भिगवण वार्ताहर.दि.१९
शाळेतील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला भिगवण पोलिसांनी अटक करून बारामती येथील विशेष न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने विकृत नराधमाला २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .
भिगवण आणि परिसरातील पालकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी घटना शाळेत घडली.या शाळेत विद्यादान करण्यासाठी आलेल्या शिक्षक रुपी नराधमाने शाळेतील कोवळ्या मुलीसोबत अश्लील चाळे करीत गुरु आणि शिक्षक नात्याला कलंक लावण्याचे महापाप केले. अत्यंत हुशार आणि चाणाक्ष मुलीने वेळेचे रूप ओळखीत या नराधमाच्या तावडीतून सुटका करीत पळ काढला आणि आपल्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. अघटीत घटनेमुळे घाबरून गेलेल्या पालकांनी सरळ पोलीस ठाण्याचे दरवाजे गाठले.आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी पथकाची निर्मिती करून काही वेळातच नराधमाच्या मुसक्या आवळल्या. सदर आरोपीला आज बारामतीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली .
भिगवण परिसरात घडलेल्या या गंभीर प्रकरणी पालकांची भावना अतिशय संतापाच्या असून आरोपीला पाठीशी घालणाऱ्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांना सहआरोपी करण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे. तर या नराधमाने वर्गातील अनेक मुलींशी असा अश्लील चाळा केल्याची माहिती समोर येत आहे.पाठीमागे असा प्रकार उघडकीस येवूनही याची माहिती पोलिसांना दिली नसल्यामुळे या प्रकरणी माफीनामा लिहून घेणाऱ्या सर्व शिक्षण विभागातील अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणीही पालकांतून केली जात आहे. तर अत्यंत गंभीर घटना घडूनही गटशिक्षण अधिकारी आणि तालुका अधिकारी यांच्या शिवाय इतर कोणीही भेट दिली नसल्याचे वास्तव बोलले जात आहे.तर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी हि भेट दिली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पालकांत संतापाची भावना असून याकडे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी आरोपीला कठोर शासन मिळावे यासाठी तपासाची गती वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच सदर प्रकरण माननीय न्यायालयाला विनंती करून जलदगती कोर्टात समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती दिली.