भिगवण येथे स्व. रमेश बापू जाधव प्रेरित श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय आघाडीची घोषणा
भिगवण वार्ताहर . दि.१६
इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडनुकीचा बिगुल वाजला आहे. याच अनुषगाने (दि. १५) रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात 'स्वर्गीय रमेश बापू जाधव' प्रेरित 'श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय पॅनल' ची घोषणा ज्येष्ठ नेते अशोकराव शिंदे यांनी केली.
अशोकराव शिंदे (भाऊ)मार्गदर्शक आणि...
लामजेवाडी येथे दरोडा टाकीत जवळपास पावणेदोन लाखाची चोरी ; धारदार शस्त्राचा धाक दाखवीत तीन चोरट्यानी मारला डल्ला
भिगवण वार्ताहर.दि.१७
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या लामजेवाडी गावात चोरट्यांनी मध्यरात्री सुमारास दाराची कडे कोयंडे उचाकाटीत १ लाख ७७ हजार रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली. हिंदी बोलणाऱ्या या चोरट्यांनी घरमालकाला कोयत्याचा धाक दाखवून हि चोरी केल्यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार लामजेवाडी...
अतिक्रमनाच्या वादामुळे रस्त्याचे काम थांबविण्याची वेळ ;आदर्श गाव तक्रारवाडी येथील प्रकार
भिगवण वार्ताहर.दि.२१
तक्रारवाडी गावात वाढत असलेल्या अतिक्रमणाचा फटका विकास कामांना बसत असून दोन बाजूच्या प्लॉट धारकांच्या तक्रारी मुळे सदर ठिकाणचा रस्ता थांबविण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली असल्याचे दिसून आले.तर कमी रुंदीच्या रस्त्यामुळे अतिक्रमणाला खतपाणी मिळत असल्याचे वास्तव आहे.
तक्रारवाडी गावात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून सिमेंट रस्त्याचे काम...
भिगवण पोलिसांच्या सतर्कतेमुळे नैराश्यातून घर सोडून जाणारी मुलगी आईवडिलांच्या ताब्यात ; भिगवण पाेलिसांचे सर्व स्तरातून कौतुक
भिगवण वार्ताहर : दि.८शालेय परीक्षेत अपयश आलेल्या एका मुलीने नैराश्यातून खचून जाऊन घर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदरचा प्रयत्न भिगवण पोलिसांच्या समय सुचकतेमुळे तिचा हा प्रयत्न फसला. घर सोडून निघून जाणारी मुलगी पुन्हा घरच्यांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले.
या बाबतची हकीकत अशी, करमाळा तालुक्यातील एक मुलगी डिप्लोमा या शाखेत शिक्षण घेत...
किरकोळ कारणावरून विवाहितेने गळफास लावून दिला जीव ; भिगवण येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना
लहान मुलाला अभ्यास करताना आईने हाताने केली होती मारहाण म्हणून नवरा रागावल्याच्या कारणातून दिला जीव
भिगवण वार्ताहर.दि.१३
मुलाचा अभ्यास घेत असताना पती रागावल्याच्या कारणातून विवाहितेने गळफास लावीत जीव दिल्याची घटना भिगवण येथे घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रोहिणी राकेश थोरात वय २५ असे आत्महत्या केलेल्या...
उजनी धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
भिगवण वार्ताहर.दि.23
पुणे परिसरातील धरण क्षेत्रात आणि सर्वदुरच मुसळधार पाऊस पडल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरल्याने उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
दौंड तालुक्याच्या पुर्व भागातील खानवटे , राजेगाव, नायगाव, वाटलूज , मलठण , हिंगणी बेर्डी, शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे...
मुस्लिम बांधवाना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम ; भिगवण रोटरीचा बंधुभावाचा स्तुत्य उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि .८
भिगवण येथील रोटरी क्लबने जामा मज्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदू-मुस्लीम भाई -भाई हा ऐक्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.रमजान च्या पवित्र महिन्यात ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवांना शीरखुर्मा खाण्यासाठी बोलवत असतात.यातून बंधुभावाचा संदेश देण्यात...
तक्रारवाडी गावच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरानी केला जीवघेणा हल्ला ; जखमी तरुणांची प्रकृती नाजूक
भिगवण वार्ताहर .दि .१२भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर तक्रारवाडी गावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.लोखंडी रॉड आणि लाकडी बॅट ने केलेल्या हल्ल्यात तरुणांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे .
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार वैष्णव राहुल अनपट वय २१ असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. वैष्णव हा आपल्या दुकानाच्या मालाच्या...
बांधिलकी नारी सन्मानाची विशेष अंकाचे वितरण ; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतील योजना
भिगवण वार्ताहर.दि.९
लोकशाही समाजात सरकारच्या पोलीस यंत्रणेइतकी दुसरी कोणतीही संस्था नागरिकाच्या जवळ नसते .त्यामुळे पोलीस यंत्रणेतील अधिकारी यांनी महिला आणि मुलीच्या मनात विश्वासार्ह परिस्थिती निर्माण केली तर यातून अमुलाग्र बदल घडू शकतात याच उद्देशाने कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी चंद्रशेखर पवार...
विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करून त्याचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा
भिगवण वार्ताहर.दि.१०
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शासनाने ग्रामपंचायतीला विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करण्यासाठी परवानगी दिली होती.
या दंडातून भिगवण आणि परिसरातील ग्रामपंचायत कडे लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला हि रक्कम ग्रामपंचायत खात्यावर पडून असून या निधीचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा...




























