डम्परखाली चिरडून मृत्यू झालेल्या तरूणाच्या पत्नीने गळफास लावत दिला जीव ; भिगवण येथील दुर्दैवी घटना
भिगवण वार्ताहर.दि.१४
डंपरखाली चिरडून जीव गेलेल्या तरुणाच्या पत्नीने नवऱ्याच्या अंत्यविधीच्या दुसर्या दिवशीच गळफास घेत आपला जीव दिल्याची मनाला सुन्न करणारी घटना भिगवण येथे घडली.या दुर्दैवी घटनेने भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साक्षी उर्फ पियुषा ज्ञानेश्वर बिबे वय २० रा.विवेकानंद नगर भिगवण असे गळफास लावून जीव दिलेल्या...
कुंभारगाव येथील लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार पासुन सुरु ; सरपंच उज्वला परदेशी यांची माहिती
भिगवण वार्ताहर .दि.२१
कुंभारगाव येथील जागृत देवी अशी ओळख असणाऱ्या लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार पासून सुरु होणार असल्याची माहिती सरपंच उज्वला परदेशी यांनी दिली. दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेला परिसरातील नागरिक तसेच पुणे आणि मुंबई भागात राहणारे चाकरमाने मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात.
उजनी धरणाच्या किनारी वसलेल्या आणि पर्यटनासाठी...
अभिनेत्री पल्लवी सोनोने यांचा राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते सन्मान ; तावशी येथील कार्यक्रमात केला सन्मान .
भिगवण वार्ताहर .दि .२१भिगवण (ता इंदापूर) येथील पल्लवी सोनोने यांचा अभिनय क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.अभिनेत्री सोनोने यांना महिला दिनानिमित्त भारत इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल च्या वतीने वूमन सिनेमा अँड आर्टस इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने तावशी येथील जाहीर कार्यक्रमात सोनोने यांना भरणे यांच्या...
भिगवण बाजारपेठ वाहतूक कोंडी पासून घेणार मोकळा श्वास ; पोलिसांनी उचलले कारवाई साठी पाऊल
भिगवण वार्ताहर .दि.१९
भिगवण पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कार्यवाहीला सुरवात करीत दुकानाबाहेर माल लावणाऱ्या व्यापार्यांना सूचना करीत आपला माल दुकानात ठेवण्यास सांगितले.तर पहिल्या टप्यात व्यावसायिकांना सामंजस्याने जनजागृती करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांसाठी कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिला .
भिगवण बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून...
शाळेत मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी खुनाचा प्रयत्न ; भाईगिरी साठी सरसावली तरुण पिढी
भिगवण वार्ताहर.दि.१४
पाच वर्षापूर्वी शाळेतील भांडणात गालावर मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाने दिली.तर एका झापडीसाठी एखाद्या मृत्युच्या दारात पोहोचविन्यामागे गुंडगिरीची मानसिकता असल्याचे दिसून येते.
अगदी सिनेमात दाखविला जातो असाच सीन भिगवण मधील दोन दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्यात वापरला गेला.अकरावीच्या वर्गात शिकत...
तक्रारवाडी गावच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरानी केला जीवघेणा हल्ला ; जखमी तरुणांची प्रकृती नाजूक
भिगवण वार्ताहर .दि .१२भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर तक्रारवाडी गावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.लोखंडी रॉड आणि लाकडी बॅट ने केलेल्या हल्ल्यात तरुणांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे .
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार वैष्णव राहुल अनपट वय २१ असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. वैष्णव हा आपल्या दुकानाच्या मालाच्या...
भिगवण येथील श्रीनाथ संस्थेची निवडणूक बिनविरोध ; दिवंगत नेते रमेशराव जाधव यांनी रोवली होती पतसंस्थेची मुहूर्तमेढ
भिगवण वार्ताहर .दि.१२
भिगवण परिसरात सर्वसामान्य व्यापारी आणि गरजूंना तातडीच्या आर्थिक कारणासाठी संजीवनी ठरणाऱ्या श्रीनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.काळे यांनी दिली. १३ जागांकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत १३ अर्ज आल्याने हि घोषणा करण्यात आली.
इंदापूर तालुक्यात नावलौकिक असणाऱ्या आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या...
आईसमान चुलतीवरच केला नराधमाने बलात्कार ; भिगवण पोलीस ठाण्याचे हद्दीतील गावातील नात्याला काळीमा फासणारी घटना
भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आवळल्या नराधमाच्या मुसक्या
भिगवण वार्ताहर.दि.१२
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका नराधमाने आईसमान असणाऱ्या चुलतीवर बलात्कार केल्याची घटना घडली.नात्याला काळिमा फासणारी घटना असूनही नात्याचा विचार आणि आरोपीच्या दहशतीखाली पीडितेनी ८ दिवसानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिगवण...
साईंनाथ शिक्षण संस्थेच्या आदर्श शाळेचे रौप्य महोत्सवात पदार्पण ;राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोहळा
भिगवण वार्ताहर .दि .२७शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनांमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होते.असे मनोगत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले .भिगवण येथील आदर्श शाळेतील रौप्य महोत्सव कार्यक्रम वेळी भरणे बोलत होते .
डॉ खानावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने पंचवीस वर्षापुर्वी प्रतिकुल परिस्थितींमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करुन या भागातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली...
किरकोळ कारणावरून विवाहितेने गळफास लावून दिला जीव ; भिगवण येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना
लहान मुलाला अभ्यास करताना आईने हाताने केली होती मारहाण म्हणून नवरा रागावल्याच्या कारणातून दिला जीव
भिगवण वार्ताहर.दि.१३
मुलाचा अभ्यास घेत असताना पती रागावल्याच्या कारणातून विवाहितेने गळफास लावीत जीव दिल्याची घटना भिगवण येथे घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रोहिणी राकेश थोरात वय २५ असे आत्महत्या केलेल्या...