Friday, July 4, 2025

भिगवण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील इतर ४ आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी

भिगवण वार्ता.२५ भिगवण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील इतर ४ आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी तक्रारदार अशोक भास्कर भोसले यांनी बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात दि.१२ /०९ /२०२० रोजी डाळज नंबर ता.इंदापूर येथील अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत...

भिगवण पोलिसांचा उत्साही वातावरणात गणपती बाप्पाला निरोप ;विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचा सहभाग

भिगवण वार्ताहर.दि.९ भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने विराजमान केलेल्या गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलिसांनी बेन्झोच्या ठेक्यावर थिरकत आनंदी वातावरणात बाप्पाला निरोप दिला. भिगवण पोलीस ठाण्यात प्रत्येक वर्षी गणपती विराजमान केले जातात.मात्र मागील दोन वर्षात आलेल्या जागतिक महामारी मुळे हा उत्सव साजरा...

हरवलेली पाखरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र ! यवतच्या विद्या विकास मंदिरातील विद्यार्थ्यां चे आगळ वेगळं स्नेह संमेलन

भिगवन प्रतिनिधी गणेश जराड दि.२०/०५/२०२४ हरवलेली पाखरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र.. विद्या विकास मंदिर शाळेच्या २००३-२००४ या बॅचचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे. विद्या विकास मंदिर यवत ता. दौंड‌ जि. पुणे या विद्यालयाच्या २००३-२००४ या इयत्ता बारावीच्या बॅचचे वार्षिक स्नेहसंमेलनचा सोहळा रविवार दि.१९ मे २०२४ रोजी...

भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा

भिगवण वार्ता .दि.३०भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा करण्यात आला.अगदीसर्वसामान्य नागरीका पासून ज्यांचे सारथ्य म्हणून काम केले अशा वरिष्ठ अधिकार्याने सलामी देत हा सेंड ऑफ चा कार्यक्रम पार पडल्याने पोलिसांत सुद्धा माणुसकी खचून भरलेली असल्याची जाण दिसून आली. सहायक पोलिस निरीक्षक जीवन...

साईंनाथ शिक्षण संस्थेच्या आदर्श शाळेचे रौप्य महोत्सवात पदार्पण ;राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोहळा

भिगवण वार्ताहर .दि .२७शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनांमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होते.असे मनोगत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले .भिगवण येथील आदर्श शाळेतील रौप्य महोत्सव कार्यक्रम वेळी भरणे बोलत होते . डॉ खानावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने पंचवीस वर्षापुर्वी प्रतिकुल परिस्थितींमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करुन या भागातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली...

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित – हनुमंत बंडगर, जिल्हा परिषद सदस्य

भिगवण वार्ता ….२५ भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिली . भिगवण आणि परिसरात वाढत असलेल्या कोरोनाच्या थैमाना मुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच अति गंभीर रुग्णाला उपचारासाठी बारामती अथवा पुणे येथे पाठविणे रुग्णवाहिका विना जिकिरीचं...

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग कोसळून चार कामगार गाडले गेल्याची भीती ; एन डी आर एफ पथकाकडून शोध मोहीम सुरु

भिगवण सत्यवार्ता न्यूज नेटवर्क. इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी शेतातील विहिरीचे संरक्षण कठड्याचे काम सुरु असताना त्यातील काही भाग कोसळून त्या खाली काम करणारे 4 मजूर गाडले गेल्याची घटना घडली. गाडले गेलेले चारही मजूर बेलवाडी गावाचे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.या ठिकाणी एन डी आर एफ पथक आले असून ढासळलेला भाग पोकलंड मशीनाच्या...

रोटरीच्या मदतीतून विरवाडी गावच्या दिव्यांग तरुणाला व्हीलचेअर ; भिगवण रोटरीचा स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि . २७रोटरी क्लब ऑफ भिगवन तसेच रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्ष संजय खाडे तसेच इतर रोटरीचे सदस्य उपस्थित होते . भिगवण विरवाडी येथील जाधव यास दिव्यांग असलेल्या कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करावा...

इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी ; नगरपालिका मुख्याधिकारी ,तहसीलदार तसेच तालुका आरोग्य अधिकारी ही महत्वाची पदे प्रभारी

तातडीने सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्याची राज्य ग्राहक संघटना सदस्य तुषार झेंडे पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे मागणी भिगवण वार्ताहर.दि.१३ कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीच्या काळात इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होत असून सक्षम अधिकाऱ्यांच्या तातडीने नियुक्त्या करण्याची मागणी राज्य ग्राहक संघटनेचे...

अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता

सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाडअकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावातील प्रभाग दोन मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत पाच जणांनी शक्ती प्रदर्शन करीत इंदापूर येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दीपक कोकरे व सहाय्यक निवडणूक अधिकरी शिवाजी खोसे यांच्याकडे...