तक्रारवाडी येथील नवसाला पावणाऱ्या पिरसाहेबांचा उरूस सोमवारी पासून ; ग्रामपंचायत प्रशासनची जय्यत तयारी
भिगवण वार्ताहर .दि.११
तक्रारवाडी येथील हिंदू मुस्लीम एकात्मतेच प्रतिक असणाऱ्या राजबाग सवार पीरसाहेब उरसाला सोमवार पासून सुरवात होत असून मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस उरूस चालणार आहे अशी माहिती तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांनी दिली.नवसाला पावणारा पीर अशी याची ख्याती असल्याने पुणे मुंबई पासून राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उरसात उपस्थित राहतात.
साईंनाथ शिक्षण संस्थेच्या आदर्श शाळेचे रौप्य महोत्सवात पदार्पण ;राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोहळा
भिगवण वार्ताहर .दि .२७शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनांमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होते.असे मनोगत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले .भिगवण येथील आदर्श शाळेतील रौप्य महोत्सव कार्यक्रम वेळी भरणे बोलत होते .
डॉ खानावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने पंचवीस वर्षापुर्वी प्रतिकुल परिस्थितींमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करुन या भागातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली...
भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित
भिगवण वार्ताहर.दि.३
भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. भिगवणकर नागरिकांनी पवार यांना मिळालेल्या मानाच्या पुरस्काराबद्दल कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला .
अकोले पोटनिवडणूकीसाठी ८७ टक्के मतदान ;दोन गटाची प्रतिष्ठा पणाला
सत्यवार्ता अकोले पत्रकार विजय गायकवाड-
इंदापूर तालुक्यात ८ पैकी ७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीच्या जागा बिनविरोध होऊन केवळ एकमेव निवडणूक लागलेल्या अकोले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज ८७ टक्के मतदान झाले.पोटनिवडणूकीच्या झालेल्या मतदानातून उद्या उमेदवारांचे निकालातून भवितव्य ठरणार आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणातुन एकमेकांची प्रतिष्ठा पणाला...
बारामती भिगवण रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू ; अपघातात अक्षरशा देहाचा चेंदामेंदा
भिगवण वार्ताहर .दि .२०
बारामती भिगवण रस्त्यावर शेटफळगढे गावच्या हद्दीत शेतमालाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीखाली सापडून सुरक्षा रक्षकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार संतोष मारुती शिंदे वय ४७ रा.सणसर असे अपघातात मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.बारामती भिगवण रस्त्यावर शेटफळगढे अग्रो कारखान्याच्या उस वाहतूक करणाऱ्या...
सामाजिक प्रबोधन करण्यासाठी कीर्तन कारांची गरज असल्याचे ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मत
सत्यवार्ता अकोले वार्ताहर ….विजय गायकवाडवारकरी संप्रदाय हा कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून समाजाची सेवा करीत असतात.अशी सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी समाजात कीर्तनकार तयार होण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
धायगुडेवाडी(अकोले ) येथील वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शैक्षणिक संस्थेच्या उदघाटन ते प्रसंगी बोलत होते. धायगुडे वाडी येथे प्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवी धायगुडे यांनी...
अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई तात्काळ देणार ; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
सत्यवार्ता बातमी : अवकाळी पावसामुळे राज्यात पशुधनाची फार मोठे नुकसान झाले आहे .राज्यामध्ये १ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत .बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली राज्यभरात याचा फटका बसला असून पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे २००० जनावरांची...
अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता
सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाडअकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गावातील प्रभाग दोन मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत पाच जणांनी शक्ती प्रदर्शन करीत इंदापूर येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दीपक कोकरे व सहाय्यक निवडणूक अधिकरी शिवाजी खोसे यांच्याकडे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महेश देवकातेपाटील यांना मातृशोक
भिगवण वार्ताहर.दि.२
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अॅड. महेश मारुतराव देवकातेपाटील यांच्या मातोश्री कै.सौ सुप्रिया मारुतराव देवकाते यांचे वयाच्या ६५ वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.अतिशय प्रेमळ स्वभावाच्या सुप्रिया काकुच्या निधनामुळे भिगवण आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
बारामती आणि इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि आपल्या बाणेदारवाणीने गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला कायद्याच्या प्रकरणी...
अकोले पोटनिवडणुक इच्छुकांच्या गर्दी मुळे होणार चुरशीची
सत्यवार्ता प्रतिनिधी : विजय गायकवाड (अकोले )
अकोले वार्ताहर दि .२७
अकोले गावच्या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होत आहे .गावातील अंतर्गत गटबाजीचा फायदा उचलून निवडुन येण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ही निवडनुक चुरशीच्या वातावरणात पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
अकोले गावचे दिवंगत...




























