Monday, October 5, 2026

मदनवाडी राशीन रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकटरने ठोकरल्याने एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

भिगवण वार्ताहर.दि.१५ भिगवण राशीन राज्यमार्गावर उस वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी झाला.मदनवाडी गावच्या हद्दीत तुळजाभवानी हॉटेल समोर हा अपघात घडला असून नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मोहम्मद आबिद अन्सारी वय .२४...

डिकसळ येथे महिला किसानदिन साजरा : कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रम

भिगवण वार्ताहर.दि.२९ महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत डिकसळ येथे महिला किसान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना रब्बी हंगामाचे नियोजन करणे ,प्रधानमंत्री कृषी योजना बाबत माहिती देणे तसेच ई पिक पाहणी बद्दल माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी...

भिगवण रोटरीचे माध्यमातून सुरक्षा रक्षकांना उबदार ब्लँकेट चे वाटप ;

भिगवण वार्ताहर .दि.७ भिगवण रोटरी क्लबच्या माध्यमातून थंडीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आणि गुरख्यांना उबदार ब्ल्ँनकेट चे वाटप करण्यात आले.पुणे रिव्हर साईड क्लब आणि भिगवण क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी माहिती देताना भिगवण रोटरी अध्यक्ष संजय खाडे यांनी सुरक्षा रक्षक आणि वॉचमन रात्रीच्या वेळेस बँका तसेच सराफी पेढीचे...

भिगवण ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी महा पारेषण कार्यालया ठोकले टाळे ; २ कोटी १७ लाखाची थकबाकी

भिगवण वार्ताहर .दि.७ ग्रामपंचायत कराच्या थकबाकीमुळे भिगवण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कार्यालयाला ग्रामपंचायत विभागाकडून टाळे ठोकण्यात आले. वीज बिल थकल्यावर ग्राहकाची वीज कापणाऱ्या विभागाला ग्रामपंचायत विभागाने घरपट्टी आणि कर न भरल्यामुळे टाळे लाऊन दणका दिला असल्याचे दिसून आले. याबाबत भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या माहिती...

निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!

निसर्गातील 'इंजिनिअर' साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची 'कारागिरी' मनावर भुरळ घालणारी!
खेड:विजय सोनवणे 'अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला' निसर्गकन्या,कवयित्री बहिणाबाई यांनी सुगरणीच्या कौशल्याचे वर्णन या कवितेतून केलेले आहे. इवलीशी चोच आणि पायाची दोन बोटं...इंजिनियरलाही लाजवेल एवढं टॅलेंट मोठं... खरोखरच मनाला अचंबा वाटावा अशी गोष्ट आहे...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर

भिगवण वार्ताहर.दि.१० राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण  शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर भिगवण बारामती  हा नेहमीच जादा वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा राज्यमार्ग . मात्र  भिगवण ते शेटफळगढे दरम्यान च्या  परिसरामध्ये मदनवाडी ओढ्यावरती असणारा  जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पुल   आणि मदनवाडी घाटातील झेड आकाराचा वळणरस्ता अपघात प्रणव...

शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडीच्या सरपंचाला पडलं महागात ; ४ गुंठे जागेसाठी पदावरून व्हावं लागलं पायउतार

भिगवण वार्ताहर.दि.१५ शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडी गावच्या सरपंच शिवाजी किसन कन्हेरकर यांना चांगलंच महागात पडलं .अतिक्रमण प्रकरणात दोषी ठरल्यामुळे पद रद्द करण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी दिला.तर याच गावच्या महिला सदस्या सोनाली नितीन खटके यांना सदस्य पदावर अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिला .

वैश्विक महामारीच्या संकटाला संधी समजून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे केळीचे उत्पन्न

भिगवण वार्ताहर .दि .18 संधी समजून काम केलं पाहिजे  नेहमी म्हटल जात मात्र कोरोणा सारख्या वैश्विक महामारीच्या संकटाला संधी समजून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे केळीचे उत्पन्न घेऊन प्रत्यक्षात आणले आणि इतर शेतकऱ्यांच्या समोर देखील एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. इंदापुर तालुक्यातील मदनवाडी गावच्या तुकाराम बंडगर...

शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात...

अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता

सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाडअकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावातील प्रभाग दोन मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत पाच जणांनी शक्ती प्रदर्शन करीत इंदापूर येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दीपक कोकरे व सहाय्यक निवडणूक अधिकरी शिवाजी खोसे यांच्याकडे...