Saturday, May 23, 2026
Home Blog Page 22

तहसीलदार पोलीस अधिकारी पथकाची भिगवण खासगी कोवीड सेंटरला भेट; भेट देत रुग्णाच्या सुविधा बाबत घेतली माहिती

0

भिगवण वार्ताहर . दि.२४

इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, अनेक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची जादा बिले आकारली जाऊ नयेत व ज्या प्रमाणात मोबदला घेतला जातो त्याच प्रमाणात सोयी दिल्या जातात का नाही हे पाहण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे व भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने गोपनीय विभाग पोलीस नाना विर यांनी आज दि. २३ रोजी भिगवण येथील खाजगी कोविड सेंटर मध्ये जाऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी भिगवण मध्ये असलेल्या यशोधरा हॉस्पिटल तसेच भिगवण आय सी यू कोविड सेंटरमध्ये जाऊन दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस करत त्या ठिकाणी एकूण रुग्ण संख्या किती आयसी बेड किती व्हेंटीलेटर संख्या हॉस्पिटल परवाना स्वच्छ्ता याची पाहणी केली .तसेच दाखल रुग्णांच्या बिलांची ज्यादा आकारणी केली जाते का? तसेच ऑक्सीजन वर रुग्ण किती आहेत, रेमडेसिवरची मागणी किती ? व पुरवठा किती होत आहे. त्या ठिकाणी मिळणारी सोयी सुविधा व नागरिकांच्या बिला संदर्भात काही तक्रारी आहेत का? हे देखील जाणून घेतले.
यावेळी यशोधरा हॉस्पिटलचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर रेनुकर तसेच डॉ.महेश गाढवे यांनी माहिती दिली तर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी तहसील दार ठोंबरे यांच्याकडे मागणी केली.तसेच रेमडीशिविर इंजेक्शन मागणी प्रमाणात उपलब्धता होत नसल्याची माहिती दिली.
भिगवण आय सी यू सेंटरचे संचालक डॉ.मिथुन यादव यांनी शासनाने खासगी कोवीड सेंटरच्या डॉकटरची शासकीय कोवीड सेंटरला लावलेल्या ड्यूटी बाबत नाराजी व्यक्त केली.दिवसभर खासगी दवाखानयात रुग्णांना सेवा देण्यास वेळ अपुरा पडत असून ६ तास वेळ काढणे शक्य नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याबाबत आपण लेखी स्वरूपात म्हणणे शासन दरबारी पोहोचविनार असल्याचे भिगवण आय सी यू संचालक डॉ.वल्लभ वेद पाठक यांनी सांगितले .

राज्यमंत्री भरणे यांनी दिलेला शब्द पाळला ; कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची केली सोय

0

भिगवण वार्ताहर . दि.२१

 

     

भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आय़ुष प्रसाद, प्रभारी तहसलिदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सचिन बोगावत, ,तुषार क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत खानावरे,सरपंच तानाजी वायसे, भिगवन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने ,मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते उपस्थित होते. १० बेडच्या ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ना. भरणे यांनी येथील सेंटरची पाहणी केली व उपलब्ध सुविधाबाबत माहिती घेतली.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापुर तालुक्यामध्ये सध्या १६६३ सक्रिय कोरोना रुग्न असल्याची माहिती पत्रकार यांना दिली. रुग्नांना योग्य ते उपचार मिळावे यासाठी तालुक्यामध्ये आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. भिगवण येथे ६६ आयसोलेशन बेड सुविधा आहे त्यामध्ये आत्ता १० ऑक्सिजन बेडची भर पडलेली आहे. भिगवण येथे टप्प्याटप्प्याने येथे ,२० ऑक्सिजनयुक्त बेडची सोय उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. येथील कोविड सेंटरमध्ये आवश्यक डॉक्टर इतर स्टाफचीही नेमणुक केली आहे. सध्याचा काळ अतिशय कठीण आहे नागरिकांनी शासनाच्या वतीने वेळोवेळी लागु केलेल्या निर्बंधाचे पालन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पोझितिव रुग्णाची माहिती ज्याप्रमाणे अपडेट केली जात त्याचं प्रमाणे निगेटिव्ह रुग्णाची माहिती अपडेट करण्याच्या सूचना दिल्या.तसेच ऑक्सिजन बेड साठी आवश्यक डॉक्टरची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती दिली.


राज्यमंत्री भरणे यांनी गेल्या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत भिगवण कोविड सेंटर येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार असल्याची ग्वाही दिली होती.त्याची पूर्तता करून आपण फक्त बोलतच नाही तर काम ही करतो हे दाखवून दिले आहे. ऑक्सिजन बेड मुळे भिगवण कर नागरिकांना याचा निश्चतच फायदा होणार आहे.

कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी

0

भिगवण वार्ताहर.दि.१८

इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास मदत झाली.

इंदापूर तालुक्यात कोरोणाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.अनेक उपाययोजना करूनही त्यावर अंकुश आणणे कठीण झाले आहे.त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आरोग्यविभाग , पोलीसप्रशासन , महसूलविभाग ,पंचायत समिती प्रशासन पदाधिकारी  तसेच नगरपालिका आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांची आढावा बैठक आयोजित केली होती.यावेळी सर्व विभागांना आपली जबाबदारी काटेकोर पणे पाळण्याचे आदेश राज्यमंत्री भरणे यांनी दिले.तर आढावा बैठकीत आलेल्या सुचनावर प्रशासनाकडून करण्यात येत असलेली उपाय योजना बाबत चर्चा केली.यावेळी महसूल विभागाचे बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे ,तहसीलदार अनिल ठोंबरे तसेच तक्रारवाडी ,मदनवाडी भिगवण विभागाचे तलाठी हजर होते.मात्र यावेळी मंडलअधिकारी दिसून आले नाहीत. राज्याचे मंत्री यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला वरिष्ठ पदाधिकारी हजर असताना मंडल अधिकारी अनुपस्थित असल्याने भरणे यांनी नाराजी व्यक्त केली.तर याबाबत योग्य दखल घेण्याची सूचना केली.

याबाबत मंडल अधिकारी मकरंद तांबडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण भिगवण येथील आढावा बैठकीला हजर असल्याचे सांगितले. तसेच बैठक आटोपल्यावर घरातील सदस्याला दवाखान्याच्या उपचार कामासाठी बारामती येथे गेल्याचे सांगितले.

भिगवण कोविड सेंटर मध्ये होणार ५० ऑक्सिजन बेडची उपलब्धता ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

0

भिगवण वार्ताहर.दि.१७

इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णाचा वाढता आलेख कमी करण्याच्या तसेच रुग्णांना तातडीने सेवा मिळावी यासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे मंत्री दतात्रय भरणे यांनी भिगवण ट्रामा केअर सेंटर इमारती मधील कोविड सेंटर मध्ये आढावा बैठक आयोजित केली होती.या बैठकीला बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे ,इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे ,जि.प.सदस्य हनुमंत बंडगर ,गट विकास अधिकारी विजय परीट ,तालुका आरोग्य अधिकारी सुनील गावडे ,भिगवण कोविड सेंटर इनचार्ज कैलास व्यवहारे उपस्थित होते .

यावेळी इंदापूर तालुक्यात वाढत असलेल्या रुग्ण संखेबाबत माहिती देण्यात आली .तसेच पोलीस अधिकाऱ्यांना इंदापूर तसेच वालचंदनगर आणि भिगवण हद्दीत येणाऱ्या गावात बेरीगेटिंग करण्याचा सूचना दिल्या.तसेच संचारबंदी आदेशाची काटेकोरपणे पालन करून विणकामाच्या बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.यावेळी मंत्री भरणे यांनी भिगवण कोविड सेंटर मध्ये मंगळवारी पासून ५० ऑक्सिजन बेड सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.तर रेम्डीसिवीर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगितले.यावेळी इंदापूर नगरपालिका अधिकाऱ्यांना शहरात बेरीगेटींग करण्याच्या सूचना देण्यात आल्या.यावेळी उपस्थित भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,माजी सरपंच पराग जाधव आणि पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,सचिन बोगावत ,तुषार क्षीरसागर यांनी तपासण्या वाढविण्यावर आणि भिगवण परिसरातील कोविड सेंटर मध्ये इंजेक्शन पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी केली.तर ऑक्सिजन बेड ची उपलब्धता तातडीने सुरु करण्याची मागणी केली.यावेळी या आढावा बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता आर,एल,चौधरी स्थापत्य अभियंता ए.ए.कावडे ,इंदापूर तालुका पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे ,वालचंदनगर स.पो.नि दिलीप पवार ,भिगवण स.पो.नि जीवन माने तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .

भिगवण कोविड सेंटर मध्ये मंगळवारी २० तारखेपासून ५० ऑक्सिजन बेडची उपलब्धता होणार असल्याची राज्यमंत्री भरणे यांची ग्वाही

इंदापूर तालुक्यातील कोरोना हॉस्पिटल मध्ये रेमडीसिवीर इंजेक्शनचा पुरवठा आवश्यकतेनुसार होणार असल्याची राज्यमंत्री भरणे यांची माहिती

संचारबंदी नियम काटेकोर पणे पाळण्याची गरज असल्याचे सांगून पोलिसांनी यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे भरणे यांचे आदेश

अतिक्रमण रोखण्यास प्रशासन अपयशी ; रस्ता मिळत नसल्यामुळे मिळकत धारक जाणार न्यायालयात !

0

भिगवण वार्ताहर . दि.१६

तक्रारवाडी गावातील अतिक्रमणाचा वाद पोलीस ठाण्याच्या दरवाजात पोहोचला असला तरी याची दखल ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामसेवक घेताना दिसून येत नसल्यामुळे तक्रारदार न्यायालयाचे दरवाजे ठोठवनार असल्याची माहिती संबंधिता कडून देण्यात आली.अतिक्रमणावर अंकुश ठेवण्यासाठी कोणतेच प्रशासन कार्यवाही करत नसल्यामुळे अतिक्रमण करणारांची मानसिकता वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारवाडी गावातील सबंधित प्रकरण असून गावातील 238 मिळकत नंबर चे भोगवटा दार राजेंद्र गोडसे यांनी त्यांच्या मिळकत समोरील रस्त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी काही दिवसापूर्वी प्रशासनाला अनेक विनंती अर्ज केले होते.मात्र प्रशासनाने न्याय देण्यास विलंब केल्याने त्यांनी आमरण उपोषण केले होते.त्यावेळी जागे झालेल्या प्रशासनाने आणि ग्राम विस्तार अधिकारी यांनी तक्रारदार गोडसे आणि अतिक्रमण करणाऱ्या शरद वाघ , युवराज काळंगे तसेच इतर ४ नागरिकात तडजोड करीत १० फुटाचा रस्ता मालकी असणाऱ्या मिळकत दार राजेंद्र गोडसे यांना दिला होता. तस पाहिलं तर गट विकास अधिकारी होत असलेल्या अतिक्रमणावर निर्बंध घालणं गरजेचं होत परंतु राजकीय दबावामुळे गट विकास अधिकारी यांनी अतिक्रमणाला मुक पाठिंबा दिल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाडस वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.यातूनच जागा मालकाला स्वतःच्या जागेवर येण्या जाण्याच्या रस्त्यावर पक्के बांधकामास सुरवात करण्यात आली आहे.तसेच याबाबत मूळ जागा मालकाने आपणाला आणि पत्नीला शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्या बाबत भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.मात्र आठ दिवस उलटूनही यावर कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याचे गोडसे यांचे म्हणणे आहे.तर ग्रामसेवक यांना वरिष्ठ कार्यालयाचे आदेश मिळूनही अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येतं आहे.तर अतिक्रमण करणारे कोणत्याही नोटीस ला घाबरत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे साहजिकच तक्रार दाराला न्यायालयाचे दरवाजे ठोठावन्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत तक्रारदार राजेंद्र गोडसे यांनी बोलताना ग्रामसेवक आणि तक्रारवाडी गावाचे सरपंच यांनी अतिक्रमण रोखणे गरजेचे असताना आणि ग्रामसेवक यांची जबाबदारी असताना यावर कोणती ही कारवाई केली जात नसल्याचे सांगितले.तसेच याविषयी आपण न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. तसेच प्रशासन अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरत असल्याने गावातील सर्वच जागा अतिक्रमणाच्या घशात चालल्या असल्याचे सांगितले.

याबाबत ग्रामसेवक दीपक बोरावके यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देवून बांधकाम थांबविण्यासाठी सूचना केल्या असल्याचे सांगितले.

याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिक्रमण होत असलेली जागा गावच्या नकाशाच्या बाहेर येत असल्याची माहिती दिली.तर या अतिक्रमण बाबंत हद्दीचा विषय येत असल्याने कोणतीही कारवाई केली नसल्याचे सरपंच वाघ यांनी म्हणणे मांडले.

जत्रा ,यात्रा ,उरूस रद्द ,वर्गणी मात्र सुरूच ; कोरोणा काळातील ग्रामीण भागातील चित्र

0

भिगवन वार्ताहर. दि.४

कोरोना च्या वाढत्या प्रसारामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या ग्रामदेवतेच्या यात्रा उरूस जत्रा यावर शासनाने निर्बंध आणल्यामुळे यावर्षीच्या यात्रा भरलेले नाहीत. मात्र असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांची या यात्रेच्या वर्गणीतून सुटका झाली असल्याचे मात्र दिसत नाही.

या दिवसात ग्रामीण भागात सालाबाद प्रमाणे भरतात. ग्रामीण भागात यात्रा उरूस जत्रा यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. या सणाला ग्रामीण जीवनातील उत्साह मानला जातो. यावेळी नागरिक आपल्या नातेवाईकांना एकत्र करीत गोड-धोड आणि मांसाहारी यासारखे अन्नपदार्थ करून पाहुणचार करीत असतात. तसेच महिलांसाठी हा सण अत्यंत आनंदाचा मानला जातो लेकी बाळी माहेरी जातात तर सासरच्या नातेवाईकांना पाहुण्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर पाहुणचार केला जातो. मात्र या कोरोणाने या सर्वांवर विरंजन टाकण्याचे काम केले आहे असे असले तरी ग्रामीण भागात ग्रामदेवतेच्या वर्गणीतून कोणतीही सूट देण्यात आली नसून सर्वसामान्य नागरिकांना ही वर्गणी भरावे लागत असल्याचे चित्र इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.

तसेच अनेक देव देवतेच्या यात्रेसाठी केलेल्या वर्गणीतून शिल्लक राहिलेली रक्कम गावातील गरजूंना वार्षिक व्याजावर व्याजाने दिली जाते तिच्यातही कोणत्याही प्रकारची सूट केलेली दिसून आले आहे .तर भावनेच्या प्रश्नांमुळे या पैशाच्या विषयात कोणी बोलताना दिसत नाही.त्यामुळे कोरोणामुळे वर्ष भरापासून पिडलेला शेतमजूर कामगार आणि हातावर पोट असलेला सर्वसामान्य आणखीनच अडचणीत आलेला दिसून आला. रिन काढून सण करणे आता आणखीनच आवघड होत असल्याचा प्रत्यय आता गोरगरीब नागरिकांना येत असताना दिसून आल्याशिवाय राहणार नाही.

कोरोनाच्या काळात गावातील यात्रा कमिटी आणि राजकीय प्रतिनिधी यांनी या विषयात सद्सद्विवेक बुध्दी वापरून यातील काही व्याज माफ करून काही खिशातील घातल्यास नक्कीच गोरगरीब नागरिकांची यात्रा जत्रा आणि उरूस आनंददायी झाल्याशिवाय राहणार नाहीत.

पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक गावात हा प्रकार घडत असताना भावना आणि श्रध्देचा विषय असल्यामुळे यावर कोणी बोलताना दिसून येत नसले तरी कोटीच्या घरात होणाऱ्या या व्यवहाराला व्याजाचा व्यवहार मानला जात नाही हे देखील विशेष मानावे लागेल. तर याची काही ठिकाणी अधिकृत आर्थिक तपासणी देखील केली जात नाही.

यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे खेळणी आणि महिलांच्या वस्तू विक्री करणाऱ्या छोटया व्यवसाय करणाऱ्यावर उपासमारी ची वेळ आली असल्याचे देखील प्रामुख्याने जाणवत आहे.मात्र शासन दरबारी यांची कुठे नोंद नसल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधांना वानवा असल्याचे चित्र आहे.

भिगवण कोविड सेंटर मध्ये ५० ऑक्सिजन बेड देण्याची ;भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी

0

भिगवण वार्ताहर. दिं.३
इंदापुर तालुक्यासह राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपा नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नवनिर्वाचीत कार्यकारिणी भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर पंचायत समिती आदींच्या वतीने करण्यात आली आहे.

भिगवण येथे भव्य ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली आहे. अद्याप ट्रॉमा केअर सेंटर सुरु न झाल्यामुळे गतवर्षी या इमारतीमध्ये पन्नास बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते.यावेळी सामाजिक संस्था आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
आजच्या घडीला इंदापुर तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. तालुक्यातील कोविड सेंटर जवळपास हाऊसफुल्ल झाली असून भिगवण येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील रुग्नांना उपचारासाठी बारामती व इतरत्र जावे लागते आहे. रुग्णांना आर्थिक ताणांसह मोठा त्रासही सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभुमीवर भाजपा नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धनजी पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, येथील भिगवण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी वायसे, माजी सरपंच पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,कपिल भाकरे आदींनी येथील कोविड सेंटरमध्ये स्वच्छता राखण्यात यावी, तसेच येथे पन्नास ऑक्सिजन व्हेंटिलेटर युक्त बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन बेडची सोय उपलब्ध झाल्यास इंदापुर तालुक्यातील कोविड रुग्नांना त्याचा फायदा होईल.भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर पंचायत समितीच्या मागणीनुसार इंदापुरचे प्रभारी तहसिलदार यांनी नुकतीच कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे.

याबाबत राज्याचे भाजपा नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धनजी पाटील म्हणाले, इंदापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर होणार अपघात व या भागाची गरज विचारात घेऊन आपण भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरला मंजुर केले होते. सध्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरु आहे. रुग्नांची गरज विचारात घेऊन या ठिकाणी पन्नास ऑक्सिजन बेडची उपलब्धता करुन द्यावी यासाठी पाठपुरावा करत आहे.

दारूबंदी साठी महिलांचा एल्गार ;कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

0

भिगवण वार्ताहर.दि.३

इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदी साठी ग्रामसभा घेवून दारूबंदी करण्याचा ठराव घेतला.प्रसिद्ध देवस्थान पद्मावती मंदिर परिसरात असणाऱ्या ढाब्यांवर हि दारूविक्री सुरु असून याचा भाविक आणि ग्रामस्थ यांना मनस्ताप सहन करावा लागत असून तातडीने दारूबंदी झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा महिलावर्गा कडून देण्यात आला आहे.

याबाबत ग्रामसभेचा ठराव निवेदन सोबत देण्यात आला असून याची प्रत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ,उपविभागीय अधिकारी बारामती ,प्रांताधिकारी कार्यालय आणि भिगवण पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.पिंपळे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ढाब्यांवर हि अनधिकृत दारू विकली जात असून यामुळे प्रसिद्ध देवस्थान पद्मावतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तसेच ग्रामास्थाना याचा त्रास होत असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे.याबाबत पिंपळे गावात महिलांनी महिलांची ग्रामसभा ,तसेच जनरल ग्रामसभेचा ठराव घेत दारूबंदीची मागणी केली आहे.दारू विक्री करणाऱ्या ढाब्यामुळे अनेक शेतमजूर आणि गोरगरीब नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून हि प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.तसेच आठ दिवसाच्या आत प्रशासनाने दारूविक्री करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई न केल्यास १२ एप्रिल पासून ग्रामस्थ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत पिंपळे गावचे सरपंच कुंडलिक भिसे यांनी सदर दारूबंदी साठी महिला वर्ग अतिशय आक्रमक झाल्या असल्याचे सांगितले.तसेच याबाबत महिलांनी ग्रामसभा घेवून दारूबंदीचा ठराव संमत केला असल्याचे सांगितले.तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील भाविक हे पद्मावती देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या दारूविक्री मुळे अनेक चुकीचे प्रकार घडत असताना यावर कारवाई होत नसल्यामुळे खंत व्यक्त केली.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी निवेदन पोहोचल्याचे सांगत दारू विक्री करणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.तर याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडूनही कारवाई अपेक्षित असल्याचे सांगितले.

कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे ;पंचायत समिती उपसभापती चे आवाहन

0

भिगवण प्रतिनिधी …. दिं.१

कोरोनाची दुसरी लाट सध्या राज्यात सुरु झाली असून इंदापूर तालूक्यामध्येही मोठ्या प्रमाणात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर तालूक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहून अधिक काळजी घेण्याचे आवाहन इंदापूर पंचायत समीतीचे उपसभापती संजय देहाडे यांनी केले.

तालुक्यांतील ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या गावात सॅनिटायझेशन व इतर उपाय योजना राबविण्यात येत आहेत. तसेच ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण सापडला आहे, अशा कुटुंबातील इतर सदस्यांच्याही कोरोना तपासण्या केल्या जात आहेत.ग्रामपंचायत माध्यमातून गावातील मोक्याच्या जागा, वर्दळीची ठिकाणे, बाजारापेठा, बस स्थानक आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याचे यावेळी देहाडे यांनी सांगितले.

इंदापूर तालूक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत असून नागरिकांच्या प्राथमिक तपासण्या करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तोंडाला मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती थुंकू नये असे आवाहन देहाडे यांनी नागरिकांना केले.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. लसीकरण हे सुरक्षित असल्याने त्याविषयी गैरसमज निर्माण न करता तालूक्यातील नागरिकांनी या लसीकरणास प्रोत्साहन द्यावे. इंदापूर तालूक्यामधील कर्मचारी,अधिकारी , पंचायत समीती व ग्रामपंचायत सदस्य यांनी लसीकरण करुन घेतले आहे. कोणाला कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनीही मनातील भीती बाजूला करुन लस टोचून घ्यावी असे आवाहन इंदापूर पंचायत समीतीचे उपसभापती संजय देहाडे यांनी केले.

भिगवण ग्रामपंचायतीचा महत्वाकांक्षी उपक्रम ;प्लॅस्टिकचा राक्षस जागीच ठेचनार

0

व्यापारी वर्ग आणि सामान्य जनतेतून निर्णयाचे स्वागत;

जनतेच्या सेवेतून वेगळे पण दाखविणार सरपंचाची भूमिका

“भिगवण प्रतिनिधी .३१

अलीकडच्या काळामध्ये प्लॅस्टिक ही मानवाला भेडसावणारी फार मोठी समस्या असल्यामुळे याच्यावर उपाय योजना करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपक्रम,विविध योजना राबविल्या जात आहेत,याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक मुक्त गाव हा अनोखा उपक्रम ग्रामपंचायत भिगवण मार्फत राबविण्यात येणार असून एक एप्रिल पासून हा उपक्रम सुरू होत आहे.

या उपक्रमांतर्गत गावातील सर्व प्लास्टिक,यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू, खेळणी, पिशव्या,बाटल्या,कचरा तसेच इतर साहित्य ग्रामपंचायत मार्फत खरेदी करण्यात येणार असून गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.हे प्लास्टिक साधारणत: ग्रामपंचायत कडून पाच ते दहा रुपये किलो या दराने खरेदी केले जाणार असून नागरिकांनी प्लास्टिकचा कचरा इतरत्र कुठेही न टाकता तो आपल्या घरामध्ये साठवून ठेवून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिन्यातून दोन वेळा जमा करायचा आहे.

भिगवण मध्ये मोठी बाजारपेठ असल्याने उद्योग,व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून प्लास्टिकच्या कचऱ्याने याठिकाणी उग्र रूप धारण केले असल्याकारणाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे निश्चितच व्यापारी वर्गाला प्लास्टिक पासून होणारा त्रास कमी होणार आहे.ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार असून नागरिकांनी प्लास्टिक, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करण्याचे आव्हान ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यासंदर्भातील ठराव दिनांक 30 मार्च रोजी झालेल्या मासिक मिटिंग मध्ये करण्यात आला आहे. अशी माहिती सरपंच तानाजी वायसे यांनी दिली तर जनतेच्या कामातून आपले वेगळे पण दाखविणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.