भिगवण येथील बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जलदगती न्यायालयात वर्ग करण्यासाठी प्रयत्न करणार ; खासदार सुप्रियाताई सुळे यांची ग्वाही

0
893

भिगवण वार्ताहर .दि.२१

भिगवण परिसरातील शाळेत घडलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणी माहिती घेण्यासाठी तसेच निर्भया पथकाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सबंधित शाळेला भेट दिली.यावेळी सुळे यांनी शिक्षणविभाग, पोलीस यंत्रणा आणि पालक यांच्याशी विभागवार संवाद साधित सूचना केल्या.

यावेळी बोलताना सुळे यांनी भिगवण सारख्या शहरात शाळेसारख्या पवित्र मंदिरात घडलेला प्रकार अतिशय वेदनादायी असल्याचे सांगितले. तसेच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच भिगवण पोलिसांनी सदर प्रकरणी संवेदनशील पद्धतीने तातडीने तपास करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या बद्दल आभार व्यक्त केले.तसेच निर्भया पथकाच्या महिला पोलिसांचे काम अतिशय चांगले झाल्यामुळे त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करणार असल्याचे सांगितले.यावेळी बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,सपोनि .दिलीप पवार ,गटविकास अधिकारी विजय परीट ,हनुमंत बंडगर ,सरपंच तानाजी वायसे,पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,बाळा भोसले तसेच पालक उपस्थित होते.

यावेळी गटविकास अधिकारी विजय परीट यांनी या प्रकरणात आरोपीच्या पाठीमागील माफीनाम्यात प्रथमदर्शनी दोषी आढळून आलेल्या प्रभारी मुख्याध्यापिका यांना निलंबित केले असल्याचे तर केंद्रप्रमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांना दिली.

चौकट : खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्को कायदा अतिशय कठोर असून यात फिर्यादी यांची ओळख जाहीर होवू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.तसेच यावेळी सुळे यांनी सर्व पालक तसेच पत्रकार यांच्याकडून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत शिक्षण विभागाविषयी गटविकास अधिकारी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here