छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल बागल यांच्यावर जीवघेणा हल्ला ; कोयताने केलेल्या हल्ल्यात बागल गंभीर जखमी
बिग ब्रेकिंग न्यूज ......भिगवण वार्ताहर.दि.१
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पिंपळे गावचे माजी सरपंच अनिल बागल यांच्या वर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात बागल यांच्या डोक्यावर छातीवर आणि हाताच्या बोटावर सपासप वार करण्यात आल्याची माहिती.४ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पूर्ववैमनस्य...
४५ वर्षाच्या वरील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण ;तक्रारवाडी उपकेंद्रातील यशस्वी लसीकरण मोहीम
भिगवण वार्ताहर.दि.३०
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारवाडी उपकेंद्रात ४५ वर्षाच्या पुढील २३३३ नागरिकांपैकी १८४८ नागरिकांचे लसीकरण पहिल्या टप्प्यात झाल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी सांगितले.तर १५० च्या आसपास नागरिकांना दुसरा डोस हि देण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तक्रारवाडी उपकेंद्रात मदनवाडी आणि पोंधवडी अशी तीन गावे येतात.यात ४५ वर्षाच्या...
कोरोनाच्या भीतीने गळफास लावीत संपविले जीवन ; भिगवण येथील दुःखद घटना
भिगवण वार्ताहर.दि.२५
लस घेवूनही आपणाला कोरोनाच्या आजाराचा संसर्ग झाल्याचा संशय आणि उपचारासाठी बेड मिळणार नाही या भीती पोटी एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविल्याची घटना भिगवण येथे घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रकाश विष्णुपंत भगत वय ६५ असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. भगत...
अबब लॉक डाऊन चालू असताना विनाकारण फिरणाऱ्या २२४ पैकी २६ जणांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह ; भिगवण पोलिसांची विशेष मोहीम
भिगवण वार्ताहर.दि.२५
कोरोनाने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजविला जात असताना तसेच कडक निर्बंध असतानाही काही महाभाग विना कामाचे फिरताना दिसून येत आहे.या मोकाट वीरांना आवर घालण्यासाठी आणि सुपर स्प्रेडर समाजात फिरून संसर्ग वाढवू नये यासाठी इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे पोलीस अधिकारी जीवन माने यांनी मदनवाडी ब्रिज खाली या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी...
तहसीलदार पोलीस अधिकारी पथकाची भिगवण खासगी कोवीड सेंटरला भेट; भेट देत रुग्णाच्या सुविधा बाबत घेतली माहिती
भिगवण वार्ताहर . दि.२४
इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, अनेक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची जादा बिले आकारली जाऊ नयेत व ज्या प्रमाणात मोबदला घेतला जातो त्याच प्रमाणात सोयी दिल्या जातात का नाही हे पाहण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे व भिगवण पोलीस स्टेशनचे...
राज्यमंत्री भरणे यांनी दिलेला शब्द पाळला ; कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची केली सोय
भिगवण वार्ताहर . दि.२१
भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात...
कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी
भिगवण वार्ताहर.दि.१८
इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास...
डिकसळ येथील व्यायामशाळेच्या बांधकामासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास काळे यांचा उपोषणाचा इशारा
डिकसळ रिपोर्टर . दि.१६डिकसळ ता.इंदापुर येथे पुणे जिल्हा परिषद यांचेकडुन मा.बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण भैय्या माने यांच्या विशेष प्रयत्नातुन प्रभाग क्र. 1 मध्ये मुलांना व्यायाम करता यावा या उद्देशाने ५ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला होता. सदर व्यायाम शाळेसाठी ग्रामपंचायतीकडुन जागा निश्चित करून भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. परंतु आजपर्यंत बांधकाम चालु झाले नाही. याबाबत सामाजिक...
भिगवण येथे स्व. रमेश बापू जाधव प्रेरित श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय आघाडीची घोषणा
भिगवण वार्ताहर . दि.१६
इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडनुकीचा बिगुल वाजला आहे. याच अनुषगाने (दि. १५) रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात 'स्वर्गीय रमेश बापू जाधव' प्रेरित 'श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय पॅनल' ची घोषणा ज्येष्ठ नेते अशोकराव शिंदे यांनी केली.
अशोकराव शिंदे (भाऊ)मार्गदर्शक आणि...
अतिक्रमनावर कारवाईस ग्रामपंचायतीची दिरंगाई, तक्रारवाडी ग्रामंचायत कार्यालया समोर राजेंद्र गोडसे यांचे उपोषण
भिगवन वार्ताहर. दि . ७
तक्रारवाडी (ता. इंदापूर) या गावात अतिक्रमणाचा कहर वाढला असून अतिक्रमण करणाऱ्यांनी आता खाजगी मिळकतदारांचे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण केले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.
उजनी धरणाच्या निर्मिती वेळी पुनर्वसित झालेल्या तक्रारवाडी गावाला चारही बाजूने अतिक्रमणाचा...