Saturday, May 23, 2026
Home Blog Page 14

साईंनाथ शिक्षण संस्थेच्या आदर्श शाळेचे रौप्य महोत्सवात पदार्पण ;राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोहळा

0

भिगवण वार्ताहर .दि .२७
शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनांमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होते.असे मनोगत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले .भिगवण येथील आदर्श शाळेतील रौप्य महोत्सव कार्यक्रम वेळी भरणे बोलत होते .

डॉ खानावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने पंचवीस वर्षापुर्वी प्रतिकुल परिस्थितींमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करुन या भागातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली ही अतिशय महत्वाची बाब आहे. पंचवीस वर्षापुर्वी लावलेल्या रोपटयाचा वटवृक्ष झाला आहे. सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे केंद्र असलेल्या साईनाथ शिक्षण मंडळास सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डी एन जगताप .अॅड. महेश देवकाते, प्रताप पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, अभिजीत तांबिले, प्रमिलाताई जाधव, हेमाताई माडगे, सचिन बोगावत,धनाजी थोरात, बाळासाहेब सोनवणे, संजय खाडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे व संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी ना. भरणे यांचे हस्ते विज्ञान प्रयोगशाळेचा उद्घाटन करण्यात आले. ना. भरणे पुढे म्हणाले, साईनाथ शिक्षण संस्थेमध्ये भौतिक सुविधांसाठी आवश्यक ती मदत केली जाईल. शैक्षणिक संकुलामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २० लाख रुपये, व्यायामशाळेसाठी आवश्यक निधी व वाचनालयांसाठी ५० हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक संस्थापक डॉ. चंद्रकांत खानावरे यांनी केले ,सुत्रसंचालन निलेश चांदगुडे व डॉ. काशीनाथ सोलनकर यांनी तर आभार डॉ. अमोल खानावरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याधापिका सुचेता साळुंखे,पल्लवी वाघ, संचालक व शिक्षक यांचे विशेष परिश्रम घेतले.
चौकट ..बिल्ट ग्राफिक कंपनीने या शाळेसाठी ११ संगणक दिले याबद्दल कंपनीचे कौतुक करत असताना कंपनी सामाजिक सेवेत हात आखडता घेत असल्याची खंत व्यक्त करत अजूनही काही सामाजिक सेवेत कंपनीने योगदान द्यावे असे भरणे यांनी कंपनी अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांना सुचविले.

किरकोळ कारणावरून विवाहितेने गळफास लावून दिला जीव ; भिगवण येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना

0

लहान मुलाला अभ्यास करताना आईने हाताने केली होती मारहाण म्हणून नवरा रागावल्याच्या कारणातून दिला जीव

भिगवण वार्ताहर.दि.१३

मुलाचा अभ्यास घेत असताना पती रागावल्याच्या कारणातून विवाहितेने गळफास लावीत जीव दिल्याची घटना भिगवण येथे घडली.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रोहिणी राकेश थोरात वय २५ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याबाबत राकेश थोरात यांनी तक्रार दिली असून यामध्ये नमूद केल्या प्रमाणे शुक्रवारी सकाळी राकेश थोरात कामावरून घरी आलेले असताना पत्नी रोहिणी हि मुलाचा अभ्यास घेत होती .तर मुलगा राघव हा अभ्यास करत नसल्यामुळे रोहिणी त्याला हाताने मारहाण करत असल्याचे दिसून आले.यावेळी राकेश याने रोहिणीला तु अभ्यासासाठी मुलाला का मारते त्याचा अभ्यास तो करेल असे म्हणत तिच्या हातातून सोडवत हाताला झटका देत आपल्या जवळ घेतले.यावेळी चिडलेल्या रोहिणी हिने आता याचा अभ्यास तुम्हीच घ्या असे रागाने म्हणत घरात जावून दरवाजा बंद केला. बराच वेळ होवूनही दरवाजा न उघडल्याने मनात शंका निर्माण झाल्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रोहिणी हिने घराच्या छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले.यावेळी राकेश याने रोहिणीला खाली घेत शेजार्याच्या मदतीने दवाखान्यात नेले असता तिचा जीव गेला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
याची तक्रार पती राकेश थोरात यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे .

भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित

0

भिगवण वार्ताहर.दि.३

भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. भिगवणकर नागरिकांनी पवार यांना मिळालेल्या मानाच्या पुरस्काराबद्दल कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला .

भिगवण पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावर नियुक्ती होताच सपोनि दिलीप पवार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा कोणाताही धागेदोरे नसताना कसब पणाला लावीत तपास केला. निरगुडे येथील खून प्रकरण अकोले येथील पत्नीच्या प्रियकराने केलेल्या नवर्याचा खून तसेच शेटफळ येथील चुलत भावाने केलेला खून या सर्व प्रकरणात पवार यांनी गुप्त पद्धतीने आणि तांत्रिक विश्लेषनाचा आधार घेत तपास करीत आरोपीना गजाआड केले आहे.तर भिगवण मधील नामंकित पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या गुन्ह्रेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.तर भिगवण हे शहर पुणे सोलापूर महामार्गावर असल्याने या ठिकाणी होत असलेल्या चोरट्या गांजाची वाहने पकडीत कारवाया केलेल्या आहेत.
तसेच अनेक गुंतागुंत असलेल्या गुन्ह्यात सहकारी पोलिसांची मदत घेत गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे काम केले आहे .याच सर्व तपास कामी त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून बहिर्जी नाईक हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता .बुधवार दि २ फेब्रुवारी रोजी पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात अधीक्षक डॉ .अभिनव देशमुख यांच्या हस्ते दिलीप पवार यांना हा पुरस्कार देण्यात आला.

भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी ज्या प्रमाणे अत्यंत जिकिरीच्या गुन्ह्यात तपास करीत आरोपींना गजाआड केले त्यांना मिळालेला पुरस्कारा मुळे भिगवणकरांनी त्यांचे अभिनंदन करीत कौतुक केले.

उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

0

भिगवण वार्ताहर .दि.२५

भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मदनवाडी गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्ग सर्विस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला.यावेळी पोलिसांनी हे पोते बाहेर काढून पाहिले असता यात ४० ते ४५ वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.मयताच्या अंगावर निळ्या रंगाची जीन पँनट असल्याचे आढळून आले.याबाबत मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब वनवे यांनी तक्रार दिली आहे.भिगवण पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत पुणे येथील ससून रुग्णालयात शवविचेद्न करण्यासाठी पाठवून दिला आहे.भिगवण पोलीस या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत असून याबाबत प्रसिद्धी पत्रक काढून ओळख पटविण्याचे आवाहन करीत असल्याचे सपोनि दिलीप पवार यांनी सांगितले .

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू करण्यात आल्याची पोलिसांची माहिती .तसेच प्रसिद्धी पत्रका द्वारे ओळख पटविण्याचे नागरिकांना आवाहन .

उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; मदनवाडी हद्दीतील खळबळ जनक प्रकार

0

अनोळखी ४० ते४५ वयाच्या पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रसिद्धी पत्रका द्वारे आवाहन

भिगवण वार्ताहर .दि.२५

भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मदनवाडी गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्ग सर्विस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला.यावेळी पोलिसांनी हे पोते बाहेर काढून पाहिले असता यात ४० ते ४५ वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.मयताच्या अंगावर निळ्या रंगाची जीन पँनट असल्याचे आढळून आले.याबाबत मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब वनवे यांनी तक्रार दिली आहे.भिगवण पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत पुणे येथील ससून रुग्णालयात शवविचेद्न करण्यासाठी पाठवून दिला आहे.भिगवण पोलीस या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत असून याबाबत प्रसिद्धी पत्रक काढून ओळख पटविण्याचे आवाहन करीत असल्याचे सपोनि दिलीप पवार यांनी सांगितले .

अतिक्रमनाच्या वादामुळे रस्त्याचे काम थांबविण्याची वेळ ;आदर्श गाव तक्रारवाडी येथील प्रकार

0

भिगवण वार्ताहर.दि.२१

तक्रारवाडी गावात वाढत असलेल्या अतिक्रमणाचा फटका विकास कामांना बसत असून दोन बाजूच्या प्लॉट धारकांच्या तक्रारी मुळे सदर ठिकाणचा रस्ता थांबविण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली असल्याचे दिसून आले.तर कमी रुंदीच्या रस्त्यामुळे अतिक्रमणाला खतपाणी मिळत असल्याचे वास्तव आहे.

तक्रारवाडी गावात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून सिमेंट रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.पीरसाहेब मंदिराच्या दक्षिण बाजूला असणाऱ्या रस्त्यावर गेली चार दिवसापूर्वी काम सुरु झालेला रस्ता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.पुनर्वसन विभागाने दोनही बाजूच्या प्लॉटसाठी १८ फुटाचा रस्ता ठेवला आहे.तर याठिकाणी ग्रामपंचायत विभागाने १२ फुट रुंदीचा सिमेंट रस्त्याचे काम सुरु केले आहे.मात्र दोन्ही बाजूचे नागरिक आमच्या बाजूला रस्ता घेवू नका मध्यापासून काम करा अशी मागणी करीत रस्त्याला विरोध करीत आहेत.त्यामुळे गेली ४ दिवस काम बंद पडले असून याबाबत बिडीओ आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे अखेर ग्रामसेवक सतीश बोरावके आणि सरपंच सतीश वाघ यांनी या ठिकाणी भेट देत जोपर्यंत वाद मिटत नाही तो पर्यंत काम बंद ठेवण्या ऐवजी पुढील भागात काम करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे अखेर सरकारी जागेवर असणाऱ्या रस्त्याला सुद्धा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले.

याबाबत तक्रारदार संदीप वाघ यांनी आपली भूमिका रस्ता अडविण्याची नसून रस्त्याचा मध्यभाग काढून रस्ता करण्याची आहे.समोरील बाजूने अतिक्रमण झाल्यामुळे आमच्या बाजूला रस्ता वळविण्याचे काम केले जात याला आमचा विरोध असल्याचे सांगितले.

याविषयी सरपंच सतीश वाघ यांनी सदरच्या ठिकाणी विकास कामात अडथळा आणण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले १८ फुट रस्ता असताना १२ फुटाचे काम करण्यास अडथळा केला जात असेल तर हे योग्य नसल्याचे सांगितले. याठिकाणी तात्पुरता वाद असल्यामुळे पुढच्या टप्यातील काम सुरु केल्याचे सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन ; भाजपा युवा मोर्चा यांचे भिगवण येथे आंदोलन

0

भिगवण वार्ताहर.दि.१८

भिगवण येथील मदनवाडी ब्रिजखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पुतळ्याचे दहन करीत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी नाना पटोले यांनी खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्य बाबत हे आंदोलन करण्यात आले.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आकाश कांबळे ,किसान मोर्चाचे माउली चवरे ,सरचिटणीस गजानन वाकसे यांनी नाना पटोले यांनी केलेल्या बेताल वक्तवयाचा निषेध करीत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद होवून तातडीने अटक करण्याची मागणी केली.यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पटोले यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत राज्यसरकार यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.यावेळी आबासाहेब थोरात ,गणेश भांडवलकर ,राम आसबे ,ललित होले ,माउली मारकड ,हेमंत काजळे ,पांडुरंग सूळ ,हनुमंत निंबाळकर ,सुग्रीव साठे प्रेमकुमार जगताप यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवीत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याना ताब्यात घेत सुटका केली .

रोटरीच्या माध्यमातून मराठी पत्रकार संघाला संगणक भेट ; पत्रकार दिनाचे निमित्त भिगवण रोटरीचे आदर्शवत कार्य

0

भिगवण वार्ताहर .दि .१२
भिगवण रोटरी क्लब यांच्या माध्यमातून पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिगवण मराठी पत्रकार संघास संगणक भेट देण्यात आला . तारादेवी लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्तेयाचे वितरण करण्यात आले .
आजच्या काळात संगणक हा काळाची गरज मानला जातो . ग्रामीण भागातील बातम्यांचे संकलन करून त्याचे प्रसिद्धी करण्यासाठी संगणकाची आवश्यकता भासते .याच्याच विचार करून पत्रकार दिनाच्या निमित्ताने मराठी संघाला भेट देण्यात आल्याचे अध्यक्ष संजय खाडे यांनी सांगितले . रोटरीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली जातात त्यांच्या या सेवेच्या कार्याची बातमी करण्यात मराठी पत्रकार संघाचे योगदान असते त्याची उतराई या स्वरूपात झाली असल्याचे मत नियोजित अध्यक्ष डॉ .अमोल खानावरे यांनी व्यक्त केले .
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ प्रशांत चवरे , संघातील सर्व पत्रकार , भिगवण पोलिस स्टेशनचे ए पी आय दिलीप पवार , तुषार झेंडेपाटील जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे, पराग जाधव, डी एन जगताप,शंकरराव गायकवाड ,डॉ.अमोल खानावरे ,संपत बंडगर, रियाज शेख, नामदेव कुदळे, संजय चौधरी, कमलेश गांधी, धरनेंद्र गांधी, प्रदीप ताटे, औदुंबर हुलगे संजय रायसोनी, तुषार क्षिरसागर, रंजीत भोंगळे , डॉ .अमित खानावरे उपस्थित होते .

भिगवण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत ; अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी केले पूजन

0

भिगवण वार्ताहर.दि.९

भिगवण पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोनशिलेचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले .

भिगवण येथे पोलीस चौकीला ओगस्ट २०१४ साली पोलीस स्टेशनचा दर्जा प्राप्त झाला.यावेळी तीन चार खोल्यातून कामकाज पाहिले जात होते.तीन जिल्हे आणि पाच तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ गावे आणि १० वाड्या वस्त्या येतात.तर राष्ट्रीय महामार्ग पुणे सोलापूर या ठिकाणी जात असल्यामुळे अपघात आणि चोरीच्या घटना सातत्याने घडत असतात त्यामुळे अपुऱ्या जागेत कामकाज करताना अडचणी येत होत्या.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे पोलीस ठाण्याच्या नव्या इमारती साठी २ कोटी ३३ लाख रुपयाचा निधी देण्यात आल्याने आज इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी बोलताना ना.भरणे यांनी भिगवणची बाजारपेठ मोठी असल्यामुळे पोलीस ठाण्याच्या कामाचा व्याप मोठा आहे पोलिसांना चांगल्याप्रकारे काम करण्यासाठी इमारतीची आवश्यकता होती ती आता पूर्ण होणार असल्याचे सांगितले.तसेच भिगवण जिल्हा परिषद गटात जवळपास ११०७ कोटी रुपयांचा रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले .तालुक्यातील इतर रस्त्यांना निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता तालुक्यातील कामासाठी निधी मिळविण्यासाठी डोके लागते असा टोला मारला.तर मंजूर केलेल्या कामाचे रोज नारळ फोडले तरी दिवस कमी पडतील असे सांगितले.

यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी इंदापूर आणि बारामती भागातील सर्व पोलीस ठाण्याच्या इमारती बांधकाम करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले .तर भिगवण पोलीस ठाण्याच्या इमारती साठी लागणाऱ्या सर्व परवानगी कमी वेळेत पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे सांगितले.यावेळी कंत्राटदार दतात्रय आरडे यांनी पोलीस ठाण्याचे काम ८ महिन्यात पूर्ण करू असा शब्द ना.भरणे यांना दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागीय अधिकारी एम.एम.सुर्वे ,शाखा अधिकारी आर ,एल ,चौधरी ,कनिष्ट अभियंता अमोल कावडे , जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर , डी .एन.जगताप ,आबासाहेब देवकाते ,अजिक्य माडगे ,महेश शेंडगे ,संदीप वाकसे ,डॉ.अमोल खानावरे ,प्रमोद नरुटे उपस्थित होते. प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी तर आभार मानण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले.

चौकट : यावेळी बोलताना ना .भरणे यांनी कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या घेत ” नेते न बनता कार्यकर्ते बना ” असे सांगितले तर ” लोकांची सेवा केली तरच तुम्हाला लोक ओळखतील ” असे सांगून अप्रत्यक्षपणे ग्रामपंचायतीत झालेल्या पराभवाची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली.

शेअर्स मार्केटमध्ये नफा कमविण्याच्या बहाण्याने ९ लाखाचा गंडा ; बिल्ट पेपर कंपनी कामगाराला फसविले

0

भिगवण वार्ताहर.दि.८

शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्यासाठी आपल्याकडे द्या आणि गुंतविलेल्या पैशाची जबाबदारी आम्ही घेतो असे म्हणत ९ लाख २१ हजार रुपयांना गंडा घालण्याच्या प्रकार भिगवण पोलीस ठाणे हद्दीत घडला.याबाबत तीन आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी सुभाष पवार रा.आसू पवारवाडी ता.फलटण जि.सातारा त्याची पत्नी माधुरी सुभाष पवार तसेच दादा महादेव माने रा.बारामती यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बिल्ट कंपनीत कामगार असणाऱ्या शंकर फकीरा मोहंती रा.बिल्ट कॉलनी यांना त्यांच्या सोबत काम करणाऱ्या दिगांबर हगारे यांनी मध्यस्थी करीत २०१९ ला आरोपी आणि मोहंती याची ओळख करून दिली यावेळी आरोपींनी मोहती यांना आम्हाला शेअर मार्केट मध्ये चांगल्या पैसे कसे वाढवायचे याबाबत माहिती असल्याचे सांगितले.तसेच तुम्हाला जास्तीचा नफा मिळेल आणि तुमचा पैसा बुडणार नाही याची हमी घेत मोहंती यांच्या कडून ९ लाख २१ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यातून घेतले.मात्र पैसे घेतल्यावर कोरोना आहे असे सांगून पैसे परत करण्यात अडचणी येत असल्याचे सांगू लागले.तसेच भेटीसाठी गेल्यावर घरी न थांबता पसार झाले.तसेच घरी पैसे आणावयास का आला म्हणून शिवीगाळ आणि खोट्या तक्रार करण्याची धमकी दिली. या मुळे आपले पैसे मिळणार नाहीत म्हणून मोहंती यांनी भिगवण पोलीस ठाण्याची धाव घेत आरोपी विरोधात फसवणुकीची तक्रार दिली.याबाबत भिगवण पोलीस तपास करीत आहेत.