जुगार अड्ड्यावर छापा घालीत राजकीय पक्षाच्या अध्यक्ष आणि नामंकित वस्तादासह २६ जुगाऱ्या वर कारवाई ; भिगवण पोलिसांची सिंघम कारवाई .

0
1439

रिमझिम पडणाऱ्या पावसात पोलिसांनी केली सिनेमा स्टाईल एंट्री…

६ तालुक्यातील २६ व्हाईट कॉलर खेळाडू सह शासकीय नोकर आणि गाव पुढारी जागेवरच पकडले..

भिगवण वार्ताहर.दि.१३

भिगवण वार्ताहर.दि.१३

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारीत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगारी नागरिकांना ताब्यात घेतले.यात शासकीय नोकराबरोबर राजकीय पदाधिकारी ,नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत निंबोडी रस्तावर असणाऱ्या डोंगराजवळ हा अड्डा चालविला जात असल्याची पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांना गोपनीय बातमी द्वारे मिळाली.याच बातमीचा आशय घेत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी तातडीने छापा टाकीत हि कारवाई केली. या कारवाईत ८ टेबलावर खेळविल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. यावेळी अड्डा चालक हनुमंत माणिक थोरात यांच्या सह २६ जुगार्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते ,पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने ,पोलीस अनंता वारगड ,संदीप लोंढे ,केशव चौधर ,नवनाथ भागवत ,समीर करे या पथकाने केली.

सदर कारवाईत अनेक पांढरपेशी मंडळी बरोबर शासकीय कर्मचारी , माजी ग्रा.पं सदस्यासह बारामती परिसारातील नामांकित वस्ताद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तर आपले नाव जुगार्याच्या यादीतून काढण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न करूनही पोलिसांनी कारवाईत कोणालाही दाद दिली नसल्याची माहिती मिळाली.

पोलीस कारवाई होण्याच्या भीतीने अनेक वेळा जागा बदल करून हा जुगार अड्डा चालविला जात होता. रिमझिम पाऊस चालू असताना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल ने या ठिकाणी प्रवेश करीत अड्ड्यावर छापा घातल्याने जुगार्यांच्या पळून जाण्याच्या प्रयत्नावर विरंजन पडले.

एकूण आठ टेबल वर सुरु असणाऱ्या या जुगारीत बारामती , इंदापूर ,दौंड ,कर्जत ,फलटण ,माळशिरस अशा ६ तालुक्यातील २६ जुगारी खेळत होते.त्यामुळे जागतिक महामारीच्या काळात सर्व व्यवहार आणि आस्थापना बंद असताना असले उद्योग कसे चालू राहतात असा प्रश्न पडतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here