Wednesday, October 7, 2026
Home Blog Page 5

भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा पवार यांची निवड ; कुंची कोरवी समाजातील महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मिळाला मान.

0

भिगवण वार्ताहर .दि.१४

भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा गंगाराम पवार यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक कोकरे यांनी दिली.गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी गुराप्पा गंगाराम पवार यांना १२ मते मिळाली तर श्रीमती निर्मला हरिचंद्र पांढरे यांना ५ मते मिळाली.या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक कोकरे तसेच तलाठी राहुल देवकर आणि ग्रामपंचायत अधिकारी भगीरथ परदेशी यांनी कामकाज पाहिले.

इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायती मध्ये कुंची कोरवी समाजाचा महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मान गुरप्पा पवार यांनी मिळविला. तर भिगवण गावच्या राजकारणातील आजचा महत्वाचा दिवस म्हणून ओळखला जाणार आहे.अगदी सर्वसामान्य नागरिकाला गावच्या सरपंच पदाचा मान मिळाल्यामुळे राजकीयदृष्ट्या हि नवी नांदी मानली जात आहे .भिगवण गावची निवडणूक पार पडताच सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका पदाधिकारी पराग रमेशराव जाधव आणि तत्कालीन पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी व्यक्त केली होती .त्याप्रमाणे ३ सदस्यांना सरपंच पदाचा तर ३ तीन सदस्यांना उपसरपंच पद देण्याचा शब्द देण्यात आला होता.यात धनगर समाजातील सदस्याला पहिला सरपंच पदाचा मान तर तेली समाजाच्या सदस्याला दुसऱ्या वेळी आणि कुंची कोरवी समाजाच्या सदस्याला आजच्या दिवशी सरपंच पदाचा बहुमान देण्यात आला तर रामोशी , मुस्लीम आणि बौद्ध समाजाच्या सदस्याला उपसरपंच पदाचा बहुमान देवून सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न सत्तेतील कार्यकारिणीने केला .  सर्व जाती जमातीच्या सदस्यांना सत्तेतील पदाचा  लाभ देण्याचा दिशा दर्शक पायंडा भिगवण करांनी पाडला असून तो जिल्ह्यात वाखाणण्याजोगा आहे.

आजची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित असताना सरपंच पदासाठी दुसरा अर्ज दाखल करण्यात आला.त्यामुळे निवडणूक घेण्यात आली.यात सत्तेतील १६ मते विरोधातील एकच मत  असतानाही ५ सदस्यांनी आपली मते विरोधात टाकल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.तर फुटलेली मते पदाचा मेवा चाखून झालेल्या सदस्यांची की पदे मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्या सदस्यांची याबाबत दबकी चर्चा सुरु झालीय. मात्र मतदान गुप्त असल्यामुळे नावे समजणें शक्य होणार नाही.या निवडीनंतर जयदीप जाधव ,अशोक शिंदे तसेच संजय देहाडे यांनी सुभेच्छा दिल्या तर निवनियुक्त सरपंच गुराप्पा (आपाजी )पवार यांनी आभार व्यक्त केले.   

दोन निष्पाप लेकरांचा आईनेच गळा घोटून घेतला जीव ; भिगवण शेजारील स्वामीचिंचोली येथील घटना

0

भिगवण वार्ताहर. दि. 8

आपल्याच उदरी जन्म घेतलेल्या दोन निष्पाप मुलांचा गळा दाबून जीव घेतल्यावर नवऱ्यावर धारदार शस्त्राने वार गंभीर जखमी केल्याची घटना दौड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात घडली. गंभीर जखमी नवऱ्यावर बारामती येथे उपचार. संशयित आरोपी महिलेला दौड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामधून शनिवारी सकाळीच धक्कादायक बातमी समोर आली आहे.जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्यांचा आज पहाटे गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.सदर महिला एवढ्यावरच न थांबता आपल्या पतीवर देखील तिने कोयत्याने वार केलेत.तिच्या या क्रूर वागण्यातून तीला पूर्ण कुटुंबच संपवायचं होत काय असा सवाल उपस्थित होतो.यात पती ही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती बारामती येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून दौंड पोलिसांनी संशयित आरोपी कोमल दुर्योधन मिंढे य(वय 30) या महिलेला अटक केली आहे.

शंभू दुर्योधन मिंढे (वय ०१) आणि पियू दुर्योधन मिंढे वय (०३)अशी मयत मुलांची नावे असून या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय ३५) वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केल आहे. कौटुंबिक कलहातुन या जन्मदात्या क्रूर आईने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून ही घटना समजताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.संशयित आरोपी महिला दौड पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.

ग्राहक पंचायत विभागाकडून रथसप्तमी निम्मित प्रवासी दिन साजरा ; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष तुषार झेंडेपाटील यांचे आवाहन.

0

भिगवण वार्ताहर .दि.४

जगाचा आधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमी चे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,आरटीओ कार्यालय बारामती आणि भिगवण पोलीस ठाणे तसेच इंदापूर एसटी डेपो यांच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला.

समाजातील नागरिकांनी खासगी वाहतुकीच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय अंगीकारावा तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी ग्राहक पंचायत पुणे यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी बारामती आरटीओ विशाल नाझीरकर ,भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विनोद पाटील  ,ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य सचिव अॅड तुषार झेंडेपाटील ,पुणे जिल्हा संघटक दिलावर तांबोळी ,इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर ,संघटक आबासाहेब निंबाळकर ,गणेश गुप्ते ,इंदापूर तालुका अध्यक्षा अर्चना सपकाळ ,नंदकुमार तावरे ,मनोज उदावंत ,भिगवण व्यापारी प्रतिनिधी श्रीकांत गायकवाड ,वाहतूक नियंत्रक सोमनाथ कुताळ  हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी व्यापारी प्रतिनिधी औदुम्बर हुलगे तात्यासाहेब बंडगर ,ग्राहक पंचायतीच्या सचिव नाजीया सय्यद पूनम गुप्ते दादासो भोंगळे यांनी प्रवाश्यांना गुलाब पुष्प देवून स्वागत केले.

मुख्य कार्यक्रम वेळी पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास करणाऱ्या एस.टी बसेस थांबवून या गाडीचे चालक आणि कंडक्टर यांचा फेटा बांधून सत्कार करीत बस मधील प्रवास्यांना पाणी बाटली तसेच तिळगूळ तसेच गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.यावेळी झेंडेपाटील तसेच आरटीओ नाजीरकर  यांनी बस मधील प्रवासी यांचे स्वागत करीत बस ने प्रवास केल्याने देशाचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच देशातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतल्यास अपघात प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना अॅड .तुषार झेंडे पाटील यांनी ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सांगितले.तर बारामती येथे रेल्वे प्रवाशी आणि चालकाचा सत्कार केल्याचे सांगितले.सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब केल्याने अपघाताचे प्रमाण ,हवेतील प्रदूषण आणि नागरिकाचा आणि शासनाचा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगितले.

रंगीबेरंगी जरबेरा म्हणून नागझरी गवताची भिगवण बाजारपेठेत विक्री ;पोलिसांना माहिती मिळताच टोळीने केला पोबारा

0

समुद्र किनारी उगावणारे नागझरी गवताची बेटे जरबेरा म्हणून घेऊन फ़सू नये महाराष्ट्र ऍग्रो एजन्सी चे संचालक किरण नगरे यांची माहिती..

भिगवण वार्ताहर.दि.२

‘ शिकलेली आणि हुशार मानस फसतात मात्र फसवणूक करणारा पट्टीतला पाहिजे ’ अस नेहमीच बोलल जात आणि त्याचा प्रत्यय रविवारीच्या बाजार दिवशी भिगवणकरांनी घेतला . समुद्र किनार्यावर उगवणारे गवत रंगीबेरंगी जरबेरा फुलांची बेट म्हणून घेत खिशाला चाट बसविला .याची माहिती जाणकार पत्रकाराने पोलीस ठाण्याला देताच चाहूल लागल्याने गवत विक्री करणार्यांनी आपला बोजा बिस्तारा आवळून धूम ठोकली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि भिगवण बाजार पेठेतील गजबजलेल्या आंबेडकर चौकात रंगीबेरंगी जरबेरा फुलांची झाडे विक्रीसाठी चार पाच तरुण आणि काही महिला बसल्या होत्या.१०० रुपयात सुंदर फुलाचे झाड मिळत असल्यामुळे अनेक नागरिकांनी आणि महिलांनी गर्दी करीत हि रोपटी विकत घेण्यास सुरवात केली .काही वेळातच त्यांच्याकडील रोपटी संपून त्यांनी साठा असलेल्या गाडीतून आणखीन रोपटी आणली यावेळी पत्रकार यांची गाडी या ठिकाणी पार्क करून माहिती घेतली असता त्यांनी आपण कळस अकोले येथील असल्याची बतावणी केल्यामुळे थोडासा संशय निर्माण झाला.याच वेळी बाजार पेठेतील गुरुदत्त इलेक्ट्रिकलचे व्यापारी यांनी आपण ती रोपे खरेदी केली असून त्यासाठी कुंड्या विकत घेतल्याचे सांगितले आणि हि जरबेरा असून याला सुंदर फुले येतात अशी माहिती दिली .यावेळी या रोपट्याचा आणि फुलाचा फोटो काढून तो शेतीतद्न्य आणि फुलझाडे आणि फळझाडे याची माहिती असणार्या किरण नगरे यांना पाठविताच त्यांनी हि जरबेरा नसून समुद्र किनारी उगविणारे नागझरी गवत असल्याचे सांगितले.विक्री करणारी टोळी लोकांची सरळसरळ फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांना देण्यात आली .मात्र हि गोष्ट विक्री करणाऱ्या टोळीच्या लक्षात येताच त्यांनी माल घेवून पळ काढला आणि अचानक संपूर्ण टोळीच काही क्षणात अदृश्य झाली.मात्र तो पर्यंत अनेक नागरिक यात गंडविले गेल्याचे उघड झाले.यामुळे ‘ दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये ’ या म्हणीची आठवण झाली.

याबाबत महाराष्ट्र अग्रो एजन्सीचे संचालक किरण नगरे यांनी हि रोपटी समुद्र किनारी उगविणारे नागझरी गवताची रोपे असून त्याची पाने कापून हि रंगीबेरंगी जरबेरा असविल्याचे भासवून फसवणूक केली जात असल्याचे सांगितले त्यामुळे नागरिकांनी या फसवणुकी पासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले.तसेच यांच्याविरोधात पोलीस कारवाई झाल्यावर फसवणूक टाळली जाईल असे मत व्यक्त केले.

तक्रारवाडी गावच्या ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीची ग्रामस्थांची मागणी ; शासकीय योजनाची माहिती न देणे आणि कार्यालयीन वेळेत हजर नसणे याबाबत बदलीची मागणी.

0

भिगवण वार्ताहर.दि.२७

तक्रारवाडी गावच्या ग्रामसेविका यांची बदली करून याठिकाणी नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ , गटविकास अधिकारी इंदापूर तहशिलदार इंदापूर तसेच जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे यांच्याकडे लेखी निवेदन देणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.

याबाबत बोलताना नागरिकांनी तक्रारवाडी ग्रामपंचायत सेविका अर्थात ग्रामविकास अधिकारी या त्यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहत नसून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगितले.तसेच ग्रामसेविका सर्वसामान्य नागरिकांना माहिती तसेच शासकीय योजनाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले जात आहे.तसेच त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यालयीन कामकाजाची वेळ आणि त्यांची उपस्थिती याबाबत नोटीस बोर्ड लावण्याची आवश्यकता असताना याची माहिती लावण्यात आली नाही.त्यामुळे नागरिकांना कामकाज करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे,.तसेच बऱ्याच वेळा वरिष्ठ कार्यालयाच्या मिटींगचे कारण सांगितले जात असून याबाबत कोणतीही पूर्वसूचना कार्यालयाच्या माध्यमातून दिली जात नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी तातडीने त्यांची बदली करून नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

तक्रारवाडी गावातील अतिक्रमनाचा मुद्दा पेटला ; अतिक्रमण हटविण्याच्या मागणी साठी पीपल रिपब्लिकन पार्टीचा रास्ता रोकोचा इशारा

0

भिगवण वार्ताहर. दि. 19

तक्रारवाडी गावातील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असून रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमण 7 दिवसाच्या आत हटविण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम खात्याने अतिक्रमण करणारया नागरिकांना दिली आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता चवरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत नोटीस वितरित केल्या आहेत. तर पीपल रिपब्लिकन पार्टीचे सचिन आढाव तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. बाळासाहेब भोसले यांनी 22 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील अतिक्रमण हटाविण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

तक्रारवाडी गाव हे अतिक्रमनाच्या विळख्याने ग्रासले असून वनविभाग असेल सार्वजनिक बांधकाम असेल अथवा ग्रामपंचायत विभाग असेल सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. याला गावातील राजकीय पुढारी आणि गुंड प्रवृत्ती च्या नागरिकांचा छुपा पाठिंबा असून दिवसा अतिक्रमण हटविण्याच्या गप्पा मारणारे पुढारी रात्री च्या वेळेत टपरी कुठं टाकावी याबाबत मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत.
सध्या मासे मार्केट येथे सुरु झालेल्या अतिक्रमनामुळे विषय वाढलेला दिसून येत आहे. मात्र याठिकाणी अतिक्रमण करणारी बहुतेक लोक हातावर पोट भरणारी आहेत. मात्र आता पर्यंत झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते पुढे आले नाही आणि ग्रामपंचायत विभाग ही पुढे आला नाही. अतिक्रमण करणार्यांना नोटीस दिल म्हणजे आपली जबाबदारी संपली म्हणणारे तत्कालीन सरपंच असो अथवा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक असो. यामुळेच गेल्या 5 वर्षांपासून अतिक्रमण वाढत असून याला गुप्त राजकीय पाठबळ मिळत आहे. तर पाठीमागे असणारा प्लाट आमच्या मालकीचा आहे. मग रस्त्याच्या शेजारी असणारी जागा आमचीच असा अधिकार वाणीने सांगितले जात आहे.जागा सरकारची आणि दुकाने अतिक्रमण करणाची अशी परिस्थिती पाहाव्यास मिळत आहे. तर अनेक जण अतिक्रमण करून या जा्गांचे भाडे वसुल करत आहेत. यातून काहींना महिना 50000 पासुन लाखाच्या आत भाडे मिळत आहे. यांचा फायदा ना ग्रामपंचायत प्रशासनाला ना व्यावसाय करून पोट भरणार्यांना मिळत आहे.तर काही गोरगरीब प्लाट मालकाच्या जागेत रात्रीत बळजबरीने अतिक्रमण करून दादागिरी होत असल्याचे प्रकार ही घडत आहेत. अतिक्रमण करून केलेल्या व्यवसायात कधीच भरभराटी होत नाही याची माहिती असताना आणि गावात यांच्या नादाला कोणी लागावं अशी ओळख असणाऱ्या अतिक्रमण करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
अतिक्रमण करणाऱ्यांनी आता रस्ता सुद्धा ग्रासला जात असून गावातील बाहेर निघण्याच्या प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमनाचा वेढा पडत असल्याचे दिसून येत आहे.

अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी गावातील रस्ते मोकळ्या जागा आणि शासकीय जागा सोडल्या नाहीत त्यामुळे मागासवर्गीय नागरिकांना वापरण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी
पीपल रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते सचिन आढाव तसेच डॉ. बाळासाहेब भोसले यांनी 22 तारखेला रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. आता तरी प्रशासन जागे होईल आणि गावातील सर्व अतिक्रमण काढून रस्त्याना मोकळा श्वास घेऊ देतील काय हे येणारा काळ ठरविणार आहे.

स्कुलबस खाली चिरडून लहानग्याचा मृत्यू ;इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील घटना

0

भिगवण वार्ताहर.दि.१४

शाळकरी मुलांना शाळेतून घरी सोडत असताना दीड वर्षाच्या चिमुरड्याला स्कूलबस खाली चिरडल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे घडली.भोगी सणाच्या दिवशीच चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार या अपघातात स्वराज महेश काशीद वय १ वर्ष १० महिने याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.याबाबत स्कूलबस चालक रोहित हनुमंत पवार रा.पोंधवडी याच्याविरोधात सर्व रस्त्याची माहिती असताना गाडी भरधाव वेगात चालवून अपघात झाल्यास एखाद्याचा जीव जावू शकतो याची जाणीव असताना हलगर्जीपणा करून अपघात केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या अपघाताबद्दल मिळालेल्या माहिती नुसार या लहानग्याची बहिण याच स्कूलबस ने प्रवास करीत घरी आली असता चिमुरडा गाडीच्या दुसऱ्या बाजूने आल्याची माहिती मिळत आहे.यावेळी चालकाचे लक्ष नसल्यामुळे चिमुरडा गाडी खाली येत चेंगरला गेला .याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गणेश बबन काशीद यांनी तक्रार दिली आहे.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे अंमलदार लोढी यांनी अपघात दाखल करून पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.

बंद घराचे दार तोडून 2 लाखाची चोरी 8 ; भिगवण परिसरातील अपार्टमेंट चोरांच्या निशाणावर

0

भिगवण वार्ताहर.दि.११

भिगवण परिसरात चोरट्यांनी डोके वर काढण्यास सुरवात केली असून दोन दिवसापूर्वी बारामती राशीन रोड शेजारील अरुण लोखंडे यांच्या घरी रात्रीच्या वेळी घरफोडी करीत २ लाखांच्या आसपास सोने चांदी आणि इतर ऐवज चोरून पोबारा केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिगवण हद्दीतील अरुण लोखंडे यांच्या इमारतीत राहणाऱ्या शाम जाधव यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली आहे.जाधव हे दिवाळीच्या सणासाठी बाहेर गावी गेले असता चोरट्यांनी ८ तारखेला रात्री हि चोरी केली.यात चोरट्यांनी बंद घराचे कटावणी ने कोयंडे तोडून घरात प्रवेश करीत घरातील समसंग कंपनीचा टीव्ही ,सोन्याचे गंठन ,अंगठी ,कर्णफुले आणि चांदीच्या पैजण चोरून नेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी या दागिन्यांची बिले सोबत नेली आहेत.यावेळी जाधव यांनी सणासाठी आणलेला किराणा माल तसेच ड्रायफ्रुट सुधा चोरून नेला.यावेळी चोरट्यांनी घरात दिवाळीच्या फराळावर ताव मारला आणि अगदी निवांत चोरी करून पोबारा केला. जाधव गावावरून परत आल्यावर चोरीची माहिती मिळाली.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जात आहे .

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी नागरिकांना घाबरून न जाता  सावधानतेचा इशारा दिला असून घर बंद करून गावी जात असताना याची कल्पना शेजारील कुटुंबाना देण्याची माहिती दिली आहे.तसेच इमारती खाली सीसी टीव्ही बसविण्याच्या सूचना केली आहे.तसेच बंद घरात सोने चांदी तसेच रोख रक्कम ठेवू नये अशी सूचना दिल्या आहेत.  

भिगवण येथे तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून :पोलिसांनी तातडीने तपास करून एका संशयीताला घेतलं ताब्यात.

0

शाळा परिसरात खून झाल्यामुळे विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली

विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांची घटना स्थळी भेट

भिगवण वार्ताहर.दि.१५

भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील मदनवाडी येथील वनविभागाच्या जागेत तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांना गुन्ह्याची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देत तपास करीत यातील संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिडीयाला दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विजय काजळे वय ४४ रा.निरगुडे सध्या भिगवण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पुणे सोलापूर महामार्गाच्या पूर्व बाजूस मदनवाडी गावच्या हद्दीत हा खून झालेला आहे.भिगवण पोलिसांनी याची माहिती मिळताच तांत्रिक विश्लेषण आणि गतिशील तपास यंत्रणा राबवून यातील एक संशयित आरोपी ताब्यात घेतला आहे.तर आरोपीने खून केल्याचा प्राथमिक जबाबही दिला असल्याची माहिती मिळत आहे.संशयित आरोपी आणि मृत झालेले विजय काजळे हे एकमेकांना ओळखीचे असून रात्रीच्या वेळेस दोघे पार्टी करण्यासाठी वनविभागाच्या जागेत बसले होते.यावेळी कोणत्यातरी कारणावरून दोघात बाचाबाची झाली आणि यातूनच संशयित आरोपीने शेजारी असणारा मोठा दगड विजयच्या डोक्यात मारून जीव घेतला.तर यावेळी विजयच्या डोक्याच्या एका बाजूचा चेंदामेंदा करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत भिगवण पोलिसांत मृत विजय यांच्या पत्नी भाग्यश्री काजळे यांनी खबर दिली असून पोलिसांच्या माध्यमातून गुन्ह्याची नोंद केली जात आहे.दगडाने ठेचून खून झाल्यामुळे भिगवण येथील वातावरण ढवळून निघाले असून बारामती विभागीय अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड ,इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे ,वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डूनगे ,स्थानिक गुन्हा विभागाचे प्रकाश माने ,तसेच पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देवून तपासात मदत केली.सदर खून त्याठिकाणी असणार्या शाळे समोर झाला असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळते.

मदनवाडी येथील 21 वर्षीय नवतरुणाचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू.

0

भिगवण वार्ताहर.दि.५

मदनवाडी येथील शरयू शरद चितारे वय २१ या तरुणाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

इंदापूर आणि दौंड तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हनुमंत चितारे परिवारातील शरद चितारे यांचा शरयू हा एकुलता एक मुलगा होता.अत्यंत देखणी शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर सदा स्मितहास्य असणाऱ्या या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेल्या मृत्यूमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.शरयू हा त्याच्या मामाच्या गावी गेलेला असतानाच त्याला हा झटका आला.कोणताही वैदकीय उपचार मिळण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली .हृद्य विकाराने अतिशय कमी वयात दौंड तालुक्यातील खानावटे गावातील तरुणाचा मागील आठवड्यात तरुणाने आपला जीव गमावला तर आज मदनवाडी येथील शरयू चीतारे याला मृत्यूला सामोरे जावे लागले.शरयू च्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.तर अंत्यविधी दुपारी २ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.