Monday, April 6, 2026

जिल्हा परिषद तक्रारवाडी शाळेच्या वर्गखोलीचे अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ; जिल्हा नियोजन समिती माध्यमातून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला विकास निधी

भिगवण वार्ताहर.दि.२५ तक्रारवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन भगवानराव भरणे प्रतिष्टानच्या कार्याध्यक्षा अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ,मदनवाडी गावच्या सरपंच अश्विनी बंडगर ,भिगवण गावच्या आदर्श सरपंच हेमाताई माडगे ,इंदापूर बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते ,प्रशांत शेलार ,प्रदीप वाकसे ,अजिंक्य माडगे ,प्रमोद नरुटे राजाभाऊ देवकाते ,बापूराव थोरात तसेच तक्रारवाडी...

भिगवण ग्रामीण रुग्णालय येथील शिबिरात 233 रुग्णांची कर्करोग तपासणी ; 8 संशयित रुग्णांना पुढील तपासणी साठी रेफर

भिगवण वार्ताहर.दि.१७ भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे कर्करोग तपासणी व्हॅन मार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी दिली .यावेळी शिबिरात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सचिन विभूते ,डॉ.अनिकेत लोखंडे ,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अमोल खानावरे ,डॉ.सूर्या दिवेकर ,दंतरोग तज्ञ डॉ.घोगरे ,डॉ.मृदुला जगताप ,डॉ.कीर्ती व्यवहारे ,समुदाय आरोग्य अधिकारी रेणुका...

भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा पवार यांची निवड ; कुंची कोरवी समाजातील महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मिळाला मान.

भिगवण वार्ताहर .दि.१४ भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा गंगाराम पवार यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक कोकरे यांनी दिली.गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी गुराप्पा गंगाराम पवार यांना १२ मते मिळाली तर श्रीमती निर्मला हरिचंद्र पांढरे यांना ५ मते मिळाली.या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक कोकरे तसेच तलाठी राहुल देवकर आणि ग्रामपंचायत अधिकारी...

दोन निष्पाप लेकरांचा आईनेच गळा घोटून घेतला जीव ; भिगवण शेजारील स्वामीचिंचोली येथील घटना

भिगवण वार्ताहर. दि. 8 आपल्याच उदरी जन्म घेतलेल्या दोन निष्पाप मुलांचा गळा दाबून जीव घेतल्यावर नवऱ्यावर धारदार शस्त्राने वार गंभीर जखमी केल्याची घटना दौड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात घडली. गंभीर जखमी नवऱ्यावर बारामती येथे उपचार. संशयित आरोपी महिलेला दौड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती समोर...

ग्राहक पंचायत विभागाकडून रथसप्तमी निम्मित प्रवासी दिन साजरा ; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष तुषार झेंडेपाटील यांचे आवाहन.

भिगवण वार्ताहर .दि.४ जगाचा आधीप्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथ सप्तमी चे निम्मित साधीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ,आरटीओ कार्यालय बारामती आणि भिगवण पोलीस ठाणे तसेच इंदापूर एसटी डेपो यांच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला. समाजातील नागरिकांनी खासगी...

रंगीबेरंगी जरबेरा म्हणून नागझरी गवताची भिगवण बाजारपेठेत विक्री ;पोलिसांना माहिती मिळताच टोळीने केला पोबारा

समुद्र किनारी उगावणारे नागझरी गवताची बेटे जरबेरा म्हणून घेऊन फ़सू नये महाराष्ट्र ऍग्रो एजन्सी चे संचालक किरण नगरे यांची माहिती.. भिगवण वार्ताहर.दि.२ ‘ शिकलेली आणि हुशार मानस फसतात मात्र फसवणूक करणारा पट्टीतला पाहिजे ’ अस नेहमीच बोलल जात आणि त्याचा प्रत्यय रविवारीच्या बाजार दिवशी भिगवणकरांनी घेतला . समुद्र किनार्यावर उगवणारे गवत...

तक्रारवाडी गावच्या ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीची ग्रामस्थांची मागणी ; शासकीय योजनाची माहिती न देणे आणि कार्यालयीन वेळेत हजर नसणे याबाबत बदलीची मागणी.

भिगवण वार्ताहर.दि.२७ तक्रारवाडी गावच्या ग्रामसेविका यांची बदली करून याठिकाणी नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ , गटविकास अधिकारी इंदापूर तहशिलदार इंदापूर तसेच जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे यांच्याकडे लेखी निवेदन देणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. याबाबत बोलताना नागरिकांनी तक्रारवाडी ग्रामपंचायत सेविका अर्थात ग्रामविकास अधिकारी या...

तक्रारवाडी गावातील अतिक्रमनाचा मुद्दा पेटला ; अतिक्रमण हटविण्याच्या मागणी साठी पीपल रिपब्लिकन पार्टीचा रास्ता रोकोचा इशारा

भिगवण वार्ताहर. दि. 19 तक्रारवाडी गावातील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असून रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमण 7 दिवसाच्या आत हटविण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम खात्याने अतिक्रमण करणारया नागरिकांना दिली आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता चवरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत नोटीस वितरित केल्या आहेत. तर पीपल रिपब्लिकन पार्टीचे सचिन आढाव तसेच माहिती अधिकार व पत्रकार...

स्कुलबस खाली चिरडून लहानग्याचा मृत्यू ;इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील घटना

भिगवण वार्ताहर.दि.१४ शाळकरी मुलांना शाळेतून घरी सोडत असताना दीड वर्षाच्या चिमुरड्याला स्कूलबस खाली चिरडल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे घडली.भोगी सणाच्या दिवशीच चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे . याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार या अपघातात स्वराज महेश...

बंद घराचे दार तोडून 2 लाखाची चोरी 8 ; भिगवण परिसरातील अपार्टमेंट चोरांच्या निशाणावर

भिगवण वार्ताहर.दि.११ भिगवण परिसरात चोरट्यांनी डोके वर काढण्यास सुरवात केली असून दोन दिवसापूर्वी बारामती राशीन रोड शेजारील अरुण लोखंडे यांच्या घरी रात्रीच्या वेळी घरफोडी करीत २ लाखांच्या आसपास सोने चांदी आणि इतर ऐवज चोरून पोबारा केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिगवण हद्दीतील अरुण लोखंडे यांच्या इमारतीत राहणाऱ्या शाम जाधव यांच्या घरी...