Sunday, July 6, 2025

बारामती भिगवण रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू ; अपघातात अक्षरशा देहाचा चेंदामेंदा

भिगवण वार्ताहर .दि .२० बारामती भिगवण रस्त्यावर शेटफळगढे गावच्या हद्दीत शेतमालाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीखाली सापडून सुरक्षा रक्षकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार संतोष मारुती शिंदे वय ४७ रा.सणसर असे अपघातात मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.बारामती भिगवण रस्त्यावर शेटफळगढे अग्रो कारखान्याच्या उस वाहतूक करणाऱ्या...

सामाजिक प्रबोधन करण्यासाठी कीर्तन कारांची गरज असल्याचे ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मत

सत्यवार्ता अकोले वार्ताहर ….विजय गायकवाडवारकरी संप्रदाय हा कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून समाजाची सेवा करीत असतात.अशी सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी समाजात कीर्तनकार तयार होण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. धायगुडेवाडी(अकोले ) येथील वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शैक्षणिक संस्थेच्या उदघाटन ते प्रसंगी बोलत होते. धायगुडे वाडी येथे प्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवी धायगुडे यांनी...

अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई तात्काळ देणार ; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सत्यवार्ता बातमी : अवकाळी पावसामुळे राज्यात पशुधनाची फार मोठे नुकसान झाले आहे .राज्यामध्ये १ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत .बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली राज्यभरात याचा फटका बसला असून पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे २००० जनावरांची...

अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता

सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाडअकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावातील प्रभाग दोन मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत पाच जणांनी शक्ती प्रदर्शन करीत इंदापूर येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दीपक कोकरे व सहाय्यक निवडणूक अधिकरी शिवाजी खोसे यांच्याकडे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महेश देवकातेपाटील यांना मातृशोक

भिगवण वार्ताहर.दि.२ राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अॅड. महेश मारुतराव देवकातेपाटील यांच्या मातोश्री कै.सौ सुप्रिया मारुतराव देवकाते यांचे वयाच्या ६५ वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.अतिशय प्रेमळ स्वभावाच्या सुप्रिया काकुच्या निधनामुळे भिगवण आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि आपल्या बाणेदारवाणीने गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला कायद्याच्या प्रकरणी...

अकोले पोटनिवडणुक इच्छुकांच्या गर्दी मुळे होणार चुरशीची

सत्यवार्ता प्रतिनिधी : विजय गायकवाड (अकोले ) अकोले वार्ताहर दि .२७ अकोले गावच्या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होत आहे .गावातील अंतर्गत गटबाजीचा फायदा उचलून निवडुन येण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ही निवडनुक चुरशीच्या वातावरणात पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे . अकोले गावचे दिवंगत...

रोटरीच्या मदतीतून विरवाडी गावच्या दिव्यांग तरुणाला व्हीलचेअर ; भिगवण रोटरीचा स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि . २७रोटरी क्लब ऑफ भिगवन तसेच रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्ष संजय खाडे तसेच इतर रोटरीचे सदस्य उपस्थित होते . भिगवण विरवाडी येथील जाधव यास दिव्यांग असलेल्या कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करावा...

भादलवाडी गावात काळभैरवनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा

सत्यवार्ता प्रतिनिधी : शैलेश परकाळे (भादलवाडी ) भादलवाडी गावात सालाबाद प्रमाणे साजरी करण्यात येत असलेली काळ भैरवनाथ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . गावातील ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी यावेळी उत्सवात सहभाग घेत देवाची मनोभावे पूजा केली . गेल्या २ वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता .मात्र...

रेल्वे खाली उडी घेत दिला तरुण व्यावसायिकाने दिला जीव ; भिगवण येथील धक्कादायक बातमी

भिगवण वार्ताहर.दि.२७ भिगवण व्यापारी पेठेतील तरुण व्यावसायिकाने रेल्वेखाली उडी घेत जीव दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली.घरगुती वाद कि पैशाचे तणाव याचे कारण समजू शकले नाही मात्र या घटनेमुळे व्यापारी वर्गात दुखाचे सावट पसरले असल्याचे दिसून आले. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार सुनील पांडुरंग कुचेकर वय २२ असे तरुण व्यावसायिकाचे नाव आहे.सुनील...

पुणे सोलापूर महामार्ग अपघातात कर्मयोगी संचालकाच्या मुलाचा मृत्यू ; ट्रॉलीचा टायर बदलताना झाला दुर्दैवी अपघात

भिगवण वार्ताहर.दि.१९ पुणे सोलापूर महामार्गावरील गागरगावच्या हद्दीत उस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे टायर बदलत असताना खासगी प्रवाशी बसने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात आदित्य विश्वास देवकाते या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.तर या अपघातात कर्मयोगी साखर कारखान्याचे नूतन संचालक विश्वास देवकाते गंभीर जखमी झाले आहेत. कर्मयोगी साखर कारखान्याचा ऊस वाहतून करत असताना सदर...