिवस रात्र मदत पोहोचविणारे सचिन बोगावत ,अमोल वाघ ,राहुल धांडे ,प्रिया नखाते ,रुग्णवाहिका चालक सुहास पालकर उपस्थित होते .

४५ वर्षाच्या वरील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण ;तक्रारवाडी उपकेंद्रातील यशस्वी लसीकरण मोहीम

0

भिगवण वार्ताहर.दि.३०

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारवाडी उपकेंद्रात ४५ वर्षाच्या पुढील २३३३ नागरिकांपैकी १८४८ नागरिकांचे लसीकरण पहिल्या टप्प्यात झाल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी सांगितले.तर १५० च्या आसपास नागरिकांना दुसरा डोस हि देण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

तक्रारवाडी उपकेंद्रात मदनवाडी आणि पोंधवडी अशी तीन गावे येतात.यात ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांची संख्या २३३३ इतकी आहे.उपकेंद्राच्या वतीने करण्यात येणारी जनजागृती आणि तीनही गावातील आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांच्या मुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले.तक्रारवाडी गावात सरपंच सतीश वाघ ,पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे यांनी लसीकरणाचा शुभारंभ केला.उपकेंद्राच्या बाहेर ग्रामपंचायत निधीतून मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती.तर नागरीकांना योग्य अंतर पाळून बसण्यासाठी खुर्च्या तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.मदनवाडी आणि पोंधवडी येथेही लसीकरणाचे कँम्प लावण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर , मदनवाडी गावच्या सरपंच आम्रपाली बंडगर , सदस्य तेजस देवकाते ,पोंधवडी गावचे सरपंच लक्ष्मण पवार , सदस्य गणेश पवार ,डॉ.तुळशीराम खारतोडे यांनी लसीकरणासाठी लागणाऱ्या सुविधा पुरवून नागरिकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन केले होते.

तर लसीकरण झाल्यानंतर कोणत्याही लाभार्थ्याला शारीरिक समस्या जाणवल्या नाहीत.तर एकालाही लसीकरणा नंतर दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागले नसल्याची माहिती डॉ.मृदुला जगताप यांनी दिली.

लसीकरण करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांना आरोग्य सहायका रेणुका जाधव ,आरोग्य सेवक शरद ससाणे ,आरोग्य सेविका उषा यादव ,सीमा मारकड ,मनीषा देवकाते ,ज्योती जगताप ,सविता देवकाते ,शोभा काळगे ,भारती बंडगर यांनी सहकार्य केले.

तक्रारवाडी उपकेंद्राच्या माध्यमातून लसीकरण सोबतच विविध असंसर्गजन्य आजार विषयक जनजागृती ,बीपी शुगर कॅन्सर तपासणी ,किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी नियमित केल्या जातात.तसेच तीन हि गावात आरोग्याबाबत नियमित सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती आरोग्य सेवक शरद ससाणे यांनी दिली.

ना रेमडीसिविर ना फेबी फ्ल्यू ; भिगवण ट्रॉमा कोवीड सेंटर मधील अवस्था

0

गंभीर रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागते इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव …

कोवीड सेंटरमध्ये कोणाचाच कोणाला मेळ लागत नसल्याचे दिसत आहे वास्तव..

भिगवण वार्ताहर .दि.२६

भिगवण कोविड सेंटर मध्ये आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन आणि फेबी फ्ल्यू गोळ्या मिळत नसल्यामुळे १५ ऑक्सिजन बेडची सुविधा कशासाठी देण्यात आली असा सवाल येथील रुग्ण करीत आहेत.तर भिगवण येथील कोविड सेंटरला फिजिशन डॉक्टरची नियुक्तीच झाली नसल्याची माहिती कोविड सेंटर येथील डॉ.गणेश पवार यांनी दिली .

भिगवण येथे कोविड सेंटर मध्ये १०० च्या वर बिगर लक्षणी रुग्ण उपचार घेत आहेत .तर आठ दिवसापूर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत १० ऑक्सिजन बेडची उपलब्धता करण्यात आली. त्यात वाढ करीत बेडची संख्या १५ पर्यंत नेण्यात आली.मात्र आठ दिवस होवूनही या ऑक्सिजन बेड मध्ये रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत ..या ठिकाणी नियुक्ती असणाऱ्या चार वैदकीय अधिकाऱ्या पैकी २ जणच सेवा देत आहेत.तर या कोविड सेंटर मध्ये फिजीशन डॉक्टर नियुक्ती झाली नसल्यामुळे अति गंभीर रुग्णांना उपचार करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती येथील अधिकार्यांनी दिली.तर या कोविड सेंटर मध्ये आवश्यक असणारी रेमडी सिवीर इंजेक्शन तसेच फेबीफ्ल्यू गोळ्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. रेमडी सिवीर इंजेक्शन बाबत तालुका आरोग्य सुनील गावडे यांना विचारणा केली असता त्यांनी रेमडी सिवीर इंजेक्शन ची मागणी उपजिल्हा आरोग्य अधिकारी चंदनशिवे यांच्या आदेशाने जात असल्याचे सांगितले.

याबाबत बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना संपर्क साधला असता इंदापूर उपजिल्हा आरोग्य केंद्रासाठी इंजेक्शन पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती दिली.तर भिगवणला याच ठिकाणाहून इंजेक्शन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

आवश्यक डॉक्टर आणि सुविधांचा वानवा असताना आणि इंजेक्शन आणि गोळ्यांचा पुरवठा नियमित होत नसताना ऑक्सिजन बेडची सुविधा तातडीने करण्याची गरज होती का ?असा सवाल या माध्यमातून निर्माण होत आहे.

याबाबत अनेक वेळा प्रयत्न करूनही उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चंदनशिवे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही

याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंगळवार पासून इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.तसेच याठिकाणी लागणाऱ्या सर्व सुविधा तातडीने पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

कोरोनाच्या भीतीने गळफास लावीत संपविले जीवन ; भिगवण येथील दुःखद घटना

0

भिगवण वार्ताहर.दि.२५

लस घेवूनही आपणाला कोरोनाच्या आजाराचा संसर्ग झाल्याचा संशय आणि उपचारासाठी बेड मिळणार नाही या भीती पोटी एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविल्याची घटना भिगवण येथे घडली.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रकाश विष्णुपंत भगत वय ६५ असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. भगत यांनी ८ दिवसापूर्वी कोरोना लस घेतली होती .लस घेतल्या पासून त्यांची तब्बेत ठीक नव्हती . सर्दी खोकला आणि अंगदुखी सारखा किरकोळ आजार होता. चार दिवस होवूनही आराम मिळत नसल्यामुळे घरातील इतर सदस्यांनी त्यांना कोरोना चाचणी घेण्यासाठी सांगितले.मात्र आपली कोरोना चाचणी पोझीटिव्ह आला तर आपल्याला उपचार मिळतील का ,बेड मिळेल का या काळजीने २४ एप्रिल रोजी रात्री जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपले असता त्यांनी स्वयपाकघरात जात पंख्याला लटकून आपला जीव दिला.लस घेतली असताना आपणाला कोरोना कसा झाला याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पावूल उचलले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत दतात्रय प्रकाश भगत यांनी भिगवण पोलीस ठाण्यात खबर दिली असून भिगवण पोलीस पुढील तपास करीत आहेत .याबाबत बोलताना भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने आवाहन करताना कोरोना हा आजार बरा होणारा आजार असून तपासणी पोझीटिव्ह आली म्हणून घाबरून जावून टोकाचा विचार न करता उपचार घ्यावेत असे सांगितले.

अबब लॉक डाऊन चालू असताना विनाकारण फिरणाऱ्या २२४ पैकी २६ जणांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह ; भिगवण पोलिसांची विशेष मोहीम

0

भिगवण वार्ताहर.दि.२५

कोरोनाने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजविला जात असताना तसेच कडक निर्बंध असतानाही काही महाभाग विना कामाचे फिरताना दिसून येत आहे.या मोकाट वीरांना आवर घालण्यासाठी आणि सुपर स्प्रेडर समाजात फिरून संसर्ग वाढवू नये यासाठी इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे पोलीस अधिकारी जीवन माने यांनी मदनवाडी ब्रिज खाली या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी केली.

याबाबत भिगवण पोलीस अधिकारी जीवन माने यांनी दिलेल्या माहिती नुसार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविण्यात आली. महसूल विभाग तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या या तपासणीत २२४ पैकी २६ नागरिक पौझिटिव्ह आल्याची माहिती प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनिता पाळंदे यांनी दिली.यावेळी तहसीलदार अनिल ठोंबरे ,तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी भिगवण पोलिसांनी २५ पोलीस कर्मचारी होमगार्ड यांचा बंदोबस्त लावीत चारही बाजूने येनाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना थांबवून कोरोना तपासणी केली. अनेक नागरिक पोलिसांना आपण दवाखान्यात चाललोय ,मेडिकल मध्ये चाललोय ,दवाखान्यात डबा देण्यासाठी चाललोय अशी समर्पक कारणे देत होते .मात्र पोलीस कोणाचेही कारण न एकता तपासणी करण्यास लावत होते.

याकामी आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळा तंत्रद्न सुनिता पाळंदे ,लॅब टेक्निशन प्रवीण बनसुडे ,आरोग्य सेविका रेश्मा भिंगारदिवे ,तलाठी भारती तसेच शिवाजी शेलार यांनी तपासणीचे कामात मदत केली

यावेळी पोलीस अधिकारी जीवन माने यांनी मोकाट फिरणाऱ्या २२४ पैकी २६ जन पोझीटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी कोविड सेंटर येथे पाठविल्याचे सांगितले.तसेच लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.तसेच मोकाट फिरणाऱ्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश झाल्यावर पुन्हा हि कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले .