Saturday, May 23, 2026
Home Blog Page 12

पोंधवडी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

भिगवण वार्ताहर.दि.२२

भिगवण पोलीस हद्दीतील पोंधवडी येथून १० वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना २० तारखेला घडली.सदर प्रकरणी भिगवण पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत भिगवण पोलीस सूत्रांनी माहिती नुसार अंकुश प्रकाश पवार रा.पोंधवडीपाटी बंडगरवाडी यांनी फिर्याद दिली आहे.अंकुश यांची १० वर्षाची बहिण प्रातविधी साठी बाहेर गेली असता कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांच्या ताब्यातून पळवून नेवून तिचे अपहरण केले आहे.याविषयी भिगवण पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला असून याचा पुढील तपास पोसइ दडसपाटील करीत आहेत.

चौकट : भिगवण आणि परिसरात महिला आणि मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता अल्पवयीन मुलीही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.पोलीस प्रशासन आणि निर्भया पथक आपले काम चोख बजावीत असताना समाजातील इतर घटकानेही मुली आणि महिला यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

भिगवण येथील बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जलदगती न्यायालयात वर्ग करण्यासाठी प्रयत्न करणार ; खासदार सुप्रियाताई सुळे यांची ग्वाही

0

भिगवण वार्ताहर .दि.२१

भिगवण परिसरातील शाळेत घडलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणी माहिती घेण्यासाठी तसेच निर्भया पथकाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सबंधित शाळेला भेट दिली.यावेळी सुळे यांनी शिक्षणविभाग, पोलीस यंत्रणा आणि पालक यांच्याशी विभागवार संवाद साधित सूचना केल्या.

यावेळी बोलताना सुळे यांनी भिगवण सारख्या शहरात शाळेसारख्या पवित्र मंदिरात घडलेला प्रकार अतिशय वेदनादायी असल्याचे सांगितले. तसेच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच भिगवण पोलिसांनी सदर प्रकरणी संवेदनशील पद्धतीने तातडीने तपास करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या बद्दल आभार व्यक्त केले.तसेच निर्भया पथकाच्या महिला पोलिसांचे काम अतिशय चांगले झाल्यामुळे त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करणार असल्याचे सांगितले.यावेळी बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,सपोनि .दिलीप पवार ,गटविकास अधिकारी विजय परीट ,हनुमंत बंडगर ,सरपंच तानाजी वायसे,पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,बाळा भोसले तसेच पालक उपस्थित होते.

यावेळी गटविकास अधिकारी विजय परीट यांनी या प्रकरणात आरोपीच्या पाठीमागील माफीनाम्यात प्रथमदर्शनी दोषी आढळून आलेल्या प्रभारी मुख्याध्यापिका यांना निलंबित केले असल्याचे तर केंद्रप्रमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांना दिली.

चौकट : खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्को कायदा अतिशय कठोर असून यात फिर्यादी यांची ओळख जाहीर होवू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.तसेच यावेळी सुळे यांनी सर्व पालक तसेच पत्रकार यांच्याकडून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत शिक्षण विभागाविषयी गटविकास अधिकारी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणार्या नराधम शिक्षकाला पोलिस कोठडी

0

भिगवण वार्ताहर.दि.१९

शाळेतील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला भिगवण पोलिसांनी अटक करून बारामती येथील विशेष न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने विकृत नराधमाला २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

भिगवण आणि परिसरातील पालकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी घटना शाळेत घडली.या शाळेत विद्यादान करण्यासाठी आलेल्या शिक्षक रुपी नराधमाने शाळेतील कोवळ्या मुलीसोबत अश्लील चाळे करीत गुरु आणि शिक्षक नात्याला कलंक लावण्याचे महापाप केले. अत्यंत हुशार आणि चाणाक्ष मुलीने वेळेचे रूप ओळखीत या नराधमाच्या तावडीतून सुटका करीत पळ काढला आणि आपल्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. अघटीत घटनेमुळे घाबरून गेलेल्या पालकांनी सरळ पोलीस ठाण्याचे दरवाजे गाठले.आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी पथकाची निर्मिती करून काही वेळातच नराधमाच्या मुसक्या आवळल्या. सदर आरोपीला आज बारामतीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली .

भिगवण परिसरात घडलेल्या या गंभीर प्रकरणी पालकांची भावना अतिशय संतापाच्या असून आरोपीला पाठीशी घालणाऱ्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांना सहआरोपी करण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे. तर या नराधमाने वर्गातील अनेक मुलींशी असा अश्लील चाळा केल्याची माहिती समोर येत आहे.पाठीमागे असा प्रकार उघडकीस येवूनही याची माहिती पोलिसांना दिली नसल्यामुळे या प्रकरणी माफीनामा लिहून घेणाऱ्या सर्व शिक्षण विभागातील अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणीही पालकांतून केली जात आहे. तर अत्यंत गंभीर घटना घडूनही गटशिक्षण अधिकारी आणि तालुका अधिकारी यांच्या शिवाय इतर कोणीही भेट दिली नसल्याचे वास्तव बोलले जात आहे.तर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी हि भेट दिली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पालकांत संतापाची भावना असून याकडे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी आरोपीला कठोर शासन मिळावे यासाठी तपासाची गती वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच सदर प्रकरण माननीय न्यायालयाला विनंती करून जलदगती कोर्टात समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती दिली.

भिगवण पोलिसांच्या सतर्कतेमुळे नैराश्यातून घर सोडून जाणारी मुलगी आईवडिलांच्या ताब्यात ; भिगवण पाेलिसांचे सर्व स्तरातून कौतुक

0

भिगवण वार्ताहर : दि.८
शालेय परीक्षेत अपयश आलेल्या एका मुलीने नैराश्यातून खचून जाऊन घर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदरचा प्रयत्न भिगवण पोलिसांच्या समय सुचकतेमुळे तिचा हा प्रयत्न फसला. घर सोडून निघून जाणारी मुलगी पुन्हा घरच्यांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले.

या बाबतची हकीकत अशी, करमाळा तालुक्यातील एक मुलगी डिप्लोमा या शाखेत शिक्षण घेत होती. या शाखेचा नुकतंच निकाल लागला. त्यामध्ये ती अनुत्तीर्ण झाल्याने तिने नैराश्यातून घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. ति करमाळा येथून थेट भूम- स्वारगेट एसटीमध्ये निघाली. ही घटना जवळच्या नातलगांना कळताच त्यांनी मुलीचा शोध घेण्यात सुरुवात केली. मुलगी स्वारगेटकडे एसटीने मार्गस्थ झाल्याची माहिती कळताच मुलीच्या नातलगांनी या मार्गावरील सर्व एसटी डेपो व सर्व पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सदर मुलीचे फोटो व नाव व्हाट्सअपवर व्हायरल केले. दरम्यान, या मुलीचे फोटो इंदापूर डेपो मॅनेजर यांनी सर्व बस स्थानकाच्या डेपो मॅनेजर सर्व बसेच्या चालक, वाहक व बस थांबत असलेल्या हॉटेल चालकांना पाठविले. त्याच वेळी भिगवण पोलीसही त्या मुलीच्या शोधात होते.

भिगवण पोलिसांकडून मुलीचे समुपदेशन :
ही मुलगी ज्या बसमध्ये बसली ती बस पुण्याचे दिशेनी गेल्याचे समजताच भिगवणचे पोलिस अधिकारी दिलीप पवार यांनी एक पथक तयार करून परिवहन विभागाचे अधिकृत मान्यता असलेले हॉटेल उदयचे मालक समीर मुलाणी यांच्या संपर्क करून त्यांना मुलीची माहिती दिली. मुलाणी यांनी येणाऱ्या प्रत्येक एसटी बसवर बारीक नजर ठेवून सर्व एसटींची कसून चौकशी केली असता घर सोडून जाणारी मुलगी नजरेस पडली. त्यांनी ती बस थांबवून ठेवली. काही वेळानंतर भिगवण पोलिसांनी त्या मुलीस ताब्यात घेत तिच्या कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबीय येईपर्यंत सपोनि .दिलीप पवार व महिला पोलिस हवालदार दीपाली खेत्रे यांनी या मुलीचे समुपदेशन करत मत परिवर्तन केले. तसेच संबंधित मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

महिला आणि मुलींना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार ; सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांची ग्वाही

0

भिगवण वार्ताहर .दि.२

भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील गावात महिला आणि शाळकरी मुली यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार असल्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. गुन्हेशोध पथकाच्या विशेष कामगिरी निम्मित आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी हि माहिती दिली.

आली रे ! आली आता तुझी बारी आली !!” या चित्रपटातील डॉयलॉगची आठवण लवकरच भिगवण आणि परिसरातील रोडरोमिओ आणि धूम स्टंट रायडींग करणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना येणार आहे.कारण आता भिगवण पोलीस ठाण्याच्या सिंघम अधिकारी दिलीप पवार यांनी भिगवण आणि परिसरात महिला आणि मुलीसाठी सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार असल्याची ग्वाही पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली. त्यामुळे काही वर्षापासून महिला आणि मुलीसाठी या रोड रोमिओ आणि धूमस्टाईल बायकर्सचा त्रास होत होता.त्यातून नक्कीच सुटका होणार आहे .तर महिला आणि मुली विषयक गुन्ह्यात आरोपीना कठोरात कठोर कलमे लावण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी दिलीप पवार यांच्या या संकल्पनेच पत्रकार संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून अशा गुन्ह्यात सहभाग असणारांची नावे माध्यमातून प्रसिद्ध करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

चौकट …..वेगाने दुचाकी चालविणे तसेच शाळा परिसरात विना कामाच्या घिरट्या घालणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी निर्भया पथकाची निर्मिती करण्यात आली असून महिला आणि मुलींच्या रक्षणासाठी त्यांच्याकडून केली जाणर असल्याचे दिलीप पवार यांनी यावेळी सांगितले.

अपघाताचा बनाव फसला अन् पचलेला खुनाचे गूढ उकललं ; भिगवण पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी

0

भिगवण वार्ताहर.दि.२

शेतातील ट्रोलीच्या लोखंडी प्लेट चोरल्याच्या संशयातून अनोळखी इसमास लोखंडी टौमीने तोंडावर कपाळावर मारहाण करीत त्याचा खून करीत पुणे सोलापूर महामार्गावरील पोंधवडी गावच्या हद्दीत अपघात झाल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या भिगवण पोलिसांनी आवळल्या. भिगवण पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार खून करणारा आरोपीचे नाव आकाश वामन काळोखे वय २३ रा.देहूगाव विठ्ठलवाडी ता .हवेली असे आहे. खून झालेल्या इसमाचे नाव अरुणसिंह वय ५३ रा.बब्बनसिंह गाव भदोरा आझमगढ उत्तरप्रदेश असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे सोलापूर महामार्गावरील पोंधवडी गावच्या हद्दीत अनोळखी मृतदेह आढळून आला होता.घटनास्थळी पाहणी केली असता प्रथमदर्शनी अपघात झाल्याचे दिसून येत होते.मात्र तरीही भिगवण पोलिसांनी आपले कसबपनाला लावीत तपास करून हा अपघात नसून खून असल्याचा तपास केला.आणि खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. १५० किलोमीटर अंतरावरील देहूगाव येथे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अपघाताचा बनाव उघडकीस आणण्यात अखेर भिगवण पोलिसांना यश मिळाले.भिगवण पोलिसांच्या या कामगिरीचे अनेक स्तरातून कौतुक केले जात आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी दिलीप पवार .उपनिरीक्षक सुभाष रूपनवर ,पोलीस अमलदार सचिन पवार ,महेश उगले ,अंकुश माने ,हसीम मुलानी ,अक्षय कुंभार ,गणेश पालसांडे या पथकाने केली.

भिगवण रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा .

0

भिगवण वार्ताहर दि.३१

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आलेल्या सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेली सामाजिक असुरक्षितता अजूनही गेलेली सामाजिक विषम सामाजिक विषमते मधून निर्माण होणारी असुरक्षितता व त्यातून गमावलेली संवेदनशीलता यामुळे संचय करण्याची वृत्ती वाढत आहे आणि ती सामाजिक असुरक्षितते मुळे निर्माण झाली आहे.आज मी माझे घर माझेच अशी वृत्तीमुळे संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे असे विचार रोटरी चे वाईस गव्हर्नर मोहन पालेशा यांनी भिगवण रोटरी क्लब पदग्रहण समारंभ दरम्यान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे गव्हर्नर मोहन पालेशा, असिस्टंट गव्हर्नर निखिल मुथा , इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, हॅप्पी व्हिलेजचे डायरेक्टर वसंत माळुंजकर, रोटरी मेडिकल डायरेक्टर पल्लवी साबळे तसेच भिगवन रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, संस्थापक उपाध्यक्ष महेश शेंडगे ,रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष संजय खाडे, सेक्रेटरी सुषमा वाघ, भिगवण पोलीस स्टेशनचे दडस पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

मनुष्य स्वप्न मध्ये जास्त आणि वर्तमानात कमी जगत आहे. मनुष्याची संवेदना तरल आणि उत्कंट असणे आवश्यक आहे संवेदना समाज विकासाला आवश्यक असून आज देशांमध्ये संवेदनशील नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. सर्व भौतिक सुख वस्तू गोळा करण्याच्या नादात मनुष्य आनंदी होतच नाही. त्यासाठी सामाजिक भान ठेवून समाजात काम करताना प्रत्येकाने सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे यासाठी रोटरीचे कार्य महत्त्वपूर्ण आहे असे मत पालेशा यांनी व्यक्त केले.
संपूर्ण जिल्ह्यात भिगवण क्लबचे काम अत्यंत उत्तम पद्धतीने चाललेले आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भिगवन क्लब सध्या सर्वोत्कृष्ट असे काम करत आहे असे मत प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मावळते अध्यक्ष संजय खाडे यांनी केलेल्या विविध कामांचा वर्षभरातील आढावा सादर केला..
यावेळी पुणे विभागापैकी ग्रामीण भागातून रोटरी युथ एक्सचेंज च्या माध्यमातून पहिल्यांदा भिगवन मधील सुजित भोंगळे हा पुढील शिक्षणासाठी रोटरीतर्फे अमेरिका येथे जात आहे त्यामुळे त्याचा विशेष सत्कार करण्यात आला .

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून पुढील वर्षभरात विविध सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य विषयक कामे सर्वांना बरोबर घेऊन करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली . या कार्यक्रमांमध्ये नवीन मेंबर तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर ला पिन लावण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये नवीन सदस्य विठ्ठल थोरात, आनंद वांझखडे, प्रियंका बोरा यांनी रोटरी जॉईन केली .
बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये अध्यक्ष डॉक्टर अमोल खानावरे,सेक्रेटरी वैशाली बोगावत,खजिनदार संतोष सवाने,उपाध्यक्ष किरण रायसोनी, क्लब ट्रेनर संजय खाडे, एडमिनिस्ट्रेशन धरनेद्र गांधी, फाउंडेशन संदीप बोगावत, मेंबरशिप प्रवीण वाघ, सर्विस प्रोजेक्ट संपत बंडगर व रियाज शेख, मेडिकल प्रोजेक्ट डॉक्टर ज्ञानेश रेणुकर ,पब्लिक इमेज औदुंबर हुलगे, आयटी ऑफिसर प्रदीप ताटे व नामदेव कुदळे, युथ सर्विस संजय चौधरी यांचा समावेश करण्यात आला .
पदग्रहण कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब सोनवणे, अफजल भाई, कमलेश गांधी, संजय रायसोनी, तुषार क्षिरसागर ,डॉक्टर महेश गाढवे, डॉक्टर अमित खानावरे, थॉमस मथाई, अतुल वाघ, पप्पू भोंग, कुलदीप ननवरे, मीनाताई बंडगर, दीपा भोंगळे, रेखा खाडे ,तेहमिन शेख व डॉ. शिवरानी खानावरे यांनी केले…. पदग्रहण समारंभासाठी दौंड, बारामती, इंदापूर, पाटस, कुरकुंभ या ठिकाणातील रोटरी क्लबचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव बंडगर व रणजित भोंगळे यांनी केले तर आभार वैशाली बोगावत यांनी मानले.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील घटना

0

भिगवण वार्ताहर.दि.१६

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत  जाळ्यात अडकवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भिगवण पोलिसांनी या घटनेतील गांभीर्य ओळखून आरोपी विरोधात पास्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अंकुश भगवान गाडे रा.वार्ड नं .२ भिगवण असे आरोपीचे नाव आहे.आरोपी अंकुश याने पीडिता अल्पवयीन आहे याची माहिती असूनही मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे असे आमिष दाखवीत गेल्या ८ महिन्यापासून बळजबरी करीत बलात्कार केला आहे.आरोपीने स्वताच्या घरात तसेच त्याच्या शंभूराज चायनीज दुकानात पिडीतेला बोलावून तिच्यावर हा अत्याचार केलेला असल्याचे पीडीतेचे म्हणणे आहे.८ महिने हे दुष्कृत्य चालू होते शेवटी पीडिता भिगवण पोलीस ठाण्यात येत तिने आरोपी विरोधात तक्रार दिली.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुभाष रूपनवर या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे .

पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी लुटणारी टोळी जेरबंद ;भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी

0

भिगवण वार्ताहर .दि. १२

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस अडवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात भिगवण पोलिसांना यश आले.९२ हजार रुपयाच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.

शुभम प्रकाश जाधव वय २१ , वैभव व्यंकट संगुळे वय २१ रा.काळेगाव ता.अहमदपूर लातूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २६ /०५ /२०२२ रोजी डाळज गावाच्या हद्दीत रात्री ३ वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाला  अडवून त्याला मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि ४० हजार रुपयाची रोख रक्कम लुटण्यात आली होती.याबाबत फिर्यादीने तक्रार दाखल केली होती.तर ३१ तारखेला भिगवण बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकाची दुचाकी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेली होती.यावेळी दोन चोरटे सी सी टी व्ही मध्ये दिसून आले होते.भिगवण पोलिसांनी या दोनही चोरीच्या घटनाचा तपास करीत तांत्रिक विश्लेषणाचा वापर करीत आरोपींचा शोध सुरु केला होता.याच अनुश्न्घाने तपास करीत असता लातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने लातूर पोलिसांशी संयुक्त रित्या तपास करीत संशयित आरोपींना ताब्यात घेतले.यावेळी आरोपी कडून दोन दुचाकी सह मोबाईल आणि रोख रक्कम असा ९२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ .अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार ,पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम ,विनायक दडसपाटील ,पोलीस अंमलदार विजय लोडी ,सचिन पवार ,अंकुश माने ,महेश उगले ,हसीम मुलानी या पोलीस पथकाने केली.

कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे ; सार्वजनिक बांधकाम खात्याची कंत्राटदारावर मेहरबानी का ?नागरिकांचा सवाल

0

रस्ता बटराप्रमाणे फुगणार कि कोंबडीच्या कातडे सारखं सोलटवून डांबर निघणार हे काळच ठरवणार

भिगवण वार्ताहर.दि.३

कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून हि याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे कंत्राटदारावर एवढी मेहेरबानी का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. तर राज्यमंत्री भरणे यांनी आणलेला निधी हा सर्वसामान्य नागरिकांच्या रस्त्यासाठी कि कंत्राटदार यांचे खिशे भरण्यासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.

कुंभारगाव पोंधवडी पिंपळे या ग्रामीण मार्गासाठी अंदाजे ९ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.तर याचे काम व्ही .एच खत्री या बारामतीच्या कंत्राटदाराला मिळाले आहे.यातील पहिला टप्पा पुणे सोलापूर महामार्ग ते पोंधवडी असे काम सुरु करण्यात आलेले आहे.परंतु हे काम इस्टीमेंट प्रमाणे होत नसल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे.याठिकाणी कंत्राटदार जुन्या रस्त्याच्या दोन बाजूनी एक ते दीड फुटाची चारी खणून त्यात खडी भरत असल्याचे दिसून येत आहे. तर खणलेली चारी मुरुमापर्यंत सुधा नेली जात नाही.त्यामुळे रस्ता तयार होताच आठ दिवसात दोन्ही बाजूने रस्ता खचणार हे निश्चित. आणि रस्त्याचे काम मजबूत होण्यासाठी बॉक्स करून रोलिंग पाणी करणे आवश्यक असताना हि लाव लीजाव पद्धत का असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. तर कंत्राटदार रस्त्याचे काम घाईघाईने करीत ते पूर्ण करीत असल्याचेही दिसून येत आहे.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी भेट देवून कामाची प्रतवारी तपासणे गरजेचे आहे.

राज्यमंत्री दतात्रय भरणे कोटीच्या कोटी निधी इंदापूर तालुक्यातील रस्त्यासाठी मंजूर करून आणत आहेत मात्र या निधीचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का यावर लक्ष ठेवणे स्थानिक कार्यकर्त्यांचे काम आहे .मात्र स्थानिक कार्यकर्ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसून येत नाही. त्यामुळे कंत्राटदार यांचे फावत असून तक्रारी करणाऱ्याला चिरीमिरी देवून गप्प केले जात आहे.त्यामुळे कोट्यावधी निधी वापरून तयार होणारे कुचकामी ठरणार आहेत.

याबाबत कंत्राटदार व्ही.एच खत्री यांच्या वर्क मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काम हे एस्टिमेट प्रमाणे सुरु असल्याचे सांगितले.तर एस्टिमेट पहावयास मिळेल का असे विचारले असता ते तुम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात मिळेल असे सांगितले. तर कामाची माहिती फलकाबद्दल विचारला असता आम्ही लावला होता मात्र पडून गेला असेल असे सांगितले. काम सुरु होवून आठ दिवसात फलक पडत असेल तर रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न निर्माण होतो.
याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे डेप्युटी इंजिनिअर मनोहर सुर्वे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी याबाबत माहिती मिळाली असल्याचे सांगितले.तसेच याकामाची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले.आणि सदर काम इस्टीमेंट प्रमाणे करून घेतले जाणार असल्याचे सांगितले.

सदर रस्ता बारामतीतील नामांकित कंत्राटदार करत असून याच कंत्राटदाराने निरगुडे लाकडी निंबोडी भवानीनगर हा रस्ता तयार केला होता .या रस्त्याबाबत मोठा गाजावाजाही निर्माण झाला होता .बटरा प्रमाणे प्रमाणे फुगलेला रस्ता ,कोंबडीचे कातडे सोललया प्रमाणे निघणारा डांबराचा थर अशी अनेक विश्लेषणे बातमीदारांनी या रस्त्यासाठी वापरण्यात आली होती .आता कुंभारगाव पोंधवडी पिंपळे हा रस्ता सुद्धा त्याच पध्दतीने बनवल्या जात आहे त्यामुळे या रस्त्याला नक्की कोणती विश्लेषण लावली जाणार हे काळच ठरवेल .