भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित
भिगवण वार्ताहर.दि.३
भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. भिगवणकर नागरिकांनी पवार यांना मिळालेल्या मानाच्या पुरस्काराबद्दल कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला .
उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
भिगवण वार्ताहर .दि.२५
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मदनवाडी गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्ग सर्विस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला.यावेळी...
उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; मदनवाडी हद्दीतील खळबळ जनक प्रकार
अनोळखी ४० ते४५ वयाच्या पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रसिद्धी पत्रका द्वारे आवाहन
भिगवण वार्ताहर .दि.२५
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.
अतिक्रमनाच्या वादामुळे रस्त्याचे काम थांबविण्याची वेळ ;आदर्श गाव तक्रारवाडी येथील प्रकार
भिगवण वार्ताहर.दि.२१
तक्रारवाडी गावात वाढत असलेल्या अतिक्रमणाचा फटका विकास कामांना बसत असून दोन बाजूच्या प्लॉट धारकांच्या तक्रारी मुळे सदर ठिकाणचा रस्ता थांबविण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली असल्याचे दिसून आले.तर कमी रुंदीच्या रस्त्यामुळे अतिक्रमणाला खतपाणी मिळत असल्याचे वास्तव आहे.
तक्रारवाडी गावात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून सिमेंट रस्त्याचे काम...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन ; भाजपा युवा मोर्चा यांचे भिगवण येथे आंदोलन
भिगवण वार्ताहर.दि.१८
भिगवण येथील मदनवाडी ब्रिजखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पुतळ्याचे दहन करीत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी नाना पटोले यांनी खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्य बाबत हे आंदोलन करण्यात आले.माजी मंत्री हर्षवर्धन...
रोटरीच्या माध्यमातून मराठी पत्रकार संघाला संगणक भेट ; पत्रकार दिनाचे निमित्त भिगवण रोटरीचे आदर्शवत कार्य
भिगवण वार्ताहर .दि .१२भिगवण रोटरी क्लब यांच्या माध्यमातून पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिगवण मराठी पत्रकार संघास संगणक भेट देण्यात आला . तारादेवी लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्तेयाचे वितरण करण्यात आले .आजच्या काळात संगणक हा काळाची गरज मानला जातो . ग्रामीण भागातील बातम्यांचे संकलन करून त्याचे प्रसिद्धी करण्यासाठी संगणकाची आवश्यकता भासते .याच्याच विचार करून पत्रकार दिनाच्या...
शेअर्स मार्केटमध्ये नफा कमविण्याच्या बहाण्याने ९ लाखाचा गंडा ; बिल्ट पेपर कंपनी कामगाराला फसविले
भिगवण वार्ताहर.दि.८
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्यासाठी आपल्याकडे द्या आणि गुंतविलेल्या पैशाची जबाबदारी आम्ही घेतो असे म्हणत ९ लाख २१ हजार रुपयांना गंडा घालण्याच्या प्रकार भिगवण पोलीस ठाणे हद्दीत घडला.याबाबत तीन आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी सुभाष पवार रा.आसू पवारवाडी ता.फलटण जि.सातारा...
भिगवण ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी महा पारेषण कार्यालया ठोकले टाळे ; २ कोटी १७ लाखाची थकबाकी
भिगवण वार्ताहर .दि.७
ग्रामपंचायत कराच्या थकबाकीमुळे भिगवण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कार्यालयाला ग्रामपंचायत विभागाकडून टाळे ठोकण्यात आले. वीज बिल थकल्यावर ग्राहकाची वीज कापणाऱ्या विभागाला ग्रामपंचायत विभागाने घरपट्टी आणि कर न भरल्यामुळे टाळे लाऊन दणका दिला असल्याचे दिसून आले.
याबाबत भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या माहिती...
भिगवण रोटरीचे माध्यमातून सुरक्षा रक्षकांना उबदार ब्लँकेट चे वाटप ;
भिगवण वार्ताहर .दि.७
भिगवण रोटरी क्लबच्या माध्यमातून थंडीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आणि गुरख्यांना उबदार ब्ल्ँनकेट चे वाटप करण्यात आले.पुणे रिव्हर साईड क्लब आणि भिगवण क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी माहिती देताना भिगवण रोटरी अध्यक्ष संजय खाडे यांनी सुरक्षा रक्षक आणि वॉचमन रात्रीच्या वेळेस बँका तसेच सराफी पेढीचे...
प्लास्टिक विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोड मध्ये ; ९ दुकानावर कारवाई करत १८ हजाराचा दंड वसूल
भिगवण वार्ताहर .दि.२५
प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८ हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे हनुमंत चांदगुडे यांनी दिली .ग्रामपंचायतीने घेतलेल्या या कडक भूमिकेच अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून व्यापारी वर्गातून मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यभरात...




























