Saturday, May 23, 2026
Home Blog Page 17

तक्रारवाडी सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटप ; सभासदांची दिवाळी होणार गोड

0

भिगवण वार्ताहर. दि.३१

तक्रारवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने शेतकरी सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करीत सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.संस्थेच्या ३६५ सभासदांना १० टक्के प्रमाणे जवळपास २ लाख २७ हजार रुपयाचे वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन

विकासराव वाघ यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या संस्थेचा वसूल १०० टक्के पर्यंत होता.मात्र मागील काही वर्षात शासनाच्या कर्ज माफीतील विसंवादामुळे काही शेतकरी कर्ज भरण्यात दिरंगाई करीत आहेत.असे असूनही संस्था नफ्यात आलेली आहे.संस्थेला स्वताची जागा नसली तरी ग्रामपंचायत तक्रारवाडी यांच्या इमारतीत कामकाज केले जाते.तर लवकरच संस्थेची सुसज्ज इमारत बांधण्याचा संकल्प सोसायटी सदस्यांनी घेतला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली .दिवाळी पूर्वी नफा वाटप केल्यामुळे सभासदांना याचा फायदा होणार आहे .या नफा वाटपाच्या कार्यक्रमाला चेअरमन विकास वाघ,व्हा.चेअरमन अमोल वाघ ,रामभाऊ जाधव ,माजी उपसरपंच प्रशांत वाघ , जेष्ठ मार्गदर्शक शामराव वाघ ,मा. सरपंच पोपटराव वाघ ,राजेंद्र आढाव ,दिगांबर वाघ ,अर्जुन जराड ,सचिन वाघ ,अनिल वाघ ,बलभीम आढाव ,मधुकर पिसाळ ,युवराज काळगे ,सचिव सिकंदर आतार ,सेवक शरद वाघ ,नंदकुमार मोरे उपस्थित होते.

डिकसळ येथे महिला किसानदिन साजरा : कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रम

0

भिगवण वार्ताहर.दि.२९

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत डिकसळ येथे महिला किसान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ग्रामीण भागातील महिलांना रब्बी हंगामाचे नियोजन करणे ,प्रधानमंत्री कृषी योजना बाबत माहिती देणे तसेच ई पिक पाहणी बद्दल माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामीण फळबाग लागवड योजना ,पाचट कुटी नियोजन विषयक मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला भिगवण मंडल कृषी पर्यवेक्षक संतोष सरडे ,गोपाळ खंडागळे ,कृषी सहायक पल्लवी काळे सर्व कृषी सहायक तसेच डिकसळ गावच्या महिला शेतकरी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते नारायण बंडगर यांची बिनविरोध निवड .

0

भिगवण वार्ताहर.दि.२९

पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदावर सामाजिक कार्यकर्ते नारायण माहादेव बंडगर याची निवड सर्वानुमते करण्यात आली.गावचे सरपंच लक्ष्मण पवार यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पोंधवडी गाव हे गेल्या काही दिवसात तक्रारीचा वाढता आलेख असणारे गाव म्हणून ओळख निर्माण करीत आहे.त्यातच राजकीय सत्ताबदलाच्या वाऱ्यामुळे गावातील वातवरण गरम राहत असल्याचे दिसून येत होते.तर गावातील तंटामुक्ती अध्यक्षाचे पद खाली असल्यामुळे पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींना पेव फुटले होते.त्यामुळे सत्ता बदल होताच सरपंचाच्या अध्यक्षतेखाली हि निवड बिनविरोध करण्यात आली.यावेळी मार्गदर्शक दतात्रय पवार ,उपसरपंच प्रतिनिधी प्रदीप बंडगर ,गणेश पवार ,ज्ञानदेव बंडगर ,संभाजी कोकरे ,तुळशीराम खारतोडे ,आण्णा बंडगर ,भागवत बंडगर ,दादा काशीद ,संजय भोसले पोलीस पाटील शामल पवार उपस्थित होते.निवडी नंतर मनोगत व्यक्त करताना नारायण बंडगर यांनी गावातील तंटे पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी सामंजस्याने मिटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

भिगवण पोलीसांची धाडसी कारवाई ; मदनवाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने आरोपी गजाआड

0

भिगवण वार्ताहर.दि.१९

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतीपंपाची तसेच मंदिरातील दानपेटीची चोरी करणारे दोन चोरटे मदन वाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने पकडण्यात भिगवण पोलिसांना यश आले.गेल्या बऱ्याच दिवसापासून शेती पंपाची चोरी होत असल्यामुळे या आरोपीकडून अनेक गुन्हे उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी दिलेल्या प्रेसनोट नुसार १७ तारखेच्या रात्री ८ वाजता डाळज आणि भादलवाडी तलावातील शेती पंपाच्या मोटारीतून तांबे चोरून नेल्याची तक्रार देण्यात आली होती.तक्रारीच्या आधारे पोलीस पथकाची नियुक्ती करीत तातडीने तपास केला असता पोलिसांना तसेच मदन वाडी ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर महामार्गावर एक संशयित आढळून आला. मात्र या आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ग्रामसुरकशा दलाच्या कार्यकर्त्यानी पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात देत झडती घेतली असता पोत्याच्या पिशवीत वजनदार वस्तू असल्याचे आढळून आले.पिशवी उघडून पाहिले असता मोटारीत वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या तारा आणि मंदिरातील दानपेटी आढळून आली. सदर दानपेटी हि पुणे सोलापूर मार्गावरील सकुंडे वस्ती वरील महादेव मंदिरातून चोरी झाल्याची तक्रार दाखल होती. तक्रार दाखल होताच तातडीने तपास केल्यामुळे तसेच ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीमुळे काही वेळातच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले.पकडलेल्या आरोपी राजेंद्र तुकाराम मोटे वय २४ रा.मेखळी असे आरोपीचे नाव असून त्याच्या सोबत विधी संघर्ष ग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी सदरचे आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून नातेपुते ,फलटण ,बारामती या भागात गुन्हे केल्याची माहिती देत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,विभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील ,पोलीस अंमलदार समीर करे ,विजय लोडी, अंतुल पठाण ,नाना वीर ,सचिन पवार ,महेश उगले ,अंकुश माने ,आण्णा भांडवलकर मदनवाडी ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते पोलीस मित्र अशोक सोळके रवी देवकाते यांनी केली
.

लामजेवाडी येथे दरोडा टाकीत जवळपास पावणेदोन लाखाची चोरी ; धारदार शस्त्राचा धाक दाखवीत तीन चोरट्यानी मारला डल्ला

0

भिगवण वार्ताहर.दि.१७

भिगवण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लामजेवाडी गावात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास दाराची कडे कोयंडे उचाकाटीत १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. हिंदी बोलणाऱ्या या चोरट्यांनी घरमालकाला कोयत्याचा धाक दाखवून हि चोरी केल्यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लामजेवाडी येथील विनायक प्रकाश शेलार यांच्या घरी हि चोरी झाली आहे. १६ तारखेच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी शेलार याच्या घराचे दरवाजे ढकलून आणि कडी कोयडे उचाकातून घरात प्रवेश केला यावेळी जागे झालेल्या शेलार आणि त्यांच्या पत्नीच्या तोंडावर बॅटरी चा फोकस मारीत कोयत्या सारखे धारदार शस्त्र दाखवीत ‘ लेटके रहो सो जावो हिलो मत हमको तकलीफ तो तुमको भी तकलीफ ’ असे दरडावून फिर्यादी आणि त्यांची पत्नी यांना बेड वर झोपण्यास सांगून त्यांच्या अंगावर ब्लॅनकेट टाकले .यावेळी घरात असणाऱ्या कपाटाचे दरवाजे उचकाटून यातील सोने चांदीचे दागिने ,१९००० रोख रक्कम  आणि मोबाईल असे जवळपास १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेला. जीविताला असणारा धोका आणि घरातील सदस्यांना त्रास होवू नये यासाठी फिर्यादी यांनी भीतीपोटी झोपून राहून चोरटे निघून गेल्यावर हा प्रकार इतरांना सांगितला.  

दसरा दिवाळीचा सन आणि उस तोडीचा हंगाम सुरु होताच चोरीच्या घटनात वाढ होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे गावागावात ग्राम सुरक्षादलाची निर्मिती करून चोरीला आळां घालण्याचे काम पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.तसेच पोलिसांच्या पेट्रोलिंग मघ्ये वाढ करण्यात आली असल्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी सांगितले.

शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम

0
?????????????????????????????????????????????????????????

भिगवण वार्ताहर .दि.१६

पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले.

पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या परस्परविरोधी तक्रारी मात्र आता हि ओळख पुसण्याचा प्रयत्न चांगल्या कामातून केला जात आहे.पोंधवडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावरून रस्सीखेच चालू होती आणि त्यात बाजी मारत किसन शंकर आटोळे यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब लक्ष्मण ननवरे यांची निवड करण्यात आली.अध्यक्षपदी निवड होताच आटोळे यांनी मानाचा मोठे पणा दाखवीत गेल्या अनेक दिवसापासून पडलेले प्रवेशद्वार स्वखर्चाने तयार करून बसवून दिले .या साठी त्यांना उपाध्यक्ष ननवरे यांनी मदतीचा हात दिला.या प्रवेशद्वाराचे उद्घाटन वेळी  जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर ,सरपंच लक्ष्मण पवार ,प्रदीप बंडगर ,गणेश पवार माजी सरपंच नानासाहेब बंडगर ,मदनवाडी सोसायटीचे चेअरमन विष्णुपंत देवकाते ,ग्रामपंचायत सदस्य डॉ.तुळशीराम खारतोडे ,भागवत बंडगर ,बाळासाहेब ननवरे ,शिक्षक आणि  विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी निवड होताच शाळेला मिळाले प्रवेशद्वार ; पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळेतील स्तुत्य उपक्रम

0

भिगवण वार्ताहर .दि.१६

पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले.

पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या परस्परविरोधी तक्रारी मात्र आता हि ओळख पुसण्याचा प्रयत्न चांगल्या कामातून केला जात आहे.पोंधवडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावरून रस्सीखेच चालू होती आणि त्यात बाजी मारत किसन शंकर आटोळे यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब लक्ष्मण ननवरे यांची निवड करण्यात आली.अध्यक्षपदी निवड होताच आटोळे यांनी मानाचा मोठे पणा दाखवीत गेल्या अनेक दिवसापासून पडलेले प्रवेशद्वार स्वखर्चाने तयार करून बसवून दिले .या साठी त्यांना उपाध्यक्ष ननवरे यांनी मदतीचा हात दिला.या प्रवेशद्वाराचे उद्घाटन वेळी  जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर ,सरपंच लक्ष्मण पवार ,माजी सरपंच नानासाहेब बंडगर ,मदनवाडी सोसायटीचे चेअरमन विष्णुपंत देवकाते ,ग्रामपंचायत सदस्य डॉ.तुळशीराम खारतोडे ,भागवत बंडगर ,बाळासाहेब ननवरे ,शिक्षक आणि  विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

भिगवण राशीन रोडवर दुचाकीच्या अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू

0

भिगवण वार्ताहर.दि.१४

भिगवण राशीन रोडवर रात्रीच्या सुमारास पायी  चालणाऱ्या इसमाला दुचाकीने धडक दिल्याने यात सदर इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार १० तारखेला रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला .हा  अपघात करणारा अनोळखी दुचाकीस्वार अपघात ग्रस्ताला मदत न करता घटना स्थळावरून पसार झाला .सदर अपघातास जबाबदार असणाऱ्या दुचाकी स्वराची तसेच जीव गमावलेल्या अनोळखी माणसाची ओळख पटविण्याचे काम भिगवण पोलीस करीत आहेत.सदर मयताच्या अंगावर निळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची साधी पँन्ट आहे.सदर मयताचे डोक्यावरील केस पांढऱ्या रंगाचे असून याचे अंदाजे वय ४० असण्याची शक्यता आहे.सदर मयत इसम तसेच अपघात करणारा दुचाकी स्वार यांच्याबाबतची कोणतीही माहिती असल्यास भिगवण पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  भिगवण पोलीस ठाण्याच्या ०२११८२४६२३३ या फोनवर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.

डिकसळ गावात आता घरपोच सातबारा ; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिम्मित उपक्रम

0

डिकसळ प्रतिनिधी ( विजयकुमार गायकवाड)

दि.२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत डिजिटल ७/१२ देण्याची विशेष मोहीम शासनाने सुरू केली आहे .या योजनेचा शुभारंभ आज डिकसळ ता. इंदापुर येथे 2 ऑक्टोबर गांधी जयंती च्या निमित्ताने आयोजन करण्यात आले .
यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच मोफत डिजिटल सातबारा वाटप करण्यात आले .
या मोहिमे अंतर्गत २१ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.यामध्ये ज्येष्ठ शेतकऱ्यांचा विशेष सहभाग जाणवला .
शासनाच्या या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले . या योजनेतून सातबारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयाची उंबरडे झिजवण्याची वेळ येणार नसुन वेळेची फार मोठी बचत होणार असल्याचे शेतकऱ्यांनी बोलुन दाखवले.
यावेळी डिकसळ सरपंच सुर्यकांत सवाने, सर्कल भाऊसाहेब डी.एस. कोकरे, गाव कामगार तलाठी आर.पी.देवरे, पोलीस पाटील संदीप पवार, ग्रामसेवक डी.बी. परदेशी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर काळे आदी.पदाधिकाऱ्यांची हस्ते प्राथमिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल सातबारे देण्यात आले.
यावेळी सरपंच सुर्यकांत सवाने,डिकसळ सोसायटी चेअरमन रावसाहेब गवळी ,मा.सरपंच ज्ञानदेव पवार, प्रभाकर गायकवाड ,प्रताप गवळी सोसायटी संचालक संजय काळे, सतीश काळे युवा शेतकरी सुनील काळे, कैलास कुंभार, बापु भोंग नवनाथ पवार, निलेश काळे ,ग्रामपंचायत कर्मचारी अमोल भोंग, कोतवाल शिवाजी शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते .

भिगवण परिसरात समाधान कारक पाऊस ; लवकरच गाठणार सरासरी

0

भिगवण वार्ताहर .दि.२

भिगवण परिसरात अनेक दिवसापासून केली जाणारी पावसाची  प्रतीक्षा काही प्रमाणात पूर्ण झाली असल्याचे शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे दिसून आले.जवळपास दोन तास पडणाऱ्या पावसाने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून आले. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या पावसाची ६६ मिलीमीटर नोंद झाल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देविदास फलफले यांनी दिली.

राज्यात अनेक ठिकाणी थैमान घालीत पूर आणणाऱ्या वरुण राजाने भिगवण आणि परिसरावर मात्र तिरकी नजर केल्याचे वाटत होते. धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरण भरण्याच्या दिशेने वाटचाल करीत असले तरी भिगवण आणि परिसरात मात्र सरासरीच्या आकड्याला गाठताना अनेक दिवसांची वाट बळीराजाला पाहावी लागली होती.मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे परत आशा पल्लवित झाल्या असून आजून दोन चार पावसामुळे सरासरी ओलांडली जाण्याच्या मार्ग मोकळा झालेला आहे . काल रात्री जवळपास २ तास पडणाऱ्या पावसाची ६६ मिलीमीटर नोंद करण्यात आली. भिगवण परिसरात सरासरी  ४२० मिलीमीटर पावसाची नोंद आहे.तर चालू मोसमात आजपर्यंत ४१२.१०० मिलीमीटर नोंद घेण्यात आली आहे. गेल्या वर्षातील झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सर्व सरासरीला पाठीमागे टाकीत ९७५ इतक्या विक्रमाची नोंद केली आहे.तर २००२ ,२०१२ आणि २०१६ साली २०० मिलीमीटर इतका कमी पावसाच्या आठवणी बळीराजाला सतावित आहेत.त्यामुळे राहिलेल्या मोसमात पाऊस कोणता विक्रम करतो याच्याकडे बळीराजा आणि व्यापारी वर्ग डोळा लावून बसला असल्याचे चित्र आहे.