Friday, July 4, 2025

भिगवण पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकपदी विनोद महांगडे तर बारामती वाहतूक विभागाच्या निरीक्षकपदी सिंघम पोलीस अधिकारी चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती

भिगवण वार्ताहर .दि. 16 भिगवण पोलीस स्टेशनचे महिना भरापूर्वी आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी स पो नी विनोद महांगडे यांनी चार्ज घेतल्याची माहिती मिळत आहे.तर भिगवण येथे सिंघम अधिकारी म्हणून नाव असणाऱ्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बारामती वाहतूक विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे. लोक सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला...

भिगवण येथे रथसप्तमी निमित्ताने प्रवासी दिन साजरा ; ग्राहक पंचायत महा.राज्य ,भिगवण पोलीस ठाणे आणी बारामती परिवहन विभागाचा आगळा वेगळा उपक्रम.

भिगवण वार्ताहर .दि.१६ जगाचा अधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमीचे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,भिगवण पोलीस ठाणे ,परिवहन विभाग बारामती तसेच इंदापूर राज्यपरिवहन आगाराच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे तिळगुळ आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला. देशातील नागरिकांनी...

भिगवण गावचे माजी सरपंच शंकरराव (आण्णा ) गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन

भिगवण वार्ताहर .दि.5 भिगवण गावचे माजी सरपंच आणी राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते शंकरराव गायकवाड वय 66 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भिगवण आणी परिसरावर शोककळा पसरली आहे. शंकरराव गायकवाड भिगवण आणी परिसरात आण्णा या नावाने प्रसिद्ध होते. शंकरराव आण्णा यांनी इंदापूर कृषी उत्पन बाजार समिती वर सदस्यपद भूषविले आहे....

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची दौंड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती तर भिगवण सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी संदेश बावकर.

भिगवण वार्ताहर.दि.१ भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सिंघम पोलीस अधिकारी अशी छाप पाडीत महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी वेळ प्रसंगी वज्रापेक्षा कठोर भूमिका बजाविणाऱ्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची दौंड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.तर भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून संदेश बावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

निंबोडी येथे 50 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन ; नवनिर्वाचित सरपंच संतोष सोनवणे यांचा विकासाचा चौकार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामे . बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन . भिगवण वार्ताहर .दि. 9बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे गुरुवारी (ता:०४) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष...

सिद्धेश्वर निंबोडी येथे आरोग्य शिबिरातून 221 रुग्णांची तपासणी ; नूतन सरपंच संतोष सोनवणे यांची माहिती

शासनाच्या योजनेतील गोल्डन कार्ड आणी आभा कार्ड साठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणार मदत ; राजकीय जोडे बाजूला ठेवत गावातील नागरिकांसाठी विकास कामांना प्राधान्य देण्याचा सरपंच संतोष सोनवणे यांचा संकल्प भिगवण वार्ताहर.दि.२३ सिद्धेश्वर निंबोडी ता.बारामती येथे १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा २२१ नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती नवनियुक्त...

रोटरी क्लब ऑफ भिगवण च्या माध्यमातून विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मूठभर धान्य जमा करीत वाटला आभाळाएवढा आनंद

एक् मुठ धान्य गरजावंतासाठी जमवून चिमुकल्या नी घेतला दातृत्वाचा वसा सत्यवार्ता वार्ताहर : दि. 23 विद्या प्रतिष्टानच्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीअम स्कूल, चिंचोली येथील रोटरी इंटरॅक्ट क्लब आयोजित 'एक मूठ धान्य' या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजातील संवेदनशीलता अजूनही टिकून आहे व ती दिवसेंदिवस...

चिमुकलीला उराशी कवटाळून विहिरीत उडी घेत विवाहितेने दिला जीव ; इंदापूर तालुक्यातील पोंधवडी पवार वस्ती येथील जीव पिळवटून टाकणारी घटना

भिगवण सत्यवार्ता प्रतिनिधी : दि.३ भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील पोंधवडी पवारवस्ती येथील विहिरीत चिमुकलीसह उडी घेत विवाहितेने जीव दिल्याची हृदयाला पिळवटून टाकणारी घटना घडली.याबाबत भिगवण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आईचा मृतदेह सापडल्या नंतर १० तासांनी चिमुकलीचा मृतदेह शोधण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोट नुसार धनश्री...

पत्रकारिता सामाजिक बांधिलकी की व्यवसाय ? ; संविधान दिना निम्मित सत्यवार्ता लेख

भिगवण वार्ताहर.दि.26 संविधान दिना निम्मित सत्यवार्ता लेख !! पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी कि व्यावसायिकता ? असा सवाल गेली अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उठत आहेत.मात्र याचे उत्तर ना सरकारी यंत्रणेकडे आहे ना कायदे बनविणाऱ्या संसदेकडे त्यामुळे सामाजिक पत्रकारिता हा विषय नुसता नावापुरताच शिल्लक राहिलाय अशी आजची अवस्था...

देवदर्शनावरुन घरी निघालेल्या भाविकाचा अज्ञात वाहणाने चिरडल्यामुळे जागीच मृत्यू ; पुणे सोलापूर महामार्गांवरील डाळज चौकी समोरील घटना

भिगवण वार्ताहर.दि.24 पुणे सोलापूर महामार्गांवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून काल एसटी ने ट्रेकटरने धडक दिल्याने दोघांचा जीव गेला तर आज संध्याकाळी 7 वाजता महामार्ग पोलीस चौकी समोर अज्ञात वाहनाने चिरडल्याने देव देवदर्शन करून घरी निघालेल्या भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.याबाबत प्राथमिक मिळालेल्या नुसार अपघातात मुरलीधर बेंडाधूम रा.जांभुळपाडा जि. नाशिक यांचा...