उजनी धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
भिगवण वार्ताहर.दि.23
पुणे परिसरातील धरण क्षेत्रात आणि सर्वदुरच मुसळधार पाऊस पडल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरल्याने उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
दौंड तालुक्याच्या पुर्व भागातील खानवटे , राजेगाव, नायगाव, वाटलूज , मलठण , हिंगणी बेर्डी, शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे...
ना रेमडीसिविर ना फेबी फ्ल्यू ; भिगवण ट्रॉमा कोवीड सेंटर मधील अवस्था
गंभीर रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागते इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव ...
कोवीड सेंटरमध्ये कोणाचाच कोणाला मेळ लागत नसल्याचे दिसत आहे वास्तव..
भिगवण वार्ताहर .दि.२६
भिगवण कोविड सेंटर मध्ये आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन आणि फेबी फ्ल्यू गोळ्या मिळत नसल्यामुळे १५ ऑक्सिजन बेडची सुविधा कशासाठी देण्यात आली असा सवाल येथील रुग्ण...
कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी
भिगवण वार्ताहर.दि.१८
इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास...
धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत
भिगवण वार्ता ...२८
भिगवण येथे झालेल्या धनगर ऐक्य परिषदेत सर्वपक्षीय धनगर नेत्यांचे आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यावर एकमत झाले. यावेळी झालेल्या धनगर आरक्षण एल्गार सभेत संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.
या सभेची सांगता राज्यमंत्री मंडळाची यादी आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रमाने दिलेल्या २२ सवलतींचा अध्यादेश...
जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची तुषार झेंडेपाटील यांची मागणी
भिगवण वार्ताहर.दि.४जिल्हा पालक सचिव (मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रमुख )शासन निर्णयाचे परिपत्रकाचे उलंघन करून लोकशाहीची चेष्टा करीत असल्याने त्यांचेवर विधान सभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी केली.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,मुख्य सचिव संजय कुमार ,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच विरोधी पक्षनेता यांना निवेदन पाठवून...
मदनवाडी गावच्या उपसरपंच पदी सौ .संगीता सतीशराव बंडगर यांची बिनविरोध निवड
भिगवण वार्ताहर .दि.३
मदनवाडी ता.इंदापूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ .संगीता सतीश बंडगर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस.गाताडे यांनी दिली.
भिगवण शहराच्या शेजारी मोठ्या लोकसंखेचे गाव म्हणून मदनवाडी गावाची ओळख आहे.गावच्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच विद्यमान उपसरपंच रणजीत निकम यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर हि निवडणूक...
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित – हनुमंत बंडगर, जिल्हा परिषद सदस्य
भिगवण वार्ता ….२५
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिली .
भिगवण आणि परिसरात वाढत असलेल्या कोरोनाच्या थैमाना मुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच अति गंभीर रुग्णाला उपचारासाठी बारामती अथवा पुणे येथे पाठविणे रुग्णवाहिका विना जिकिरीचं...
भिगवण पोलीस कारवाईत जप्त केलेला वाळू साठयाचा ताबा पोलीस पाटील धुमाळ यांच्याकडे
भिगवण वार्ता.दि.२४भिगवण पोलिसांनी चोरट्या वाळू उपशावरील कारवाईत जप्त केलेल्या वाळू साठा सांभाळण्याची जबाबदारी महसूल विभागाने तक्रारवाडी गावच्या पोलीस पाटील यांच्यावर टाकल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे.
कोरोनाच्या कामामुळे आधीच त्रासून गेलेल्या पोलीस पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून “ घरचे झाले थोड आणि व्याह्याने धाडले घोडे ”असे म्हणायची वेळ आल्याचे दिसून येत आहे..
शेअर्स मार्केटमध्ये नफा कमविण्याच्या बहाण्याने ९ लाखाचा गंडा ; बिल्ट पेपर कंपनी कामगाराला फसविले
भिगवण वार्ताहर.दि.८
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्यासाठी आपल्याकडे द्या आणि गुंतविलेल्या पैशाची जबाबदारी आम्ही घेतो असे म्हणत ९ लाख २१ हजार रुपयांना गंडा घालण्याच्या प्रकार भिगवण पोलीस ठाणे हद्दीत घडला.याबाबत तीन आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी सुभाष पवार रा.आसू पवारवाडी ता.फलटण जि.सातारा...
आईसमान चुलतीवरच केला नराधमाने बलात्कार ; भिगवण पोलीस ठाण्याचे हद्दीतील गावातील नात्याला काळीमा फासणारी घटना
भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आवळल्या नराधमाच्या मुसक्या
भिगवण वार्ताहर.दि.१२
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका नराधमाने आईसमान असणाऱ्या चुलतीवर बलात्कार केल्याची घटना घडली.नात्याला काळिमा फासणारी घटना असूनही नात्याचा विचार आणि आरोपीच्या दहशतीखाली पीडितेनी ८ दिवसानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिगवण...