छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल बागल यांच्यावर जीवघेणा हल्ला ; कोयताने केलेल्या हल्ल्यात बागल गंभीर जखमी
बिग ब्रेकिंग न्यूज ......भिगवण वार्ताहर.दि.१
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पिंपळे गावचे माजी सरपंच अनिल बागल यांच्या वर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात बागल यांच्या डोक्यावर छातीवर आणि हाताच्या बोटावर सपासप वार करण्यात आल्याची माहिती.४ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पूर्ववैमनस्य...
राज्यमंत्री भरणे यांनी दिलेला शब्द पाळला ; कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची केली सोय
भिगवण वार्ताहर . दि.२१
भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात...
कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी
भिगवण वार्ताहर.दि.१८
इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास...
भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा
भिगवण वार्ता .दि.३०भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा करण्यात आला.अगदीसर्वसामान्य नागरीका पासून ज्यांचे सारथ्य म्हणून काम केले अशा वरिष्ठ अधिकार्याने सलामी देत हा सेंड ऑफ चा कार्यक्रम पार पडल्याने पोलिसांत सुद्धा माणुसकी खचून भरलेली असल्याची जाण दिसून आली.
सहायक पोलिस निरीक्षक जीवन...
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित – हनुमंत बंडगर, जिल्हा परिषद सदस्य
भिगवण वार्ता ….२५
भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिली .
भिगवण आणि परिसरात वाढत असलेल्या कोरोनाच्या थैमाना मुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच अति गंभीर रुग्णाला उपचारासाठी बारामती अथवा पुणे येथे पाठविणे रुग्णवाहिका विना जिकिरीचं...
भिगवण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील इतर ४ आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी
भिगवण वार्ता.२५
भिगवण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील इतर ४ आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी तक्रारदार अशोक भास्कर भोसले यांनी बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात दि.१२ /०९ /२०२० रोजी डाळज नंबर ता.इंदापूर येथील अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत...
माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत संशयित रुग्णाची अँटी जेन तपासणी
भिगवण वार्ता .१९
बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बारामती आणि इंदापूर शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात ही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.
पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्यावतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटांमधील भिगवणमध्ये घरोघरी जाऊन...
उजनी धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
भिगवण वार्ताहर.दि.23
पुणे परिसरातील धरण क्षेत्रात आणि सर्वदुरच मुसळधार पाऊस पडल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरल्याने उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
दौंड तालुक्याच्या पुर्व भागातील खानवटे , राजेगाव, नायगाव, वाटलूज , मलठण , हिंगणी बेर्डी, शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे...
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर
भिगवण वार्ताहर.दि.१०
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर
भिगवण बारामती हा नेहमीच जादा वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा राज्यमार्ग . मात्र भिगवण ते शेटफळगढे दरम्यान च्या परिसरामध्ये मदनवाडी ओढ्यावरती असणारा जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पुल आणि मदनवाडी घाटातील झेड आकाराचा वळणरस्ता अपघात प्रणव...
निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!
खेड:विजय सोनवणे
'अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला'
निसर्गकन्या,कवयित्री बहिणाबाई यांनी सुगरणीच्या कौशल्याचे वर्णन या कवितेतून केलेले आहे.
इवलीशी चोच आणि पायाची दोन बोटं...इंजिनियरलाही लाजवेल एवढं टॅलेंट मोठं... खरोखरच मनाला अचंबा वाटावा अशी गोष्ट आहे...