Monday, April 6, 2026
Home Blog Page 4

रंगीबेरंगी जरबेरा म्हणून नागझरी गवताची भिगवण बाजारपेठेत विक्री ;पोलिसांना माहिती मिळताच टोळीने केला पोबारा

0

समुद्र किनारी उगावणारे नागझरी गवताची बेटे जरबेरा म्हणून घेऊन फ़सू नये महाराष्ट्र ऍग्रो एजन्सी चे संचालक किरण नगरे यांची माहिती..

भिगवण वार्ताहर.दि.२

शिकलेली आणि हुशार मानस फसतात मात्र फसवणूक करणारा पट्टीतला पाहिजे ’ अस नेहमीच बोलल जात आणि त्याचा प्रत्यय रविवारीच्या बाजार दिवशी भिगवणकरांनी घेतला . समुद्र किनार्यावर उगवणारे गवत रंगीबेरंगी जरबेरा फुलांची बेट म्हणून घेत खिशाला चाट बसविला .याची माहिती जाणकार पत्रकाराने पोलीस ठाण्याला देताच चाहूल लागल्याने गवत विक्री करणार्यांनी आपला बोजा बिस्तारा आवळून धूम ठोकली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि भिगवण बाजार पेठेतील गजबजलेल्या आंबेडकर चौकात रंगीबेरंगी जरबेरा फुलांची झाडे विक्रीसाठी चार पाच तरुण आणि काही महिला बसल्या होत्या.१०० रुपयात सुंदर फुलाचे झाड मिळत असल्यामुळे अनेक नागरिकांनी आणि महिलांनी गर्दी करीत हि रोपटी विकत घेण्यास सुरवात केली .काही वेळातच त्यांच्याकडील रोपटी संपून त्यांनी साठा असलेल्या गाडीतून आणखीन रोपटी आणली यावेळी पत्रकार यांची गाडी या ठिकाणी पार्क करून माहिती घेतली असता त्यांनी आपण कळस अकोले येथील असल्याची बतावणी केल्यामुळे थोडासा संशय निर्माण झाला.याच वेळी बाजार पेठेतील गुरुदत्त इलेक्ट्रिकलचे व्यापारी यांनी आपण ती रोपे खरेदी केली असून त्यासाठी कुंड्या विकत घेतल्याचे सांगितले आणि हि जरबेरा असून याला सुंदर फुले येतात अशी माहिती दिली .यावेळी या रोपट्याचा आणि फुलाचा फोटो काढून तो शेतीतद्न्य आणि फुलझाडे आणि फळझाडे याची माहिती असणार्या किरण नगरे यांना पाठविताच त्यांनी हि जरबेरा नसून समुद्र किनारी उगविणारे नागझरी गवत असल्याचे सांगितले.विक्री करणारी टोळी लोकांची सरळसरळ फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांना देण्यात आली .मात्र हि गोष्ट विक्री करणाऱ्या टोळीच्या लक्षात येताच त्यांनी माल घेवून पळ काढला आणि अचानक संपूर्ण टोळीच काही क्षणात अदृश्य झाली.मात्र तो पर्यंत अनेक नागरिक यात गंडविले गेल्याचे उघड झाले.यामुळे ‘ दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये ’ या म्हणीची आठवण झाली.

याबाबत महाराष्ट्र अग्रो एजन्सीचे संचालक किरण नगरे यांनी हि रोपटी समुद्र किनारी उगविणारे नागझरी गवताची रोपे असून त्याची पाने कापून हि रंगीबेरंगी जरबेरा असविल्याचे भासवून फसवणूक केली जात असल्याचे सांगितले त्यामुळे नागरिकांनी या फसवणुकी पासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले.तसेच यांच्याविरोधात पोलीस कारवाई झाल्यावर फसवणूक टाळली जाईल असे मत व्यक्त केले.

तक्रारवाडी गावच्या ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीची ग्रामस्थांची मागणी ; शासकीय योजनाची माहिती न देणे आणि कार्यालयीन वेळेत हजर नसणे याबाबत बदलीची मागणी.

0

भिगवण वार्ताहर.दि.२७

तक्रारवाडी गावच्या ग्रामसेविका यांची बदली करून याठिकाणी नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ , गटविकास अधिकारी इंदापूर तहशिलदार इंदापूर तसेच जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे यांच्याकडे लेखी निवेदन देणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.

याबाबत बोलताना नागरिकांनी तक्रारवाडी ग्रामपंचायत सेविका अर्थात ग्रामविकास अधिकारी या त्यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहत नसून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगितले.तसेच ग्रामसेविका सर्वसामान्य नागरिकांना माहिती तसेच शासकीय योजनाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले जात आहे.तसेच त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यालयीन कामकाजाची वेळ आणि त्यांची उपस्थिती याबाबत नोटीस बोर्ड लावण्याची आवश्यकता असताना याची माहिती लावण्यात आली नाही.त्यामुळे नागरिकांना कामकाज करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे,.तसेच बऱ्याच वेळा वरिष्ठ कार्यालयाच्या मिटींगचे कारण सांगितले जात असून याबाबत कोणतीही पूर्वसूचना कार्यालयाच्या माध्यमातून दिली जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी तातडीने त्यांची बदली करून नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

तक्रारवाडी गावातील अतिक्रमनाचा मुद्दा पेटला ; अतिक्रमण हटविण्याच्या मागणी साठी पीपल रिपब्लिकन पार्टीचा रास्ता रोकोचा इशारा

0

भिगवण वार्ताहर. दि. 19

तक्रारवाडी गावातील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असून रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमण 7 दिवसाच्या आत हटविण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम खात्याने अतिक्रमण करणारया नागरिकांना दिली आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता चवरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत नोटीस वितरित केल्या आहेत. तर पीपल रिपब्लिकन पार्टीचे सचिन आढाव तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. बाळासाहेब भोसले यांनी 22 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील अतिक्रमण हटाविण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

तक्रारवाडी गाव हे अतिक्रमनाच्या विळख्याने ग्रासले असून वनविभाग असेल सार्वजनिक बांधकाम असेल अथवा ग्रामपंचायत विभाग असेल सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. याला गावातील राजकीय पुढारी आणि गुंड प्रवृत्ती च्या नागरिकांचा छुपा पाठिंबा असून दिवसा अतिक्रमण हटविण्याच्या गप्पा मारणारे पुढारी रात्री च्या वेळेत टपरी कुठं टाकावी याबाबत मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत.
सध्या मासे मार्केट येथे सुरु झालेल्या अतिक्रमनामुळे विषय वाढलेला दिसून येत आहे. मात्र याठिकाणी अतिक्रमण करणारी बहुतेक लोक हातावर पोट भरणारी आहेत. मात्र आता पर्यंत झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते पुढे आले नाही आणि ग्रामपंचायत विभाग ही पुढे आला नाही. अतिक्रमण करणार्यांना नोटीस दिल म्हणजे आपली जबाबदारी संपली म्हणणारे तत्कालीन सरपंच असो अथवा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक असो. यामुळेच गेल्या 5 वर्षांपासून अतिक्रमण वाढत असून याला गुप्त राजकीय पाठबळ मिळत आहे. तर पाठीमागे असणारा प्लाट आमच्या मालकीचा आहे. मग रस्त्याच्या शेजारी असणारी जागा आमचीच असा अधिकार वाणीने सांगितले जात आहे.जागा सरकारची आणि दुकाने अतिक्रमण करणाची अशी परिस्थिती पाहाव्यास मिळत आहे. तर अनेक जण अतिक्रमण करून या जा्गांचे भाडे वसुल करत आहेत. यातून काहींना महिना 50000 पासुन लाखाच्या आत भाडे मिळत आहे. यांचा फायदा ना ग्रामपंचायत प्रशासनाला ना व्यावसाय करून पोट भरणार्यांना मिळत आहे.तर काही गोरगरीब प्लाट मालकाच्या जागेत रात्रीत बळजबरीने अतिक्रमण करून दादागिरी होत असल्याचे प्रकार ही घडत आहेत. अतिक्रमण करून केलेल्या व्यवसायात कधीच भरभराटी होत नाही याची माहिती असताना आणि गावात यांच्या नादाला कोणी लागावं अशी ओळख असणाऱ्या अतिक्रमण करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
अतिक्रमण करणाऱ्यांनी आता रस्ता सुद्धा ग्रासला जात असून गावातील बाहेर निघण्याच्या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमनाचा वेढा पडत असल्याचे दिसून येत आहे.

अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी गावातील रस्ते मोकळ्या जागा आणि शासकीय जागा सोडल्या नाहीत त्यामुळे मागासवर्गीय नागरिकांना वापरण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी
पीपल रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते सचिन आढाव तसेच डॉ. बाळासाहेब भोसले यांनी 22 तारखेला रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. आता तरी प्रशासन जागे होईल आणि गावातील सर्व अतिक्रमण काढून रस्त्याना मोकळा श्वास घेऊ देतील काय हे येणारा काळ ठरविणार आहे.

स्कुलबस खाली चिरडून लहानग्याचा मृत्यू ;इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील घटना

0

भिगवण वार्ताहर.दि.१४

शाळकरी मुलांना शाळेतून घरी सोडत असताना दीड वर्षाच्या चिमुरड्याला स्कूलबस खाली चिरडल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे घडली.भोगी सणाच्या दिवशीच चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार या अपघातात स्वराज महेश काशीद वय १ वर्ष १० महिने याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.याबाबत स्कूलबस चालक रोहित हनुमंत पवार रा.पोंधवडी याच्याविरोधात सर्व रस्त्याची माहिती असताना गाडी भरधाव वेगात चालवून अपघात झाल्यास एखाद्याचा जीव जावू शकतो याची जाणीव असताना हलगर्जीपणा करून अपघात केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या अपघाताबद्दल मिळालेल्या माहिती नुसार या लहानग्याची बहिण याच स्कूलबस ने प्रवास करीत घरी आली असता चिमुरडा गाडीच्या दुसऱ्या बाजूने आल्याची माहिती मिळत आहे.यावेळी चालकाचे लक्ष नसल्यामुळे चिमुरडा गाडी खाली येत चेंगरला गेला .याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गणेश बबन काशीद यांनी तक्रार दिली आहे.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे अंमलदार लोढी यांनी अपघात दाखल करून पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.

बंद घराचे दार तोडून 2 लाखाची चोरी 8 ; भिगवण परिसरातील अपार्टमेंट चोरांच्या निशाणावर

0

भिगवण वार्ताहर.दि.११

भिगवण परिसरात चोरट्यांनी डोके वर काढण्यास सुरवात केली असून दोन दिवसापूर्वी बारामती राशीन रोड शेजारील अरुण लोखंडे यांच्या घरी रात्रीच्या वेळी घरफोडी करीत २ लाखांच्या आसपास सोने चांदी आणि इतर ऐवज चोरून पोबारा केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिगवण हद्दीतील अरुण लोखंडे यांच्या इमारतीत राहणाऱ्या शाम जाधव यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे.जाधव हे दिवाळीच्या सणासाठी बाहेर गावी गेले असता चोरट्यांनी ८ तारखेला रात्री हि चोरी केली.यात चोरट्यांनी बंद घराचे कटावणी ने कोयंडे तोडून घरात प्रवेश करीत घरातील समसंग कंपनीचा टीव्ही ,सोन्याचे गंठन ,अंगठी ,कर्णफुले आणि चांदीच्या पैजण चोरून नेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी या दागिन्यांची बिले सोबत नेली आहेत.यावेळी जाधव यांनी सणासाठी आणलेला किराणा माल तसेच ड्रायफ्रुट सुधा चोरून नेला.यावेळी चोरट्यांनी घरात दिवाळीच्या फराळावर ताव मारला आणि अगदी निवांत चोरी करून पोबारा केला. जाधव गावावरून परत आल्यावर चोरीची माहिती मिळाली.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जात आहे .

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी नागरिकांना घाबरून न जाता  सावधानतेचा इशारा दिला असून घर बंद करून गावी जात असताना याची कल्पना शेजारील कुटुंबाना देण्याची माहिती दिली आहे.तसेच इमारती खाली सीसी टीव्ही बसविण्याच्या सूचना केली आहे.तसेच बंद घरात सोने चांदी तसेच रोख रक्कम ठेवू नये अशी सूचना दिल्या आहेत.  

भिगवण येथे तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून :पोलिसांनी तातडीने तपास करून एका संशयीताला घेतलं ताब्यात.

0

शाळा परिसरात खून झाल्यामुळे विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली

विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांची घटना स्थळी भेट

भिगवण वार्ताहर.दि.१५

भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील मदनवाडी येथील वनविभागाच्या जागेत तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांना गुन्ह्याची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देत तपास करीत यातील संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिडीयाला दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विजय काजळे वय ४४ रा.निरगुडे सध्या भिगवण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पुणे सोलापूर महामार्गाच्या पूर्व बाजूस मदनवाडी गावच्या हद्दीत हा खून झालेला आहे.भिगवण पोलिसांनी याची माहिती मिळताच तांत्रिक विश्लेषण आणि गतिशील तपास यंत्रणा राबवून यातील एक संशयित आरोपी ताब्यात घेतला आहे.तर आरोपीने खून केल्याचा प्राथमिक जबाबही दिला असल्याची माहिती मिळत आहे.संशयित आरोपी आणि मृत झालेले विजय काजळे हे एकमेकांना ओळखीचे असून रात्रीच्या वेळेस दोघे पार्टी करण्यासाठी वनविभागाच्या जागेत बसले होते.यावेळी कोणत्यातरी कारणावरून दोघात बाचाबाची झाली आणि यातूनच संशयित आरोपीने शेजारी असणारा मोठा दगड विजयच्या डोक्यात मारून जीव घेतला.तर यावेळी विजयच्या डोक्याच्या एका बाजूचा चेंदामेंदा करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत भिगवण पोलिसांत मृत विजय यांच्या पत्नी भाग्यश्री काजळे यांनी खबर दिली असून पोलिसांच्या माध्यमातून गुन्ह्याची नोंद केली जात आहे.दगडाने ठेचून खून झाल्यामुळे भिगवण येथील वातावरण ढवळून निघाले असून बारामती विभागीय अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड ,इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे ,वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डूनगे ,स्थानिक गुन्हा विभागाचे प्रकाश माने ,तसेच पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देवून तपासात मदत केली.सदर खून त्याठिकाणी असणार्या शाळे समोर झाला असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळते.

मदनवाडी येथील 21 वर्षीय नवतरुणाचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू.

0

भिगवण वार्ताहर.दि.५

मदनवाडी येथील शरयू शरद चितारे वय २१ या तरुणाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

इंदापूर आणि दौंड तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हनुमंत चितारे परिवारातील शरद चितारे यांचा शरयू हा एकुलता एक मुलगा होता.अत्यंत देखणी शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर सदा स्मितहास्य असणाऱ्या या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेल्या मृत्यूमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.शरयू हा त्याच्या मामाच्या गावी गेलेला असतानाच त्याला हा झटका आला.कोणताही वैदकीय उपचार मिळण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली .हृद्य विकाराने अतिशय कमी वयात दौंड तालुक्यातील खानावटे गावातील तरुणाचा मागील आठवड्यात तरुणाने आपला जीव गमावला तर आज मदनवाडी येथील शरयू चीतारे याला मृत्यूला सामोरे जावे लागले.शरयू च्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.तर अंत्यविधी दुपारी २ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

पत्नीच्या मृत्यूमुळे आलेल्या नैराश्यातून गळफास घेत मदनवाडी गावाच्या तरुणाने संपविले जीवन. 7 महिन्याची चिमुकली आई वडिलांला झाली पोरकी

0

भिगवण वार्ताहर .दि.२९

अल्पशा आजाराने पत्नीचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून मदनवाडी येथील तरुणाने गळफास घेत जीवन संपवल्याची दुखद घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाळ उर्फ स्वप्नील प्रदीप सुतार वय.24 असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे .गोपाळ याचा भिगवण परिसरात मोबाईल विक्रीचा व्यवसाय असून दोन दिवसापूर्वीच गोपाळची पत्नी श्रावणी सुतार हिचे डेंगू आजारात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्युच्या नैराश्यातून गोपाळने हे टोकाचे पावूल उचलल्याची शक्यता आहे.रविवारी दुपारी घरी असताना नातेवाईक यांना मला कंटाळा आलाय मी थोडासा आराम करतो असे म्हणून गोपाळ खोलीत गेला होता.बराच वेळ होवूनही तो बाहेर येत नसल्यामुळे घरच्या सदस्यांनी आत जावून पाहिले असता खोलीच्या छताला नायलॉन दोरीच्या साहाह्याने लटकला असल्याचे दिसून आले.या घटनेची खबर गोपाळचा भाऊ संतोष सुतार यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली.

अत्यंत समजदार असा स्वभाव असणाऱ्या गोपाळ याने असे टोकाचे पावूल उचलल्या मुळे भिगवण आणि मदनवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तर ७ महिन्याची चिमुकली आई आणि वडिलांच्या मृत्यू मुळे पोरकी झाली आहे.  

भिगवण ग्रामीण रुग्णालयातील जनरेटर अवघ्या 47 हजारात झाला सुरु ; 621424 रुपये खर्चाचा प्रस्ताव आरोग्य विभागाने केला होता सादर.

0

भिगवण वार्ताहर.दि.२२

भिगवण ग्रामीण रुग्णालयातील जनरेटर दुरुस्तीच्या कामात होणारा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार होण्या अगोदरच रोकण्यात आल्याची माहिती शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष रणजीत जाधव यांनी दिली.तर जाधव यांच्या जागरूकते मुळे शासनाची ५ लाख ७४ हजार रुपयांची बचत झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिगवण येथील ग्रामीण रुग्णालयातील जनरेटर काही दिवसापासून बंद होता.मुळातच हा जनरेटर नवीन बसविताच ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे नादुरुस्त झाला होता.याला असणारी वॉरनटी चालू न करताच संपूनही गेली होती. ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयी आणि जनरेटर दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी शिवतेज ग्रुप ,मराठा महासंघ आणि अमर बौद्ध युवक संघटनेच्या माधयामातून मोर्चाचे आयोजन करून आंदोलन ही करण्यात आले होते.या आंदोलना नंतरही शासनाने वेळ काढू पणा दाखविल्या मुळे आंदोलकांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडून आंदोलन चालू ठेवले होते.याची दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यामुळे तक्रारवाडी मदनवाडी आणि भिगवण येथील व्यापारी वर्गाने आंदोलनाला पाठींबा दर्शवित आपले व्यवहार बंद ठेवले होते.यावेळी आंदोलकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.तर याच वेळी जनरेटर दुरुस्ती साठी ६२१४२४ इतका खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या कडे दिला असल्याचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नागनाथ एम्पल्ले यांनी आंदोलकांना दिले होते.यावर जनरेटर दुरुस्ती साठी इतका खर्च येणे शक्य नसल्याचे रणजीत जाधव यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुढे होत सम्राट मोटार गॅरेज च्या नवनाथ (बुवा ) खंडागळे यांच्याशी संपर्क साधून दुरुस्ती करण्यास सुरवात केली.आणि काय आश्चर्य ६ लाखाचे काम फक्त ४७ हजार रुपयात पूर्ण झाले.इतकच काय तर जनरेटर अगदी सुंदर रीतीने आपले काम हि करू लागला.त्यामुळे शासनाच्या ५ लाख ७४ हजार ४२४ रुपयाची बचत झाली.त्यामुळे शासनाची होणारी फसवणूक टाळली गेली आहे.याबाबत खंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जनरेटर दुरुस्ती चांगल्याप्रकारे झाली असून आता यात काही बिघाड होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.

तर ६ लाखाचे काम ५० हजारात होवूनही शासकीय अधिकारी हे काम वरच्यावर झाले आहे असे खंडागळे यांनाच बोलत असून मुख्य काम करावेच लागणार असल्याचे सांगत असल्यामुळे यातील गोलमाल काय आहे हे समजण्यास मार्ग नाही.तर शासनाला हे काम वरच्यावर का करता आले नाही असा सवाल आंदोलक विचारीत आहेत.

याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रभारी अधिकारी डॉ.सचिन विभूते यांनी पदभार सोडला असल्याची माहिती मिळाली.तर तात्पुरता पदभार असणारे डॉ.अनिकेत लोखंडे ट्रेनिंग साठी नागपूर येथे गेल्याची माहिती मिळाली.

कर्तव्य बजावीत असताना रेल्वे अपघातात जीव गमाविलेल्या पोलीस जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; पुष्पचक अर्पित करून हवेत बंदूकीच्या फैरी झाडून दिली सलामी.

0

भिगवण वार्ताहर.दि.१२

मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावीत असताना अपघाती निधन झालेल्या पोलीस जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मदनवाडी येथे पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील १० पोलीस जवानासह प्रभारी पोलीस अधिकारी विनोद महांगडे यांनी मृत पोलीस जवानाच्या पार्थिवाला अखेरची सलामी दिली.

मुंबई पोलीस दलात सेवा बजावीत असणाऱ्या मदनवाडी गावच्या रवींद्र बाळासाहेब हाके या पोलीस जवानाचा रविवारी १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला होता .आज सोमवारी सकाळी ८.३० वाजता त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथून १० पोलीस जवान तसेच भिगवण पोलीस जवान आणि प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सलामी देण्यात आली.हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत पुष्पचक्र अर्पण करून हि अखेरची सलामी देण्यात आली.यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थिती लावून पार्थिवाचे दर्शन घेतले.यावेळी मदनवाडी गावचे सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर ,विष्णुपंत देवकाते ,दीपक बंडगर यांनी पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अनेक तरुणांनी उपस्थिती लावली होती.पोलीस जवान रवींद्र यांच्या पाठीमागे पोलीस ट्रेनिंग घेणारा एक भाऊ ,आई वडील बहिण आणि पत्नी आणि लहान बाळ असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती मृत्यूने मदनवाडी आणि परिसरावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले.