भिगवण पोलीस आवारातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव ; इच्छुक खरेदीदारांना सहभाग नोंदविण्याचे सपोनि विनोद महांगडे यांचे आवाहन.
भिगवण वार्ताहर. दि.. 12
भिगवण पोलीस स्टेशन यांनी विविध कारवाईत तसेच संशयित गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन अनेक वेळा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात आले होते. याबाबत अनेक वेळा प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया तुन आवाहन करण्यात आले होते.या आवाहना नंतर अनेक...
भिगवण ग्रामपंचायत प्रशासनाकडून अपंग कल्याण निधीचे होणार वाटप ; अपंग (दिव्यांग )लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरपंच गुराप्पा पवार यांचे आवाहन.
भिगवण वार्ताहर. दि. 15भिगवण गावातील अपंग (दिव्यांग )नागरिकांचा निधी देण्याच्या कार्यवाहीला सुरवात केली असून लाभार्थी अपंग नागरिकांनी ग्रामपंचायत विभागाकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन सरपंच गुराप्पा पवार तसेंच उपसरपंच सत्यवान भोसले यांनी केले. तर ग्रामपंचायत सर्व लाभार्थी यांना निधी दिला जाणार असल्याची माहिती ही यावेळी सरपंच पवार यांनी दिली.पंचायत राज संस्था च्या उत्पनाच्या 5 टक्के निधी अपंग( दिव्यांग...
पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी ब्रिज वरून कंटेनर खाली कोसळला. चालकाचा अपघातात मृत्यू.
भिगवण वार्ताहर. दि. 15पुणे सोलापूर महामार्गांवर मदनवाडी ब्रिज वरून सर्व्हिस रोड वर कंटेनर कोसळल्याने झालेल्या भीतीदायक अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या कंटेनर खाली इतर वाहने आणि नागरिक न आल्याने मोठी जीवितहानी टळली. या भयानक अपघाताने तरी भिगवण कर नागरिक जे महामार्गांवर अतिक्रमण करून व्यवसाय करतात आणि अनधिकृत...
भिगवण मध्ये होळी आणि धुलवड सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी
भिगवण वार्ताहर. दि. 14
भिगवण शहरामध्ये होळी आणि धुलवड सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली असून सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिगवणची बाजारपेठे आसपासच्या 15 गावे आणि 40 च्यावर असणाऱ्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना रोज लागणाऱ्या वस्तू आणि सेवाचे ठरलेलं ठिकाण. त्यातच भिगवण साठी सर्व गाव आणि वाड्या वास्त्यावरून...
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचा 20 लक्ष रुपयाचा निधी ; भिगवण वैकुंठ भूमीत होणार निवाऱ्याची सोय
भिगवण वार्ताहर.दि.११
भिगवण येथील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेडचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे शुभहस्ते सरपंच गुराप्पा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले .कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे यांनी सांगितले.
भिगवण वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी शेडची व्यवस्था...
तक्रारवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ; जागतिक महिला दिनी स्तुत्य उपक्रम.
भिगवण वार्ताहर.दि.८
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तक्रारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करीत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. ग्रामपंचायत तक्रारवाडी गावच्या सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेविका ,आरोग्य उपकेंद्र अधिकारी ,वायरमन ,आरोग्य सेविका ,अंगणवाडी सेविका ,स्वस्त धान्य दुकानदार ,जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख, महिला शिक्षिका, ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी या सर्वच पदावर महिला काम...
भिगवण गावच्या हिंदू खाटीक समाजासाठी स्वखर्चाने बोअर ; बाजार समिती माजी उपसभापती पराग जाधव यांचे कौतुकास्पद कार्य
भिगवण वार्ताहर .दि. ७
भिगवण गावातील हिंदू खाटिक समाजाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करून बोअर मारून २४ तास पाणी उपलब्ध करण्याचे काम भिगवण गावच्या पराग जाधव यांनी केले.त्यांच्या या कामाचे कौतुक खाटिक समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खडके यांनी ‘ गावचा नेता असावा तर असा ’ उल्लेख करीत समाजाच्या वतीने सत्कार केला.
भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी ;ऍग्रो कारखाना परिसरातून चोरीला गेलेला ट्रॅक्टर संशयित चोरट्यासह ताब्यात.
भिगवण वार्ताहर.दि.३
भिगवण पोलिसांनी दमदार कामगिरी करत उस वाहतूक करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याचा बारामती अग्रो कारखाना शेटफळ परिसरातून चोरी झालेला ट्रॅकटर हस्तगत करीत चोराच्याही मुसक्या आवळल्या .१०० ठिकाणाचे सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय गोपनीय बातमीदाराच्या मदतीने केलेल्या कामगिरी मुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील चोरटा...
तक्रारवाडी बौध्द विहारासाठी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय चा 20 लाखाचा निधी ; सरपंच मनीषा वाघ यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
भिगवण वार्ताहर.दि.३
तक्रारवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहाराचे बांधकाम आणि सुशोभीकरण विकास कामाचे भूमिपूजन गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन आढाव यांनी दिली.
इंदापूर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे...




























