Saturday, May 23, 2026
Home Blog Page 13

भिगवण स्टेशन येथील क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ;

0

भिगवण वार्ताहर.दि.१९

भिगवण रेल्वे स्टेशन येथे क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी भिगवण पोलीस स्टेशन येथे करण्यात आल्या .यात एका गटाच्या ५ जणांवर तर दुसऱ्या गटाच्या ६ असे ११ जणांवर एट्रासिटी मारामारी आणि दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर क्रिकेट सारख्या शुल्लक कारणासाठी दोन समाज समोरासमोर उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.

याबाबत भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी सचिन प्रवीण कांबळे यांनी खौजा हसन कुरेशी ,तय्यब कुरेशी ,सोहेल कुरेशी ,जुनेत कुरेशी यांच्या विरोधात गर्दी जमविणे ,दंगा करणे ,जातीवाचक शिवीगाळ करणे अशी तक्रार दिली आहे.तर प्रतिस्पर्धी गटाच्या वतीने अझहर खाजा कुरेशी यांनी राजेंद्र कांबळे ,सचिन कांबळे ,अक्षय कांबळे ,प्रेमचंद कांबळे ,गणेश खडके यांच्या विरोधात दमदाटी ,लाकडी दांड्याने मारहाण तसेच जबरदस्तीने पैसे काढून नेल्याची तक्रार केली आहे.दोनही गुन्ह्याची पोलिसांनी नोंद करीत तपास सुरु केला आहे.मात्र क्रिकेट सारख्या शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणामुळे दोन समाजात दरी निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.तर तक्रार दाखल करण्यासाठी भिगवण पोलीस ठाण्यावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

दोन्ही गुन्ह्यातील कोणत्याही आरोपीची अटक बातमीच्या वेळेपर्यंत झाली नसल्याची माहिती ठाणे अमलदार रामदास जाधव यांनी दिली.

डम्परखाली चिरडून मृत्यू झालेल्या तरूणाच्या पत्नीने गळफास लावत दिला जीव ; भिगवण येथील दुर्दैवी घटना

0

भिगवण वार्ताहर.दि.१४

डंपरखाली चिरडून जीव गेलेल्या तरुणाच्या पत्नीने नवऱ्याच्या अंत्यविधीच्या दुसर्या दिवशीच गळफास घेत आपला जीव दिल्याची मनाला सुन्न करणारी घटना भिगवण येथे घडली.या दुर्दैवी घटनेने भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साक्षी उर्फ पियुषा ज्ञानेश्वर बिबे वय २० रा.विवेकानंद नगर भिगवण असे गळफास लावून जीव दिलेल्या विवाहितेचे नाव आहे.वीटभट्टीसाठी माती आणली जात असताना आलेल्या गाडींचा हिशोब ठेवणाऱ्या वीटभट्टी मालकाचा गुरुवारी पहाटे डंपरखाली चिरडून मृत्यू झाला होता. साक्षी हि मयत ज्ञानेश्वर राजेंद्र बिबे याची पत्नी होती.साक्षी आणि ज्ञानेश्वर यांच्या लग्नाला ६ महिने सुधा पूर्ण झाले नसल्याची माहिती मिळत आहे .त्यातच नवऱ्याचा मृत्यू झाल्याच्या दुखातून तिने आपला जीव दिला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवऱ्याचा अंत्यसंस्कार होताच शुक्रवारी रात्री घरातील लोखंडी अंगलला साक्षी हिने गळफास घेतला होता. दुर्दैवी साक्षी ऊर्फ पियूशा बिबे

याबाबत भिगवण पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चौकट……दिवसा माती वाहतूक केली तर महसूल विभागाला याची माहिती मिळेल आणि रॉयल्टी आणि दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल म्हणून रात्रभर उजनीतून चोरून माती उपसा केला जातो.आणि हि माती व्यावसायिक उत्पादकांना विकली जाते.यातून वाहतूक करणारे बक्कळ पैसा कमवीत असतात.परंतु असा दुर्दैवी प्रकार घडल्यावर कुटुंब संपून जावू शकते याची फिकीर या माती माफियांना नक्कीच नसते.

तरुणांच्याआत्महत्येत होतेय वाढ ; कारणांचा उकल होण्याची गरज

0

टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी मित्र अथवा नातेवाईक यांच्याजवळ मन मोकळे करणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून मत व्यक्त

भिगवण वार्ताहर.दि.३०

भिगवण परिसरात तरूणांच्या आत्महत्या वाढत असून यामागचे खरे कारण मात्र गोपनीय राहत असल्यामुळे कारणांचा शोध देहाबरोबरच अनंतात विलीन होत आहे.पैसा संपती प्रेम विरह या कारणाबरोबरच सोशल मीडियातील सेक्स्कोरटन ( हनीत्र्याप ) ची फसवणूक हे हि मुख्य कारण असेल काय ? अशी कुजबुज मृत्यूनंतर केली जात आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासन गंभीरतेने पाहताना दिसून येत नसल्यामुळे फक्त हळहळ व्यक्त करण्यापलीकडे समाज काहीही करताना दिसून येत आहे.

आपणच आपले जीवन मुद्दामहून संपविणे याला आत्महत्या म्हणतात .युद्धात बंदुकीच्या गोळ्या खावून अथवा शत्रूच्या समोर निधड्या छातीने उभे ठाकणे हि सकारात्मक आत्महत्या प्रकारात मोडते तर घराच्या छताला दोरी अडकवून गळफास घेणे ,विहिरीत उडी मारून अथवा विषारी ओषध प्रासून दिलेला जीव हा नकारात्मक प्रकारात मोडतो.हाच नकारात्मक आत्महत्या प्रकार भिगवण परिसरात वाढत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसून यात आहे.अगदी जवानीच्या उंबरठ्यावर उभा असणारे तरुण अचानक प्राणाची आहुती देत असून यामागचे कारनांचा शोध घेतला जात नाही.आत्महत्या केलेल्या तरुणाच्या घरातील नातेवाइकांची परिस्थिती अतिशय वाईट असल्यामुळे याची पाळेमुळे शोधली जात नाहीत.तर पोलीस प्रशासन हि कोणतीच तक्रार नसल्यामुळे खऱ्याखुऱ्या कारणांचा शोध घेताना दिसून येत नाही.आणि जर अशा कारणाचा शोध लागला तर याचा इतर तरुणाची जागृती करण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे आणि एकाचा जीव यातून वाचण्याची शक्यता निर्माण होवू शकते.

सेक्शोरटन म्हणजेच हनीत्र्याप नावाचे सोशल मिडियाचे भूत हे हि या तरुणाच्या आत्महत्या पाठीमागील कारण असेल काय याचा शोध लागण्याची कुजबुज मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भागातील अनेक तरुण यात गुरफटले जात आहेत.या आभासी भूतामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असून अगदी जीव देण्यासारखी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे काही प्रकारात उघड झाले आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा आत्महत्या झालेल्या तरुणांचे मोबाईल ताब्यात घेत तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण केल्यास नक्कीच मूळ कारणापर्यंत पोहोचता येईल अशी कुजबुज भिगवण परिसरात होताना ऐकावयास मिळत आहे.

कुंभारगाव येथील लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार पासुन सुरु ; सरपंच उज्वला परदेशी यांची माहिती

0

भिगवण वार्ताहर .दि.२१

कुंभारगाव येथील जागृत देवी अशी ओळख असणाऱ्या लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार पासून सुरु होणार असल्याची माहिती सरपंच उज्वला परदेशी यांनी दिली. दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेला परिसरातील नागरिक तसेच पुणे आणि मुंबई भागात राहणारे चाकरमाने मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात.

उजनी धरणाच्या किनारी वसलेल्या आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुंभारगाव येथे लक्ष्मी मातेचे हे पुरातन काळातील मंदिर आहे.सालाबाद प्रमाणे या देवीचा यात्रा उत्सव पार पडत असून यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्रीच्या १२ वाजता गावातील प्रत्येक घरातील पुरुष मंडळीने देवीला पाणी घालण्याची पुरातन काळा पासून परंपरा आहे.सकाळी नैवद्य झाल्यानंतर दुपारी देवीला चोळी पातळ विधी पार पाडला जातो.रात्री देवीचा छबिना काढून पहाटेच्या सुमारास पालखी मंदिरात पोहोचवली जाते.पालखी मंदिरात पोहोचविल्या नंतर भाविकांच्या मनोरंजनासाठी जळगावकर यांचा तमाशा कार्यक्रम करण्यात येईल .दुसर्या दिवशी मल्लांच्या कुस्त्या आयोजन करण्यात येते.देवीच्या पालखीचा मान गेली ४०० वर्षापासून गावातील भोई समाजाकडे मिळालेला असल्याचे वयस्कर मंडळी सांगतात. गेली २ वर्ष कोरोना महामारीमुळे यात्रा साजरी करण्यात आली नव्हती .त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्त यात्रेला हजर राहणार असल्याचा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ग्रामपंचायत विभागाकडून गावात स्वच्छता पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती करण्यात आली असल्याची माहिती सदस्या दिपाली राहुल भोई यांनी दिली.

अभिनेत्री पल्लवी सोनोने यांचा राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते सन्मान ; तावशी येथील कार्यक्रमात केला सन्मान .

0

भिगवण वार्ताहर .दि .२१
भिगवण (ता इंदापूर) येथील पल्लवी सोनोने यांचा अभिनय क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
अभिनेत्री सोनोने यांना महिला दिनानिमित्त भारत इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल च्या वतीने वूमन सिनेमा अँड आर्टस इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने तावशी येथील जाहीर कार्यक्रमात सोनोने यांना भरणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांचेसमवेत लागीर झाल जी फेम कल्याणी सोनोने -चौधरी यांचा ही सन्मान केला.कल्याणी सोनोने आणि पल्लवी या दोघी बहिणी असून त्या भिगवण सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत . यावेळी सचिन बोगावत, आण्णा धवडे,अजिंक्य माडगे,प्रमोद बंडगर, मनोज राक्षे आदी उपस्थित होते.

मनोरंजन क्षेत्रात काहीही संबंध नसणाऱ्या सर्व सामान्य कुटुंबातील पल्लवी सोनाने व कल्याणी सोनोने या सख्या बहिणींनी कला क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावली.त्या दोघींनी आपल्या कर्तुत्ववान कामगिरी ने इंदापूर तालुक्याचे नाव देशात झळकवण्याचे काम केले आहे असे, अशा शब्दात राज्यमंत्री भरणे यांनी त्यांचे कौतुक केले .

भिगवण बाजारपेठ वाहतूक कोंडी पासून घेणार मोकळा श्वास ; पोलिसांनी उचलले कारवाई साठी पाऊल

0

भिगवण वार्ताहर .दि.१९

भिगवण पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कार्यवाहीला सुरवात करीत दुकानाबाहेर माल लावणाऱ्या व्यापार्यांना सूचना करीत आपला माल दुकानात ठेवण्यास सांगितले.तर पहिल्या टप्यात व्यावसायिकांना सामंजस्याने जनजागृती करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांसाठी कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिला .

भिगवण बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून याबाबत पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.बाजारपेठेतील मुख्य रस्ता ९ मीटर असताना तो काही ठिकाणी अगदी ५ मीटर सुधा शिल्लक राहत नसल्याचे दिसून येत आहे.तर काही व्यावसायिक आपला व्यवसाय व्हावा यासाठी दुकानाच्या बाहेर माल लावीत वाहतूक कोंडी करीत असल्याचे दिसून येत होते.याबाबतीत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकाची नेमणूक करीत रस्त्यावरील अतिक्रमण करणार्यांना सूचना केल्या.तर याबाबत अजूनही सूचना करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांसाठी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

बाजारपेठेत अतिक्रमण वाढून वाहतूक कोंडी होवू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.तर ग्रामपंचायत प्लास्टिक बंदी ,स्वच्छता आणि पाणीपुरवठा यावर चांगल्या प्रकारे काम करीत असताना अतिक्रमणाबाबत शांत का आहे असा सवाल सर्वसामान्यांना पडत आहे.

याबाबत भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे यांना विचारणा केली असता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन काम करीत असल्याचे सांगितले.तसेच काही दिवसातच मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम होणार असल्यामुळे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

शाळेत मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी खुनाचा प्रयत्न ; भाईगिरी साठी सरसावली तरुण पिढी

0

भिगवण वार्ताहर.दि.१४

पाच वर्षापूर्वी शाळेतील भांडणात गालावर मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाने दिली.तर एका झापडीसाठी एखाद्या मृत्युच्या दारात पोहोचविन्यामागे गुंडगिरीची मानसिकता असल्याचे दिसून येते.

अगदी सिनेमात दाखविला जातो असाच सीन भिगवण मधील दोन दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्यात वापरला गेला.अकरावीच्या वर्गात शिकत असताना मित्रासाठी केलेल भांडण हल्ल्याचे कारण असल्याचे समोर आले आहे.याबाबत भिगवण पोलिसांनी जयपाल रसिक पाटील रा.कात्रज ता.करमाळा ,विक्रम बाळासो माडगे ,रवींद्र उर्फ राजू भगवान बदर दोघे रा.भिगवण ,विशाल घोलप रा.बोरीबेल ता.दौंड यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करीत यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवारी तक्रारवाडी गावच्या वैष्णव अनपट या तरुणावर या चार आरोपींनी लोखंडी रॉड ,लाकडी बॅट ने जीवघेणा हल्ला केला होता.या हल्ल्यात वैष्णवला डोक्याला आणि छातीवर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती.पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध लावीत मुख्य आरोपी असणाऱ्या जयपाल पाटील याच्या मुसक्या आवळल्या होत्या.अजूनही दोन आरोपींचा शोध पोलीस घेत असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.

भिगवण गावाची शहरी करनाकडे वाटचाल सुरु झाल्याने या परिसरात भाईगिरी करण्याच्या प्रकारालाही वाढ झाली आहे.दोन चार गुन्हे नावावर दाखल झाल्याशिवाय आपली ओळख होणार नाही अशी मानसिकता तरुणांत वाढ होताना दिसून येते.तर नाव झाल्यावर वाळू तस्करी पासून मांडवली करण्याच्या प्रकरणात पैसा कमविता असा समज करून घेतला जात आहे.

भिगवण पोलिसांनी अशा गुंडगिरी चा लागलीच बिमोड करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे .कारण अशी भाईगिरी वाढू लागली तर सर्वसामान्यांना याचा त्रास होतो आणि सामाजिक वातावरणात दूषितपणा निर्माण होतो तो शांत आणि संयमी भिगवण साठी योग्य न ठरणारा आहे .

तक्रारवाडी गावच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरानी केला जीवघेणा हल्ला ; जखमी तरुणांची प्रकृती नाजूक

0

भिगवण वार्ताहर .दि .१२
भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर तक्रारवाडी गावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.लोखंडी रॉड आणि लाकडी बॅट ने केलेल्या हल्ल्यात तरुणांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे .

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार वैष्णव राहुल अनपट वय २१ असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. वैष्णव हा आपल्या दुकानाच्या मालाच्या खरेदी साठी भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावरील आला असता दबा धरून बसलेल्या ५ ते ८ हल्लेखोर तरूणांनी हा जीवघेणा हल्ला केला.लोखंडी रॉड आणि बॅट तसेच फरशी कडापा याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला .हल्ला होत असताना काही कळायच्या आतच डोक्यात वार झाल्यामुळे वैष्णव जमिनीवर पडला .वैष्णव जमिनीवर पडला असता यातील एका हल्लेखोर मोट्या आकाराची फरशी डोक्यात टाकण्याचा प्रयत्न करीत होता .
.मात्र आसपासच्या नागरिकांनी त्या हल्लेखोर तरुणाला पकडल्यामुळे त्याने पळ काढला .अगदी २ मिनिटाच्या आत हा प्रकार करून हल्लेखोरांनी हल्ला करणाऱ्या टोळीने पळ काढला .
यावेळी या ठिकाणच्या नागरिकांनी जखमी वैष्णवला भिगवण येथील खासगी आय सी यु मध्ये उपचारासाठी दाखल केले.डोक्यात झालेल्या अतिशय गंभीर जखमा मुळे वैष्णवची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टर यांनी दिली.भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत प्रकरणाची माहिती घेतली .तसेच संशयित आरोपींना शोधण्यासाठी पथक नियुक्त करीत शोध सुरू केला.
मात्र या प्रकरणामुळे भिगवण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून आले . या अज्ञात हल्लेखोराना पकडण्याची मागणी तक्रारवाडी गावातून होत आहे .

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी हॉस्पिटलमध्ये येत माहिती घेतली .तसेच आरोपींच्या नावाची माहिती घेत आरोपींना शोधण्यासाठी पथकाची नियुक्ती केली .

भिगवण येथील श्रीनाथ संस्थेची निवडणूक बिनविरोध ; दिवंगत नेते रमेशराव जाधव यांनी रोवली होती पतसंस्थेची मुहूर्तमेढ

0

भिगवण वार्ताहर .दि.१२

भिगवण परिसरात सर्वसामान्य व्यापारी आणि गरजूंना तातडीच्या आर्थिक कारणासाठी संजीवनी ठरणाऱ्या श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.काळे यांनी दिली. १३ जागांकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत १३ अर्ज आल्याने हि घोषणा करण्यात आली.

इंदापूर तालुक्यात नावलौकिक असणाऱ्या आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या या श्रीनाथ पतसंस्थेची स्थापना भिगवण गावाचे विकासरत्न म्हणून ओळख असणाऱ्या दिवंगत रमेशराव जाधव यांनी केली होती.छोटे व्यावसायिक आणि गरजू शेतकरी तसेच आणि कामगार यांना त्यांनी निर्माण केलेल्या पत विचारात घेवून त्यांना लागणाऱ्या कर्जाची सोय व्हावी यासाठी २१ वर्षापूर्वी हि स्थापन करण्यात आली. यातील १९ वर्ष अध्यक्ष म्हणून रमेशराव जाधव यांनी कार्यभार पाहिला.त्यांच्या अचानक जाण्यामुळे पाठीमागील २ वर्षापासून त्यांचे सुपुत्र पराग जाधव जबाबदारी पडली होती.तर २०२२ ते २०२७ ची निवडणूक घेण्यात आली .यात १३ सदस्यांनी आपले अर्ज दाखल केले.पराग रमेशराव जाधव ,रवींद्र वांझखडे ,खंडू गाडे ,मुकेश ललवाणी ,रत्नाकर थोरात सलीम सय्यद ,प्रल्हाद काळे ,रोहन जाधव यांनी सर्वसाधारण जागेसाठी तर महिला प्रतिनिधी जागेसाठी तृप्ती जाधव ,प्रमिला जाधव यांनी तर इतर जागांसाठी अनिल देसाई ,शिवाजी गुंजाळ तसेच देवानंद शेलार यांनी अर्ज दाखल केले. एकूण १३ जागांसाठी १३ अर्ज दाखल करण्यात आल्याने हि निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.

यावेळी संस्थेचे व्यवस्थापक सचिन मदने ,रोखपाल संतोष लिमकर ,मनीषा ढेरे ,पद्माकर कदम ,विजयकुमार गायकवाड ,सचिन जाधव ,बाळासाहेब क्षीरसागर ,उदय जाधव तसेच इतर कर्मचारी यांच्या वतीने नवनिर्वाचित मंडळाचा सत्कार करण्यात आला.

भिगवण परिसरात काही वर्षापूर्वी अनेक पतसंस्था उदयाला आल्या होत्या त्यातील काहीच पतसंस्था आज चालू असलेल्या दिसतात तर अनेक पतसंस्था गोरगरीब ठेवीदाराचे पैसे गुंडाळून बंद झालेल्या आहेत.चेअरमन पदावर असणाऱ्या व्यक्ती आणि काही ठिकाणी कर्मचारी यांनी हेराफेरी आणि झगमगाटावर बेमाप खर्च करीत पतसंस्था डबघाईला आणल्या.मात्र श्रीनाथ संस्थेनी आपला आलेख नेहमी उंचावीत ठेवला. सतत अ वर्ग असानार्या या पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २० कोटी रुपयांची आहे . ”     

आईसमान चुलतीवरच केला नराधमाने बलात्कार ; भिगवण पोलीस ठाण्याचे हद्दीतील गावातील नात्याला काळीमा फासणारी घटना

0

भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आवळल्या नराधमाच्या मुसक्या

भिगवण वार्ताहर.दि.१२

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका नराधमाने आईसमान असणाऱ्या चुलतीवर बलात्कार केल्याची घटना घडली.नात्याला काळिमा फासणारी घटना असूनही नात्याचा विचार आणि आरोपीच्या दहशतीखाली पीडितेनी ८ दिवसानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिगवण पोलीस हद्दीतील गावात हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.केतन कांतीलाल पवार असे आरोपीचे नाव आहे.केतन याने पिडीतेच्या घरात अनाधिकाराने घुसत जबरदस्ती करीत पिडीतेशी शारीरिक दुष्कृत्य केले .तसेच वेळोवेळी पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.मात्र आरोपी हा पिडीतेचा पुतण्या असल्यामुळे पीडिता नात्याचा विचार करून गप्प राहिली .मात्र चार दिवस उलटताच या नराधमाने परत जबरदस्तीने शारीरिक दुष्कृत्य केले.तसेच याबाबत कोणालाही माहिती दिल्यास पूर्ण कुटुंब कापून टाकण्याची तसेच तिलाही मारून टाकण्याची धमकी दिली.

अखेर पिडीतेने भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली.नात्याला काळिमा फासणाऱ्या या आरोपी विरोधात भिगवण पोलिसांनी गुन्हा नोंद करींत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.