मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन
भिगवण वार्ता.दि.२
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे.आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपन प्रयत्न शील असल्याची ग्वाही देताना राज्यमंत्री भरणे
यावेळी समाजाचे निवेदन...
भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा
भिगवण वार्ता .दि.३०भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा करण्यात आला.अगदीसर्वसामान्य नागरीका पासून ज्यांचे सारथ्य म्हणून काम केले अशा वरिष्ठ अधिकार्याने सलामी देत हा सेंड ऑफ चा कार्यक्रम पार पडल्याने पोलिसांत सुद्धा माणुसकी खचून भरलेली असल्याची जाण दिसून आली.
सहायक पोलिस निरीक्षक जीवन...
धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत
भिगवण वार्ता ...२८
भिगवण येथे झालेल्या धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत झाले. यावेळी झालेल्या धनगर आरक्षण एल्गार सभेत संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.
या सभेची सांगता राज्यमंत्री मंडळाची यादी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रमाने दिलेल्या २२ सवलतींचा अध्यादेश...
धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सरकारची भूमिका-आ. दत्तात्रय भरणे
भिगवण वार्ताहर.दि.२७धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची भूमिका सरकारची असून या दोन्ही समाजाला न्याय मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी भिगवण येथे बोलताना सांगितले.
तसेच भटक्या मेंढपाळांना स्वताच्या रक्षणासाठी शस्त्र परवाना मिळाला पाहिजे अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली असल्याचे यावेळी सांगितले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुणे...
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित – हनुमंत बंडगर, जिल्हा परिषद सदस्य
भिगवण वार्ता ….२५
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिली .
भिगवण आणि परिसरात वाढत असलेल्या कोरोनाच्या थैमाना मुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच अति गंभीर रुग्णाला उपचारासाठी बारामती अथवा पुणे येथे पाठविणे रुग्णवाहिका विना जिकिरीचं...
भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना अल्पदरात वाफेचे मशीन
भिगवण वार्ता.२५भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने ९०० च्यावर नागरिकांना अल्पदरात वाफेचे मशीन देण्यात आली.वाफेच्या मशीनची अजूनही नागरिकांनी मागणी केल्यास ती ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतोष धवडे यांनी दिली.
भिगवण आणि परिसरात कोरोना आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत.भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे.तर अनेकवेळा फवारणी करण्यात...
भिगवण पोलीस कारवाईत जप्त केलेला वाळू साठयाचा ताबा पोलीस पाटील धुमाळ यांच्याकडे
भिगवण वार्ता.दि.२४भिगवण पोलिसांनी चोरट्या वाळू उपशावरील कारवाईत जप्त केलेल्या वाळू साठा सांभाळण्याची जबाबदारी महसूल विभागाने तक्रारवाडी गावच्या पोलीस पाटील यांच्यावर टाकल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे.
कोरोनाच्या कामामुळे आधीच त्रासून गेलेल्या पोलीस पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून “ घरचे झाले थोड आणि व्याह्याने धाडले घोडे ”असे म्हणायची वेळ आल्याचे दिसून येत आहे..
उजनी धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
भिगवण वार्ताहर.दि.23
पुणे परिसरातील धरण क्षेत्रात आणि सर्वदुरच मुसळधार पाऊस पडल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरल्याने उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
दौंड तालुक्याच्या पुर्व भागातील खानवटे , राजेगाव, नायगाव, वाटलूज , मलठण , हिंगणी बेर्डी, शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे...
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर
भिगवण वार्ताहर.दि.१०
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर
भिगवण बारामती हा नेहमीच जादा वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा राज्यमार्ग . मात्र भिगवण ते शेटफळगढे दरम्यान च्या परिसरामध्ये मदनवाडी ओढ्यावरती असणारा जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पुल आणि मदनवाडी घाटातील झेड आकाराचा वळणरस्ता अपघात प्रणव...
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १ येथे सर्वेक्षण
डाळज वार्ता .१७
"माझे कुटुंब माझी जबाबदारी" अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १ येथे सर्वेक्षण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी सर्वेक्षणात सहभाग घेत स्वतः नागरिकांची तपासणी केली आणि लक्षण असणाऱ्या नागरिकांनी रॅपीड ॲंटिजन टेस्टसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
...